प्राजक्ता भसाळे - हो ती मैत्रिण आहे माझी, इथेच आहे ती, DC मध्ये!!!
कदाचित चेहरा बघितला कि ओळखु शकेन मी तुला.
तुमच्या वर्गाच कौतुक आम्हाला ऐकवायच्या बाई आम्हाला - बहुतेक काकतकर - तुमच्या पेक्षा लहान असुनहि भरपुर समंजस आहेत म्हणुन !!!
बरं, पूर्वा, तुम्हालाही कार्यानुभव / शिवण वगैरेंत काळे कापडी हत्ती कापूस ठसठसून भरुन बनविणे, त्यांना सजविणे वगैरे होते का गं? स्ट्रॉची बाहुली, बुजगावणं (तेही ऑथेंटिकच हवं... व्यवस्थित मडकं रंगवून वगैरे!!!!), क्रोशाची पर्स वगैरे प्रकार होते का?
नीधपला तर हे सर्व कलाप्रकार असणारच आहेत. नी, तुमच्या बॅचच्या अनेकजणी आमच्या वर्गात ''तो हत्ती उधार देऊ शकाल का,'' म्हणून विचारायला यायच्या! आणि आपल्या शिक्षिकाही इतक्या चाणाक्ष की बरोब्बर कोणी हत्ती स्वतः बनवलाय, आणि कोणी उधार आणलाय ते अचूक ओळखायच्या!
मी घरातील थोर व अनुभवी बहिणींच्या मार्गदर्शनाखाली केलेला तो हत्ती! पण हाय!!
मी बनवलेल्या हत्तीने चार पाय चारही दिशांना पसरले होते!! आणि चांगलाच गुटगुटीत बाळसेदार होता हत्ती!! माझ्याकडून तो हत्ती घेऊन गेली होती एक मुलगी त्यानंतरच्या वर्षी, नंतर आली, म्हणाली, बाईंनी ओळखला हा हत्ती! अगदी अंगावरची झूल बदलून देखील तिला त्याचे कमीच गुण मिळाले!!
स्ट्रॉची बाहुली हा प्रकार अगाध होता! बुजगावणं मात्र मी मन लावून तयार केलेलं.... त्याला पोतेर्याची अंगडी टोपडी शिवताना, मडक्याचे नाक डोळे रंगवताना काय तो आनंद!
का रे डेंजर बॅच का? तुझं कोणी होतं का आमच्या वर्गात?
अकु,
हत्ती,पर्स,स्ट्रॉची बाहुली होती ना आणि पाचवीत लोकरीचं टोपडं,सहावीत मोजे,सातवीत स्वेटर...अगदी जीव काढला त्या शिवणाने...माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी माझ्या २-३ बॅच पुढे होती.तिने केलेल्या वस्तू मला मिळत.मी पण हुशारी करुन प्रत्येक वर्षी सेम कलरची लोकर मिळवत असे
ह्या व्यतिरिक्त पण अजून भारी गोष्टी शिवण कामात होत्या.त्यांचा काय उपयोग होता कुणास ठाऊक...
आम्हाला एकदा शिवणाला जगताप बाई होत्या.त्यांच्या वर्गाच्या सतरंजीवर जगताप-जगाला ताप असे कोणीतरी लिहिले होते
मी माझा माझाच केला होता हत्ती. आणि त्याचं एक पाउल वाकडं पडलेलं होतं>>
@रागरागश्री : फार प्रिय असं काही नाही गं! पण त्यांचं शिकवणं आवडायचं.
पूर्वा, जगताप-जगाला ताप
शिवणाने माझाही दम काढला पार शाळेत असताना. आधी ढेरे बाई, मग रावतू बाईंसारख्या कमी कडक शिक्षिका मिळाल्या म्हणून बरे! नाहीतर मी शिवणात नापासच झाले असते!
टायपिंग कोणाकोणाला होतं? त्या तिसर्या मजल्यावरच्या, पर्यवेक्षिकांच्या ऑफिसच्या वर असलेल्या लाकडी जिन्याने जायला लागणार्या अंधार्या खोलीत जुन्या टाइपरायटर्स ( बहुतेक लाँगवूड, रेमिंग्टन कंपनी) ना बडवायला किती ते श्रम करायला लागत!
वर्गातल्या कमी हुशार मुलींसाठी टायपिंग असल्याने मी नियमाप्रमाणे टायपिंगलाच होते.
