विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण प्रायश्चित घ्यावच लागेल... एक व्यंचि टाकून > > पाँटिंग टिव्ही तोडताना कसा वाटेल . Happy हे बघायला आवडेल.

पाँटींगने धावबाद झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आपली कवच कुंडले इतक्यात जोरात फेकली...>>आता बर्‍याच पेपरमध्ये सचिन वि. पॉटींग तुलना चालली आहे, रन आउट झाल्यावरचे दोघांचे वर्तन...परत एकदा ऑसीजचा माज दिसुन आला

तथाकथित लिम्बूटिम्बू संघांनी आतापर्यन्त प्रतिष्ठित संघांआ झुंज्जवलं त्यावरून तरी योग चा मुद्दा जो की औस्ट्रेलियाचा आवडता शोध आहे दम नसलेला ठरतोय. परवा ऑसीची दमछाक आणि कालची इंग्रजांची पळापळ पाहता या संघांना इतका माजोरडेपणा दाखवायची गरज नाही. काल आ.ंतरराष्ट्रिय क्रिकेट खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेला कॉलिन्गवूड होता म्हणून शेपटी सुटली म्हणायची इंग्रजांची. आज पाकड्यांचेही जरा नरमाईतच सुरू झालेय!

केनियाला तर जेव्हा पासून त्यांना चान्स मिळाला आहे तेव्हा पासून वर्ल्डकप मध्ये खेळायचा अनुभव आहे... त्यांनी वेस्ट इंडीजची पुण्यात लावलेली वाट कोणी विसरणे अवघड आहे..

>>औस्ट्रेलियाचा आवडता शोध आहे
नेमकी काय म्हणतोय्स कळलं नाही रे..

>>काल आ.ंतरराष्ट्रिय क्रिकेट खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेला कॉलिन्गवूड होता म्हणून शेपटी सुटली म्हणायची इंग्रजांची.

मी असेन म्हणेन की काल कॉ. च्या अनुभवापेक्षाही नेदरलँड च्या अननुभवाचा फायदा ईं. ला झाला. कॉलिंगवूड ऊजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू विशेष खेळू शकत नाही हे एव्हाना शाहरूख ला ही माहित असेल.. Happy अशा वेळी काल त्याल अनेक खराब चेंडू लेग ला टाकले गेले..
खेरीज निव्वळ क्षेत्ररक्षक जवळ ऊभे करून दबाव आणायचा एव्हडही ने. ला जमलं नाही.. असो. ई. साठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती Happy
असो थोडक्यात ईं साठी अनेक डोकेदुखीज आहेत..

आज पाक वि. केनिया काय होतय पाहुया. पाक सुरुवातीला थोडे गडबडलय..

Rofl

भाऊ Lol

भाऊ जबरी Biggrin

<<त्यात असणार नको>> केदारजी, आंत कुठेतरी मला खूप आदरही आहे पाँटींगच्या शैलीदार फलंदाजीबद्दल ! म्हणूनच "असणार" हा त्याला "बेनीफिट ऑफ डाउट" ! Wink

Happy

TV तोडला नसून फेकेलेली बॅट कशावर तरी आदळून TV ला लागली असे आज वाचले. उगाच चिथवू नका रे त्याला Wink

<< TV तोडला नसून फेकेलेली बॅट कशावर तरी आदळून TV ला लागली असे आज वाचले. उगाच चिथवू नका रे त्याला >> असामीजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या इतक्या ज्येष्ठ खेळाडूला हे वर्तन अशोभनीय आहेच पण एका देशाचा प्रतिनिधी म्हणून मोठ्या स्पर्धेत असं अपरिपक्व वागणं अक्षम्य आहे. आणि हो, त्याला चिथवण्याचा प्रश्नच येत नाही; तो स्वतःच तर चिथावणीचा शिरोमणी आहे !!! Wink
रच्याकने, पाँटींगला अधिकृतपणे, नियमांनुसार या वर्तणूकीबद्दल ताकीदही देण्यात आली आहे .
आजचा द्.आफ्रिका वि. वे.इंडीज सामना रंगतदार होण्याची खूपच शक्यता आहे, असं वाटतं.

लाराने १९९६ व २००३ च्या विश्वचषकात आफ्रिकेविरूध्द जबरदस्त शतक झळकावून त्यांची पुढची वाट बंद केली होती. आज लारा नाही. दुसर्‍या कोणीतरी आफ्रिकेला धक्का दिला पाहिजे.

<<दुसर्‍या कोणीतरी आफ्रिकेला धक्का दिला पाहिजे.>> गेल ही एक शक्यता होती पण अनपेक्षितपणे बोथाला पहिलंच षटक देऊन गेलचे आडाखे [बाद २ धावा ] द.आफ्रिकेने धुळीला मिळवले ! "I have never waited so long for a game in my life!" इति कालीस, आजच्या सामन्याबद्दल ! द.आफ्रिका फिरकी गोलंदाजीवर भर देणार हेही त्याने सुचित केलं होतं !

