मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल

Submitted by डॅफोडिल्स on 15 April, 2011 - 08:17

मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून. Happy

पिल्लू : मग आई बाप्पा चप्पल का नाही घालत ?
मी : बाप्पा सिंहासनावर बसलेले असतात ना म्हणून.
पिल्लू : अगं मग आपण नाही का मंदिराबाहेर ओळीत चप्पल काढुन ठेवतो तशी बाप्पांनी पण चप्पल बाहेर काढून बसायचं ना ...... Lol

बॉईज च्या पोटात का बेबी नसतं ? फक्त गल्स का बेबी आणतात ?
मी:- कारण बेबी ग्रो होण्यासाठी गल्सच्या पोटात एक बॅग असते. तशी बॉइज ना नसते. Uhoh
मग कांगारूला असते तशीच ना मग ती आपल्याला का दिसत नाही... Sad
देवारे......

आता काय बोलणार ?

एकदा मला विचारलं .. सगळ्या आज्यांना आजोबा आहेत मग माँ आज्जीचे आजोबा कुठेयत ?
मी सांगितलं ते देवाघरी गेले आहेत.
कुठे असतं देवाघर ?
उंच आकाशात...

काही महिने होउन गेले. मध्ये दोन तिन दा आम्ही प्लेन ने कुठे कुठे जाउन आलो होतो.

तर हा पठ्ठ्या मला एकदा म्हणतो तु खोटं सांगतेस.. देवाघर नसतच...मी बघितलं आकाशात मला कुठेच देवाघर दिसलं नाही. Uhoh वय वर्षे तिन होतं फक्त.

आई मन म्हणजे काय ग ?

स्पोर्ट्स कोण बनवतं ?

जगात माणसं का असतात ?

असे एक ना अनेक प्रश्न ...

तुमच्याकडेही असतिल ना असे खूपसे प्रश्न ? काय अन कशी उत्तरे द्यायची....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला समजावून समजेल एवढा मोठा आहे का तो? किंवा मग थोडीशी असं बोल्लं तर देवबाप्पा रागावतो वगैरे भीती दाखवून जमवावं लागेल. बाकीचे अनुभवी लोक सांगतीलच उपाय.

तुम्ही थोडे दुर्लक्ष करुन बघा.. त्याला जर असे वाटले ना की आपण बोलतेय ते काही वेगळे आहे आणि घरचे ते बोलु देत नाहीत.. तर मुल मुद्दाम करतात.. तो काही बोलला तरी काहि झालच नाही असे दाखवायचे हळु हळु त्यांची क्रेझ कमी होते आणि मग विसरुन जातात.. थोडा पेशन्स ठेवावा लागतो पण वर्क होते..

त्याला काय बोलायचे नाही ह्यापेक्षा काय बोलायचे हे शिकवलेत / समजावून सांगितलेत तर? उदाहरणार्थ घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे, त्यांना कोणते गाणे / कविता / श्लोक म्हणून दाखवायचे, त्यांना खेळण्यांची ओळख कशी करून द्यायची वगैरे वगैरे अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टी सांगितल्यात तर तो आधीचे विसरून ह्या नव्या गोष्टी आत्मसात करेल असे नक्की वाटते. तसेच त्याच्यासमोर किंवा त्याच्या कानावर पडतील अशा तर्‍हेने तुम्हाला आक्षेपार्ह वाटणारे शब्द घरात उच्चारले जाणार नाहीत ह्याची काळजीही तुम्हाला घ्यावी लागेल. तसेच तुमचे मूल कोणाच्या संगतीत असते, त्या व्यक्तीची भाषा तपासावी लागेल. त्यासाठी तुम्हाला व तुमच्या घरातील सर्वांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुलाने ते शब्द उच्चारले तर त्याला समजावून सांगावे लागेल. सध्या कदाचित त्याला ते शब्द उच्चारल्यावर तुमच्या होणार्‍या रिअ‍ॅक्शन्स बघण्यात मजा वाटत असेल. तेव्हा तुम्ही कसे रिअ‍ॅक्ट करताय हेही बघा. इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा मुलाचा तो एक प्रयत्न असू शकतो हेही लक्षात असू द्या.