पहिल्या ३० मुलींना कॉम्प्युटर होता. म्हणजे काय होतं देव जाणे पण त्यांची शायनिंग भारी असायची.
अगं, टायपिंग माझ्या बॅचला सर्व मुलींना सक्तीचे होते. कोणत्या टाइपरायटरची कोणती कळ/ की बरोबर उमटत नाही हे त्या शिक्षकांना चांगले माहित होते, आणि त्याप्रमाणे ते टाइप केलेले कागद तपासत!!
कॉम्प्युटर नामक महाकाय प्रकार (तेव्हा राणीच्या देशातून कोणीतरी खास शाळेला देणगीदाखल पाठविलेला) होता... ते दोन अगडबंब ठोकळे होस्टेलातल्या तळमजल्यावरच्या एका खोलीत विराजमान झाले होते. माझा नंबर त्या वर्षी (चुकून) पहिल्या दहा क्रमांकात लागल्यामुळे मलाही त्या कॉम्प्युटर नामक राक्षसासमोर बसायची शिक्षा होती! गोरे बाई, आगटे बाई येऊन काहीबाही शिकवायच्या.... मला काय पण कळायचे नाही. त्यात एकदा चुकीची कमांड दिली गेली की काय झाले ते माहित नाही, पण त्या दोन धूडांमधील एक धूड बंद पडले. मग एकाच कॉम्प्युटरवर दहाजणींची मारामार.... श्या... माझा इंटरेस्ट पारच संपून गेला...!! ते जुने लोटस आणि फॉक्सप्रो असे काहीतरी प्रोग्रॅम्स होते तेव्हा... सरतेशेवटी ते धूडही बंद पडले.... मग कॉम्प्युटरच्या तासाला आम्ही शाळाभर उंडारायला मोकळ्या! (तो तेव्हा ऑफिशियली समाजसेवेचा तास असायचा... पण आमच्यासाठी कम्पूटरमामाचा तास!!)
तुमच्या बॅचला बहुतेक नवे कॉम्प्युटर्स शाळेत आलेले दिसताहेत.... आधीचे ते जुने कॉम्प्युटर्स अँटिक पीसेस म्हणून शाळेच्या कोणत्या कोपर्यात धूळ खात पडलेत की स्क्रॅपमध्ये निकालात निघालेत ते देव जाणे!
मी गीता, मी पण हुजुरपागेचि... हत्ती आठवला आणि हसु आले मी कम्पुटर ला होते, डोस सिस्टिम असायचि... आगटे बाई चि आठवण आली काकतकर बाई फ़ेसबुक वर आहेत. शाळे मधे बान्धकाम चालु आहे असे एकले.
शाळेचे लक्ष्मी रोडचे दार सध्या बंद आहे गीता. सध्या मागच्या बोळातून प्रवेश आहे. गायन वर्ग, पर्यवेक्षकांचे ऑफिस असलेली इमारत पाडून तिथे एक बहुमजली इमारत बांधणे सुरू आहे.
बायदवे, परवाच माझ्या आईच्या हुपा बॅचमधील (बहुतेक १९६६-६७ ची बॅच) वर्गमैत्रिणींचे एक छोटे गटग झाले. सगळ्याजणी ज्ये. नागरिक! पण धम्माल चालली होती नुसती! हशा, शाळेतील शिक्षिकांच्या आठवणी (दाणी बाई, वझे बाई, सुप, मालती साठे, शांता निसळ बाई, गंगूताई पटवर्धन (ह्या सोसायटीच्या, शिक्षिका नव्हेत!)) ....
सुपंनी वर्गात तेव्हा रिबेक्काची ष्टोरी सांगितली होती. आणखी काही इंग्रजी चित्रपट / कादंबर्यांच्या ष्टोर्या सांगायच्या त्या.
आठवणींमध्ये आणखी, बालिका वस्तू भांडार - स्टोअर - तिथे काम केल्यावर कशी ऑरेंजची गोळी मिळायची किंवा चिक्की मिळायची ते, गुलमोहराची व अशोकाची झाडे, प्लेशेड, घंटा, मधुमालती-बोगनवेलीचा मांडव (जो आता अस्तित्त्वात नाही), तेव्हा त्यांना साडीचा युनिफॉर्म होता, त्याच पदर कसा घ्यायचा हेही शिक्षिका सांगायच्या (कमरेला खोचायचा म्हणे तो पदर!) वगैरे खूप आठवणी निघाल्या. सगळ्यांनी सांगितले की आजही लोक मधेच रस्त्यात वगैरे किंवा इतरत्र अचानक विचारतात, ''तुम्ही हुजूरपागेच्या का? चेहर्यावरून कळते लग्गेच्च!!!'' (???? म्हणजे नक्की कॉय? ) सरते शेवटी मैतरणी शाळेतील काही कविता उत्स्फूर्तपणे आठवताना, सगळ्यांना त्या कविता आपल्या आजही तोंडपाठ आहेत हे लक्षात आले. अगदी श्रावणमासी पासून ते बाळ जातो दूर देशा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या वगैरे वगैरे. जोरात आणि जोषात म्हणून झाल्या कविता.
