मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होल फूडस मध्ये मोगरा नक्की मिळतो. $२० ला एक रोप असतं. हीच किंमत असते का सगळीकडे ?

मी ३ वर्षांपुर्वी एक डेझर्ट रोजचं (बोनसाय) रोप आणलं. त्याला मार्चमध्ये हमखास फुलं येतात म्हणे. माझ्या रोपाला एकदाही आली नाहीत. तसच त्याची वाळु आता निघून येते आहे. काय करु ?

आज माझी बाकीची ६ झाडे आली व लागली. दारा समोर ही सहा मंडळी आहेत.
आता मिशन: एंट्रन्सचे सुशोभिकरण.
या मधे मेन दाराला रंग करून त्यावर ट्री ऑफ लाइफ चे चित्र काढणार आहे. व दाराची चौकट व बाजूचा भाग रंगविणार आहे. दाराला ऑफ व्हाइट रंग देणार एखाद्या वीकांताला. पहिले दिवाळीचे स्टिकर्स व शुभलाभ वाले जुने तोरण काढायचे आहे. इथे एक चांगली पद्धत आहे ती म्हणजे लोक माळा घेऊन रोज घराच्या दाराला लावतात. माझी एक मैत्रीण रोज फुलाने रांगोळी काढते. सकाळी पॅसेज पुसुन घेतात व स्वच्छ रांगोळी वगैरे काढतात. प्रसन्न वाट्ते. माझ्या दारात दोन हत्ती वाले स्टँड आहेत छोटेसे. सण वाराला मी तिथे हार लावते. हत्ती सोंडेत हार घेऊन उभे आहेत असे दिसते. आता त्या स्टँड वरही छोट्या कुंड्या ठेवणार आहे.
केन चा प्लांटर्स ठेवायचा स्टँड घेतला तरी मस्त दिसेल. पुढील महिन्याचा प्रॉजेक्ट.

मनिषा, मोगरा खूप सुंदर फूललाय. बहर येण्यापूर्वी सगळी पाने तोडली, तर जोमदार बहर येतो, असे वाचले होते. (पण कधी धीर नाही झाला !!)
अश्विनी, कुठली झाडे आणली ?

भाग्य, आता मला दुघी हलवा करुन पाठव Happy

दिनेश, माझ्या गार्डनींगच्या कोर्समध्ये सांगितलेले की बहर यायचा ऋतु येण्यापुर्वी मोग-याची पाहिजे तितकी छाटणी करायची आणि मग आठवडाभर त्याचे पाणी तोडायचे (याला ताण देणे असेही म्हणतात). मग नेहमीसारखे पाणी सुरु करायचे. नविन फुटवे भराभर येतात आणि बहर पण भरपुर येतो.

मी छाटणी करते पण पाणी तोडायचे जमले नाही कारण मी घरात नसतात घरातील इतर मंडळीही झाडांना पाणी घालतात आणि कितीही समजावले तरी कुंड्यातील झाडांना पाणी घालायचे म्हणजे कुंडी भरुन पाणी वाहायला लागेपर्यंत घालायचे असा त्यांचा समज आहे.

कुंड्यांमधल्या झाडाना पाणी घालताना कधीच नळाला पाईप लाऊन घालु नये. भांड्याने झाडाच्या मुळाशी पाणी ओतावे आणि कुंडीत आत अर्धे खाली जाईल इतकेच घालावे. वरुन पाणी ओतले आणि खालुन ते वाहुन जायला लागले की आपण घातलेले खतही सोबत वाहुन जाते. जमिनीत लावलेल्या झाडातले खत असे वाहुन गेले तरी ते झाडाच्या आजुबाजुलाच राहते आणि मुळे ते खत नंतर शोषुन घेऊ शकतात. पण कुंडीतुन वाहुन गेलेले खत मात्र वाया जाते.

अर्थात हे घरातल्यांना समजावुनही काही उपयोग नाही Sad पाणी आणि खत दोघांचीही नासाडी...