आमची सध्या समर व्हेकेशन सुरू आहे. त्यामुळे विचार करायला खूप वेळ आहे. आणि मला नाही नाही त्या प्रश्नांनी भंडावून सोडले आहे. अक्षरशः रोजच यक्षप्रश्णांची बंबारर्डींग होतेय माझ्यावर.. मी योग्य ती आणि त्यांच्या वयाला पटतिल अशी उत्तरे देतेच आहे. आणि त्या ओघानेच आज ह्या बाफ् ची आठवण आली.
गंमत म्हणून इथे काही उदाहरणे देते..

आई सगळ्यात पहिला देव कोण ?
ब्रह्मा कुणाच्या पोटातून आला ? त्याची आई कोण ?
काही काही देव असे विचित्र का असतात ? (म्हणजे चार डोकी, नंदी वगैरे.. गणपती ला हत्ती चे डोके गोष्ट माहीत आहे)
देव सगळं संस्कृत बोलतात का?
देव हेअरकट का नाही करत ?
देवांकडे आता सारखे एरोप्लेन्स नव्ह्ते का ? (संदर्भ.. पुष्पक विमान)
माणसं ओल्ड का होतात ? जशी आहेत तशीच का नाही रहात ?
सगळे देव मेले का ? आत्ता कोण कोण देव जिवंत आहेत ?
खूप इयर्स मेडीटेटींग केल्यावर आपण देव बनतो का ?
मला खर्‍या हनुमाना चा फोटो काढता येईल का ?
एलियन्स कुठेही जाउ शकतात का ?
एलियन्स ना आपली भाषा येते का ?
खूप वर्षंपूर्वी सगळे खंड एकत्र होते, मग ते वेगळे झाले म्हणजे ते पाण्यावर तरंगत आहेत का ?
आपण रहतो ती लँड अजूनही पाण्यावरच तरंगतेय का ?
आपल्याला पंख का नाहीयेत ?

डॅफो, Happy कसले गोड प्रश्न आहेत.

सगळे देव मेले का ? आत्ता कोण कोण देव जिवंत आहेत ?
मला खर्‍या हनुमाना चा फोटो काढता येईल का ? >>>>> Lol

ठराविक वयानंतर हे प्रश्न कमी होत जातील अशी माझी अपेक्षा होती पण नाही!
प्रश्नांचे स्वरूप बदलते आणि ते सुरुच राहतात.
टीनएजर होण्याच्या मार्गावर असलेल्या माझ्या मुलाने आतापर्यंत एकच हिंदी सिनेमा पाहिला आहे, तो म्हणजे 'बॉडीगार्ड'. त्यातील 'तेरी मेरी मेरी तेरी प्रेमकहांनी' हे गाणे तर इतके आवडले आहे की विचारता सोय नाही. त्यावरून असंख्य इथे न लिहिता येण्यासारखे प्रश्न आले. माझ्या नवर्याशी हसून काहीतरी बोलत असताना त्याने येऊन विचारले की ही तुमची "प्रेमकहानी सुरु आहे का?"
एकदा 'तेरी मेरी म्हटल्यावर पुन्हा 'मेरी तेरी' का म्हटलेले आहे? यांचे चाललेले प्रेमप्रकरण आपल्याला समजले आहे ते त्यांच्या खर्‍या घरी समजले आहे काय? (दाखवतात ते खोटे असते हे सांगितले). असे खोटे प्रेम असताना एकमेकांना 'टच' केले तर चालते का?
त्यानंतर त्याला "खुदा जाने के मैं फिदा हूं" हे गाणे आवडले. त्यावर इतके प्रश्न विचारले की "बाबा, आता हात जोडते पण आणखी प्रश्न विचारू नकोस." असे म्हणण्याची वेळ आली.
आता शाळेत काय ते सांगतीलच म्हटल्यावर त्याला ते आवडले नाही म्हणून पुस्तके आणून दिली तर ती वाचायची नव्हती. असो. सध्या सगळा गोंधळ आहे.

"आपल्याला दिसत कस?" ( मला क्रोममधे अनुस्वार देता येत नाहिएत).
हत्तीला हात का नाहिएत?
दिसलेली प्रत्येक गोष्ट कोणी बनवली?

