व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क. २

१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!

************************************************************

आजचे चित्र :
Vyangchitr_2.jpg

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.


समदु:खी

कोसळले दु:खाचे आभाळ तुझ्यावर...
बुडालो दु:खाच्या सागरात मी,
शेवटची इच्छा माझी ऐकशील?
तळाशी जाशील तेव्हा माझ्या सखीचे अश्रू पुसशील?



इथे फुग्यांना मरण जन्मता
दगडांना पण चिरंजिवीता !
बुडुनीया वा उडून जाऊ,
पण नको जन्म हा आता !



कुणी मरत बुडुन
कुणी मरत उडुन
जिवनाचा हा खेळ माणसा
शिक मरत्या कडुन



छान आहे.



आत्महत्येच्या मार्गास
दिशेचे नाही बन्धन
बस्स, निमित्त हवे थाम्बवण्यास
हृदयाचे स्पन्दन

...;
आपला, लिम्बुटिम्बु



जन्म आपला वेगळा
तरी मरणयातना एकच
सुखं आपली वेगळी
पण दु:खाची कळ एकच..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
स्मित



मृत्युस कवटाळण्या
सिद्ध जीव दोन
अन्तिम ध्यास एकच परी
मार्ग ते भिन्न
...;
आपला, लिम्बुटिम्बु



लिंबूदा अरेरे
आशू, छान गं...



हाय टॉमी, बाय टॉमी
पुरेशी खोल, आहे रे खाडी | स्मित
घाबरुन कस चालेल रे भो
आता मार की बुडी || फिदीफिदी

(आयटे, अग आता विषयच असला, तर चारोळ्या कसल्या??)
...;
आपला, लिम्बुटिम्बु



चल, प्रार्थना करू
त्या दयाघनापाशी
दगडाला लाभो हलकेपणा
अन् फुग्याला वजनाच्या राशी

-अश्विनी



अश्विनी.... याला म्हणतात आशावाद.... good positive thinking स्मित



अश्विनी, गुड वन! स्मित
फक्त पहिली ओळ अशी हवी अस वाटते
चला, करूयात प्रार्थना
म्हणजे, ते आवाहन त्या दोघान्पैकी एकमेकास नसुन वाचकास केल्यासारखे होईल! स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु



शेवटी एकदा वाटून गेलं,
जगनं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं
हे आयूष्य नव्हतंच!!



च् च्.. जास्तच गंभीर झालो राव आपण सगळे.
थोडे हलके व्हा पाहू..
--
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कूणी भेटलाच नव्हता आपला!



....दगडाला लाभो हलकेपणा
अन् फुग्याला वजनाच्या राशी

स्मित अतिशय सुन्दर...... स्मित



LT.. पहिली मस्त आहे..
अश्विनी.. मस्त !!



बापाण्ची क्रुपा झाली
जन्म झाला naturally,
माणसाची क्रुपा झाली
मरन मात्र technically!!!



टेकनिकल मरण.... स्मित



काहीच्या काही उखाणा हाहा

गेले थकवायचे राहुनी
कितीतरी बँकाचे हफ्ते|
माझ्यापास डेबिट कार्डे
पण अकाउंट मध्ये नाही पैसे||

बुडालो होतो आकंठ मी
माझ्या प्रियेच्या प्रेमामध्ये|
एके दिवशी आला शार्क
आता उरलो नावापुरते||

भलामोठा दगड, बांधुन पायाला
आलो आज सागरात, जीव द्यायाला|
वाटले, होइल हलके ओझे जड दगडाने
पण दिसला एक मासा, जीव देता हलक्या फुग्याने||



काय म्हणता मिष्टर
मन अगदी झालय जड?
भार हलका करण्याची
भलती एकेकाची खोड!



प्रवेशिका - १
नभाची मर्यादा शोधायला
जाणार्‍या मित्रा एक सांग
अफाट भव्य या सागराचा
तरी लागतो का रे कुठे थांग ?

    ***
    If dreams are like movies, then memories are films about ghosts...



    प्रवेशिका - २
    मी : निळ्या सागराच्या तळाशी
    खरंच रत्ने असतात का रे ?
    तो : मीही शोधत आहे मित्रा
    या निळ्या नभीचे तारे

      ***
      If dreams are like movies, then memories are films about ghosts...



      प्रवेशिका - ३
      पुसशी मला, निळ्या तळाशी
      खरंच रत्ने असतात का रे ?
      सांग आधी, निळ्या छतावर
      कसे जडवलेत हे तारे ?

        ***
        If dreams are like movies, then memories are films about ghosts...



        माझा फुगा तुला घे
        तुझा दगड मला दे !
        स्वप्नं माझी तुला घे
        दु:ख तुझी मला दे !!



        स्लार्टी... प्रवेशिका २ मस्त आवडली... स्मित



        स्लार्टी,
        प्रवेशिका २ उत्तम आहे....आवडली....



        स्लार्टी... प्रवेशिका २ मस्त



        हवेतले नी पाण्यातले
        दोघेही खिन्न
        एकाच ठिकाणी जायला
        मार्ग मात्र भिन्न



        साध्य आहे मरण आणि
        साधन फुगा व दगड
        कारण, ऐनवेळी घात करेल
        जगण्याची तडफड



        वर खालीचा अर्थ निखळला,
        बुडुनि मरा वा उडुनि मरा |
        पल्याड भेटू उद्या गड्या रे ,
        धरू धारेवर चक्रधरा ||



        Jo_s, अश्विनी, जोशी मस्तच स्मित



        जे माझे अश्रू कुणा न दिसती,
        ते आज पहा रे, मी उडतो.
        मज अश्रून्चे ह्या ओझे झाले,
        ते लपवाया रे , मी बुडतो.



        पुष्कर.... जबरदस्त!



        पुष्कर,
        खूपच मस्त.. व्यंगचित्रातलं कारुण्य ओतप्रोत भरलय या चारोळीत...



        क्या बात है पुष्कर... अरेरे



        व्वा... काय शब्द आहेत..
        ग्रेट..



        संपव तुझे आयुष्य मित्र जाउन तळाकडे
        मी ही आयुष्याला कंटाळुन निघालोय वरती,
        उडी मात्र नको मारु माझ्या फुग्यावर
        नाहीतर होईल दोघांचीही फजिती.
        .................................................................................................................................
        ** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **



        फजिती माशाची होइल फक्त. दगडाला फुगा आपटला तर फुगा फुटेल... पण दगड तर न फुटता खालीच जाणार की ... ( का यातला दुसरा फजित तुम्ही आहात.. गळ घेउन नदीकाठी बसले असणार !)



        मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
        मायबोली गणेशोत्सव २००८