आकाशकंदील - बांबूच्या चोयट्यांपासून

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्‍यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्‍यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्‍यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.

kandil 1.JPG
आकृती १

kandil 2.JPG
आकृती २
अश्याप्रकारे आकृती २ मध्ये दाखविल्या प्रमाणे चारही चौरस लावावेत.
kandil 3.JPG
आकृती ३
त्यानंतर उरलेल्या चोयट्या आकृती ३ मध्ये दाखविल्या प्रमाणे चारही बाजूंना लावायच्या आहेत. आकृतीत तितकेसे स्पष्ट नाही परंतू जो कोन तयार होतो त्याचे टोक बर्‍यापैकी बाहेर आलेले असते.

त्या लावल्यावर मूळ साचा तयार होईल...
नंतर सजावट... पतंगाचा कागद वापरून हवी तशी सजावट करता येईल.

हा तयार झालेला सांगाडा...

DSC09693_1.JPG

आणि हा सजावट केलेला आकाशकंदील..

DSC09714_1.JPGDSC09716_1.JPG

आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....

DSC09718_1.JPG
रांगोळी नेहमीप्रमाणेच मनाकु१९३० ह्यांनी काढलेली...

विषय: 
प्रकार: 

हा आकाशकंदील बनवता बनवता लक्षात आलेल्या काही गोष्टी...

चार चौरसांच्या ऐवजी ८ चौरस बनवून घ्यायचे... एकत्र बांधायला सोपे पडते...

<< चार चौरसांच्या ऐवजी ८ चौरस बनवून घ्यायचे... एकत्र बांधायला सोपे पडते... >>कंदीलाचा सांगाडा प्रमाणबद्ध व सुबक व्हायला हे महत्वाचे. शिवाय रंगसंगयीवर जरा विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
फार फिक्कट रंग न वापरणं योग्य असं आपलं माझं मत. पतंगाना वापरतात तो कागद वापरल्यास आंत सोडलेल्या लाईटचा छान परिणाम दिसतो.

वर दिलेल्यापेक्षां थोड्याशा वेगळ्या पद्धतिने घरीं तयार केलेला आमचा पारंपारिक कंदील -

maayboli kandil.jpg

वर्षा! माझा आकाशकंदिल गजाननच्या क्रुतिनेच केलाय,फक्त तो २००७ मधे केलाय आणि गजाननची क्रुति आत्ता दिली आहे.
माझ्या वडिलांनी घोटिव कागदाचे छोटे आकाश्कंदिल बनवलेत लवकरच फोटो टाकते.

रैना अग मी कार्ड पेपरचा केला. ४ समान भागात व वर चिकटवायला थोडा एक्स्ट्रा असा फोल्ड करुन घेतला. त्या प्रत्येक भागावर लेकाचे स्टॅम्प नी पेन्ट वाले ठसे मारले. व ते शेप कट केले. खालील बाजुस पणत्यांचे शेप कट केले. त्या सर्व शेपना आतुन जिलेटीन पेपर लावला व त्या कागदाचा चौरस बनवुन चिकटवायची बाजु बंद केली.

मग वरुन त्याला चकचकित पेपर लावुन सजवले. मी प्राण्यांचे स्टॅम्प वापरले होते म्हणुन कंदिल फोल्ड करायच्या आधी अंदाजे प्रत्येक प्राण्या च्या डोळ्याच्या जागी १-१ टीकली लावली. तु लेकीच्या आवडीच्या गोष्टीचे शेप कापु शकतेस. खली झिरमिळ्यापण लाव. Happy

हा दुवा भावाला पाठवला ... करायचाय का कंदील म्हणून. त्याने आणि आईने उत्साहाने बुरूड आळीत जाऊन चोयट्या आणल्या. शनिवारी भावाने सांगाडा तयार केला. रविवारी आम्ही कागद आणले, डिझाईन बनवलं. रविवारी रात्री कंदील तयार!

अरे वा वा हिम्स छान झालाय आकाशकंदील. आजोबांची रांगोळी तर मस्तच.
दिवाळीच्या शुभेच्छा!!
आणि हा माझा (जुनाच) झब्बू
Akashkandil.jpg

सगळ्यांचेच आकाश दिवे एकदम मस्त बनलेत !!
माझा आकाश दिवा http://www.mimarathi.net/node/7302 इथे आहे. बनवायला एकदम सोपा आहे. फोटोची फाईल बरीच मोठी आहे असा एरर मेसेज आल्याने मायबोली वर टाकता येत नाहीये.

Pages