शाळा पहिलीमधे प्रवेश - किमान वय? आणि ठाणा, मुलुंड मधल्या शाळा

Submitted by सावली on 30 January, 2011 - 21:24

भारतात पहिलीमधे प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे लागते ५ पुर्ण की ६ पुर्ण?

आणि ठाणा, मुलुंड मधल्या सेमीइंग्लिश / इंग्लिश माध्यमातल्या चांगल्या शाळा सुचवणार का?
- घोडबंदररोडवरच्या नको. (ट्रॅफिक प्रॉब्लेम मुळे)
- शाळेत मराठी मुलांची टक्केवारी साधारण जास्त हवी.
- शाळेला ग्राउंड हवं.
या माझ्या अपेक्षा आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००४ मधे जन्मलेली मुले आत्ता १ली त आहेत. त्या आधी २ वर्षे जु. आणि सी. के. जी.

प्रत्येक शाळेची काहीतरी cut-off date असते. म्हणजे एप्रिल ३० ला...अमुक एवढी वर्षे पूर्ण पाहिजेत.
इच्छित शाळेत चौकशी करा.

पाल्य आणि पालक यान्ची उपस्थीती अनिवार्य आहे काय? की यान्च्या अनुपस्थीतीत पाल्याचे आजी अजोबा फॉर्म भरण व फी भरण ई. करू शकतात ?
जर का अम्हाला मुलीला मागच्या ईयत्तेत घालायचे असेल तर तसे करता येते काय?>>>>

तोषवी, तसं बघायला गेलं तर असा काही hard n fast रूल किंवा सरकारी नियम नाहीये, ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाचा निर्णय शेवटचा, त्यामुळे त्या शाळेत चौकशी करून बघा. पण हे aided schools ना लागू होत नाही Happy

धन्स मन्जुडी ,सावली.अश्विनी
खूप गोन्धळ उडालाय माझा .तिच्या साठी ज्या शाळेचा विचार करतोय ,तिथे फोन केला तर उत्तर मिळाल की म्हणे ते ज्यु केजी पासूनच अ‍ॅड्मिशन देतात , मधेच पहीलीत नाही. जर जागा शिल्लक असतिल तर म्हणे एप्रिल मे महीन्यात चौकशी करून बघा , असल्यास मिळेल.... मग तोपर्यन्त मिळेल आशेवर थाम्बायच ??

रच्याकने,
कुणाला Dr. Sarvepalli Radhakrishnan Vidyalaya, Malad.किवा The Witty International School,मालाड या शाळाबद्दल माहीती आहे का?

छान माहिती.... ठाण्यातील सिंघानिया शाळेविषयी अजुन अपडेट्स मिळतील का? मायबोलीवरील कोणाचे पाल्य या शाळेत जात आहेत का? त्यांचे अ‍ॅडमिशन रॅनडम बेसिसवर ऑनलाईनच होते व शाळा डोनेशन घेत नाही असे त्यांच्या वेबसाईटवरुन समजते. इतर काही पर्याय आहेत का या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी.

बाकी ठाण्यातील इतर शाळा कश्या आहेत मेनली ICSE अभ्यासक्रम असणारया... कुणाला माहिती असल्यास इथे शेअर करा प्लिज....

सिंघानिया शाळेविषयी अजुन अपडेट्स >> शाळा चांगली आहे असे ऐकून आहेच. त्यामुळे अ‍ॅडमीशन मिळणे कठीण होते. अ‍ॅडमिशन ज्यु. केजी मधेच मिळते. शाळेत नर्सरी नाही.

अजुन काही शाळा म्हणजे
बिलाबाँग - प्रायमरी सेक्शन चांगला आहे. सेकंडरी फारसे ऐकले नाही. प्रचंड महाग आहे. शाळेतले नंतरचे खर्चही बरेच असतात म्हणे.

युरोकीड्स - कासार वडवली भागात आहे. शाळा नविन आहे. इंफ्रास्ट्र्कचर चांगले आहे असे पहिल्या भेटीत वाटले होते. पण फाऽर लांब आहे. शाळेच्या एका बाजुला हावरे सोसायटी आहेत. मात्र मागच्या आणि समोरच्या बाजुला केवळ मोकळे रान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ते सेफ वाटले नाही. बिबळ्याच्या जंगलात मुलांना सोडल्यासारखे वाटले Wink

हिरानंदानी स्कूल - चांगली आहे असे ऐकले आहे. मात्र तुमचे घर हिरानंदानी सोसायटीमधे असेल तरच प्रवेश मिळतो.

