लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या पोळ्यांचा कुस्कर
कांदा
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट
मीठ
क्रमवार पाककृती:
१) शिळ्या पोळ्यांचा कुस्कर थोडा पाण्याचा हबकारा मारून नरम होऊ द्यावा .
२) हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.
३) पोळ्यांचा नरम कुस्कर + बारीक चिरलेला कांदा + मिरचीचे वाटण + मीठ + दाण्याचे कूट + बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून थालीपीठासाठी गोळा मळून घ्यावा.
४) तेल सोडून मस्त पातळ व खरपूस थालीपीठे भाजावीत.
५) उलटताना मोडण्याचा संभव असल्याने खूप मोठी थालीपीठे लावू नयेत.
गरम गरम थालीपीठावर तूप घालावे. लिंबाचे गोड लोणचे /चुंदा/ दही वा टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.
वाढणी/प्रमाण:
मी पाच शिळ्या पोळ्या कुस्करून घेतल्या होत्या. ४ मीडीयम साईझची थालीपीठे झाली.
अधिक टिपा:
पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण अॅड करून बघणार आहे. त्याने कुस्कराला एकजिनसीपणा येईल असे वाटतेय.
फोटु नाहीत, त्याआधीच निंबुडा यांची थालीपीठे गट्टम झाली होती.
माहितीचा स्रोत:
निंबुडा यांचे "पोह्याचे थालीपीठ" ही पाककृती
छानच हो? माध्यम
छानच हो?
माध्यम प्रायोजकांच्या स्पर्धेत भाग घ्या
आता काय करु?? शिळ्या
आता काय करु?? शिळ्या पोळ्यांचे थालिपिठ हे शीर्षक बघितले आणि पाकृ म्हणुन उघडणार तोच "विडंबन" दिसले.
आणि चला आता वाचुया काय लिहिलेय ह्या विडंबनात म्हणुन आत आले तर आत चक्क पाकृ...
ट्राय करून बघते हा.. (एक
ट्राय करून बघते हा..
(एक प्रः शिळं प्लान करून उरवायचं का?
)
खरंच कि
खरंच कि
(No subject)
मी चाल लावून वाचलं
मी चाल लावून वाचलं
युरी
युरी
विडंबन... आणि चक्क पाककृती
विडंबन... आणि चक्क पाककृती
युरी
युरी
युगा.... तू चाल लावू वाचलस
युगा....
तू चाल लावू वाचलस काय, खाल्लं पण असशील
पुढील आकर्षण उकडलेला भुंगा
पुढील आकर्षण
उकडलेला भुंगा
(No subject)
चाल लावून>> अयाईगं>>!!
चाल लावून>> अयाईगं>>!!

उकडलेला भुंगा>>
पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण
पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण अॅड करून बघणार आहे. त्याने कुस्कराला एकजिनसीपणा येईल असे वाटतेय.
पुढील भागात हे विनोदी विडंबन ...असेल कदाचीत
मस्त्च
मस्त्च
पाककृतीचे ही विडंबन करण्यात
पाककृतीचे ही विडंबन करण्यात भलतेच पोटेन्शियल आहे..... हे मी किरण्याच्या ध्यानात आणून दिलेले आहे
आता त्याने पुढील पदभार सांभाळावा 
भुंग्या नवे नवे धागे
भुंग्या
नवे नवे धागे गुंफण्याचे माझे हक्क मी एकाला विकलेत
आज युरी सुटलेले आहेत
आज युरी सुटलेले आहेत
कुठून ?
कुठून ?
नवे नवे धागे गुंफण्याचे माझे
नवे नवे धागे गुंफण्याचे माझे हक्क मी एकाला विकलेत >> तू एक कमी होतास?

आता इथे ६०% आयडी त्याचे नी ३९% तुझे.. बाकी समस्त पामर (व त्यांचे तुरळक ड्युआय) १% त! अवघडे
नजरेतून
नजरेतून
माझा एकही आयडी नाही. मी थाप
माझा एकही आयडी नाही.
मी थाप मारली होती. त्याबद्दल मारही खाल्ला
हाही तुमचा नाही का?
हाही तुमचा नाही का?
मी थाप मारली होती. त्याबद्दल
मी थाप मारली होती. त्याबद्दल मारही खाल्ला
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मग आता थालीपीठ खा

भुंग्या, ___/\___
भुंग्या,
___/\___
मला आता वाटू लागलंय की
मला आता वाटू लागलंय की का.का.क. प्रमाणे पुढील विभागही असायला हवेत माबोवरः
का.का.वि. == काहिच्या काही विडंबन
का.का.पा. == काहिच्या काही पाककृती
इ. इ.
छान पाककृती. यशस्वी
छान पाककृती. यशस्वी होईलही.
(बाकी विडंबनाला कविता कमी पडायला लागल्यात कक्काय ? )
चाल लावून>> उकडलेला भुंगा>>
चाल लावून>>
उकडलेला भुंगा>> यक्क...
युरी
(बाकी विडंबनाला कविता कमी
(बाकी विडंबनाला कविता कमी पडायला लागल्यात कक्काय ? >>>
विडंबन वाटाव्यात अशाच कविता येतात हल्ली
दिनेशदा, तुमच्या राज्यात
दिनेशदा, तुमच्या राज्यात घुसखोरी केली पहा भुंग्याने
(गम्मते ही दा)
Pages