ववि २०११, हायलाईट्स ....

Submitted by लाजो on 25 July, 2011 - 23:40

ववि २०११, हायलाईट्स.... Happy माबो संवाददाती 'लाजो' की नजरोंसे Happy

****************

माबोच्या वविची २४ ला निघाली गाडी
उचलले सगळ्यांना ज्यांनी भरली भाडी...
फार्मलाईफच्या आवारात जाऊन ठाकली खडी
पावसानेही साथ दिली बरसुन हरघडी... Happy

उपमा आणि पाव मिसळ नाश्त्याला ओरपली
काहींनी चमचमीत चिबिही हादडली... Proud
गरमागरम चहाने गार नरडी शेकली
पोटपूजा झाल्यावर सग्ळी मेंब(ढ)रं चहुऔर उंडारली... Lol

पूलात स्विमली अन धबधब्यात भिजली
तेही कमी म्हणुन बंधार्‍यावर जाऊन डुंबली...
तिथेच गिर्‍याने जलक्रिडेची हौस भागवली
पब्लिकची मात्र हवा तेव्हा सॉल्लिड टाईट झाली... Proud

कच्च्याबच्यांनी भिजुन भरपुर केली मजा
तोंडावर बॉल लागुन मिळाली फुकी सजा... Lol
मंगळागौरीचा खेळ रंगला ढिंगचीक्याचा बाजा
धरणी कंपली अन घाबरून कोसळला वरुण राजा... Proud

दुपारच्या जेवणाला खास बेत श्रीखंड अन पूरी
लिंबुभौंच्या पापडांनी लेकिन इस साल टांग मारी.. Proud
तुडुंब जेवल्यावर मंडळी झाली सुस्त सारी
डु-आर्या पुढे येऊन सासंची घोषणा करी... Happy

केळी खायची शर्यत, पल्लीची दे धमाल
हात वर करुन लंगडी हबाने केली कमाल... Lol
गुढगे फुटले, अगंठे ठेचले, तोंडं लालेलाल
अण्णाच्या फ्लाईटने बिचारी खुर्ची झाली हलाल... Rofl

पावसात साजरी केली मस्त रंगपंचमी
काळा पाऊस अन मोरदक, आयड्या लै नामी... Proud
संयोजकांनी पार्शलिटी केली, आहे मला हमी
दक्षी म्हणे आम्हाला वेळ दिला कमी... Uhoh

हास्याचे फवारे आणि आनंदाचे चित्कार
विजेत्यांना रोपं देऊन केला अनोखा सत्कार... Happy
उपमा आणि चहाचा झाला परत उपहार
"निघा आता" म्हणती 'टकले'.. "होतिल फार उपकार" ... Lol

ओली कापडं अन ओले डोळे
घश्यात आवंढा अन पायात गोळे... Sad
परतीच्या मार्गावर पण मन फार्मातच रूळे
जीवनाचे एक पान रंगले माबो मैत्री मुळे Happy

***********************************

मै, लाजो, कॅमेरामन अशुतोष (काका) और जिप्सी (मफो) के साथ... माबो टाईम्स के लिये Happy

***********************************

ही मागच्या वर्षीची 'वविची टुरटुर, आमची हुरहुर'

आताच आपण वाचत होतात ववि २०११, हायलाईट्स.... संवाददाता लजो च्या नजरेतुन....
आता थोड्याच वेळात सुरु प्रतिसादांची कमाल आणि हास्याची धमाल पहात रहा ववि २०११, हायलाईट्स.... फक्त माबोवर

लाजो अगदी हुबेहुब वर्णन, वाचताना प्रत्येक क्षण डोळ्यासमोर तरळत होता.... आनि हसु येत होते.... हॅट्स ऑफ यू लाजो

.

लाजो.. एक गल्ती से मिस्टेक झाली आहे तेव्हढे फक्त बदल.. बाकी हायलाईट्स सुपर लाईक...

साजिराच्या ऐवजी डुआय किंवा मी_आर्या पाहिजे...

लाजो, वविला न येता इतकी सुंदर कविता रचलीस.. अगदी चपखल जमलिये. सिक्वेन्स सेम टू सेम...

फक्त एक चेंज हवा... आम्हाला वेळ कमी दिला हे मी म्हणलं होतं. आणि ते सत्य आहे.. सत्याचा (माबोकर नव्हे)विजय असो.. Proud

लाजो, __/\__

वविला न येता देखील अगदी आंखो देखा हाल Happy

लाजो अगदी हुबेहुब वर्णन, वाचताना प्रत्येक क्षण डोळ्यासमोर तरळत होता.... >>>>>>अगदी अगदी.

तिथेच गिर्‍याने जलक्रिडेची हौस भागवली
पब्लिकची मात्र हवा तेव्हा सॉल्लिड टाईट झाली...>>>>:हहगलो:

हे खास लाजोकरता .......

मै शायर तो नहीं, मगर ऐ ववि
जबसे देखा (और सुना और पढा),
मैने तुझको, मुझको शायरी आ गयी ..... टँण्या टँण्या टँण्या ...... Happy

Pages