क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बोर्डाने ताबडतोब त्याला कन्सल्टंट म्हणून नेमला पाहिजे. >> 'गेल्या दोन दुर्दैवी मालिकेतील अनुभवावरून धोनी काय शिकला व किती सुधारला हें बघणं ' व 'चांगल्या कल्पना इतरांकडूनही येउं शकतात ', ह्याचं महत्व या लिंकवरच्या चर्चेत अधोरेखीत केलं गेलंय ; जें धोनीला लागू होतं तेंच बोर्डालाही ! इतरांकडूनही चांगल्या सूचना येऊं शकतात ,हें बोर्डाला उमजलं तर पाहिजे ना !!!

बहुतेक तज्ञ मंडळी इंग्लंड आपल्या खेळपट्ट्यांवर आपल्या फिरकीच्या वर्चस्वामुळे आपल्याकडून मार खाणार असं गृहीतच धरतेय. [ वाडेकरने तर छातिठोकपणे याची ग्वाहीच आज दिली आहे !] पण, १] खरंच आपल्या खेळपट्ट्यावर तरी आपली सध्याची फिरकी गोलंदाजी इतकी भेदक, प्रभावी होईल ? व २] आपले आजचे फलंदाजही पूर्वीसारखे फिरकी लिलया खेळूं शकतात ?, हे दोन प्रश्न तज्ञ नसूनही , किंबहुना नाही म्हणूनच, मला मात्र सतावताहेत. .फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या हेंही दुधारी शस्त्र ठरूं शकतं !

भाऊ - सहमत. सचिनसकट सगळे आजकाल स्पिन खेळताना चाचपडतात (फक्त कोहली चांगला खेळला होता लंका व पाक ची फिरकी या वर्षी). सचिन ची स्पिन खेळण्याची "याद्दाश्त" परत आली पाहिजे वेळीच Happy

इंग्लंड स्पिन खेळू शकत नाही वगैरे गोष्टी जुन्या झाल्या.

इंग्लंड is definitely well prepared and well rested compared to UAE series. जर सेहवाग पूर्वीसारखा खेळू लागला तर आपण २-० वगैरे सहज जाऊ नाहितर निसटता १-० असेल असे वाटते. BCCI मधले दिडशहाणे २००४ च्या नागपूर सारखे green top असलेले पिच बनवणार नाही अशी आशा धरूया.

बोर्डाने ताबडतोब त्याला कन्सल्टंट म्हणून नेमला पाहिजे.>> त्याने काही फरक पडेल असे मला तरी वाटत नाही. भारतीय क्रिकेट हे BCCI whims वर चालते, त्यामूळे administrative changes हा एकमेव घटक फरक पाडू शकतो जो कधीही होणे शक्य नाही. द्रविड चा फार तर एखाद दुसर्‍या प्लेयरचे technical faults सुधारण्यापेक्षा अधिक होणार नाही पण ते काम फ्लेचर सुद्धा सहज करु शकतो.

<< भारतीय क्रिकेट हे BCCI whims वर चालते, >> खरंय. इंग्लंडने तीन सराव सामने या मालिकेआधी मागून घेतले; आपले दौरे आखताना बीसीसीआय आपल्या संघाला विमानातच पॅड बांधून सरळ कसोटी खेळायला ड्रेसींग रूममधेच जायला सांगत नाही इतकंच !!

पहिला सामना
नाणेफेक जिंकली.. गुडघ्याच्या वर न ऊसळणारा चेंडू... भारत १००/०... पुढील स्क्रिप्ट सोपे आहे.
दोन दिवसात आपले ४५०+... मग ऊरलेल्या तीन दिवसात याच खेळपट्टीवर हातभर वळणारा चेंडू.. फक्त अश्विन च्या जागी भज्जी असता तर अधिक बरे झाले असते.. ईं च्या १० विकेट्स घ्यायची गोलंदाजी आपल्याकडे नक्कीच नाही..
तेव्हा एकतर अनिर्णीत किंवा ओझा चे चेंडू वळले तर आपला विजय शक्य आहे... Happy

रच्याकने: आपला संघ कसोटी चा आहे का एक्दिवसीय चा..? चारच गोलंदाज..? का युवी ५ विकेट्स घेणार आहे?