युनिवर्सल हायस्कूल, ब्रह्मांड सोसायटी. - चांगली आहे असे ऐकले आहे. शाळेचा वेळ बहुतेक जास्त आहे. डे बोर्डींग सारखे.

सिंघानिया>>> खुप चांगली शाळा. पूर्वी रेमंडच्या कामगार व एम्लॉइज साठी होती. २०% सीट बाहेरच्यांना द्यायचे. साधारण रेमंड ची सगळी युनीट्स आता गेल्या वर्षी पासुन बंद आहेत. त्या मुळे नव्या अ‍ॅडमिशन्स नर्सरी मधे बाहेरच्यांना द्यायलाच लागल्या. बाकी शाळेचे स्टँडर्ड चांगले आहे. त्यांना "एजुकेटेड मदर सिटींग अ‍ॅट होम" असेल तर पटक्न प्रवेष मिळतो. सुट्ट्या आणि परिक्षांचे वेळापत्रक मात्र इतरांपेक्षा भयानक आहे. ( माझी शेजारीण रोज रडते)

बिलाबाँग>>>> भयानक खर्च.... दर वर्षी मुलांची ट्रिप बाहेरच्या देशात काढतात. ... या ना त्या कारणाने सतत पालकांच्या खिशात हात. गॅदरींगला २-३ हजारांचा खर्च प्रत्येक मुला मागे येतो. दर वर्षी. अशी अनेक कारणे आहेत ( बिल्डिंग मधे एक मुलगी सध्या सहावीत आहे. सध्याच ट्रीप साठी इजिप्त ला गेली आहे शाळेत्न!!!!)). पूर्वी त्यांची मॅनेजमेंट चांगली होती. कर्वे म्हणुन मॅडम होत्या. जेंव्हा बिलाबाँग मॅनेजमेंट सेपेरेट झाली तेंव्हा त्या मॅडम सांताक्रुझ च्या शाळेत गेल्या. जाताना सगळा चांगला स्टाफ घेवुन गेल्या. त्या मुळे ठाण्याला बोंब आहे.

हिरानंदानी---- सावली ने लिहिलय ते खरं आहे. पण सध्या सहावी नंतर एक वर्ग प्रत्येक इयत्तेत बाहेरच्या मुलांसाठी केला आहे. एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते. स्टाफ चांगला आहे.

बाकी एस.एस.सी बोर्ड च्या इंग्लीश मिडियम च्या शाळांमधे ए.के.जोशी, सरस्वती इंग्लीश, भगवती, होली क्रॉस, वसंत विहार, ह्या चाम्गल्या शाळा आहेत. पैकी सरस्वती व होलीक्रॉस ह्या एडेड आहेत. बाकी ए.के.जोशी, भगवती, वसंत विहार ह्या प्रायव्हेट आहेत. ए.के. जोशी बद्दल माहिती हवी तर सांगु शकते.

सावली आणि मीराच्या पोस्टला मम.

ए.के.जोशी आणि सरस्वती इंग्लिश मिडियमला भरमसाठ डोनेशन घेतात. ए.के.जोशीचा यंदाचा दर रुपये दीड लाख आहे. भगवतीला डोनेशन घेतात की नाही माहिती नाही. वसंत विहारला डोनेशन नाही आणि शाळा स्टेट बोर्डाची असली तरी उत्तम आहे.
ठाणे पोलिस स्कूल ही एक शाळाही चांगली आहे. गोएंका असोसिएट्सचीच खाजगी शाळा आहे.

मायबोलीकरांचे कोणाचे पाल्य आयबी स्कुलमध्ये जाते का? अनुभव कसा आहे? मुलुंड, ठाणे, ऐरोली परिसरात आयबी अभ्यासक्रम असणारी चांगली शाळा कोणती आहे? इंटरनेटवर बघितले तर NES International, Mulund West ही एकमेव शाळा दाखवत आहे. पण त्याचे रिव्ह्युज प्लस मायनस दोन्ही सांगत आहे....

