शाळा पहिलीमधे प्रवेश - किमान वय? आणि ठाणा, मुलुंड मधल्या शाळा

Submitted by सावली on 30 January, 2011 - 21:24

भारतात पहिलीमधे प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे लागते ५ पुर्ण की ६ पुर्ण?

आणि ठाणा, मुलुंड मधल्या सेमीइंग्लिश / इंग्लिश माध्यमातल्या चांगल्या शाळा सुचवणार का?
- घोडबंदररोडवरच्या नको. (ट्रॅफिक प्रॉब्लेम मुळे)
- शाळेत मराठी मुलांची टक्केवारी साधारण जास्त हवी.
- शाळेला ग्राउंड हवं.
या माझ्या अपेक्षा आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही सीबीएसई ला घातले आहे. कारण तमिळनाडू स्टेट बोर्ड नको म्हणून. घर घेताना असे घेतले होते, जिथून शाळा जवळ आहे. तरी फी-डोनेशन्चची प्रचंड भिती होती, Happy

पण इतर कित्येक समवयीन पालकांचे अनुभव पाहता, लेकीच्या शाळेचा अनुभव "अत्युत्तम" आहे. एलकेजी ला एकही पैसा डोनेशन नाही. जितकी फी दिली त्याची पावती मिळाली. व्हॅनचे पैसे वगळता एकही एक्स्टा पैसा दिलेला नाही. शाळेची काहीही अ‍ॅक्टेव्हीटी असू देत, आजवर पैसे मागितलेले नाहीत. उलट महिन्याला एक स्पर्धा घेतात त्याचे काय पॉइन्ट्स एकत्र करून अ‍ॅन्युअल डेच्या दिवशी बक्षीसं दिली (सिल्व्हर कॉईन आणि विवेकानंदावरची पुस्तकं)

मला फार पैसा पैसा करणार्‍या शाळा अजिबात आवडत नाहीत. एक वेळ इतर अ‍ॅ़टीव्हीटीज कमी असतील तरी चालेल, पण सतत भीक मागितल्यासारखे पैसे मागणारे शालावाले अजिबात नकोत.

फकीरबाबा , या क्रोमचे आणि माबो युनिकोडचे काय वाकडे आहे कळत नाही. विशेषतः एडिट करताना कुठल्या कुठे शब्द फाफलतातए, पुन्हा एडिट केले की आणखी कॉम्प्लिकेशन्स होतात . मग कंटाळा येतो . मोठ्या पोस्ट असतील तर . मग तसेच सोडून देतो. क्रोम मध्ये तर एडिट करायचे म्हटले की अंगावर काटाच येतो....

क्रोम मध्ये तर एडिट करायचे म्हटले की अंगावर काटाच येतो....
<<<<<

याच कारणासाठी मी अजुन माझे इंटरनेट एक्सप्लोरल अपडेट नाही केले. ते अपडेट केले कि मायबोलीवर नीट टाईप करता येत नाही. मोबाईल व टॅबवरुन देखील मला इथे मराठी टाईप करता येत नाही.

रॉबिनहुड, एकदम मस्त पोस्ट. सगळ्याच पटल्या.
शाळा महत्त्वाची, बोर्ड नाही. दर २-४ वर्षांनी राज्य बदलत असेल, तर सिबिएस्सी, आणि देश बदलत असेल तर आयबी, बरोबर ना?

फायरफॉक्स वापरा.... नो झंझट...

फार पैसा पैसा करणार्‍या शाळा>> पण काही एक उपक्रम चालवायचा तर मिनिमम खर्च येतो तो कोणी द्यायला पाहिजे? मटेरिअल, बसने न्यायचे पार्कात तर डिझेल व ड्रायवर, स्पर्धेला न्यायचे तर तिकिट खर्च, एंट्री फीज, सॉफ्ट्वेअर घेतले तर तो खर्च. प्रोजेक्टस, परीक्षांची फी. हे पालकांनीच भरायला हवे ना? ते बेअर करण्याइतके फंड्स कुठल्या शाळेत असतात? अगदी अंबानीची शाळा झाली तरी. नाचाचे ड्रेस हायर केले तरी ते पैसे कोण देणार? पण काही रेसि. शाळांचे वर्शाचे खर्च ४ - ६ लाख आहेत ते बघूनच कसे तरी होते. ती लाइफ स्टाइल असलेले लोक्सच मुलाना अश्या शाळेत घालत असतील. जेट एअरवेज च्या विमानात जे मासीक मिळ ते त्यातल्या जाहिराती बघून मी दोन वर्शा पूर्वी हे सर्व सर्च केले होते. शेवटी डीएव्ही ऐरोली बेस्ट आणि मस्त बजेट मध्ये.

Pages