मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे आईने कोंब असलेले आले (अद्रक) वेगवेगळ्या कुंड्यात खोचुन ठेवले. आता छान फुटुन मोठमोठी पाने आली आहेत...!
त्यांचा काय उपयोग करता येइल?

आल्याच्या पानांचा उपयोग ऐकण्यात नाही, पण जमिनीखाली आले तयार होण्यासाठी १ महिन्या पेक्षा जास्त वेळ लागतो.
मग तयार झालेले आले आपल्या गरजे प्रमाणॅ थोडे थोडे उकरून काढता येईल.

पूनम, मी लावलेल्या धण्यालापण कोंब आलेत पण तुझ्यासारखाच मलाही प्रश्न पडलाय ती नक्की कोथिंबीरच आहे की दुसर काही तरी पडलेल उगवलय Uhoh वाट बघते आता वाढल्याशिवाय कळणार पण नाही. मिरच्यांच्या बिया पेरलेल्या त्यालाही कोंब आलेत (ते ही थोडे मोठे झाल्यावरच कळेल नक्की तेच आहेत की दुसर काही आहे ते :P)

मिरच्यांची पाने पोपटी लांबट असतात त्यावरुन ओळखायचे. कोथिंबीर मीही लावलेली पण सुरवातीची दोन पाने कशी दिसतात ते आठवत नाही आता. माझ्या कोथिंबीरीवर चिमण्यांनी ताव मारलेला. त्यांना खुप आवडते कोथिंबीर...

सचिन, लसूण तयार होईल पण त्यासाठी वेळ लागतो. साधारण तीन ते चार महिने. पात फूटभर उंच झाली की वर वरची कापून चटणीसाठी वगैरे वापरता येईल. पात काढली तरी पाणी, खत नियमीत देत राहायचं. लसूण लावतानाच थोड्या भुसभुशीत मातीत लावावा. चार महिन्यात छोटे लसणाचे गड्डे तयार होतील.

दिनेशदा आज मी माझा लसुण काढायला गेले तर त्याला आता मुळे फुटली आहेत. मग परत पुरला... आता जगेल की नाही माहीत नाही. माझी मोहरीची बरीचशी झाडे कुजली आहेत....:( Sad

मी लाल मिर्च्यांच्या बिया कुंडीत टाकल्या होत्या. एकदम खूप रोपे आली आहे. त्यांना वेग-वेगळ्या कुंडीत करायचा विचार आहे. त्यांची मुळे कधी पर्यंत strong होतात? एक काढुन बघितले होते त्याचे मुळ नाजुकच वाटले.

लसणाच्या पाकळ्या पेरल्या होत्या ना, मग माझ्या माहितीप्रमाणे त्याला खाली गड्डा येणार
नाही. त्याची पात, आणि तो लसूणच वापरावा लागेल. (मुंबईत थंडीत असा लसुण येतो,
बाजारात. गुजराथी उंधीयु मधे लागतो तो.)
गड्डा होण्यासाठी बिया पेराव्या लागतील.
मोहरीला फ़ूलोरा आणि शेंगा यायच्यापुर्वीच पाल्याची भाजी करुन टाकायची. शेंगातून काही
फ़ार मोहरी, हाती लागत नाही.

वृषा, मिरच्यांची रोपे पाच सहा इंच तरी वाढू देत.जी जोमदार आणि निरोगी वाटतील, तिच
ठेवायची आणि बाकीची काढून टाकायची.

लसणाच्या पाकळ्या पेरल्या होत्या ना, मग माझ्या माहितीप्रमाणे त्याला खाली गड्डा येणार
नाही. >>> दिनेश, मी दर वर्षी पाकळ्याच पेरते आणि दर वर्षी लसूण तयार होतो. त्याला वेळ लागतो. वर नमूद केल्याप्रमाणे ३-४ महिने - कधी कधी जास्त - लागतात.

अंजली, बरोबर. मी पण लसणाच्या पाकळ्याच पेरल्या होत्या, मस्त लसणाचे गड्डे तयार झालेत.