भाऊ,
अगदी.. तो स्वान हातभर वळवतोय.. ऑफ स्पिन तेही पहिल्याच दिवशी.. सगळे बोल्ड्स जवळ जवळ क्लासिक ऑफ स्पिनर विकेट्स होते.

भज्जी या विकेट वर तिसर्‍या दिवशी फारच भेदक ठरला असता..

पुजारा साठी खूपच महत्वपूर्ण खेळी व मालिका.. त्याचे शतक व्हावे!

(सचिन च्या बॅट वर मला तरी गेले अनेक महिने एकच ब्रँड लोगो दिसतो- "रीटायर"!)

<< सगळे बोल्ड्स जवळ जवळ क्लासिक ऑफ स्पिनर विकेट्स होते. >> क्रीजमधे जागी उभं राहूनच फलंदाज खेळताहेत हें स्वानसाठीं फार विलोभनीय दृश्य असावं, असं नाही वाटलं ?

सेहवागचा घणाघात आणी पुजाराची mature innings याच आजच्या जमेच्या बाजू . कोहली कधी नव्हे ते आज चाचपडत होता , पण होत अस कधीकधी .
सचिन खेळायला आल्यापासूनच भीती वाटत असतेय हल्ल्ली Sad

>>सचिन मारायला जाताना आउट झाला. नो प्रॉब्लेम.

अरे तो २२-२५ वर्षाचा असताना खेळायचा तेव्हा आपण असे म्हणायचो... Happy
आता २० वर्शे खेळल्यावर तेही कसोटीत "मारायला जाताना" बाद... बात हजम नही हुवी.. असो.

मारायला जाताना आउट झाला म्हणजे लौकरच एक किमान ६०-७० चा स्कोअर दिसेल असा पॅटर्न आहे. मात्र स्वतःला तो द्रविड किंवा गावसकर समजून खेळू लागला की बोअर तर करतोच, रन्स ही करत नाही आणि फालतू बोलर्स ला विकेट देतो. म्हणून ती कॉमेंट Happy

मात्र स्वतःला तो द्रविड किंवा गावसकर समजून खेळू लागला की बोअर तर करतोच, रन्स ही करत नाही आणि फालतू बोलर्स ला विकेट देतो. >> +१ शिवाय टीमवर दडपण आणून असलेला टेंपो घालवतो. शेलमधे खेळणारा तेंडूलकर पाहणे केविलवाणे वाटते. स्टेनविरुद्ध खेळताना त्याने जबरदस्त संयम नि control दाखवला होता तो खर तेंडुलकर. BTW स्वानला फालतू म्हणणे थोडे जड वाटते. He is definitely one of the better spinners around who is not relying on any odd actions etc.

नाही स्वान फालतू नाहीच - "सचिन तसा खेळताना फालतू बोलर्सना जनरली विकेट्स देतो" असे. स्वान मागच्या वर्षी जगातला सर्वात भारी स्पिनर होता.

अरे पुरे झाले कौतूक! बसवा आता सचिन ला... निव्वळ बॅटींग नव्हे एकंदरीत सर्वच केविलवाणे झाले आहे.. मी हवे तेव्हा खेळणार.. हवे तेच सामने खेळणार.. वगैरे वगैरे... चार पैकी एका सामन्यात शतक करून रिटायर होईल बहुतेक..
(आता गुडघ्याच्या वर न ऊसळणार्‍या चेंडू वर शतक केले म्हणजे सेहवाग पुढील अख्खे वर्ष खेळणार..
गंभीर चेही तेच... थोडक्यात अजिंक्य रहाणे नुसताच बाकावर बसून म्हातारा होईल असे वाटते.)

अरे पुरे झाले कौतूक! > अस कसं... २३ वर्षांची सवय लगेच कशी सुटेल? तुम्ही JTHJ बघुन या मग उत्तर सापडेल कदाचीत Wink

सेहवाग नि गंभीरला सध्या तरी पर्याय नाहि. क्रुपा करुन राहाणे हा ओपनर आहे वगैरे वाक्ये नकोत (असे म्हणणार्‍या लोकांमूळेच लक्ष्मणची ३ वर्षे फुकट गेली होती., राहाणे मुंबईसाठी सुद्धा ओपन करत नाही). आधी पर्याय शोधा नि मग त्यांची हकालपट्टी कशी नि कधी करायची हे बघता येईल. विजय, मुकुंद, धवन हे पर्याय
(???) बघितल्यावर I'm more inclined to stick with gambhir and sehwag.

