खाऊन येऊ तिच्या हातची आज कुर्मा पुरी

Submitted by pradyumnasantu on 19 February, 2012 - 20:20

चल ग आई नेते तुजला मी ताईच्या घरी
खाऊन येऊ तिच्या हातची आज कुर्मा पुरी
रोजरोज खाऊनी बोअर जाहले मी
आपणच केलेली भाजी भाकरी

चाल झपाझप उचल पाय लवकरी
अय्या मी विसरले की पाकीटच घरी
आहेत का जवळ आई पैसे तरी?
चल तर मग नेते तुला ताईच्या घरी

बेल वाजता ट्रिंगट्रिंगट्रिंग ताई दार खोलते
पाहून दोघीना तिच्या खुषीस ना मोल ते
डोळ्यातील पाणी घेते कोरडे करुन
किती दिवस झाले आई तुम्हाला पाहून

ताई तुझ्या हातचे ग जेवण मजेदार
महिने बघ लोटले खाउन चटपट लज्जतदार
चल ग धाकटे जाऊ आपण झटकन बाजारी
आणुया ती भाजी ताजी काही करण्या तरी

सटकल्या पहा अशा बडबडत त्या दोघी बहीणी
परतून आल्या सावकाश मग त्या दोन वाजुनी
आई म्हणते घ्या ग मुलीनो पानावर बसुन
कुर्मा पुरी, आणि मश्रुमची करी घ्या तुम्ही खाउन

मानभावी त्या ऐकुन म्हणती आईस उद्देशून
आई ग तू स्वैपाकसुद्धा ठेवलास करून
सॊरी आई भेटली मला एक जुनी मैत्रिण
आग्रहाने गेली आम्हाला तिच घरी घेऊन

आई म्हणते असूदे बरे ठाउक आहे मला
कोण लाडकी मैत्रीण घेऊन जाते घरी तुला
वाटेमध्ये भेटलीस तू राणी मुकर्जीला
तीच घेऊनी तुम्हा बैसली जाउन मॆटीनीला

आईने केलेले सारे खाउनिया चापून
तासा दो तासानी उठल्या सुस्त शांत झोपून
चल ग आई परतुया घरी बाबा येतील दमून
सगळे आहे करायचे मज आज मुळापासून

घाबरू नको बाई ग तू सर्व आहे तैय्यार
लाडक्या तुझ्या बाबाना मी उपाशी ना ठेवणार
निघण्यापूर्वी आज सकाळी उसळ मी केली
उसळ करता करता इकडे आमटी बनविली

किती ग्रेट ग आई तू पण सगळे हे करून
उपकारच केलेस आज मज विश्रांती देउन
होय मुलीनो आम्हाला तर तुम्हीच संभाळले
लग्नानंतर शिवाय तुमच्या असते कसे झाले

खो खो हसुनी पोरी म्हणती आई तू ग्रेट
करीनास मी तुला भेटविन पुढच्या आठवड्यात
आई म्हणते त्यातही मुली आहे मी तुमच्या पुढे
सैफ़बरोबर गेले होते कालच करीनाकडे

गुलमोहर: 

काहीच सुचले नाही की कविता करायच्या का? एकाखाली एक ओळी लिहिल्या की त्याला कविता म्हणतात का? तुम्ही एकदा तरी तुमचे लिहिलेले साहित्य वाचता का? तुम्हाला तरी ते वाचवते का?

एम्बी:
मनापासून क्षमा मागतो. कविता करण्यामागे कुणाच्याही मनाला त्रास व्हावा असा माझा मुळीच हेतू नव्हता. उलट साधेसुधे शब्द वापरून व साधेसुधे रोजच्या जीवनातील विषय घेउन काही लिहिता आले व त्यामुळे कोणाला आनंद मिळाला तर पहावे असा इरादा होता. आपला प्रतिसाद वाचून मनाला अतिशय वेदना झाल्या. आपल्याप्रमाणे आणखी एकादोघानी जरी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर मी मायबोलीवर कविता लिहिणे त्वरीत थांबविन अशी खात्री देतो.

प्रद्युम्नजी, मला आपली कविता आवडली व एम्बी यांच्या शेर्‍यावरचा आपला सुसंस्कृत प्रतिसाद भावला. माबोवर मीं तरी चोखंदळपणाला तुसडेपणाचा वास येणार नाही याची खूप दक्षता घेतो. << मनापासून क्षमा मागतो >> व << तर मी मायबोलीवर कविता लिहिणे त्वरीत थांबविन >> याची या कवितेच्या संदर्भात कांहीच गरज नव्हती, असं मला तीव्रतेने वाटतं.

