भाग - १ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32463
भाग - २ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32483
बेडसे लेणी पाहून भरपूर फोटो काढून झाल्यावर सर्वांच्या पोटात कावळे ओरडण्यास सुरवात झाली. सकाळचा मिसळ्-पावाचा नाष्ता केव्हाच जिरला होता. परत एकदा पायथ्यापाशील "पवना हट्स" रेसॉर्टकडे मोर्चा वळवला. तेथे पोहोचेपर्यंत १२:३० वा. होते. त्यामूळे आलेल्या पिठले, त्यांच्याच शेतात पिकवलेल्या फ्लॉवर्-मटार्-बटाटा भाजी, टोमॅटो-काकडीची कोशींबीर, हिरव्या मिरच्यांचा ठेचा / खर्डा, बाजरी-ज्वारी-तांदूळाच्या गरमा-गरम चूलीवर्च्या भाकर्या अशा गावरान जेवणावर सर्व जण तुटून पडले. त्यामुळे नंतर बर्याच मंडळींचा पुढील कार्यक्रम अर्ध्यावर सोडून तेथेच ताणून द्यायची इच्छा दिसली. पण लिडरच्या इशार्यानुसार सर्वजण निमूटपणे बसमध्ये जाऊन बसले.
तेथून १:३० वा. नीघून हडशीच्या मंदिराकडे कूच केले. बेड्से लेण्यांपासून पवना डॅम साधारणपणे १०कि.मी. वर आहे. पवना डॅमच्या डाव्या बाजुकडून (धरणाखालून) एक रस्ता पौड गावाकडे जातो. वाटेत डाव्या बाजुला तिकोना राहतो. त्याचा फोटो -
तसेच वाटेतील एक द्रुष्य -
तेथून पुढे ३/४ कि.मी. गेल्यावर ऊजव्या बाजुला हडशी मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसतो. साधारण घाट रस्त्यासारख्या रस्त्याने २/३ कि.मी. वर चढल्यावर आपण मंदिरापाशी पोहोचतो. प्रथम दर्शनी एक खांब लागतो.
तेथे श्री. गणेश मंदिर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजुस आत जाण्यासाठी पायर्या आहेत. त्यापुढे मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजुस पायवाटा व मध्यभागी कारंजी व फुलांचे ताटवे आहेत.
त्या ताटव्यामधील काही शोभीवंत फुले.
पुढे गेल्यावर तुळशी वृंदावन लागते. त्याच्या दोन्ही बाजुस छोटेखानी पुष्करणी (हौद) आहेत. त्यामध्ये वेगवेगळी कमळे ऊमलली होती.
त्यासमोर मुख्य मंदिर लागते. मंदिरामध्ये विठ्ठल्-रखुमाईच्या प्रसन्न मूर्ती आहेत. मुर्तींचे फोटो काढता येत नाहीत.
मंदिराच्या मागे एक कुठलातरी डोंगर सुळका दिसतो. मला ओळखता आला नाही.
पाचवा फोटो (देवळाचा लाँग शॉट)
पाचवा फोटो (देवळाचा लाँग शॉट) मस्त आहे.
सुंदर प्रकाशचित्र रे अतुल
सुंदर प्रकाशचित्र रे अतुल
कमळाचे सगळेच फोटो छान आहेत आणि सगळ्यात वरती वर्णन केलेला मेन्यू पण, एकदम तोंपासु .... त्याचा पण एखादा फोटो टाक ना 
सुंदर मंदिर आहे... आता बेडसे
सुंदर मंदिर आहे...
आता बेडसे आणि हे एकत्र करीनच.. 
पुन्हा फुलांची प्रचि जास्त
पुन्हा फुलांची प्रचि जास्त आवडली.
>>तसेच वाटेतील एक द्रुष्य -
या प्रचि चे काँपोझिशन छान आहे
सुंदर.
सुंदर.
११, १२ मी बेड्से, तिकोना
११, १२ मी बेड्से, तिकोना करणारच होते आता हे मंदीर ही बघून घेते
मस्तच
मस्तच
सुंदर फोटो
सुंदर फोटो
छान फोटो.
छान फोटो.
ललिता-प्रीती, मंजिरी सोमण,
ललिता-प्रीती, मंजिरी सोमण, सेनापती, मंदार, जागू, सुरश, ईनमीन तीन, थंड, मार्को पोलो - सर्वांना धन्यवाद
छान फोटो. पाचवा फोटो (देवळाचा
छान फोटो.
पाचवा फोटो (देवळाचा लाँग शॉट) मस्त आहे.>>>+१
सगळीच प्रचि सुरेख.
सगळीच प्रचि सुरेख.
२ कमळांचा फोटो ग्रेट आलाय....
२ कमळांचा फोटो ग्रेट आलाय....
भारीच ! तीनही भागातील सगळे
भारीच ! तीनही भागातील सगळे प्र.ची. सुंदर आलेत
मस्तं प्रचि..... तुळशी
मस्तं प्रचि.....

तुळशी वृंदावन.... तर बेस्टं.....
आणि त्या नंतरचे कमळाचे फोटो पण सह्ही... तो प्रतिबिंबवाला खास आलाय
फोटो छानच आहेत पण हे शिबीर
फोटो छानच आहेत पण हे शिबीर होते म्हणून, अनेक जणांनी काढलेला एकाच वस्तूचा (ऑबजेक्ट) फोटो बघायला मिळाला असता तर खुप मजा आली असती. जमवता येईल का ते ?
छान फोटो आहेत, काळोख पडल्यावर
छान फोटो आहेत, काळोख पडल्यावर रोषणाईपण छान दिसते तिथे.
छान.
छान.
प्रचि, स्थळ पाहिलेले असूनही
प्रचि,
स्थळ पाहिलेले असूनही अप्रतीम रंगीत चित्रांमुळे पुन्हा त्या मंदिराला भेट दिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.
सुंदर फोटो,
सुंदर फोटो,
धन्यवाद दिनेशदा, जो_एस, जयु,
धन्यवाद दिनेशदा, जो_एस, जयु, शशिकांत, सुनिल, प्_जो