सिंघानियात अजुन फक्त ज्युनियरसाठी अ‍ॅडमिशन चालु आहे. इतर ओपनिंग नाही. ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट (ICSE), युनिव्हर्सल हाय (ICSE) या शाळा कश्या आहेत?

यशस्विनी, भांडूपचे पवार पब्लिक स्कूल (ICSE) (एलबीएस रोडवर आहे) चांगले आहे, पण तुला कदाचित लांब पडेल. तू ठाण्यात असणार आहेस ना?

हो वर्षा.... पण भांडूपचे पवार पब्लिक स्कुल फक्त भांडूपस्थित मुलांनाच घेतात असे वाचले. तसेही मला ते लांबच पडणार म्हणुन ठाणे, ऐरोली, मुलुंड या परिसरातील शाळा बघत आहे.

सिंघानियात >> ते आयबी नाही. आयसिएससी आहे.
श्री श्री रविशंकर स्कूल आहे आयबी.
एन इ एस आहे. पण एन इ एस सिबिएससी आणि आय्बी अशा दोन बिल्डींग एकाच कॅम्पसमधे आहेत. आयबी वाली बिल्डींग फार हायफार आणि दुसरी अगदीच बिचारी दिसते. सतत तुलना करत रहाणार मुलं.
बिलाबाँग पण आयसिएससी आहे

वरिल सर्व शाळांची फि काहीच्या काही आहे. त्याशिवाय अ‍ॅन्युअल डे, स्कूल ट्रीप इत्यादीसाठी बराच खर्च येतो असे ऐकले / पाहीले आहे.

आय बी च्या वेबसाईट वर भारतातील आय बी स्कुलची लिस्ट आहे ती चेक करावी. बर्याच स्कुलमधे फक्त आय बी डिप्लोमा आहे. प्रायमरी असलेल्या शाळा कमी आहेत.

माझा शाळेचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.
माझ्या आजुबाजुचे सगळेच पालक समाधानी वाटतात त्यांच्या शाळा निवडी बद्दल. पण मी नाही. माझ्या नवर्‍याला पण इतकी काही समस्या वाटत नाही( कारण त्याचा काsssssssही संबंध नाही)
चांगली शाळा सुचवा प्लिज.
मी उद्याचल गोदरेज ला घालायच्या विचारात आहे, पण अनेक लोक्स स्टेट बोर्ड नको म्हणतात.

विक्रोळीचीच गोदरेज ना? उत्तम शाळा आहे.

लोक स्टेट बोर्ड नको म्हणतात, मग तुला हव्या त्या शाळेत ते अ‍ॅडमिशन मिळवून देणार आहेत का?

मुख्य कारण flexilbility. पालकांची नोकरी फिरतीची (भारतात, मध्य पुर्व, सिंगापुर इ.) असेल. तर cbse / ices वगैरे बरे पडते.

खरे तर सेन्ट्रल बोर्ड , आय बी या शाला काढण्याचे उद्देश वेगळे आहेत . ज्यांचे भारतभर अथवा आन्तरराष्ट्रीय स्तरावर नोकरीधन्द्याच्या निमित्तने भ्रमन्ती होते त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून देशभर अथवा आन्तरराष्ट्रीय ज्युरिसडिक्शन असलेल्या त्या शाळा आत्यांचेया परीक्षा घेणार्या बॉडीज आहेत. बोर्ड्स ! त्यांचा सिलॅबस, प्रश्नपत्रिका , एकसारखे असते त्यामुळे मुलांना सहज मायग्रेट करता येते.
मुळात सर्व अभ्यासक्रम हे एज अ‍ॅप्रोप्रिअट असतात आणि नॅशनल करिक्युलम पॉलीसी वर आधारित असतात. मात्र त्यांची व्याप्ती अलग अलग असते. उदा . मराठ्यांचा इतिहास अथवा शिवाजीचा इतिहास हा स्टेट बोर्डात पूर्ण पुस्तक आहे , सविस्तर आहे. मात्र सीबीएस्सी मराठ्यांचा इतिहार अवघ्या दीड पानात आटोपतो. यावर महारष्ट्रात राजकीय बोम्बाबोम्ब झाली तेव्हा सी बी एस सी बोर्डाने स्पष्त केले होते की त्यांना भारतभराचा इतिहास कव्हर करायचा असतो म्हणून त्यापेक्षा जास्त कव्हरेज देता येत नाही. तीच बाब भूगोलाची . आपल्याकडे गाव , तालुका, जिल्हा, राज्य देश, जग अशी वर्तुळे विस्तारत जातात तसे सीबी एस्सीला करता येत नाही...