पुणे - स्त्री-शक्तीने एकत्र येऊन केलेल्या आंदोलनामुळे "हुजूरपागा' नरमली असून, येत्या आठ दिवसांत लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात येईल, असे आश्वासन शाळा प्रशासनातर्फे गुरुवारी देण्यात आले. यावर तातडीने स्त्री-शक्तीने "आश्वासन नको आम्हाला कृती हवी', अशी मागणी केल्यामुळे दुपारपासूनच प्रवेशद्वाराजागी बांधण्यात आलेली भिंत पाडण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. येत्या आठ दिवसांत मुख्य प्रवेशद्वार पुन्हा सुरू होणार आहे. http://www.esakal.com/esakal/20110923/5161850117925521112.htm
उद्या दुपारी ३ वाजता, २४ सप्टेंबर, शनिवार रोजी शाळेत माजी विद्यार्थिनींची या विषयासंदर्भातील महत्त्वाची मीटिंग! सर्व माजी विद्यार्थिनींनो, उद्या नक्की उपस्थित रहा! जय हिंद!!
आयला कसला वेडेपणा आहे.. बाकीची सगळी दारं छोट्या रस्त्यांवर उघडतात.. तिथे तर अजूनच गर्दी होईल... आणि नू.म.वि.च्या समोरचे दार वापरायचे ठरवले तर ते वापरताच येणार नाही.. अजूबाजूला दुकानं असल्यामुळे ते अगदीच छोटं झालय.. आणि दोन्ही शाळा जवळपास एकाच वेळेस सुटतात..म्हणजे तर बाजीराव रोड वर अभूतपूर्व गर्दी होईल.. तिचं काय करणार..
तिथेच पुढे अजून एक शाळा आहे.. तिला पण असंच लक्ष्मीरोड वरचं दार बंद करायला सांगितलं आहे की काय?
हिम्स, बातमी वाच सगळी म्हणजे अंदरकी बात लक्षात येईल. पोलिसांची सूचना, ट्रॅफिक जॅम वगैरे फक्त वरवरची कारणे आहेत. कारण नुसते प्रवेशद्वार बंद ठेवता येऊ शकते. इथे शटर लावून, भिंत घालून, शाळेच्या नावाची पाटी काढून दुसर्या दुकानाची पाटी त्या शटरच्या शेजारी लागली होती म्हणे!
आता भिंत फोडताहेत....
प्राजक्ता भसाळे - हो ती मैत्रिण आहे माझी, इथेच आहे ती, DC मध्ये!!!
कदाचित चेहरा बघितला कि ओळखु शकेन मी तुला.
तुमच्या वर्गाच कौतुक आम्हाला ऐकवायच्या बाई आम्हाला - बहुतेक काकतकर - तुमच्या पेक्षा लहान असुनहि भरपुर समंजस आहेत म्हणुन !!!
ज्ञाती गल्ली चुकली हो>>>> नाही गं, उगाच गंमत करत होते (अहिल्यादेवींच्या मुलींना नसत्या खोड्या फार, असं म्हणू नका
)
''अगं कुंदकळ्यांनो'', ''अगं हिरकण्यांनो'' मला ते कायम नाटकी वाटायचं.
पूर्वा.. तू मधुरा सानेच्या बॅचची म्हणजे फारच डेंजर बॅचची.... प्राजक्ता जोशी, प्रीति परचुरे, सुरभी घैसास ह्या पण मैत्रिणीच की तुझ्या...
नाटकी असो किंवा कसे, कुंदकळी आणि हिरकणी इतक्या नाजूक, गोड नावाने आख्ख्या दंगेखोर, आवाजाच्या कमाल डेसिबल्स गाठणार्या वर्गाला उद्देशून संबोधिणे म्हणजे जरा डेरिंगबाजच!
