२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए वे ए ठि मंडळ इक्वल आपोर्चुनिटी एमप्लॉयर आहे त्यामुळे समावेशक (?) असं टायटल देण्यात आलं आहे.

२१ एप्रिल चालेल. पुढल्या किती दिवसांत नक्की होईल ही तारीख. मी तिकीट काढलं तर ही तारीख बदलू देणार नाही. सकाळी रूट कनाल झालं तरी अर्धं सुन्नं बोळकं घेऊन यावं लागेल! Proud

२१ चालेल.

मृण, तुला कुठे घ्यायला यायचं ते इथे सांगणार की कोपच्यात ? म्हंजी मला त्याप्रमाणे सर्र्प्राइज ग्येश्ट डिक्लेर करता येतील.

सरप्राईज गेष्टांनी लगबगीने नाव नोंदवलय त्याचं काय पण? Proud

जी एस दादा, श्रीखंड घेऊन या! अशी ही मंडळाकडून ऑफिशियल लापि लावतो! Proud

वा वा बुवा, हे छान केलंत. जरा बाफ जर्सीत हलवा हो.

ठिकाणांची ऑप्शनं सांगा. मी त्या लेक पार्सिप्पनी पि ओ ए च्या हॉलची चौकशी करेन. >> बापरे.. एवढ्या लांब.. मध्य- दक्षिण मध्य जर्सीची बस काढावी लागेल Happy

नात्याभौ, आम्ही काढतोच की बस दर वेळी, ह्यावेळी तुम्ही काढा! Proud साऊथ जर्सी वाल्यांनो, जरा नॅशनल पार्क वगैरेंची चौकशी करा. म्हणजे देसायनू म्हणतात तसं सां का ही करता येतील आणि खाणं पिणं ही होईल.

जरा बाफ जर्सीत हलवा हो. >>> नैत्तर काय! मी आपली कधीची शोधत होते! Proud

खाणं पिणं वगैरेवर बाराची गाडी आली की मी येते. तोवर बाकीची कामं आहेत मला. तुमचं चालूद्या!

लवकर काय ते ठरवा. आमच्या घरी सर्रप्राइज ग्येश्ट येणार असतीत तर तयारीला थोडा वेळ हवा.

बरं दोन आठवड्यात ढेकणं जातील का ? झुरळांसाठी बेगॉन सारखं इथे काय मिळतं ? कुठल्या दुकानात ? उंदरांसाठी पिंजरे लावले आहेत.

Proud

अरे वा! बरं झालं पोस्टी पडल्या. अरे तारिख तोंडावर आली लोखो! मेनू पेक्षा वेनूचं बोला आधी. मी आज उद्यात त्या हॉलची चौकशी करुन लिहीतो इथे.
मला खरं एक जागा सुचली होती पण ती जरा लांब आहे. न्यु यॉर्कात लेक मिनेवास्का पाशी मोहाँक माऊंटन हाऊस आहे. डोंगरात तळं आहे (बोटिंग वगैरेची सोय आहे). खुपच सुंदर जागा आहे पण थोडी लांब आहे आणि थंडी असेल तर इतकी मजा येणार नाही.

http://www.mohonk.com/Photos-Videos

मृ, तू येणार आहेस त्यामुळे ए वे ए ठि होईलच.

>> तिकीट काढू का? खरंच आता यात काही बदल होणार नाही हे नक्की?
तिकिटं काढेपर्यंत नक्की बदल होणार नाही. Proud

मुंग्यासाठी पावडर >>> घरातली माणसं तर पावडर लावत नाहीत, मुंग्यांना कशाला हवीये पावडर ? उद्या म्हणाल मस्करा आणा Proud

२१ तारीख नक्की आहे का ?
व्हॅली फोर्ज नॅशनल पार्क चालेल का ? किंवा हे दोन - दोन्ही ठिकाणी आम्ही गेलोत.

http://www.dcnr.state.pa.us/stateparks/findapark/nockamixon/

http://www.dcnr.state.pa.us/stateparks/findapark/beltzville/ - ग्रिल्स आहेत, मुलांसाटी प्ले एरिया आहे .

भाई, इथलं काही ठरेपर्यंत तिकीटं काढत नाही. हीतर पहिली तारीख पडलीय. यापुढे हो-नाही करताकरता आणखी काही तारखा पडतील. मग बाफाच्या डोस्क्यावर (फायनल) तारीख, जागा आणि मुख्य मेनू ठरला की तिकिटं काढते.

Pages