माझ्या मोग-याला दोन-तिन आठवड्यापुर्वी अगदी जोमदार बहर आलेला. झाडावरची फुले तोडायला मी सहसा उत्सुक नसतेच, मला ती झाडावरच पाहायला आवडतात. तरीही दोनदा चांगला गच्च लांबसडक गजरा करुन माळला आणि एकेरी फुलेही चारपाच वेळा माळली. आता मात्र एकही फुल नाहीये झाडावर Sad

माझी एक मैत्रीण रोज फुलाने रांगोळी काढते. सकाळी पॅसेज पुसुन घेतात व स्वच्छ रांगोळी वगैरे काढतात.

मस्तच गं. मलाही असे करायला आवडेल.. हल्ली सकाळी खाली गेले की प्राजक्ताची फुले घेऊन येते आणि ताटलीत पाणी भरुन त्यात घालुन ठेवते... Happy

कोकणात सारवलेल्या जमिनीवर, चाफ्याच्या फुलाचा मस्त रांगोळ्या काढलेल्या असतात.
हि फूले झाडाखाली पडलेलीच असतात, आणि तिथे तर याची झाडे भरपूर.

साधना हा असा कोर्स कुठे करता येइल?

दिनेश ती झाडे नक्की कोणती आहेत माहीत नाही. आवड्ली ते घेतली झालं.

मी मुंबई विद्यापिठाच्या एक्ट्राम्युरल मधुन केला होता. आताही आहे हा कोर्स... वेब्साईट बघा.

http://www.extramural.org/

http://gardentia.net/ ही सुद्घा एक चांगली साईट आहे. मी कोर्स करतानाचे एक फॅकल्टी - श्री. नंदन कलबाग - यांची ही साईट आहे. पहिल्या पानावर गार्डनिंग नोट्सखाली घरातील बागेची काळजी कशी घ्यावी यावर भरपुर साहित्य आहे.

साधना धन्स.
अमि पण धन्स. मी १९८८ मध्ये जुन्या घरात जी लावली होती तीच परत लावली आहेत. त्या घरात ३० झाडे मी जमविली होती. मी आजिबातच अ‍ॅड्वेंचरस नाही. पण सिलेक्षन अगदी अय्या किती नाजूक पाने, अय्या किती गोड आहे. किती छोटुसे आहे टाइपच केले आहे. बाकी डायवर कम माळीवर भरोसा. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. नावे शोधून बघते.

साधना, श्री नंदन कलबाग अजून लिहितात का ? त्यांची काही पुस्तके आहेत का ?
जवळजवळ २० वर्षांपूर्वी त्यांनी लोकप्रभात पॅशनफ़्रुट आणि एक मल्टी व्हिटॅमिन
प्लांट बद्दल लिहिले होते (नाव कदाचित चेक्कूर मणीस असेल).पॅशनफ़्रुट खुप
बघितले पण ते दुसरे झाड कधीच बघायला मिळाले नाही. या झाडाची पाने,
कुठल्याही भाजीत आमटीत घालता येतात. त्यातून भरपूर जीवनसत्वे मिळतात.
पानांना स्वाद नसल्याने. लक्षातही येत नाही.

गं तू सुंदर चाफेकळी, धमक ग पिवळी
किती कांती तूझी कोवळी
कां तू नंदनवनीची चुकून अप्सरा
आलीस गं भूतळी
--- विद्याधर गोखले

सोनचाफ्याचे झाड, कुणा रसिकाने अगदी घरासमोरच लावलेले. या झाडाखालून वर बघितले
तर फूले सहसा दिसत नाहीत, पानाआड दडायची खोड असते यांना, आता हे नजरेसमोर आहे
तरी खोड काही जात नाही.