प्रद्युम्नजी, मला आपली कविता आवडली व एम्बी यांच्या शेर्‍यावरचा आपला सुसंस्कृत प्रतिसाद भावला. माबोवर मीं तरी चोखंदळपणाला तुसडेपणाचा वास येणार नाही याची खूप दक्षता घेतो. << मनापासून क्षमा मागतो >> व << तर मी मायबोलीवर कविता लिहिणे त्वरीत थांबविन >> याची या कवितेच्या संदर्भात कांहीच गरज नव्हती, असं मला तीव्रतेने वाटतं.+१.
भाऊ योग्य सांगत आहेत प्रधुम्न्जी.

विभाग्रज यांच्याशी सहमत

प्रत्येकाचे प्रतिसाद वेगळे. कुणा एकाला संपूर्ण मायबोली समजू नये. ई आपल्या कविता वाचतो. कधी कधी प्रतिसाद द्यायचे राहून जाते . पण स्वआनंदासाठी लिहीणारा. काही न काही प्रयोग करीत असणारा असा कवी सोडून जाऊ नये हे वाटतं.

यापुढे आपली इच्छा !

प्रद्युम्न,
एम्बी यानी जो प्रतिसाद दिला आहे तो गंभीरपणे घेण्यायोग्यतेचा वाटू नये. त्यानी तुमच्या यापूर्वीच्या कविता वाचलेल्या दिसत नाही. त्यांच्या प्रतिसादातलेच पहिले वाक्य वापरायचे झाले तर काही लेखन येत नसले तर दुसर्‍यांच्या लिखाणावर असा प्रतिसाद लिहायचा का? अशी पृच्छा करावीशी वाटते. प्रतिसाद देताना संयमित आणि सौजन्यपूर्ण भाषा वापरायचे त्याना का सुचले नाही याचे कारण समजत नाही. कविता आवडली नसेल तर संयमित आणि तरीही रोखठोक प्रतिसाद "समजली नाही / आवडली नाही " इतपत देणे चांगल्या अभिरुचीचे दर्शक झाले असते. तेव्हा अशा अभिरुचीचा अभाव असलेल्या प्रतिसादाला कुठली जागा द्यायची ते सांगणे न लगे. चाकोरीबाहेरचे विषय कुशलतेने आणि परिणामकारकपणे हाताळणारे कवी आहात तुम्ही. अशा कवितांपासून सुज्ञ रसिकांना वंचित करू नका.

आता तुमच्या कवितेविषयी लिहायचे झाले तर आई आणि मुलींमधल्या नात्यात आईला गृहित धरण्याचा मुलींमधला अवखळपणा आणि आईचे निर्व्याज प्रेम तुम्ही दाखवले आहे. रचनेत जरा अधिक सफाई, लांबीमधे थोडी काटछाट आवश्य आहे इतकेच.

पुन्हा सांगतो, लिहिणे थांबवू नका.

प्रद्युम्न, तुमच्या बर्‍याच कविता वाचल्या आणि काही आवडल्यासुद्धा. ही कविता फार आवडली नाही, पण आशय पोचतो नक्कीच. अगदी कैच्याकै नाहीए. बर्‍याच लोकांनी इतक्या वाईट आणि चोरलेल्या कविता टाकल्या आहेत कि तुमचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच मनापर्यंत पोचतो. आमच्यासारख्या वाचणार्‍यांसाठी प्लीज लिहित रहा.

प्रद्युम्नसंतू, ही कविता खुप आवडली. काही लोकांना का आवडली नाही, हा त्यांचा चॉईस. पण त्यांचा तुसडेपणा तुम्ही मनावर घेऊ नका.
असो, कशा काही मुली असतात नाही? वरवर काळजी दाखवून आईवर सगळं काम टाकणार्‍या. काय म्हणावं या असल्या स्वभावाला? एम. कर्णिक म्हणतात तसा केवळ अवखळपणा हा नक्कीच नाही. आळशीपणा आणि मनभावीपणा म्हणता येईल का याला?

मायबोली अथवा कोणत्याही पब्लिक फोरमवर नम्रपणे वर्तन करणे ही वेगळी बाब व कविता चांगली वाईट असणे ही वेगळी बाब. त्यानुसार, कवितेतील 'आई न सांगता सगळे करून ठेवते आणि मुले (काही प्रमाणात) आई वडिलांच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतात' हा संदेश फार फार आवडला. पण कविता म्हणून ही रचना बर्‍यापैकी लांबली असे वाटले व पुढे पुढे वाचत जावे अशी ओढ कमी वाटली. बाकी चर्चा 'अकाव्यचर्चा' वाटत आहे. Happy

-'बेफिकीर'!

