मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल

Submitted by डॅफोडिल्स on 15 April, 2011 - 08:17

मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून. Happy

पिल्लू : मग आई बाप्पा चप्पल का नाही घालत ?
मी : बाप्पा सिंहासनावर बसलेले असतात ना म्हणून.
पिल्लू : अगं मग आपण नाही का मंदिराबाहेर ओळीत चप्पल काढुन ठेवतो तशी बाप्पांनी पण चप्पल बाहेर काढून बसायचं ना ...... Lol

बॉईज च्या पोटात का बेबी नसतं ? फक्त गल्स का बेबी आणतात ?
मी:- कारण बेबी ग्रो होण्यासाठी गल्सच्या पोटात एक बॅग असते. तशी बॉइज ना नसते. Uhoh
मग कांगारूला असते तशीच ना मग ती आपल्याला का दिसत नाही... Sad
देवारे......

आता काय बोलणार ?

एकदा मला विचारलं .. सगळ्या आज्यांना आजोबा आहेत मग माँ आज्जीचे आजोबा कुठेयत ?
मी सांगितलं ते देवाघरी गेले आहेत.
कुठे असतं देवाघर ?
उंच आकाशात...

काही महिने होउन गेले. मध्ये दोन तिन दा आम्ही प्लेन ने कुठे कुठे जाउन आलो होतो.

तर हा पठ्ठ्या मला एकदा म्हणतो तु खोटं सांगतेस.. देवाघर नसतच...मी बघितलं आकाशात मला कुठेच देवाघर दिसलं नाही. Uhoh वय वर्षे तिन होतं फक्त.

आई मन म्हणजे काय ग ?

स्पोर्ट्स कोण बनवतं ?

जगात माणसं का असतात ?

असे एक ना अनेक प्रश्न ...

तुमच्याकडेही असतिल ना असे खूपसे प्रश्न ? काय अन कशी उत्तरे द्यायची....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षीपर्यंत शनिवारी शाळेला सुट्टी असायची. या वर्षी शनिवारीपण शाळा असल्याने तो एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे आमच्यासाठी. मग समजूत काढायला मी 'अगं, मला, बाबाला तर दर शनिवारी शाळा असायची' असं सांगितल्यावर 'गांधीजींना पण शनिवारी शाळा असायची का?' असा प्रश्न आला. Proud

शाळेसाठी लवकर उठणे हा अजून एक जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे, 'जोधा अकबर' बघताना अकबरला सकाळी झोपेतून उठलेले पाहून 'हा सकाळी किती वाजता उठायचा?' असा प्रश्न पडला होता. Proud

माझ्या मुलाच्या वर्गातल्या एका मैत्रीणीचा एक दात नुकताच पडलाय..अमळ लवकरच वाटतंय मला म्हणजे प्रिस्कुलमध्येच...तर आता याला आजी आजोबांचे दात बाहेर कसे येतात हा प्रश्न पडलाय म्हणजे एकदम त्याची याददाश ताजी बिजी झालीय...मला वाटतं तिला पण तसा दात द्यावा का हेही एकीकडे डोक्यात सुरू असेल Proud

सगल्यन्चे response वाचुन वततय कि देवाबद्दल जेवधे कुतुहल आपल्याला आहे त्यपेक्शा जास्त ते मुलाना आहे. I feel we believed in all stories quite blindly but children are thinking about it seriously,
माझ्या मुलाने इतक्यताच विचार्लेले दोन प्रश्न
Why shiva cut ganesh's head...how he could do it to his own son Sad

hyachya uttaracha vichar karanya aadhich dusara prashna bomb sarakha samor phutala...

Why did he ask for elephant head, he could have attached same head again (logic: elephant head shodhyanyat vel kashala ghalavala...ani ugach ek hatti marala etc etc)

Sad

रेवति, देवा बद्द्लचे प्रश्न तर असे जबरदस्त असतात या मुलांचे की समोरचा गार...... परत त्यांच स्वतःच लॉजीक असतं त्यांच्या प्रत्येक प्रश्नोत्तरामागे...... आठवलं म्हणुन माझ्या लेकीने मला सांगितलेली कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांची गोष्ट सांगते " एकदा कौरव व पांडव वीटी दांडू खेळत असतात , अचानक त्यांची विटी विहीरीत जाउन पडते. आता काय करायचे म्हणून ती मुलं विहीरी भोवती घोळका करुन उभी असतात इतक्यात तिथुन द्रोणाचार्य जात असतात. ते त्या मुलांना मदत करायचे ठरवतात. तिथे जवळच पडलेल्या गवताच्या काड्या ते गाठी मारुन एकत्र लांब दोर बनवतात त्याच्या एका टोकाला मॅगनेट बांधतात (विटीच्या एका टोकाला लोखंडी पत्रा असतो, हे आपण समजून घ्यायचं ) व ती दोरी विहीरीत सोडतात. मॅगनेटला चिकटून विटी बाहेर येते.... त्यांची ही हुषारी पाहुन त्यांना कौरव-पांडवांना शिकवायचे काम दिले जाते Proud
हे ऐकल्यावर मी तिला विचारले होते, ही अशी सांगीतली गोष्ट तुला शाळेत ??? यावर तिने मला ऐकवलं, "अरे , शाळेत जशी सांगितली होती तशी जर मी तुला सांगितली असती ना .... तर तु बिलिव्हच केलं नसत..... काही ही सांगतात...... ताई".
तेव्हांपासून जी मी तिला शरण आहे की अजुन तरी तिला पौराणिक कथा सांगण्याची हिम्मत केली नाही Proud

मस्तच धागा आहे हा. अजून वाचते आहे.

आमच्याकडे पण नेहमी एक मोठी प्रश्नावली तयार असते. त्यातले काही प्रश्न.

आई आपण ऐकतो कसं?
कानाने ऐकतो.
आपल्या कानाला होल असते तसे मग कार्टूनच्या कानाला का नसते?

कार्टूनच्या हाताला चारच बोटे का असतात?

दिवस, रात्र का असते?

आपल्याला नाभी का असते?

आपल्याला थुंकी का येते?

एक डॉक्युमेंटरी पाहून झाल्यावर, रॉकेट सरळच का जाते वर ते विमानासारखे आडवे का नाही जात?

कोंबडी जेव्हा त्याच्या ताटात असते, तेव्हा त्या कोंबडीला चिकन का म्हणतात?

http://ed.ted.com/lessons या साईटवर लहान - मोठ्या मुलांसाठी आणि अगदी आपल्यासाठीही खूप तर्‍हेतर्‍हेचे माहितीपूर्ण, मनोरंजक व्हिडियो लेसन्स आहेत. कार्टून्स, व्हिडियो गेम्स वगैरे ठीक आहे, पण ह्या चित्रफीती मुलांना अवश्य दाखवाव्यात असे मला वाटते.

माझ्या लेकीने साधारण ७-८ वर्षांची असताना माझ्या आईला विचारले होते
"आजी, आपण पहिल्यांदा एकमेकींना कधी भेटलो?"

Pages