जाने तु या जाने ना... आमिर खान प्रॉडक्शन्सचा तिसरा दर्जेदार चित्रपट.
हा चित्रपट का आवडला? पाच मुख्य कारणं आणि इतर अनेक...
१) इम्रान खान आणि जेनेलिआ. मस्ती मधली बोर वाटलेली ती हीच जेनेलिआ का असं वाटाव इतका तिचा सुपर्ब मेकओव्हर अब्बास टायरवालाने केलाय. चांगला डायरेक्टर किती स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स काढून घेऊ शकतो एखाद्या ऍक्टर कडून ह्याच हे उत्कृष्ट उदाहरण ( बरेचदा डिसीएच मधल्या सोनाली कुल्कर्णीची धाकटी बहिण वाटावी तशी बोलते/हसते. नशिब ड्रेसिंग आणि मेकप सेन्स तिचा नाही घेतलेला) .
इम्रान खान कडे खरंतर तो कां सध्याचा यशस्वी स्टार बनू शकणार नाही ह्याचे सगळे 'गुण' आहेत. म्हणजे त्याच्याकडे आजकालची मस्ट असणारी (इरिटेटींग)'ओव्हर पॅक्ड' बॉडी नाही. लुक्स जरासे फट्टू वाटणारे आहेत. तो बर्यापैकी शाय वाटणारी सटल बॉडी लॅन्ग्वेज डिस्प्ले करतो. आणि हे सगळं असं असूनही झकास पर्फॉर्मन्स देऊन आमिर खान चा भाचा असण्याची लाज राखतो.
२) रेहमानचं संगीत. मला वाटतं रंग दे नंतर पहिल्यांदाच रेहमान ने 'तरुण' संगित दिलय. पप्पू डॅन्स पे तो हम फिदा. कभी कभी अदिती.. आणि दुसरं एक स्लो ट्यून वरचं गाणं आहे रशिदचं ते ही क्यूट आणि सुरेख (क्रमाने). (जब वी मेट मधल्या आओगे जब तुम साजना.. वालाच हा रशिद खान आहे कां?)
३) अब्बास टायरवाला. ह्याचे संवाद कायमच ब्रिलियन्ट होते. ह्यातलेही आहेतच अर्थात (अदिती: आंटी कॉलेजके पांच साल कैसे गुजरे पताही नही चला... रत्ना पाठकः फोनपे बेटा. हा तर केक घेऊन जातो.) आणि जोडीला डायरेक्शन पण झक्कास. खूप फ्रेश स्टाईल आहे टेकिंगची.
४) सपोर्टींग कास्ट विशेषतः आदिती आणि जय सोबत त्यांचा सगळाच ग्रूप मस्त डीफाईन झालाय. सगळ्यांचीच कामं सुरेख.
ह्या फिल्ममधलं एक अजून छान वाटणारं म्हणजे ह्यातले सगळे 'आई वडिल' चक्क तेच तेच घसीटलेले चेहरे असलेले नाहीत त्यामुळे खूप नॉर्मल आणि ताजेतवाने वाटतात. रत्ना पाठक म्हणजे जय ची आई आणि नासीरुद्दीन शाह म्हणजे जयचे फोटोतले ' प्राऊड राठोड' वडिल तर कमाल (अर्थात ते अपेक्षितच आहे म्हणा ह्या दोन 'अतीगुणवान' कलावंतांकडून). बाकी रजत कपूर्-किटू गिडवानी आणि जयंत कृपलानी-अनुराधा पटेल ह्या आइ वडिलांच्या जोड्या सुद्धा छानच वाटतात बघायला. ते नेहमीचे अनुपम खेर, किरण खेर, रिमा लागू तत्सम आईबाप नाहीत हे अगदी बरं.
५) सरप्राईज पॅकेज मला अत्यंत आवडलेलं म्हणजे प्रतिक ( आय हेट टु कॉल हिम बब्बर). सेम स्मिता सारखीच सुरुवातीला जराशी ऑकवर्ड वाटणारी पण नंतर समोरच्याकडे लक्षही जाऊ न देणारी कमालिची सहज आणि इंटेन्स स्टाईल आहे पोराकडे. रोल खूपच छोटा आहे अजून सरावलेला लूक नाही पण दोन एक्सेप्रेशन्समधेच स्मिता दिसून जाते. त्याच्या वेगळ्याच लूकला साजेसे रोल मिळाले ह्या ईडस्ट्रीत तर सोनं करील हा मुलगा आणि नाही मिळाले तर गुणांची माती होईल कारण त्या टिपिकल साईडी रोल्समधे अडकून जाईल अशी भिती.
फ्लोरा फाऊंटन, एशियाटीक लायब्ररी आणि अपना झेवियर्स कॉलेजचं मन लुभावून टाकणारं दर्शन खूप खूप वर्षांनी झालंय जाने तु.. मधे हे अजून एक कारण बायदवे.