सचिनबद्दलचा त्रागा समजू शकतो पण एकाच वेळी पूर्णपणे नवखी middle order, precarious opening pair, unreliable lower order नि कीपरच्या विकेटकिपिंगपेक्षा त्याच्या बॅटींगवर अधिक लक्ष देणारा आपला देश एव्हढ्या सगळ्या पसार्‍यात मोठे चेंजेस करण्याची नि त्यापेक्षाही मह्त्वाचे म्हणजे अशा changes ने सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ देण्याची maturity नि patience आपल्यामधे आहे का ?

>>सगळ्या पसार्‍यात मोठे चेंजेस करण्याची नि त्यापेक्षाही मह्त्वाचे म्हणजे अशा changes ने सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ देण्याची maturity नि patience आपल्यामधे आहे का ?

अरे भाऊ, ते सर्व कधीच नव्हतं ना बिसीसीआय कडे.. Happy त्याच नाण्याची दुसरी बाजू ही आहे की सचिन ला हात लावायची हिम्मत बोर्डात नाही लक्षमणाचं काय झालं पाहिलस ना! एरवी देश सर्वात प्रथम म्हणणार्‍या सचिन कडूनच "मॅचुरिटी" ची अपेक्षा होती/आहे.. बोर्डाकडून नव्हे. आणि क्रिकेट मध्ये जर तर ला अर्थ नाही.. जो संघ घेतला त्याने कामगिरी करायलाच हवी. असो. सचिन गेले दोन वर्ष निव्वळ जागा अडवतोय.. स्वताचे हसे करून घेतो आहे आणि त्याचबरोबर भारतीय संघाच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा वेळ वाया जात आहे हे कटू सत्य आहे!
सेहवाग ला तर गेल्याच वर्षी हाकलून द्यायला हवे होते कसोटी मधून.. गंभीर ला अनेक संधी देवून झाल्या आहेत...
मुळात जो प्रश्ण तू ऊपस्थित करतो आहेस तो गेल्या दोन वर्षापूर्वीच ऊपस्थित झाला होता.. फक्त आपण/आपले क्रिकेट बोर्ड, आजचे मरण ऊद्यावर ढकलणार्‍या मानसिकतेत अनेक दशके जगत असल्याने हा प्रश्ण वेळीच निकालात न निघता मानगूटीवर भूतासारखा बसून रहातो.

असो.
एकंदरीत खेळपट्टी पहाता, ऊमेश यादव ला एकही षटक मिळायचे लक्षण मला दिसत नाही.. गरज पडणार नाही बहुतेक Happy
काल चेंडू गुडघ्यापर्यंत ऊसळत होता.. आज बूटापर्यंतच ऊसळतोय.. Happy सामन्याच्या दुसर्‍याच दिवशी अक्षरशः अशी मैलभर वळणारी व "धुरळा" ऊडवणारी खेळपट्टी घेवून मग त्यावर ईं ला लोळवणे यात काय मोठा तीर मारतोय का आपण..? मग तशीच खेळपट्टी होती(धोणि व कं ला ते माहितच असणार.). तर ७ फलंदाज चा अट्टहास का? यात धोणी ला किपर कम फलंदाज गृहीत धरतोय Happy

असो. ईं. च्या फलंदाजांनीही आपल्या विकेट्स वरून फार काही शिकले नाही.... लेकाचे बॅक फूट वर किल्ला लढवत होते.. आणि व्हायचे ते झाले. केपी ने आल्याआल्या या खेळपट्टीवर दहा फूट पुढे खेळावे लागेल हे दाखवून दिले.

थोडक्यात काय तर- पुनः सर्व ये रे माझ्या मागल्या.

असो. सामना किती दिवसात संपेल याचे आकडे लावा पाहू..
रच्याकने: कुंबळे ने या खेळपट्टीवर अक्षरशः थैमान घातले असते नाही... Happy

सामन्याच्या दुसर्‍याच दिवशी अक्षरशः अशी मैलभर वळणारी व "धुरळा" ऊडवणारी खेळपट्टी घेवून मग त्यावर ईं ला लोळवणे यात काय मोठा तीर मारतोय का आपण..?>> अहो मागच्या सीझन मधे ह्याच ई ने भा ला एक्दम उसळी घेणार्या खेळपट्यात लोळवले ते विसरलात का? होम पीच्वर सगळे(च) हे(च) करतात(च). ह्यावरच पुजाराने २०० रन बनवले ते पण विसरलात?