रचना,
अंजली म्हणाली तस ३,४ महीने लागले लसूण तयार व्हायला. लसणाची पात पिवळी पडते तेव्हा साधारण लसूण तयार झाला असं समजायचे Happy

भाग्या, हो.
रचना, साधारण ४ महिन्यानंतर अगदी थोडासा मुळापाशी उकरून बघ. छोटा लसणाचा गड्डा दिसेल. पहिल्यावर्षी अंदाज येईपर्यंत भाग्या म्हणते तसं चार महिन्यांनंतर पात पिवळी पडली की काढ.

अंजली
लसणाची पात हिरवी असतांनाच वरच्यावर कापली तर लसणाचा गड्डा वाढत नाही का जमीनीत? पात ठेवावीच लागते का लसूण मोठा व्हायला.

रुनी,
अगं पात तोडलीस तरी परत येत रहाते. आणि लसूण वाढतो पात तोडत राहिलीस तरी.
मी पण पात तोडते कोवळी, मस्त स्वाद असतो त्याला.

मी नेहमी लसणीच्या एक दोन पाकळ्या कुंडीत लावते अन त्याची पात वापरत असते. यावेळेस एका मित्राने सीड गार्लिक म्हणून एक गड्डा दिलेला त्याच्या पाकळ्या अंगणात लावल्यात. त्याची पण पात मी मधनं मधनं काढत आहेच. आता जवळपास अडीच महिने झाले . आता थोडं उकरून पाहू का Happy

मेधा आत्ताच नको काढू. अजून १ महिना तरी थांब.
रूनी, अगं पात कापत राहायची. पात कापली की लसणाच्या गड्ड्याला सगळे nutrients मिळतात आणि तो जोमाने वाढतो. पात येत राहते. लसूण तयार होत आला की (साधारण ४-५ महिन्यांनी) जरी पात कापलेली असली तरी जो काही राहिलेला भाग असेल, तो पिवळा पडत जातो. कधी कधी सुकतो. मग हळूच हलवून बघायचा. पाकळ्या दिसल्या तर लसूण तयार झाला समजायचं. Happy

हे इन्टरेस्टिंग आहे. लावते लसूण Happy

धन्यामधून आता यायला लागलंय कोथिंबीरसदृश काहीतरी, हुश्श Happy पहिली पानं अगदीच एखाद्या रानभाजीसारखी जाड आली आहेत.

आरतीने दिलेला कढीपत्ता रुजला, पालवीही आली. काल दोन डिक्श्या आमटीत घातल्या, आमटी (उगाचच) जास्त स्वादिष्ट लागली Proud

पूनम, त्या कोथिंबीरीला जप. चिमण्या, कबुतरं खाऊन टाकतात. वर एकदम पात्तळ जाळी असेल तर लावून ठेव.

झाड छान वाढलं की चट्णीपुडी करुन ठेव आणि तीच १-१ चमचा ज्यात त्यात घाल. सगळेच पदार्थ स्वादिष्ट लागतात (स्वानुभव). रोज प्रत्येकाने कढीपत्त्याची ५-६ पानं खावीतच कुठल्याही प्रकारे. ब्रेस्ट आणि ब्लड कॅन्सरची शक्यता ५०%ने आणि इतर कॅन्सरची शक्यता ८०% ने कमी होते. कॅल्शियमसुद्धा भरपूर असतं त्यात.

नालायक कबुरतांनी माझी मेथीची रोपं नष्ट केली, झेंडूचे रोप मोडले Sad
माझ्या मनात इतके खतरनाक विचार आले तेव्हा... एखादं कबुतर जर माझ्या हातात मिळालं असतं तर ते जिवंत राहिलं नसतं.

हे इन्टरेस्टिंग आहे. लावते लसूण <<
लसणाच्या पाती पासून केलेली चटणी एकदम मस्त लागते,
माझ्या आईने दुधाच्या ट्रे मधे लसून आणि कोथिंबीर लावली दोन्ही मस्त उगवले आहे, तो ट्रे मी टेरेस वर ठेवला आहे पण त्याला कबुतरांनी अद्यापी धक्का सुद्धा लावला नाहीये

आमच्या इथे आजुबाजुला कितितरी वृक्ष आहेत... पण कबुतरे बाल्कनीतच कडमड्त असतात. मी आजपर्यंत एकाही कबुतराला झाडावर बसलेले पाहिले नाही. गुलाबाच्या फांद्या मोडणे, शेवंतीचे झाड उपट्णे, इ. प्रकार ही कबुतरे करतात.

