माझे लेख चोरले गेलेत !

Submitted by मितान on 2 February, 2011 - 05:52

आत्ताच मीमराठी या साईटचा अ‍ॅडमिन असणार्‍या राजेने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.

http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404

ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.

इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !

मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !

कोणती कारवाई करावी ? कशी ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला!! Angry

एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन प्रतिक्रिया नोंदव की हे माझे लिखाण असून त्यांनी चोरले आहे. तुझ्या लिखाणाचे दुवे दे. तारखांमधल्या फरकावरुन कळेलच कोणाचे आहे ते. दुसरे म्हणजे, त्या साईटच्या अ‍ॅडमिनना लिही आणि चोरलेले लिखाण उडवायची विनंती कर वा तुझ्या नावाने करायला सांग.

मितान, शैलजाला अनुमोदन.

मुग्धानन्द, इन्टरनेटच्या आभासी जगतातल्या चेहरामोहरा ठाऊक नसलेल्या आयडींना
legal notice देण्याची सोय अजून उपलब्ध झाली नाहीये Happy

अवघड आहे! वर तिथे शेअर ऑन ट्विटर, फेबु अशा लिंका बघून हसूच आले! काय लोक असतात. खरंच फेबु /ट्विटर वर प्रसिद्धी केली पाहिजे या चोर लोकांची !!

मागे माझ्या काही कविता चोरले गेले होते. तेव्हा मी गुगल च्या एका लिंक वर तक्रार नोंदवली होती. नंतर गुगल ने मी ज्या ज्या ब्लॉग बद्दल तक्रार केले होते ते ब्लॉगच उडवले होते. मला शंका आहे की ती गुगल स्वतःच्या ब्लोग्स्पॉट पुरता मर्यादीत काम करतं. ती लिंक सापडली की कळवेन तुम्हाला. तेव्हा पासुन इंटर्नेटवर कुठेही कवीता टाकणे बंद केले.

प्राची करत आहे तसे, तुझ्या मित्रमैत्रिणींना तिथे आयडी घेऊन ह्या चोरीबद्दल निषेध नोंदवायला सांग.

सगळा आनंदच आहे ! साईटच्या अ‍ॅडमिननेच लेख चोरलेत. आणि माझे एकटीचे नाही तर अनेकांचे.

lahu@marathiadda.com

त्याला मेल करतेय. तुम्हीही कृपया या वरील मेल आयडीवर मेल करुन आपला निषेध नोंदवा.

मंजुडी, त्या साइट विरुद्ध, (admin) cyber law खाली पण गुन्हा दाखल होउ शकतो.
>>>

पण मग तसे सविस्तर लिहा...उगीच अर्धवट माहिती नको.

माय गॉड!! काय गेंड्याच्या कातडीचे लोक असतात!

या लिंकवर एक कोणी तरी "पूनम" आहे (वैनी तुमच्या नावाचा आय.डी. दिसतोय. ;)) >> शरद तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की??? इथे हा उल्लेख अतिशय अप्रस्तुत आहे. मुद्दाम का कुरापत काढायला जाताय? निषेध!

पण मग तसे सविस्तर लिहा...उगीच अर्धवट माहिती नको.>> हो देते ना. पण तुमचा स्वर मला झापल्यासारखा का वाटतो आहे?

मुग्धानंद, मंजुडी जाऊदेत. मुद्द्याचं लिहा गं Happy
आणि मुग्धानंद, तुम्ही सायबर लॉ केलेय का? मला माहिती हवी आहे.

हो शैलजा, सायबर नाही पण लॉ केले आहे. मी त्याबद्द्ल जास्त माहिति सविस्तर देइनच. आता ऑफिस बंद करण्यासाठी शिपायाचा बुलावा आला आहे. मंजुडि आपण एकाच उद्दीष्टासाठी झटत आहोत. राग मानु नये.

पण तुमचा स्वर मला झापल्यासारखा का वाटतो आहे?
>>> Uhoh
तुम्हाला तसं वाटत असेल तर मला माफ करा... मितानने काय कारवाई करू? आणि कशी? असे दोन प्रश्न विचारले आहेत त्यासंदर्भात आपल्याकडे असणारी माहिती सविस्तरपणे लिहिलंत तर बरं होईल. त्याचा उपयोग इतर मायबोलीकरांनाही होऊ शकेल. धन्यवाद.

Pages