पावसाची गंमत

पावसाच्या निमित्ताने माझीच एक जुनी कविता. अलेक पदमसीच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली.
-----------------------------------------
तिची एक छोटीशी गंमत आहे.
तिने स्वत:च गुंफलेली,
स्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली.

पाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते,
आजूबाजूच्या भिंती
अलगद विरघळून जातात,
सगळेच आकार धुसर होतात,
तिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो,
हळू हळू पाऊसच होत जातो,
शेवटी तीही विरघळून जाते,
पावसाच्या थेंबासारखी,
अम्लान, अनावृत.

अश्या तिच्या स्वप्नात
तिची तंद्री लागून राहते,
आणि मग कधी कधी
खरंच ती पाऊस होते.

- नी

Submit to kanokani.com

एकदम तरल लिहिलंयस! मला पण पावसाकडे बघत बसायला खूप आवडतं. पण "आता वेळ होत नाही" च्या पडद्याआड असे क्षण क्वचितच वाट्याला येतात.

आवडली.

खूप मस्त लिहिलीये! स्मित

अलवार अगदी!

मस्तच आहे स्मित

एकदम तरल स्मित

आयला! हे म्हन्जे कोनीतरी माज्या स्वतः वर कविता केली आसती ना ?????
तर आक्षी ह्येच लिव्ल आसत बगा.......लै झ्याक!

आणि मग कधी कधी
खरंच ती पाऊस होते.>>>

सुंदर, खूप सुंदर !

मस्त गं नी. स्मित

खास!

व्वा... खल्लास... लै भारी... एक नंबर.... स्मित

"अश्या तिच्या स्वप्नात
तिची तंद्री लागून राहते,
आणि मग कधी कधी
खरंच ती पाऊस होते."

..... हे आवडलं

छान चित्रमय कविता आहे.

क्या बात है नी. मस्त मस्त कविता. स्मित

सुंदर च