ऑलिम्पिक बघुन बॅडमिन्ट्न नेट घरी आणायचेय, पण लावायचे कुठे ??- घर दुसरीकडे उचलून ठेवायचे ! सोप्पय!! ( वय साडे तीन)

माझी लेक ६ वर्षे. शुक्रवारी रात्री बाबा ला फिरायाचा मुड आला. मग बाइक काढुन आम्ही टाउनला निघालो. रस्त्याने सिएसटी स्टेशन, फोर्टच्या दगडी बिल्डिंग्स, हाय कोर्ट, युनिवरसिटी, गेट्वे - मग तिचे सुरु
ती: ममा हे वी टी स्टेशन आहे ना? ( ती बाबा बरोबर मला ऑफिसला सोडायला येते सुटीच्या दिवशी म्हणुन तिला माहितीये)
मी: हो. बघ कसं छान बांधलयं. (सिंह, माकड वै. दाखवायचा उद्देश)
ती: किती मोठ्ठ आहे ना. पण ते असं कसं बांधलय?
मी: म्हणजे?
ती: पॅलेस सारखं नी त्याच्या आत ट्रेन?
मी: हो ते इंग्रजांनी बांधलयं

बस. इथेच काडी पडली. इंग्रज कोण??
मग मी थोडा इतिहास सांगितला- इंग्लंड देश- तिथले इंग्रज- आपल्या देशात आले
ती: आपल्या देशात का आले ते? मग त्यांचा सगळा देश आला होता का? सगळं जग आपल्या देशात आलेलं का? Uhoh

ह्याची सुरळीत उत्तरे दिल्यावर
मग ते परत का गेले? कसे गेले?
मग मी फ्रीडम फायटर्स बद्दल सांगितलं.

पण त्यांनी आपल्यावर वन हंड्रेड इयर्स राज्य केलं म्हटल्यावर
ती: मग ते जेव्हा आले त्तेव्हाच त्यांना का जा म्हणुन सांगितलं नाही? वन हंड्रेड इयर्स कशाला ठेवलं?
हे एक्स्प्लेन करुन होतेय तोवर प्रत्येक बिल्डिंग- हे पण इंग्रजांनी बांधलं का?
बाबा गपचुप गाडी दामटत होता. Happy
मग ताज जवळ गेल्यावर - मम्मा, इथेच आग लाउन लोकांना मारलेलं ना?

Rofl
संध्याकाळ.... टी.व्ही. समोर जेवण चालू. 'व्हिस्पर' ची अ‍ॅड लागते... ती तरूणी उलटसुलट उड्या मारत जिमनॅस्टिक्स करतेय...
पिल्लू : ए आई, बघ! कस्ली भारी करतेय ती ताई!
मी : (एक मोठ्ठा घास त्याच्या तोंडात कोंबत..) हो की! ती खूप शक्तिमान आहे! सगळ्या भाज्या खाते!
तेवढ्यात अ‍ॅडच्या शेवटी 'व्हिस्पर' चे दर्शन...
पिल्लू : ह्यॅट्!! मग अजून पण 'पॅम्पर' का लावते ती??

डॅफो.. बाप्रे,अश्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर कशी टिकलीस??? Lol
मस्त धागा आहे हा..
केव्हढे गहन प्रश्न विचारतायेत सगळी पिल्लं.. Happy

Rofl

आमचे पण रत्न आजीने तिला आंघोळ घातली शी धुतली की आजीलाच गुडगर्ल म्हणते Happy
वय वर्षे पावणे २ असल्याने सध्या तरी फक्त हे काय ये ? सारखं चालू असत Happy

दोन दिवसांपुर्वी कन्यारत्नाला (वय वर्षे ७ पुर्ण) शिख समाजाबद्दल सांगितले.. तेच ते केस, कृपाण , कंगवा, कडे वै. बद्दल.. काल अचानक तिने विचारले.. आपला मामा शिख आहे ना तर तो का नाही केस वाढवत.. Uhoh तिला जमेल तसे समजावले की तुझा मामा शिख नाही आहे म्हणुन.. पण अजुनही तिला तिचा मामा शिख का वाटला हा प्रश्न आता मी कुणाला विचारु ते कळत नाही..:)

मामा सारखा कंगवा वापरतो का ? कडं घालतो का ? >> बापरे.. एव्हढ निरिक्षण तर मी देखिल कधी केले नाही..:) रक्षाबंधनसाठी येऊन गेला होता..