sonchafa.JPG

सिंडे, हे बघ तुझे डेझर्ट रोज. त्याचेच दुसरे नाव अ‍ॅडेनियम. ते बोन्साय सारखे दिसते पण खरे बोनसाय नाही. त्याचे रुपच बोन्साय सारखे आहे. माझ्याकडे ढिगाने आहेत. याला शेंग येते आणि शेंगात बी असते. ते रुजवले की लगेच नविन अ‍ॅडेनियम तय्यार. आणि त्याला बाराही महिने फुले येतात. आताही बाहेर फुले आहेत. आणि आलेले फुल किमान १५ दिवस तरी झाडावर टिकते. तुला देते पाठवुन.....

adenium.JPGadenium1.JPGadenium2.JPG

अ‍ॅडेनियमला भरपुर उन लागते, तुझ्याकडे उन कमी असेल तर फुले कदाचित येणार नाही. माझी आई माझ्याकडुन रोप घेऊन गेलेली त्यालाही फुले येत नव्हती, कारण उन खुप कमी मिळत होते. पाणी खुप कमी लागते. पावसाळ्यात मी शेडखाली ठेवते झाडे. बाकी काही काळजी घ्यावी लागत नाही. आपल्याकडची फुलपाखरे किडे वगैरे ह्या झाडाच्या वाटेला अजीबात जात नाहीत. Happy

हे याचे मुळ. हे बोन्सायसारखे दिसते. पण psyudo bonsai... not the real thing... रोप लावताना पसरत कुंडीत लावायचे आणि मधुन्मधुन थोडे वर काढायचे म्हणजे अर्धी मुळे वर राहतात आणि मग ती मांसल बनतात.

adenium3.JPG

ह्म्म दिनेश.. माझ्याकडे सोनचाफा होता.. Sad आता परत आणेन...

माझ्या कॉलनीत एकाने रस्त्याच्या कडेला लावलाय. अगदी लहान तिन फुट उंचीचे झाड आहे. त्याला फुले आली की ती राहातच नाहीत.. Happy मी एकदा सक्काळी जीमला चाललेले तर मला चक्क ८ फुले दिसली झाडावर. अर्थात मी तोडली नसती तर दुस-या कोणीतरी तोडली असतीच. त्यामुळे मी ती लगेच हस्तगत करुन घरी आणली. ताटलीत पाणी भरुन त्याच्या मदतीने आठवडाभर सुगंध आणि फुले टिकवली...

माझ्या मुलीच्या शाळेत दोन मोठी झाडे आहेत. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षी एका पालकांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त ती दोन रोपे शाळेला दिली होती. त्या झाडांवर मी पहिल्यांदाच सोनचाफ्याची फळे पाहिली. द्राक्ष्याच्या घोसासारखाच त्याच्या फळांचा घोस असतो, फक्त हिरवा.. खातात काय तो?? (मला फळ म्हटले की खायचेच सुचते... ") ) माझ्या हाफिसात एका ओळीत १०-१२ झाडे आहेत, त्याच्या शेंड्यावरची फुले शिल्लक असतात, हातात येण्याजोगी गुल्ल होतात Happy

मुलीच्या शाळेत यंदा नक्षत्रौद्यान बनवणार आहेत. प्रत्येक नक्षत्राची दोन झाडे लावणार. शिवाय परिसरात १००० झाडे लावणार आहेत. पालकांनी मुलीच्या वाढदिवसासाठी केक आणण्यापेक्षा शाळेला झाडे द्या असे आवाहन मॅडमनी केले आहे. मी कदंब आणि आकाशनीम (बुच) देणार आहे. दोन्ही माझे अतिशय आवडते आहेत.... Happy

कदंबाचे फुल मी पहिल्यांदा सावंतवाडीला शेजारणीने तिच्या शेतातुन आणलेले पाहिलेले. तुम्ही लिहिलेले नाव न्हिंव... तिने हेच नाव घेतलेले. मी इतकी वर्षे विसरलेले, आता तुम्ही सांगितल्यावर अचानक आठवले. ते खातात म्हणुन तिने सांगितलेले. पण कसे खायचे?? मी वरच्या पाकळ्या गळालेले कदंब बघितले पण ते टेनिस बॉलसारखे कडक लागतात हातांना.