सेकंड हाफ अजून चांगला व्हायला हवा होता. एस्पे. लास्ट टेन मिनिट्स.
जाने तु... इज सुपरकुल.
>> स्वाती
>>> स्वाती वाचते आहेस ना?
.
नाही.
बहुतेक हा
बहुतेक हा सिनेमाचे वयाबरोबर व्यस्त समिकरण असावे
>>> म्हणुनच मिल्या तो तुला ठीक ठीक वाटला खुप छान नाही
बाकी तुझ्या मताशी सहमत. ती जेनेलीया बोर वाटली, त्यात तिचे ते दिव्य हिंदी.
पण एकंदर सिनेमा आवडला. नेहमीची कथा असुनही, पुढे काय होणार हे माहित असुनही, एक फ्रेश लुक चा सिनेमा बघायला मिळाला. काही जोक्स एकदम भन्नाट आहेत.
सगळ्यांची
सगळ्यांची मत इतकी 'बोल्ड' का येताहेत की मलाच असे दिसतय?
मी
मी पहाणारच आता हा मूव्ही, म्हणजे वयाचा अंदाज येईल.
लालू बोल्ड
लालू बोल्ड शब्द वाचल्याबरोबर बघायचा ठरवलेस का काय?
बघितला,
बघितला, आवडला
... TP म्हणुन छान आहे.
तर सांगा बघु माझे वय काय ? [profile न बघता]
प्रतिक चे डोळे थेट आई चे आहेत. बराचसा आई सारखा आहे. आवाज मात्र बब्बर आहे.
मला फारसा
मला फारसा आवडला नाही. ओके आहे. कथा तर पुर्णपणे प्रेडिक्टेबल होते. जितके कौतुक केले जातेय तितका चांगला नाही.
मला
मला अतिsssssssssssशय अवडला 'जाने तू :)'.. एकदम फ्रेश चेहरे, fresh and young music, झक्क्कास खटकेबाज संवाद आणि superb direction !!

Story तशी नेहेमीचीच पण ज्या प्रकारे सादर केलीये, फारच सही...hats off !
इम्रान खान आणि जेनेलिया दोघही खूप आवडले , एकदम next door वाटतात आणि सहज अभिनय करतात !
इम्रान मधे आमिर ची झलक दिसते आणि जेनेलिया चा चेहेरी अगदी सोनाली सारखा दिसतो !
वर सगळ्यांनी संवादां बद्दल लिहिलय त्यात अजुन एका हशा पिकवणारा स़ंवाद "You really like that rat, don't u ?-जेनेलिया
"No we r just good friends"-प्रतीक :))
खूप दिवस ते शाह रुख, रानी सारखे म्हातारे लोक पाहून अतिशय कंटाळा आला असताना यातले सगळे फ्रेश चेहरे पाहताना मस्त वाटत , इम्रान आणि जेनेलइयाचे सगळे friends पण अगदी खरे खुरे वाटतत , बोले तो एकदम अपलेच college frien आहेत इतके ओळखीचे वाटतात :)!
आणि रत्ना पाठक शाह ची आई तर एकदम झक्कास......फोटो मधला नासिरुद्दिन शाह तर केवळ........ !
जयंत कृपलानि, अनुराधा पटेल, किटु गिडवानी पण छान !
सगळ्यात गंमत म्हणजे एरवी डोक्यात जाणार्या सलमान च्या भावांची कॉमेडी पण आवडली, त्या पात्रां साठी अरबाझ आणि सुहेल ची निवड च एकदम परफेक्ट
रेहमान चे संगीत पण शोभेल असे, 'पप्पू कॅन्ट डान्स साला' एकदम बेष्ट !:)
सगळ्यांच्या dressing styles पण एकदम perfect दाखवल्यात !
सगळे friends बरेचदा कार मधून भटकताना दाखवलेत, त्या वेळी 'दिल चाहता है' गाणं खूप miss केलं
थोडक्यात आमिर खान प्रॉडक्शन म्हणजे आपल्या घरचे कार्य समजून सिनेमाला जाणार्या सगळ्या फॅन्स ना एकदम खुष करणारा आहे 'जाने तू या जाने ना' !:)
एकदम फ्रेश
एकदम फ्रेश आणि नो टेन्शन वाला वाटला हा पिक्चर. स्मिता पाटिलचा मुलगा कोण होता हे मला नाहि ओळखता आले बुवा, म्हणजे त्याचे चित्रपटात काय नाव होते?
तो जिग्नेश का?
तो, अदिती
तो, अदिती चा भाऊ...
अतिशय predictable
अतिशय predictable पण तितकाच lovable
aditi गण्याचे lyrics एकदम झ्याक......