तर ७ फलंदाज चा अट्टहास का?>> पहील्याच फट्क्यात ५०० च्या वर जाण्यासाठी आणि परत खेळायला लागु नये म्हणुन

सचिन गेले दोन वर्ष निव्वळ जागा अडवतोय.. >>> "दोन वर्ष" ???

योग आपण बोलताना गेल्या काही दिवसांतील कोणत्याही गोष्टीला "परवा" म्हणतो तसे का? Happy

आज प्रवासातच असल्याने सामना अजिबात पहाता नाही आला. खूप दिवसानी भारताला वरचढ झालेलं पहाणं हुकलं ! अर्थात , 'नॉर्मल' खेळपट्टीवर असं वर्चस्व गाजवलेलं पहाणं अधिक भावलं असतं .

सेहवाग ला तर गेल्याच वर्षी हाकलून द्यायला हवे होते कसोटी मधून.. गंभीर ला अनेक संधी देवून झाल्या आहेत...
मुळात जो प्रश्ण तू ऊपस्थित करतो आहेस तो गेल्या दोन वर्षापूर्वीच ऊपस्थित झाला होता.>> हे आठवले मला, तू World Cup सुरू असताना गंभीरला हाकलून द्यायला हवे असे बोलत होतास तेच म्हणतोयस का ? Lol jokes apart, तेंव्हा नि आत्ताही ह्या दोघांचा पर्याय कोण ह्याचे उत्तर मिळत नाही तोवर "ह्याला हाकलून द्या नि त्याला लाथा घाला" ह्या वाक्यांना emotional catharsis शिवाय दुसरा काहिही अर्थ नाही.

मूळात सेहवाग ओपनला यायला लागल्यापासून ओपनर ह्या संज्ञेचा अर्थ पार बदलून गेलाय. नवा बॉल हाताळणे ह्यापेक्षा अधिकाधिक strike rate ने बॉलिंग Dominate करणे एव्हढी व्याख्या बदललेली आहे. पण ह्यात गोम अशी आहे कि असे करू शकतील असे फलंदाज भारत सोडा, जगात हाताच्या दहा बोटांवर मोजता येतील एव्हडेह पण नाहीत. classical opener म्हणता येतील असे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एव्हढे नाहीत. तेंव्हा ओपनर conundrum सहज सुटेल हि अपेक्षाच चुकीची आहे.

योग आपण बोलताना गेल्या काही दिवसांतील कोणत्याही गोष्टीला "परवा" म्हणतो तसे का? >> मलाही हा प्रश्न पडला. पण बहुधा हे योगचे frustration असावे.

रच्याकने: कुंबळे ने या खेळपट्टीवर अक्षरशः थैमान घातले असते नाही.. >> नाही वाटत मला तसे, effective नक्की ठरला असता पण थैमान घालायला त्याला variable bounce pitch मिळाले कि तो सुटायचा.

<<मूळात सेहवाग ओपनला यायला लागल्यापासून ओपनर ह्या संज्ञेचा अर्थ पार बदलून गेलाय. >> खरंय. सेहवागसारखे फलंदाज सलामीला येणं हें भारतीय क्रिकेटला मात्र नवीन नाही [ फारुख इंजिनीअर, बुधी कुंदरन, श्रीकांत इ.] व त्यांत वावगं कांहीं नसलं तरीही त्यासाठी त्यांचा सलामीचा जोडीदार व क्र.३ व ४ वरील फलंदाज बचावात्मक व आक्रमक खेळ तंत्रशुद्ध पद्धतिने खेळणारे असणं आवश्यक ठरतं, असं मला वाटतं. गंभीर व सेहवाग हे दोन्ही फलंदाज मुख्यतः आक्रमक खेळणारे आहेत व त्यामुळे ते एकमेकाना पूरक ठरण्याऐवजी त्या दोघात व्यक्तीगत धांवसंख्येच्या सरासरीत फरक पडला कीं अजाणतेपणी चुरस निर्माण होते, असं मला नेहमी जाणवतं. कदाचित माझा तो भ्रमही असेल.

भारत - इंग्लंड मॅच भारताच्या बाजूनेच वाटते आहे.. केपी खेळलाच तर काहीतरी वेगळे होऊ शकेल अन्यथा काही शक्यता दिसत नाहीत...