अकु
आमचा वर्ग पण त्यातलाच.
बरं, पूर्वा, तुम्हालाही कार्यानुभव / शिवण वगैरेंत काळे कापडी हत्ती कापूस ठसठसून भरुन बनविणे, त्यांना सजविणे वगैरे होते का गं? स्ट्रॉची बाहुली, बुजगावणं (तेही ऑथेंटिकच हवं... व्यवस्थित मडकं रंगवून वगैरे!!!!), क्रोशाची पर्स वगैरे प्रकार होते का?
नीधपला तर हे सर्व कलाप्रकार असणारच आहेत. नी, तुमच्या बॅचच्या अनेकजणी आमच्या वर्गात ''तो हत्ती उधार देऊ शकाल का,'' म्हणून विचारायला यायच्या!
आणि आपल्या शिक्षिकाही इतक्या चाणाक्ष की बरोब्बर कोणी हत्ती स्वतः बनवलाय, आणि कोणी उधार आणलाय ते अचूक ओळखायच्या! 
स्ट्रॉची बाहुली, बुजगावणं<<<
हे नव्हतं मला.
बाकी होतं.
मी माझा माझाच केला होता हत्ती. आणि त्याचं एक पाउल वाकडं पडलेलं होतं.
हत्ती पडलाय अजून आमच्या घरी.. ह्या वर्षी मुलीच्या भोंडल्याला वापरणार....
मी घरातील थोर व अनुभवी बहिणींच्या मार्गदर्शनाखाली केलेला तो हत्ती! पण हाय!!
माझ्याकडून तो हत्ती घेऊन गेली होती एक मुलगी त्यानंतरच्या वर्षी, नंतर आली, म्हणाली, बाईंनी ओळखला हा हत्ती!
अगदी अंगावरची झूल बदलून देखील तिला त्याचे कमीच गुण मिळाले!!
मी बनवलेल्या हत्तीने चार पाय चारही दिशांना पसरले होते!! आणि चांगलाच गुटगुटीत बाळसेदार होता हत्ती!!
स्ट्रॉची बाहुली हा प्रकार अगाध होता! बुजगावणं मात्र मी मन लावून तयार केलेलं.... त्याला पोतेर्याची अंगडी टोपडी शिवताना, मडक्याचे नाक डोळे रंगवताना काय तो आनंद!
@ अरुंधती : तुला अजो फारच प्रिय होत्या वाटत... sorry तुला जर वाईट वाटला असेल तर....
का रे डेंजर बॅच का?
तुझं कोणी होतं का आमच्या वर्गात?
आणि पाचवीत लोकरीचं टोपडं,सहावीत मोजे,सातवीत स्वेटर...अगदी जीव काढला त्या शिवणाने...माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी माझ्या २-३ बॅच पुढे होती.तिने केलेल्या वस्तू मला मिळत.मी पण हुशारी करुन प्रत्येक वर्षी सेम कलरची लोकर मिळवत असे 

अकु,
हत्ती,पर्स,स्ट्रॉची बाहुली होती ना
ह्या व्यतिरिक्त पण अजून भारी गोष्टी शिवण कामात होत्या.त्यांचा काय उपयोग होता कुणास ठाऊक...
आम्हाला एकदा शिवणाला जगताप बाई होत्या.त्यांच्या वर्गाच्या सतरंजीवर जगताप-जगाला ताप असे कोणीतरी लिहिले होते
मी माझा माझाच केला होता हत्ती. आणि त्याचं एक पाउल वाकडं पडलेलं होतं>>
@रागरागश्री : फार प्रिय असं काही नाही गं! पण त्यांचं शिकवणं आवडायचं.

पूर्वा, जगताप-जगाला ताप
शिवणाने माझाही दम काढला पार शाळेत असताना. आधी ढेरे बाई, मग रावतू बाईंसारख्या कमी कडक शिक्षिका मिळाल्या म्हणून बरे! नाहीतर मी शिवणात नापासच झाले असते!
टायपिंग कोणाकोणाला होतं? त्या तिसर्या मजल्यावरच्या, पर्यवेक्षिकांच्या ऑफिसच्या वर असलेल्या लाकडी जिन्याने जायला लागणार्या अंधार्या खोलीत जुन्या टाइपरायटर्स ( बहुतेक लाँगवूड, रेमिंग्टन कंपनी) ना बडवायला किती ते श्रम करायला लागत!