कबुतरे नालायकच असतात. मी अमी, कबुतरे इतकी आळशी असतात की ती सहज हाती लागतील. पण एका कबुतराला मारुन काहीही होणार नाही, इतर कबुतरे त्यापासुन काहीही धडा घेणार नाहीत आणि आपला कार्यक्रम चालुच ठेवतील. त्यापेक्षा आपणच धडाधडा धडे घेऊन नायलॉनच्या नेटने ताजे कोंब झाकलेले बरे.

अगं कबुतर हे शांततेचं प्रतिक आहे

उगाच् नाही झाले ते शांततेचे प्रतिक. माणसे वैतागुन आणि शेवटी कंटाळून गपचिप शांत पडेपर्यंत कबुतर त्रास देतच राहते. आणि आपण तसे गपचिप शांत पडलो की ते वळचणीला जाऊन तो भयाण गुटर्गु आवाज काढत बसते...

अमी टेरेस मधे कुंड्या एका कोपर्‍यात ठेव आणि दुसर्‍या कोपर्‍यात कबुतरांना काहितरी खायला टाक.
मी तसेच करतो त्यामुळे ते माझ्या कुड्यांमधे लुडबुड करत नाहीत.
हा माझा अनुभव आहे तुम्हाला वेगळा अनुभव येऊ शकतो Happy

ओक्के, आता मला कळाले मला हा त्रास का नाहीये ते. माझ्या टेरेसला लागुन खालच्या शेजा-याचे छप्पर आहे त्यावर सकाळी कबुतरे उन खात असतात आणि सोबत मी घातलेले मक्याचे दाणे इ. पण धडाधड खात असतात. म्हणुन माझ्या कुंड्यांकडे येत नाहीत.. Happy

साधना, आमच्या किंग्ज सर्कलच्या घरी कबुतरांचा असाच भयानक त्रास असायचा. सा.बा. जाम भडकायच्या. एकदा मी हापिसातून घरी आले तर दाराला आतून कडी आणि आतून काहीतरी हिंसा होत असल्याचे आवाज येत होते. थोड्या वेळाने सा.बां. नी दार उघडलं तर त्यांच्या हातात धुण्याची काठी होती आणि चेहरा जाम दमलेला पण रणरागिणीचा अवतार. भीत भीत काय झालं असं विचारलं तेवढ्यात आतल्या खोलीतून एक कबुतर उडून बाहेर गेलं. तेव्हा पुन्हा रागावून त्या म्हणाल्या ह्या मेल्याने आज कहर केला. आपली उन्हात वाळत ठेवलेली चणाडाळ पिंपाच्या झाकणासकट खाली अंगणात पाडली.

आता सगळी कबुतरं सारखीच दिसतात, पण प्रचंड चिडलेल्या सा.बा. नेमक्या त्याच वेळी घरात शिरलेल्या कबुतराच्या पाठी काठी घेऊन लागलेल्या, ते पळून जाऊ नये म्हणून दाराला कडी बिडी घातलेली.

मलाही कबुतराचा राग आला पण सा.बां. च्या हातून त्या मुक्या पक्षाची हत्या झाली नाही म्हणून बरंही वाटलं.

>>>पण प्रचंड चिडलेल्या सा.बा. नेमक्या त्याच वेळी घरात शिरलेल्या कबुतराच्या पाठी काठी घेऊन लागलेल्>>><<

मी समजू शकते.... जावे त्याच्या वंशा तेव्हा तेव्हा कळे Happy

ते काही मुके-बिचारे प्राणि नसतात बरं... अतिचलाख असतात कबुतरं...

कबुतरे शांतीचे प्रतिक.... पण आपल्या मनःशांतीचे काय?

माझ्या कडीपत्त्याची पहीली पालवी कबुतरांनी खाउन टाकली होती. आता मी झाडे घरातच ठेवली आहेत.

माझ्या लसुणाच्या झाडाला कोंब आले आहेत.. पण मोहरी मात्र कुजल्यासारखी झाली आहे. त्या पुर्वी ती अशी दिसत होती...

Mohari.JPG

बाजुच्या कुंडीत धणे लावले आहेत... अजुन काहीच आले नाही त्याला...

Pages