बेडसे लेणी, हडशी मंदिर व पवना डॅम बॅकवॉटर - फोटोग्राफी क्लबचे वन डे एक्सकर्शन-०२.०२.२०१२ - भाग १

Submitted by अतुलनीय on 5 February, 2012 - 00:04

०२ फेब्रुवारी, २०१२ रोजी आमच्या कंपनीच्या फोटोग्राफी क्लबचे वन डे एक्सकर्शन (एकदिवसीय भ्रमण) झाले. सकाळी ६:०० वा. पुण्यातून निघुन ६:४५ वा. कंपनीच्या प्रवेशदद्वाराशी पोहोचलो. तेथे पिंपरी - चिंचवड येथील ऊरलेल्या लोकांना घेऊन ठीक ७:०० वा. बेडसे लेण्यांसाठी प्रस्थान ठेवले. बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी एक "पवना हट्स" नावाच्या रेसॉर्टला नाष्त्यासाठी ठीक ८:३० वा. पोहोचलो. ते एक चांगले ठीकाण आहे. नाष्त्याची क्वॉलिटी बघून दुपारच्या जेवणाचीसुध्धा त्यांनाच ऑर्डर दिली. त्याचे हे काही फोटो.

_MG_1594.JPG_MG_1597.JPG_MG_1601.JPG_MG_1610.JPG_MG_1611.JPG_MG_1695.JPG_MG_1696.JPG_MG_1697.JPG_MG_1698.JPG_MG_1700.JPG_MG_1701.JPG_MG_1702.JPG_MG_1699.JPG_MG_1703.JPG

गुलमोहर: 

धन्यवाद - मंदार, सुहास्य.
सुहास्य - ही लेणी कार्ला, भाजे व बेडसे अशा लेणीसमुहामधील एक आहेत. कार्ला व भाजे ही लेणी अनुक्रमे मुंबई-पुणे जुन्या व एक्प्रेस हायवे जवळ आहेत. तेथे लोणावळा-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकावर ऊतरुन जाता येते. तर बेडसे येथे जाण्यासाठी जुन्या हायवेवरुन कामशेत येथे डावीकडे वळावे (पुण्याकडून मुंबईकडे जाताना) व पवना डॅमच्या रस्त्याने गेल्यास पवना डॅमच्या आधी दहा कि.मी. वर बेडसे लेण्याच्या पायथ्यापाशी आपण पोहोचतो.

मस्तं आहेत सगळेच फोटो..... तो ससा कित्ती छोटास्सा आहे...फारच गोड....

आणि फॉर अ चेंज भाजी आवडत नसली तरी.... कोबीचे फोटो फारच आवडले...... Proud

मस्तच आहेत फोटो.............ससा ग्रेट्च.......... Happy

माफ करा, पण सशाचा फोटो फसला आहे असे मला वाटतेय. कारण बोट व अंगठी येथे फोटो फोकस झाला आहे. ससा आउट ऑफ फोकस झाल्याने ब्लर्र झाला आहे. इतर फोटो विशेष्तः झेन्डू, कोबी उत्तम...