आमचे चिरंजीव वय वर्ष ५.९ सध्या सुसाट सुटलेले असतात.
१) बेसिन माधाक्या पाणी गोल गोल फिरूनच का खाली जाते. मग नदीतले का नाही फिरत
२) बेसिन मधल्या पाण्याला फेस क येतो. नदीतल्या पाण्याला पण कधी कधी फेस का येतो
३) आपण कसे बनलो. माकडा पासून सांगितले की माकड कसे बनले मग गाडी माश्यापर्यंत आली. पण मुळात मासा कसा बनला. आता मी हात टेकले
४) बाबा तुझा बाबा कसा मेला. म्हटले माणूस म्हातारा झाला की मारतो. पण पुढे मात्र माझी वाचाच बंद झाली. आईचे आई आणि बाबा पण म्हातारे आहेत ते कधी मारणार?
५) कुठून तरी आईकले की देव ही माणसाने तयार केलेली संकल्पना आहे. मग आपण असे क म्हणतो की हे सगळे देवाने केले आहे. मग देव खोटा आहे तर आपण सगळेच खोटे नाही का?
६) बर्फ कसा बनतो. आपल्या रक्ताचे बर्फ बनते का. मला माहिती नाही असे सांगितले की तुला का नाही माहिती.
७) बाबा तुला चाश्म्यातुने कसे दिसते. मग ग्लास मधून बाहेरचे कसे दिसते आणि आरश्यात आपलेच प्रतिबिंब क दिसते.

हे वाचुन :सगळ्यांना बेस्ट ओफ लक "आपापल्या पिल्ल्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी"
सध्या माझे पिल्लु पावणे २ चे आहे कधीकधीच काये हे ते काये करते तरी पण पुढच्यी प्रश्नांसाठी तयारी करत आहे

सिंहगड फिरून पायथ्याशी आल्यानंतर तिथली जीवन शिक्षण शाळा पाहून भाच्यानी विचारले..ही शिवाजीची शाळा का ?

ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगताना "आमची मुंज करायची आहे." त्यासाठी धर्मशास्त्राची परवानगी काढायला मुले मुले पैठणला गेली असे सांगितले तर्..कश्याला एवढे उपद्व्याप करायचे? घरातल्या घरात करून टाकायची ना. Happy

ध्रुवबाळाची गोष्ट सांगून झाल्यावर्. असा हा ध्रुवतारा म्हणजे ध्रुव्-बाळाचे आढळपद्...सांगितल्यावर तिने विचारले..पण मग आता उत्तमाचे स्टेटस काय आहे? Happy

शिवाजी ची शाळा, उत्तमाचे स्टेटस... देवा देवा... Rofl Rofl
केदार ची 'गुड गर्ल' ही मस्तये.. हे काये च्या चालीवर.. Happy

डॅफो.. बाप्रे,अश्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर कशी टिकलीस??? >>>> वर्षू निल .. अग ये तो ट्रेलर है.. Wink पिक्चर अभी बाकी है Lol

डॅफोडिल्स... सेम फायरिंग माझ्या बहिणीवर होत असतं भाच्याचं...

लोक्संख्या म्हणजे काय??
मग इतके लोक कुथुन आले??
आई नी इतके लोक कसे आण्ले??
पण ते कुठुन आणले??
(इथे बहिण डॉ. असल्याने शास्त्रीय वळण)
ह्म्म्म्म.... पन आईच्या पोटत कसे गेले??
तिथेच का नाही रहत मग????..... आग्ग्ग्गं... तस केल तर ऑप्पॉप लोक्संख्या कमि होइल नाआआआआआअ........................

इथे उत्तर देणा-याची बत्ती गुल.... (भाचा वय वर्ष ८)

आमच्याइथे डे केअरमध्ये एक टीचर समर मध्ये लो नेक Tank/Shorts घालून यायची तर तिच्या वर्गात नव्याने गेलेल्या एका मुलीने
Why r u naked?
विचारून सगळ्यांसमोर हवाच काढली होती. दुसर्यादिवसापासून नीट कपडे घालायला लागली आणि दोनेक महिन्यांत जॉबच बदलला. योगायोगाने हा प्रश्न विचारणारी मुलगी देसी होती. Proud

Pages