आपण..

ओल्या मातीच्या वासासवे
मन नकळत भूतकाळात जातं..
जुन्याशा त्या माजघरातून
धावतच मग अंगणात पोचतं..

छोटीशी पावलं तिथे
मातीभर उमटत जातात..
निरागस हास्याच्या लकेरी
अवघं आयुष्य व्यापून टाकतात!

इवल्याशा त्या ओंजळीत
पाउस झेलायचा प्रयत्न असतो..
छोट्याश्या अन् डोळ्यांमध्ये
आभाळाचाच रंग असतो!

एक मोठ्ठ आश्चर्य
मनभर दाटलेलं असतं..
'नक्की या ढगांमध्ये
पाणी कुठून येतं?'

काळ उलटत जातो..
पावसाचं गूढही उकलत..
लहानपणीच सगळं अप्रूप
तिथंच हरवून जातं..

पुन्हा कधीतरी मृदगंध
असाच मागे खेचून नेतो..
सारं काही तसंच असतं..
आपणच तेवढे वेगळे असतो..

Submit to kanokani.com

छान .....
शेवटची २ कडवी जास्त भावली.

केवळ अप्रतिम..!! स्मित

पुढील लेखनास शुभेच्छा.

सुं द र

सारं काही तसंच असतं..
आपणच तेवढे वेगळे असतो..>>> व्वा....खुप आवडाला हा भाव. सुंदर रचना..!

आवडली स्मित

आपल्या कविता चांगल्या आहेत. पसाभर तू वाचल्यानंतर आपले लेखन मुद्दाम पाहिले त्यात ही दिसली.

चांगली कविता!

धन्यवाद!

-' बेफिकीर '!

@' बेफिकिर'

मनःपूर्वक आभार!

मस्त .