कोणते बोर्ड चांगले ह्या प्रश्नाचे उत्तर चांगला चहा कोणता असेच आहे. सध्या समाजात विविध क्षेत्राततली अग्रगण्यनमंडळी स्टेट बोर्डातूनही आलेली आहेत. खूपशा चांगल्या इंग्रजी शाळा, कॉन्वेन्ट्स स्टेट बोर्डाला अ‍ॅफिलिएतेड आहेत. याउलट सीबीएस्सी आय बी च्या प्रचारामुळे गावगन्ना या शाळा झाल्यात आणि त्याना शिकवायला क्वालिफाईड टीचरर देखील नाहीत. मग केवळ सीबी एस्सी बोर्ड आहे म्हणून फरक पडत नाही.
मूळ कोणत्याही विषयाची स्वयंप्रेरणेने शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण करणारी ती चांगली शाळा....

बहुसंख्य पालकांकडे उच्चभ्रू शाळातील शिक्षकांच्या व्हिम्स यावर पुष्कळ किस्से असू शकतात...

माझ्या मते जवळच्य्॑आ शाळेत जाऊन वाचलेल्या वेळात इतर अ‍ॅक्टिव्हिटी करायला वेळ शिल्लक ठेवते ती चांगली शाळा. अन्यथा आन्तराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत आपला मध्यम क्षमतेचा मुलगा घातला म्हनजे ती शाळा त्याला बृहस्पती करू शकते असे मला वाटत नाही...

माझी दोन्ही मुले के जी ते बी ई शिकताना त्यांचे प्रवासाची वेळ जास्तीत जास्त ५ ते ७ मिनिटे होती तेही कॉलेजची .. अन्यथा बारावी पर्यन्त तर पायीच.....

रॉबीनहूड चांगली पोस्ट.... माझ्या घरापासुन सिंघानिया अगदी काही मिनिटांवर आहे. उत्तम शाळा आणि तीही इतक्या जवळ असे असले तरी माझ्या पाल्याला तेथील लॉटरी सिस्टीममुळे अ‍ॅडमिशन मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नको असले तरी घरापासुन दुर शाळेचा पर्याय स्विकारावाच लागतो.

मूळ कोणत्याही विषयाची स्वयंप्रेरणेने शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण करणारी ती चांगली शाळा....>>+१००

माझ्या मते जवळच्य्॑आ शाळेत जाऊन वाचलेल्या वेळात इतर अ‍ॅक्टिव्हिटी करायला वेळ शिल्लक ठेवते ती चांगली शाळा. अन्यथा आन्तराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत आपला मध्यम क्षमतेचा मुलगा घातला म्हनजे ती शाळा त्याला बृहस्पती करू शकते असे मला वाटत नाही... >> +१

मूळ प्रश्न तसाच राहिलाय Happy

शाळेत घालायचे वय म्हणजे पहिल्या इयत्तेत (विदर्भात त्याला पहिला वर्ग ,दुसरा वर्ग असे म्हनतात) वय ६ च्या आसपास. ६ हे वर्ष शैक्षणिक मानसशास्त्रज्ञानी पहिलीच्या अभ्यासक्रमासाठी आदर्श मानले आहे. काही लोक लवकर घालण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काही अर्थ नाही. प्रि प्रायमरीमध्ये मोटर स्किल्ल्स ,परिसर ओळख , सामाजिकीकरण अपेक्षित आहे तिथे लोक पुन्हा मुलाना फॉर्मल शिक्षण म्हनजे ए बी सी डी , अंक शिकवतात. हे एज अ‍ॅप्रोप्रिअट नव्हे, त्या वयात ए बी सी डी शिकायला महिना लागत असेल तर सहाव्या वर्षी एखादा आठवडा पुरतो. (त्यामुळेच आपल्याला कॉलेज मधले केवळ घोकून पाठ केलेले फिजिक्स, केमिस्ट्रीचे कन्सेप्ट आता पट्कन कळतात , आवश्यकता नसताना :))

Pages