त्यापेक्षा वेस्ट इंडीज - बांग्लादेश मॅच जास्त उत्कंठावर्धक आहे... विंडीजनी पहिल्या डावात ५००+ करुन डाव घोषित केल्यावर बांग्लानी मस्त फलंदाजी करून आघाडी घेतली... दुसर्‍या डावात विंडीज जोरात खेळत होते पण अचानक ४ विकेट पडल्याने एकदमच बॅकफूटवर गेलेत... चंदरपॉल अजून आलेला नाहीये पण तो जर लवकर बाद झाला तर बांग्लाला मॅच जिंकण्याची संधी आहे.. आज शेवटचा दिवस आहे.. सकाळच्या वातावरणाचा फायदा घेऊन जर विंडीजला लवकर गुंडाळले तर बांग्ला जिंकायचा प्रयत्न करणार पण खेळपट्टी बघता सुनिल नारायण आणि पेरुमल हे दोघे सामना परत विंडीजच्या बाजूने वळवू शकतात.. एकूणच काय तर शेवटच्या चेंडू पर्यंत धमाल येणार..

>>योग आपण बोलताना गेल्या काही दिवसांतील कोणत्याही गोष्टीला "परवा" म्हणतो तसे का? >> मलाही हा प्रश्न पडला. पण बहुधा हे योगचे frustration असावे.

ही गेल्या दोन वर्षातील सचिन ची कसोटी मधिल आकडेवारी.
२०१० ची अखेर व २०११ ची अखेर वगळता बाकी संपूर्ण २०१२ व बहुतांशी २०११ मध्ये सरासरी धावसंख्या ५० च्या जवळ देखिल नाही..
(सर्वा आकडेवारी साभार क्रिसिंफो):

२०११ मधिल धावा:
१४६, १४, ३४, १२ १६,५६,१,४०,२३,९१,७,७६,३८,९४,३,७३
२०११ मालिका सरासरी:
३५,४४,३६

२०१२ मधिल धावा
४१,८०,१५,८,२५,१३,१९,१७,२७,१३ (अहमदाबाद)
मालिका सरासरी:
२१ (न्युझी वि. ची मालिका ज्यात तीन वेळा बोल्ड!), १३

२०११ एकदिवसीय धावा:
७,२४,२८,१२०,३८,२७,१११,२,५३,८५,१८
२०११ मालिका सरासरी:
१६,५४

२०१२ मधिल एकदिवसीय धावा:
२,४८,१५,३,२२,१४,३९,६,११४ (शंभरावे शतक),५२
२०१२ मालिका सरासरी:
२०, ५८

गेल्या दोन वर्षातील सचिन चे गोलंदाजी मधिल योगदान जवळ जवळ शून्य आहे!
क्षेत्ररक्षण नक्कीच आजही ऊत्कृष्ट आहे..

आता कृपया त्याच्या संपूर्ण कारकीर्दी मधिल काही लक्षणीय निवडक कामगिरी सांगू नये.. त्याचे यश, कर्तुत्व, मेहनत, ई. सर्व वादातीत आहे! पण every good thing comes to an end and we indians are never quite bold enough to accept that esp. when it comes to Cricket!

And I rest my case..

फॉलो ऑन दिलाय खरा पण मला वाटले होते त्यापेक्षा आपण पुन्हा फलंदाजी करून खेळपट्टी अजून जास्त खराब झाल्यावर ईं. ला शेवटी फलंदाजी द्यायला हवी होती.. यामूळे आपल्या गोलंदाजांना थोडी विश्रांती, आघाडी पुनः ५०० च्या आसपास, खेळपट्टी अजून खराब होणे हे सर्वच फायदे होते.. शिवाय ईं. ला पूर्णपणे सामना वाचवायच्या मानसिकतेते खेळले असते- ज्यात चूका अधिक होतात. I just feel Dhoni has given them an opportunity to come back...
मानसिक डावपेच म्हणून फॉलो ऑन योग्य आहे पण कूक, केपी, बेल हे फलंदा़ज निश्चीतच निर्णायक खेळी करण्यास सक्षम आहेत. I feel they are just one innings away from their best..
ईं. कदाचित ५०० करून १५०+ ची आघाडी घेवून शेवटच्या दिवशी ऊपहारानंतर आपल्याला फलंदाजी करायला बोलावू शकते.. या खेळपट्टीवर शेवटच्या दिवशी फलंदाजी नक्कीच धोकादायक आहे.