एखाद्याची शैली , त्याला भावलेला विषय ,त्याने मांडलेला आशय, आपल्याला आवडले नाही कि लगेच कविताच चांगली नाही अस ठरवून ९५ टक्के वाचक मोकळे होतात त्यात कवीचा काय दोष ?
प्रद्युम्नाजी तुमचे विषय हाताळणी मला कधी कधी तितकी प्रौढ वाटत नाही पण सुखावह नक्कीच असते मग
( काही कविता सोडून ) मला तुमची कविता नेहमी भावते .
पुलेशु !!

स्वःताच्या धाग्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया येताच विनम्रता धारण करणारे हे महाशय माझ्या कवितेवर कसा प्रतिसाद देतात हे पहा. त्यामुळे एम्बी यांच्या प्रतिसादाशी मी १००% सहमत आहे. आधी विपुल साहित्य्/कविता वाचन करा. आणि मग काव्यनिर्मिती करा.

prad1.jpgprad3.jpgprad2.jpg

-फडतूस

किरण, विभाग्रज, शाम, कर्णिक यांना १००% अनुमोदन. प्रद्युम्नजी अहो मनाला वेदना होउ देउ नका. एखादा असा प्रतिसाद आला तर एखाद्याला सवय असते म्हणून सोयिस्करपणे दुर्लक्ष करून काव्यलेखन चालु ठेवा. समजून घेऊन प्रांजळपणे प्रतिसाद देणारे मायबोलीकर पण आहेत ना. त्यांच्यासाठी आणि तुमच्या आनन्दासाठी लिहा, लिखाण बंद कशाला करता.

स्वःताच्या धाग्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया येताच विनम्रता धारण करणारे हे महाशय माझ्या कवितेवर कसा प्रतिसाद देतात हे पहा. त्यामुळे एम्बी यांच्या प्रतिसादाशी मी १००% सहमत आहे. आधी विपुल साहित्य्/कविता वाचन करा. आणि मग काव्यनिर्मिती करा.>>>>
श्री फडतुसः आपला उपरोल्लेखित प्रतिसाद वाचून दु:ख झालेच. आपण माझे प्रोफाइल जरूर पहावे. खेदाचे कारण म्हणजे पदव्युत्तर प्रथम श्रेणीचे वाडःमयाचे शिक्षणही उपयोगी पडले नाही. फिल्म इंस्टिट्यूट्सारख्या संस्थेत रसग्रहणाचा कोर्स केला तोही वाया गेला. वीस वर्षे महाविद्यालयात अध्यापन केलेलेही कामी येत नाही. आपण विपुल वाचन करण्याचा दिलेला सल्ला पाहून खरोखरच निराश झालो. पण आता करायचे तरी काय? एक कचकचित शिवी हासडणे किंवा सिगरेट फुंकणे हा उपाय होऊ शकतो काय? मुळीच नाही. शिवाय कविता हे एक शस्त्र आहे. तरुणांच्या मनांवर तात्काळ प्रभाव टाकते. निराशेवर मात करण्यासाठी शिवी वा धुम्रपान हे उत्तर नाही हे दर्शविण्याच्याच उद्देशातून मी आपल्या कवितेवर थोडासा उपहासात्मक प्रतिसाद लिहिला.
आपण त्यावर तीव्र आक्षेप घेऊन 'काही पण प्रतिसाद देता काय" अशी पृच्छा केल्यामुळे नाराज होऊन मी माझा पुढचा शेरा मारला. तिथे माझे शब्द वापरताना चुकले. त्याबद्दल क्षमस्व.
धूर कवितेवर आधारीत कविता ही रिमार्क केवळ औपरोधिक प्रतिसाद होता. पण आपण जणू वैरच पत्करलेत. मला हे काहीच अभिप्रेत नव्हते. आपण तिथून व मी इथून शब्दांचे बाण सोडावेत व एकमेकाला निष्कारण जखमी करत रहावे हे अनंतकाळ लांबू शकते. त्यात कोणाला काय मिळणार? म्हणून मी ही चर्चा थांबवू इच्छितो. यापुढे आपली मर्जी. आपल्याला जो मनस्ताप दिला त्याबद्दल पुन्हा क्षमस्व.
राहता राहिले एमबी यांच्या प्रतिसादाविषयी. मला वाटते की त्यांचा प्रतिसाद कदाचित काही गैरसमजातून निर्माण झाला असावा. माझ्या इतर अनेक कविता मायबोलीवर रसिकांना आवडल्या आहेत. त्या वाचून त्या व आपणही आपले मत पुन्हा नव्याने बनवाल अशी अपेक्षा करतो