पण डोळ्यात पाणी काढतो तो अमित
"मै तो तुम्हरे पास ही था पर बाकी लोग तुम्हरे ज्यादा करीब हो गये"
सुंदर
सुंदर चित्रपट

अगदी 'दिल चाहता है' च्या तोडीचा
मला त्या रोटलू आणि बॉम्ब ची जोडी इम्रान- जेनेलीया इतकीच आवडली (विजोड असली तरी खूप खूप छान वाटते)
मला जायचंय
मला जायचंय रे! पण या रविवारी गेले होते... तिकीट काढायला माझा नंबर आला आणि... हाऊसफुल!

पण मी जाणारे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ
जाने तू
जाने तू मला फार आवडला - त्याचे मुख्य कारण म्हणजे मांडणी, अभिनय आणि गाणी.
काही काही डायलॉग्ज फारच मजेशीर आहेत - ईस प्लेन को टेकऑफ केलिये दो रनवेज लगते है. वगैरे.
मला आवडलेले काही सिन्स
१. पताही नही चला , पांच साल कैसे गुजर गये - फोन पे बेटा फोन पे
२. नसीरुद्दिन शहाचा , पोरगा मारामारी करून येतानाचा अभिनय
३. आणि जेनेलियाचा तिच्या भावाची खोली पाहतानाचा अभिनय.
मला
मला खुपपपपपपप अवडला!!!!!
मस्त रिफ्रेशिंग आहे
ठिक आहे.
ठिक आहे. पुढे काय घडणार हे माहित असले तरी मांडणीमुळे वेगळेपणा आहे. दिल घाहता है च्या मात्र एक दशांश आहे. बहुतेक गाण्यांच्या चित्रीकरणात दिल चाहताची झाक मारते. Plus pint म्हणजे NRI साठी पंजाबी छाप गाणी नसल्याने सुसह्य झाला. आजकाल फक्त पंजबी ट्युन्सचीच गाणी ऐकायला मिळतात. जसे काही बाकीच्या प्रांतात संगीताची प्रथाच नाही.
एकदा बघणेबल आहे.
मलाही
मलाही ठिकठाक वाटला. बर्याच गोष्टी इतर चित्रपटा सारख्या न घेतल्याने हा चित्रपट बराच 'वेगळा' भासतो. उगाच मोठे मोठे बंगले, हिरॉईनचे (अगदी लक्षात येणारे)तंग कपडे, श्रीमंतीचा भपका, खानदान, पानदान... असल्या काही भानगडी नाहीयेत. जिथे गरज असेल तिथे डिस्को-बिस्को घेतले आहे, मुख्य म्हणजे हिरो 'तगडा' जिमबाज दाखवला नाहीए ते सगळ्यात चांगलं. कथेत जोर नसला तरी सादरीकरण उत्तम आहे. डोक्याला जास्ती ताप नाही. सिम्पल आणि सरळ, समजायला सोपी. नाहीतर जुडवा बिछडे भाई-बहन, खानदानी दुश्मनी.. सगळं लक्षात ठेवावं लागतं.

पण काही गोष्टी पटल्या नाहीत, कॉलेजच्या एका भांडणात अशक्य शिव्या देणारी जेनेलिया, तिचा मंगेतर तिला थोबाडीत मारतो तेव्हा गप्प का बसली असेल? इतर सगळे कानीकपाळी ओरडून तुम्ही प्रेमात पडले आहात असं सांगत असताना ही इम्रान ला अदिती अमेरिकेला जातानाच या गोष्टीची प्रचिती यावी? नेहमी हे लोक विमानतळ का दाखवतात? एखाद्या चित्रपटात चेंज म्हणून पूण्याचं स्वारगेट दाखवावं की, नाही प्रेमभंग झाला की हिरो/हिरॉइन कायम out of india च का जातात? कापूरहोळ च्या प्रती बालाजी मंदिरात का नाही जात?
मला तरी जेनेलियापेक्षा इम्रान जास्ती आवडला. नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाठकचं काम अतिशय उत्तम झालं आहे. इम्रान ची गर्लफ्रेंड वयाने त्याच्यापेक्षा मोठी वाटते. कधी कधी (खरंतर नेहमीच) हिरो-हिरॉईन वयापेक्षा जास्तीच मॅच्युअर दाखवतात, पण इथे तसं नाही, सगळे आपापल्या वयाला साजेशे.
अगदी टाकाऊ नाही, एकदा पहावा असा आहे.
कॉलेजच्या
कॉलेजच्या एका भांडणात अशक्य शिव्या देणारी जेनेलिया >>> स्वतःच्या भावाला SOB पण म्हणते ती
तुम्हाला कळत कसं नाही प्रेमभंग झाला की जायला कापूरहोळ ला NYU थोडीच आहे. मग उच्च शिक्षण कसे घेणार ?
.