सचीन गोलंदाजी करेल काय...? Happy

योग तू दिलेले आकडे बरोबर आहेत पण अर्धवट आहेत. त्या प्रत्येक आकड्याबरोबर इतरांचे तेंव्हाचे आकडे लिहीले कि त्यांचा अर्थ बदलतो कि नाहि ह्याचा निर्णय तुझा तूच घे. stats are like mini skirt वगैरे मी तुला सांगायची गरज नाही Happy

फॉलो ऑन दिलाय खरा पण मला वाटले होते त्यापेक्षा आपण पुन्हा फलंदाजी करून खेळपट्टी अजून जास्त खराब झाल्यावर ईं. ला शेवटी फलंदाजी द्यायला हवी होती.>> जर असे केले असते तर अजून कोणी तरी म्हणाले असते कि धोनी defensive captain आहे, त्याचा त्याच्या बॉलर्सवर विश्वास नाही कि ते ३०० च्या आत गुंडाळून टाकू शकतील. तेही खराब खेळपट्टी वर, दुसर्‍या डावात, त्या संघाविरुद्ध जो फिरकीविरुद्ध संशयित आहे नि पहिल्या डावात फिरकीपुढे गुंडाळून पडलेला आहे. थोडक्यात धोनी तिथे खेळतोय नि त्याला जे योग्य वाटले ते त्याने केले, त्याची बरी वाईट जबाबदारी त्याची Happy

खरंय. सेहवागसारखे फलंदाज सलामीला येणं हें भारतीय क्रिकेटला मात्र नवीन नाही [ फारुख इंजिनीअर, बुधी कुंदरन, श्रीकांत इ.]
>> हो बरोबर आहे फक्त त्यांपैकी कोणीही सेहवागेव्हढे यशस्वी झाले नाही नि trend setter ठरले नाही. कदाचित जयसूर्याचे ODI मधे सलामीला येणे नि त्याचा effect असल्यामूळे सेहवागने टेस्ट्मधे सलामीला येउ लागल्यापासून आक्रमक खेळाडू सलामीला येउ लागल्याचे प्रमाण एकंदर सगळीकडेच वाढले असे काहीसे मला सांगायचे होते.

गंभीर व सेहवाग हे दोन्ही फलंदाज मुख्यतः आक्रमक खेळणारे आहेत व त्यामुळे ते एकमेकाना पूरक ठरण्याऐवजी त्या दोघात व्यक्तीगत धांवसंख्येच्या सरासरीत फरक पडला कीं अजाणतेपणी चुरस निर्माण होते, असं मला नेहमी जाणवतं. >> चुरस होतेय कि नाहि हे सांगू शकण्याएव्हढे टेस्ट क्रिकेट मला बघता येत नाही. गंभीर हा नेहमीच अतिशय insecure खेळाडू वाटत राहिला आहे. २००९-१० मधे जेंव्हा तो प्रचंड रन्स काढत होता तेंव्हाही त्याचे interview वाचताना कधीच confident वाटला नाही, ज्याचे स्थान नेहमीच असुरक्षित आहे असा खेळाडू कसा बोलेल तसे वाटत राहिला. कदाचित चॅपेलच्या वेळेचा नि त्याच्या सुरूवातीच्या struggle चाही हा परीणाम असेल. relaxed होउन खेळण्यापेक्षा तो नेहमीच एखादा पॉईंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय असे वाटत राहिलाय. (२००१ च्या आधी लक्ष्मण कसा खेळत असे सलामीला येऊन तसा) तसेच त्याच्या कामगिरीचे हवे तेव्हढे credit त्याला मिळाले नाहि असेहि मला वाटत राहिलय. सलामीच्या खेळाडूला जो अधिक leeway द्यावा लागतो तो त्याला मिळाला नाहिये. (for that matter आपण कुठल्याच सलामीच्या खेळाडूला तो देत नाही - रमेश , आकाश चोप्रा, दास.) We just expect them to open, rake the runs and be successful all the time, no matter what it is. सेहवागएव्हढे नि त्याच्यासारखे रन्स बनवणे प्रत्येकाला शक्य नाही तेंव्हा ती यार्डस्टीक न लावता सलामीच्या खेळाडूंकडे बघता यायला हवे.

Pages