वर्गातल्या कमी हुशार मुलींसाठी टायपिंग असल्याने मी नियमाप्रमाणे टायपिंगलाच होते.
पहिल्या ३० मुलींना कॉम्प्युटर होता. म्हणजे काय होतं देव जाणे पण त्यांची शायनिंग भारी असायची.
अगं, टायपिंग माझ्या बॅचला सर्व मुलींना सक्तीचे होते. कोणत्या टाइपरायटरची कोणती कळ/ की बरोबर उमटत नाही हे त्या शिक्षकांना चांगले माहित होते, आणि त्याप्रमाणे ते टाइप केलेले कागद तपासत!!
कॉम्प्युटर नामक महाकाय प्रकार (तेव्हा राणीच्या देशातून कोणीतरी खास शाळेला देणगीदाखल पाठविलेला) होता... ते दोन अगडबंब ठोकळे होस्टेलातल्या तळमजल्यावरच्या एका खोलीत विराजमान झाले होते. माझा नंबर त्या वर्षी (चुकून) पहिल्या दहा क्रमांकात लागल्यामुळे मलाही त्या कॉम्प्युटर नामक राक्षसासमोर बसायची शिक्षा होती! गोरे बाई, आगटे बाई येऊन काहीबाही शिकवायच्या.... मला काय पण कळायचे नाही. त्यात एकदा चुकीची कमांड दिली गेली की काय झाले ते माहित नाही, पण त्या दोन धूडांमधील एक धूड बंद पडले. मग एकाच कॉम्प्युटरवर दहाजणींची मारामार.... श्या... माझा इंटरेस्ट पारच संपून गेला...!! ते जुने लोटस आणि फॉक्सप्रो असे काहीतरी प्रोग्रॅम्स होते तेव्हा... सरतेशेवटी ते धूडही बंद पडले.... मग कॉम्प्युटरच्या तासाला आम्ही शाळाभर उंडारायला मोकळ्या! (तो तेव्हा ऑफिशियली समाजसेवेचा तास असायचा... पण आमच्यासाठी कम्पूटरमामाचा तास!!)
तुमच्या बॅचला बहुतेक नवे कॉम्प्युटर्स शाळेत आलेले दिसताहेत.... आधीचे ते जुने कॉम्प्युटर्स अँटिक पीसेस म्हणून शाळेच्या कोणत्या कोपर्यात धूळ खात पडलेत की स्क्रॅपमध्ये निकालात निघालेत ते देव जाणे!
काय माहित काय ते पण पहिल्या ३० मुलींना कॉम्प आणि पुढच्या ३० मुलींना टायपिंग असला सगळा मार्कवर्चस्ववादी प्रकार होता..
मी गीता, मी पण हुजुरपागेचि... हत्ती आठवला आणि हसु आले
मी कम्पुटर ला होते, डोस सिस्टिम असायचि... आगटे बाई चि आठवण आली
काकतकर बाई फ़ेसबुक वर आहेत. शाळे मधे बान्धकाम चालु आहे असे एकले.
शाळेचे लक्ष्मी रोडचे दार सध्या बंद आहे गीता. सध्या मागच्या बोळातून प्रवेश आहे. गायन वर्ग, पर्यवेक्षकांचे ऑफिस असलेली इमारत पाडून तिथे एक बहुमजली इमारत बांधणे सुरू आहे.
बायदवे, परवाच माझ्या आईच्या हुपा बॅचमधील (बहुतेक १९६६-६७ ची बॅच) वर्गमैत्रिणींचे एक छोटे गटग झाले. सगळ्याजणी ज्ये. नागरिक! पण धम्माल चालली होती नुसती! हशा, शाळेतील शिक्षिकांच्या आठवणी (दाणी बाई, वझे बाई, सुप, मालती साठे, शांता निसळ बाई, गंगूताई पटवर्धन (ह्या सोसायटीच्या, शिक्षिका नव्हेत!)) ....
सुपंनी वर्गात तेव्हा रिबेक्काची ष्टोरी सांगितली होती. आणखी काही इंग्रजी चित्रपट / कादंबर्यांच्या ष्टोर्या सांगायच्या त्या.
