मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy एकेक पान वाचतेय. मी पण लावणार आता काहीतरी. माझ्या जुन्या अपार्ट्मेंट मध्ये जागाच नव्हती झाडं ठेवायला. इथे नवीन घरात दोन हात लांबीरुंदीची बाल्कनी आहे, शिवाय भरपूर उन, दमट हवा, भरपुर उजेड, काय बरे लावावे..
इथे ज्याच्या बिया/झाडे मिळतील असे काहीतरी. बसिल, लसणाची पात, कोथिंबीर नक्की लावता येइल Happy

मेधा बिया नाही, छोटेसे रोपच मिळाले. रोड नं बारा बंजारा हिल्सला माझ्या घरापासून पुढे एक नर्सरी आहे. विंडोसिलमध्ये लावले आहे छोट्याच कुंडीत. अजून ५ गमले आणून दारासमोर हिरवळ करणार. माझा डायवर
छुपा माळी आहे. प्रेमाने मदत करतो आहे. ( करेल काय बिचारा)

ही माझी कोथिंबीर. लावल्यापासुन बाराव्या दिवशी काढलेला फोटो P7010493.JPG
हा ओवा P7010496.JPG
पुदीना P7010497.JPG
ही माझ्या छोट्याशा बागेची एक बाजु. यात हिरव्या बादलीत मी माती आणुन ठेवली होती त्यात सहज म्हणुन बडिशोप [मऊ पडलेली जी टाकुनच देणार होते ती] टाकली तर मस्त उगवली P7010500.JPG
हा मोगरा. P6100453.JPG
तोच मोगरा जवळ्उन.P6100456.JPG

रातराणी;ला अजुन फुल नाही आली यंदा पण येतील ८\१० दिवसात अस वाटतय् बघुन.

रातराणी लावायचे माझ्याही खुप मनात होते... पण वाचनात आले की ते अतिशय विषारी झाड आहे, म्हणून त्याचा विचार पुर्ण रद्द केला.

मनिषा,
मोगरा बघुन मस्त वाटल, माझ सगळ्यात आवडत फुल आहे पण इथे कुठे मिळणार मला:(, असो तुमचा मोगरा झकास एकदम!

रमा, यामागामी नर्सरी क्युपरटिनोमधे तुला मोगर्‍याचे रोप मिळेल Happy

मनिषा, बाग आवडली.

मला नाही वाटत रातराणी विषारी असेल म्हणुन. आणि तशीही ती जराही आकर्षक दिसत नाही, त्यामुळे आणुन एका कोप-यात ठेऊन द्यावी. रात्री १० च्या सुमारास सुगंध सुटेल, तेव्हाच लक्षात येईल.

माझ्या जुईला सध्या बहर आलाय. रोज संध्याकाळी फुले तोडुन बेडरुममध्ये थाळीत ठेऊन देते. बेडरुम मध्ये मस्त सुगंध पसरतो.

रातराणी सुगंध वापरा मंड्ळी.

साधना जुई मला पण आवडते. पांढर्‍या फुलांना अतिशय मनमोहक सुवास असतात. मोगरा पण अगदी देखणा आला आहे.

मनिषा
एकदम खल्लास आहे बाग, मोगर्‍यावर तर एकदम फिदा.
मला प्लीज कोणीतरी सांगा इथे अमेरीकेत कोरफडीचे झाड मला कुठे मिळेल, मला घरात कुंडीत लावायचे आहे? Lowes, Home Depot इ ठिकाणी अजून चक्कर मारली नाहीये. त्याआधीच इथे विचारतेय.

आरती, तुझ्या बागेतला अननस खूप आवडला मला. लावल्यापासून किती दिवस लागले त्याला यायला?
सीमा, धन्यवाद गं . अंबाडीच्या काड्या अजून तरी ताठ मानेने उभ्या आहेत. बारीक बारीक पानं डोकवायला लागलीत त्यातून.

रुनी , Lowes/ HD मध्ये मिळत. मी पाहिलय गेल्याच महिन्यात. कॅक्टस सेक्शनच्या जवळ बघ.

Home Depot मध्ये हमखास मिळेल. सी व्ही एस सुपर स्टोअरमध्ये पण कधी कधी मिळतात कोरफडीच्या कुंड्या Uhoh

एवढ्या सगळ्यांचं बघून मलाही पॅटिओत काहीतरी लावावंसं वाटायला लागलंय. इथल्या हवेला उन्हाळ्यात बाहेर ठेऊन आणि थंडीत आत घेऊन असं काय तग धरेल? इथे तर नर्सर्‍या शोधण्यापासून मला तयारी करावी लागेल Uhoh

Pages