चाफ्याचा घोस खात नाहीत. त्यात लाल गुंजेसारख्या बिया तयार होतात, त्या मात्र रुजतात.
छान फूललेय डेझर्ट रोज. हे झाड मूळचे वाळवंटातलेच आहे. नैसर्गिक रित्या फूललेले छान दिसते. त्यावर अजिबातच पाने नसतात, नूसतीच फुले.
निवं तसेच बॉलसारखे दिसते. तसेच खायचे. आत केशरी रंगाचा गर असतो.

साधना, दिनेश,

मी कदंबाबद्दल विचारणारच होतो तुम्हाला. म्हणजे ठाण्याला खोपट भागात त्याची भरपूर झाडे आहेत. मागच्या महिन्यात सगळी झाडे बहरली होती. ती फुले इतकी मस्त दिसत होती पण मला तेंव्हा त्याचे नाव माहीत नव्हते.
आता आतली फळं उरली आहेत. दिनेश आत्ताच खायची का? का अजून पिकावी लागतील?

आमच्याकडे सोन्चाफा चिक्कार फुललाय. परवाच त्याची छाटणी केली. कोरफडीचा पण छाटणी करायची आहे.

मोगरा, मदनबाण(:) )जास्वंद आणि अबोलीचा बहर मात्र॑ ओसरलाय. खूप पाऊस असला की झाडाना फुलं येत नाहीत. पण झाड मात्र जोमाने वाढत असतं.
आमचे दहा बारा गुलाबाना अशीच पानं फुटतायत. फुलं यायला थोडे दिवस जातील. पण या सर्व झाडाच्या पानं फुटण्याचा सोहळा मात्र बघण्यालायक असतो. ती इवलाली रंगीबेरंगी पानं खूप गोजिरी दिसतात.

मेथी, पालक टोंमॅटो भेंडी पावसात वाहून गेले Sad कोथिंबीर आणि पालकाने मात्र जोर पकडलाय. नविन लावलेला कढीपत्ता पण रूजला नाहिये. अजून रोप आणून लावावे लागेल बहुतेक. अळू आणि मिरी मात्र सुसाट सुटले आहेत.

श्रावण चालू झाला की पुन्हा एकदा नर्सरीमधून चक्कर मारावी लागेल.

साधना आता मला तुझ्याकडे याव लागेल अ‍ॅडेनियम घेण्यासाठी. नाहीतर तु ये माझ्याकडे मच्छी खाण्यासाठी तेंव्हा मी तुला वडीचा अळू देईन तु मला अ‍ॅडेनियम घेउन ये.

मी छाटणी करते पण पाणी तोडायचे जमले नाही कारण मी घरात नसतात घरातील इतर मंडळीही झाडांना पाणी घालतात आणि कितीही समजावले तरी कुंड्यातील झाडांना पाणी घालायचे म्हणजे कुंडी भरुन पाणी वाहायला लागेपर्यंत घालायचे असा त्यांचा समज आहे.
>> माझ्या कोथिंबीरीला नवर्‍यानं (माहित नसल्यानं) इतकं पाणी घातलं की तिनं मान टाकली
Sad Sad Sad

दिनेशदा, माझ्या सासरी पिवळ्या चाफ्याचं झाड आहे त्याला ६०-७० फुलं दररोज येतात! इतका भन्नाट वास येतो!

मे महिन्याच्या अखेरीला लाल झालेल्या कारल्याच्या बिया कुंडीत टाकल्या. रोज पाणी घातल्यावर ३-४ दिवसात त्या सहज रुजल्या आणि वेल वाढू लागले. आता त्यातल्या एका वेलीला छोटे कारले लागले आहे.

Pages