आठवणींमध्ये आणखी, बालिका वस्तू भांडार - स्टोअर - तिथे काम केल्यावर कशी ऑरेंजची गोळी मिळायची किंवा चिक्की मिळायची ते, गुलमोहराची व अशोकाची झाडे, प्लेशेड, घंटा, मधुमालती-बोगनवेलीचा मांडव (जो आता अस्तित्त्वात नाही), तेव्हा त्यांना साडीचा युनिफॉर्म होता, त्याच पदर कसा घ्यायचा हेही शिक्षिका सांगायच्या (कमरेला खोचायचा म्हणे तो पदर!) वगैरे खूप आठवणी निघाल्या. सगळ्यांनी सांगितले की आजही लोक मधेच रस्त्यात वगैरे किंवा इतरत्र अचानक विचारतात, ''तुम्ही हुजूरपागेच्या का? चेहर्यावरून कळते लग्गेच्च!!!'' (???? म्हणजे नक्की कॉय?
) सरते शेवटी मैतरणी शाळेतील काही कविता उत्स्फूर्तपणे आठवताना, सगळ्यांना त्या कविता आपल्या आजही तोंडपाठ आहेत हे लक्षात आले. अगदी श्रावणमासी पासून ते बाळ जातो दूर देशा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या वगैरे वगैरे. जोरात आणि जोषात म्हणून झाल्या कविता.
http://epaper.timesofindia.com/Default/Scripting/ArticleWin.asp?From=Arc...
काय वाटतं या संदर्भात माजी विद्यार्थिनींना?
http://www.esakal.com/esakal/20110923/5161850117925521112.htm
हे वाचलत का?
प्रवेशद्वार उघडायला सुरूवात झाली. भिंत तोडायला सुरूवात झाली.
अकु, ती फेसबुकवरची लिंक इथे पण टाक ना.
मृनिश लिंक चालत नाहीये. परत टाकणार का?
"दुकान' बंद ; प्रवेशद्वार सुरू
पुणे - स्त्री-शक्तीने एकत्र येऊन केलेल्या आंदोलनामुळे "हुजूरपागा' नरमली असून, येत्या आठ दिवसांत लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात येईल, असे आश्वासन शाळा प्रशासनातर्फे गुरुवारी देण्यात आले. यावर तातडीने स्त्री-शक्तीने "आश्वासन नको आम्हाला कृती हवी', अशी मागणी केल्यामुळे दुपारपासूनच प्रवेशद्वाराजागी बांधण्यात आलेली भिंत पाडण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. येत्या आठ दिवसांत मुख्य प्रवेशद्वार पुन्हा सुरू होणार आहे.
http://www.esakal.com/esakal/20110923/5161850117925521112.htm
उद्या दुपारी ३ वाजता, २४ सप्टेंबर, शनिवार रोजी शाळेत माजी विद्यार्थिनींची या विषयासंदर्भातील महत्त्वाची मीटिंग! सर्व माजी विद्यार्थिनींनो, उद्या नक्की उपस्थित रहा! जय हिंद!!
आणि या कालच्या मिरर (टाईम्स ऑफ इंडियातील) बातमीच्या लिंका
आणि या कालच्या मिरर (टाईम्स ऑफ इंडियातील) बातमीच्या लिंका
लिंक 2
आयला कसला वेडेपणा आहे.. बाकीची सगळी दारं छोट्या रस्त्यांवर उघडतात.. तिथे तर अजूनच गर्दी होईल... आणि नू.म.वि.च्या समोरचे दार वापरायचे ठरवले तर ते वापरताच येणार नाही.. अजूबाजूला दुकानं असल्यामुळे ते अगदीच छोटं झालय.. आणि दोन्ही शाळा जवळपास एकाच वेळेस सुटतात..म्हणजे तर बाजीराव रोड वर अभूतपूर्व गर्दी होईल.. तिचं काय करणार..
तिथेच पुढे अजून एक शाळा आहे.. तिला पण असंच लक्ष्मीरोड वरचं दार बंद करायला सांगितलं आहे की काय?
हिम्स, बातमी वाच सगळी म्हणजे अंदरकी बात लक्षात येईल. पोलिसांची सूचना, ट्रॅफिक जॅम वगैरे फक्त वरवरची कारणे आहेत. कारण नुसते प्रवेशद्वार बंद ठेवता येऊ शकते. इथे शटर लावून, भिंत घालून, शाळेच्या नावाची पाटी काढून दुसर्या दुकानाची पाटी त्या शटरच्या शेजारी लागली होती म्हणे!
आता भिंत फोडताहेत....
हो अकु, बोर्ड काढलेला दिसतो आहे एका चित्रात... कोणत्यातरी दुकानदाराने मजबूत पैसे दिले असतील त्याशिवाय हे असले प्रकार करणे शक्य नाही..