कापूरहोळ च्या प्रती बालाजी मंदिरात का नाही जात? >>> छोटे लोग छोटी बात
.
मला एक कळाले नाही, शिक्षण संपल्या संपल्या आम्ही आपले resume च्या कॉप्या मारत कुठे नोकरी मिळते का बघत होतो. ज्यांआ "उच्च" शिक्षणासाठी जायचे होते ते पुन्हा पुस्तकात डोके घालुन बसले. पण ह्यांना कशाची काळजी तर मला जोडीदार मिळेल की नाही. त्यांचे आई-वडीलही त्यात सामील. एव्हढे cool parents पण मुलगी २० वर्षाची झाली म्हणुन तिच्या लग्नाच्या काळजीत.
.
सगळ्यात कहर म्हणजे मांजर मेल्यावर "आदिती..." गाणे टाकुन अक्षरशः वाया घालवलेय इतके सुंदर गाणे. चित्रपट बघितल्या नंतर १५ दिवस ऐकायची इच्छा झाली नाही.
>>>स्वतःच्य
>>>स्वतःच्या भावाला SOB पण म्हणते ती >>> बरं झालं हा डायलॉग मी नाही ऐकला ते.

सिंड्रेला शेवटून दुसर्या परिच्छेदाला अनुमोदन. आपल्याला उच्चच काय? पण कसल्याही शिक्षणासाठी जबरदस्त घासावे लागते. यांना कशाचीच चिंता नाही. व्हिसे-बिसे पण अगदी अंडी मिळतात बाजारात तसे मिळून जातात यांना. आणि उठा की सुटा अमेरिकेला... तिकिटाची availability? पैसे? असले प्रश्न जणू पडतंच नाहीत यांना.. हा सिनेमा नुसता पहायचा हेच प्लॅनिंग मी १ महिन्याभरापासून करत होते, त्यातून माझ्या गाडीच्या दोन्ही किल्ल्या हरवल्या होत्या, त्या बनवायला मला वेळ नाही मिळाला. मग हे लोक अमेरिकेला जाण्याचे प्लॅन असे पिठलं बनवण्याचा प्लॅन करतात तसं कसं काय करू शकतात?
हो आणि तो मांजर मेल्यावर शोकसभेचा प्रसंग अगदीच बालिश होता...
आणि
आणि अखेरच्या प्रसंगात शेवटी अमेरिकेचे तिकिट वाया जाते तरी आपलि हरविण चित्कारत बाहेत येते विमानतळाच्या.
मि आधि हिशोब मांडला असता मग शिव्या दिल्या असत्या मेल्या आधि म्हणता नाहि आले. माझे तिकिट बुडवलेस ते.
मि आधि
मि आधि हिशोब मांडला असता मग शिव्या दिल्या असत्या मेल्या आधि म्हणता नाहि आले. माझे तिकिट बुडवलेस ते. >>
****************************
आणि मी...
आणि मी... अमेरिकेचं तिकिट काढण्यापूर्वी त्याला बोलावून घेऊन त्याचा 'क्लास' घेतला असता. आणि सांगितलं असतं 'ए बाबा, हे बघ नंतर प्रेम्-बिम वाटतंय असं वाटेल (बॉलीवूडचे इतके चित्रपट पाहून अनुभव वाढलाय ना.. :P) तू २ दिवस नीट विचार कर, आणि मला सांग. मग मी एकतर जाणं रद्द करीन किंवा पुढच्या तारखेला उडेन. उगिच विमानतळावर येऊन तमाशा केलेला मला खपणार नाही.
आत्ताच
आत्ताच (पुन्हा) पाहिला.मज्जा आली. इथली सगळी चर्चा मस्त आहे. वयाचा अंदाज
पुन्हा?
पुन्हा? माझ्याच्याने पहिल्यांदाच अर्धाही बघवला नाही. प्रचंड बोअर...
मला
मला तिसर्यांदा बघताना कंटाळा आला. प्रचंड
मला कितीही
मला कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही, मस्त डॉयलॉग्स आणि झकास कॅरेक्टर्स..क्युट इम्रान :), व्हॉयलेंट जेनेलिया,इरसाल नासिर, मिष्किल रत्ना पाठक, बुद्धु बघीरा-भालू मस्त आहेत सगळे [:)]
********** स्टाइल मे रहनेका !! ************
मी दोनदा
मी दोनदा थेटरात फुकट, तीनदा बिग स्क्रीनवर, आणि दोनदा घ री पाहिलाय
मलाही आत कंटाळा आलाय आता मी इन द गुड कंपनी किंवा स्कूल फॉर स्काऊंड्रल्स बघीन
*********************
आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो?

व्हायलेन्
व्हायलेन्ट क व्हाय्ब्रन्ट?
छान आहे ...
छान आहे ... पण कुणी बचना ए हसीनो पाहीला का?
Pages