बेडसे लेणी, हडशी मंदिर व पवना डॅम बॅकवॉटर - फोटोग्राफी क्लबचे वन डे एक्सकर्शन-०२.०२.२०१२ - भाग २

Submitted by अतुलनीय on 6 February, 2012 - 00:35

भाग - १ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32463

बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी एक "पवना हट्स" नावाच्या रेसॉर्टला नाष्त्यासाठी ठीक ८:३० वा. पोहोचलो. ते एक चांगले ठीकाण आहे. नाष्त्याची क्वॉलिटी बघून दुपारच्या जेवणाचीसुध्धा त्यांनाच ऑर्डर दिली. ---------------पुढे चालु -

ही लेणी कार्ला, भाजे व बेडसे अशा लेणीसमुहामधील एक आहेत. कार्ला व भाजे ही लेणी अनुक्रमे मुंबई-पुणे जुन्या व एक्प्रेस हायवे जवळ आहेत. तेथे लोणावळा-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकावर ऊतरुन जाता येते. तर बेडसे येथे जाण्यासाठी जुन्या हायवेवरुन कामशेत येथे डावीकडे वळावे (पुण्याकडून मुंबईकडे जाताना) व पवना डॅमच्या रस्त्याने गेल्यास पवना डॅमच्या आधी दहा कि.मी. वर बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी आपण पोहोचतो. नाष्ता झाल्यावर १०:००वा. लेण्याच्या डोंगराकडे कूच केले. लेण्यांशी पोहोचण्यासाठी जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. वर जाताना आमच्याशिवाय एक वयस्क इटालियन दांपत्यसुध्धा खास लेणी पहाण्यास आले होते. त्यांनी आम्हाला विचारले की तुम्ही लोक येथे बर्‍याचदा आला असाल. आम्ही त्यांना फक्त हो असे उत्तर दिले (व मनातल्या - मनात स्वःतची निर्भत्सना केली. कारण आमच्यापैकी बहुतेक जण तेथे प्रथमच जात होते.) जाता जाता फोटुग्राफी चालू होतीच. त्यापैकी काही.

_MG_1604.JPG_MG_1607.JPG_MG_1608.JPG_MG_1611.JPG_MG_1613.JPG_MG_1619.JPGPicture_112_0.JPGPicture_99.JPGPicture_117.JPG

वर पोहोचल्यावर सुंदर अश्या दोन गुंफा आहेत. अजिंठा व वेरुळच्या लेण्यांची आठवण होते. त्या लेण्यांचे काही फोटो.

Picture_120.JPGPicture_125.JPGPicture121.jpgPicture_122.JPGPicture_123.JPGPicture_124.JPGPicture_127.JPGPicture_129.JPGPicture_130_0.JPGPicture_136.JPGPicture_137.JPGPicture_138.JPG

या लेण्यांमध्ये अस्मादिक

Picture_142_0.JPG

व आमच्या फोटोग्राफी क्लबचा ग्रुपफोटू

_MG_1684.JPG

गुलमोहर: 

तिकोणा किल्ल्याजवळ ना रे ? मी गेलोय बहुतेक ( आठवत नाही.. मुली होत्या खूप बरोबर )
>>> किरण्या, पुढच्या पोष्टमध्ये तिकोना (तिकोणा नव्हे) तसेच तुंग, लोहगड व विसापुरचे फोटो टाकीनच.

छान.

क्लब चांगला जोरदार आहे की तुमचा. ग्रूप फोटो त्या इटालियन आजी-आजोबांनी काढला की काय?
>>> नाही लले - ग्रूप फोटो माझ्या कॅमेर्‍यावरच (with tripod) १०से.चा ऑटो-टायमर लाउन काढला आहे.

फोटोग्राफी क्लबचा ग्रुपफोटू>>> सॉल्लिड ग्रुप आहे. इतके सगळेजण प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत?
सगळे प्रचि मस्तच!!!

फोटोग्राफी क्लबचा ग्रुपफोटू>>> सॉल्लिड ग्रुप आहे. इतके सगळेजण प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत?
सगळे प्रचि मस्तच!!!
>>> शापित गंधर्व, अरे आम्ही सर्वजण टाटा मोटर्स कंपनीत पुण्याला कामाला आहोत. कंपनीचा फोटोग्राफी क्लब आहे. सर्वजण हौशी फोटोग्राफर्सच आहेत. थोडेफार सामान्य लोकांपेक्षा जास्त माहिती असलेले.

छान वर्णन आणि फोटोग्राफ सुध्दा.:स्मित:
इथले वैशिष्ट म्हणजे समोरचे जे दोन दर्शनी खांब आहेत ते. त्यावर असलेल्या स्त्री-पुरुषांच्या, हत्ती, घोड्यांच्या दगडी प्रतिमा इतक्या प्रमाणबद्द आहेत की त्यावरुन नजर हटत नाही. याच खांबावरिल हत्तीना सुळे दिसत नाहीत. तिथे फक्त खोबणी आहेत. या खोबणीत पूर्वी खरे हस्तीदंत होते असे म्हटले जाते. घोड्यांना लगाम दिसत नाहीत. ते पूर्वी रंगवलेले होते असा कयास आहे.

स्तुपावर असलेली हर्मिका व वेदिका आजही चागल्या अवस्थेत आहे. पण त्यावरिल छत्रावलीची रचना मात्र काळाच्या ओघात नष्ट झालेली आहे.

ग्रुप फोटोच्या मागे दिसणारा 'विहार' ही तितकाच वैशिष्टपूर्ण आहे.

अरे वा.. पायऱ्या बांधल्या आहेत आता... Happy ते चाफ्याचे झाड वरती पोचल्यावर उजव्या हाताला आहे ना? आठवणी धुरकट व्हायला लागल्यात.. जायलाच हवे आता एक दिवस.. Happy

वेताळ... खरे बोलतोय... हर्मिका तशी आजही बरेच ठिकाणी टिकून आहे पण वेदिका जरा कमीच दिसतात. इथे दुर्दैवाने लाकडी फासळ्या पाडून गेल्या आहेत. भाजे लेण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही लाकडी फासळ्या असणे.. Happy

कोणाला लेणी आणि गुहा याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास लेणी महाराष्ट्राची हे दाउद दळवी यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे..

सेनापती, लाकडी फासळ्या भाज्यालेण्याबरोबरच, कार्ला(वेहेरगाव) लेण्यातही बर्‍यापैकी टिकून आहेत.

होय.. स्त्री-पुरुष (डोनर कपल) मूर्ती देखील अजूनही शाबूत आहेत... शिवाय कार्ल्याचे वैशिष्ट्य असलेला विजय स्तंभ देखील.. Happy

सही Happy

धन्यवाद - वेताळ, सेनापती, शापित गंधर्व, मंदार, अंकुडी, प्_जो, मार्को पोलो, वर्षु-नील, टोकुरिका, चंबू, वरदा, जिप्सी Happy