स्टेन वि. गेल बघायला मजा आली असती..... पुन्हा कधीतरी.. Happy

बाकी पाँ. ला भारी बुकलताय राव.. त्याला छडीने शिस्त लावायची गरज आहे पण तूर्तास दिवेलागणीला हात पाय धुवून थोरा मोठ्यांना नमस्कार करून "शुभंकरोती" म्हणायला बसवावे- देव सुबुध्धी देईल अशी एक शक्यता आहे! Happy

रविवारच्या सामन्यात पुन्हा एकदा विरू ने साहेबांना धावबाद होण्यात मदत केली तर सचिन त्याचा राग कसा व्यक्त करेल? लक्षमणाने ओझा वर बॅट ऊगारलेली आपण पाहिली आहे (दुर्मिळ क्षण! ऐतीहासीक क्षण!), सचिन "फार फार" तर काय करेल? Happy
क्रीकेटच्या ईतीहासातील असे काही दुर्मीळ/ऐतीहासीक क्षण लिहीले जावे.. त्यातून टॉप टेन यादी केली जावी.

असो. आज विंडीज २५०+ करतील काय? ब्रावो हुकुमी एक्का आहे..
स्टेन्/मॉर्नी कुणालाही वाईट दिवस लागला तर?

..

लक्षमणाने ओझा वर बॅट ऊगारलेली आपण पाहिली आहे (दुर्मिळ क्षण! ऐतीहासीक क्षण!), सचिन "फार फार" तर काय करेल?
>>
sharjah cha 'tya' 143 vaalyaa match madhe sachin ni laxman la maidaanat barach kahi sunaavla hota... (दुर्मिळ क्षण! ऐतीहासीक क्षण!)...

<<देव सुबुध्धी देईल अशी एक शक्यता आहे! >> इथं मला "बी पॉझिटीव्ह" असा सल्ला दिला गेला होता ; त्याचा अर्थ मात्र मला आत्ता योगजींच्या या वाक्याने कळला ! Wink
<<सचिन "फार फार" तर काय करेल? >> कव्हर ड्राईव्ह हवेत जाऊन आपण बाद होतोय हे लक्षात आल्यावर सचिन दोन हंगामात तो फटका खेळलाच नव्हता; आता नेहमी धांवचित होतोय असं वाटलं तर तो एक-दोन धावांच्या भानगडीतच न पडतां चौके व छक्के मारूनच धांवा करेल ! Wink
<<आज विंडीज २५०+ करतील काय?>> मला वाटतं नक्कीच करेल; कराव्यातच !

सध्या तरी विंडीज २५०+ आरामात करतील असे वाटते आहे.. सरवान, चंदर आणि पोलार्ड यायचे आहेत. त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर दंगा करतील. कॅलिस पहिल्या स्पेल मधे निष्प्रभ.. स्टेन मॉर्कल ओके.. त्या नवीन ताहिरला पण एक सिक्सर मारुन झालीये.. पण सुरवातीलाच बोथाला आणून धक्काच दिलाय.. न्यूझीलंडनी केला होता हा प्रकार..

>>sharjah cha 'tya' 143 vaalyaa match madhe sachin ni laxman la maidaanat barach kahi sunaavla hota... (दुर्मिळ क्षण! ऐतीहासीक क्षण!)...

बरोबर. पण तेव्हाचा सचिन आणि आताचे साहेब यात बराच फरक आहे. मी तर म्हणेन विरू धावला तरच साहेबांनी धावावे. असो.
ब्राव्हो, ब्राव्हो!!!!
मला आफ्रिकेला/"चोकर्स" ना २७०+ चा पाठलाग करताना पहायचय.. विंडीज कडे विशेष गोलंदाज नाहीत तरिही २७०+ आफ्रीकेला भारी पडू शकतं- अपवाद "कालू मामा".

सचिनने वीरुला इट्स ओके असं म्हटल्याचं मी वाचलं (आता हा त्या पत्रकाराचा कल्पनाविलास नाही ना?) पण वीरूने इटस ओके सीरियसली नाही घेतलं म्हणजे मिळवली. पुन्हा वीरु मला ५० षटके बॅटिंग करायची म्हणतोय, तर तो काय पुढल्या विश्वचषकात नसणार आहे का? खेळतोस तर खेळ बाबा! आमची मजाच आहे Happy

२०९-६ वरून २२२ ला डाव आटोपला ! वे.इंडीजचं नेहमीचं दुखणं !! कधीही घसरतील !!!
एल्बीडब्ल्यू निर्णय रिव्ह्यू पद्धतीत "नाबाद"वरून "बाद" झाल्याचं पहायला मिळालं.

स्टेन as usual ग्रेट!!
पोलार्डला आऊट केलेला बॉल मस्त टाकला होता...
डॅरेन ब्राव्हो to be watched आहे... Happy

अरे हे काय चाललय....? पुन्हा एकदा आज विंडीज ने ४५ षटके पर्यंत बॅटींग पॉवरप्ले घेतला नाही.. आणि सक्तीने तो ४५ षटकानंतर चालू झाला तेव्हा विंडीजचा फलंदाजीतील दारूगोळा संपला होता.. ४७.५ मध्ये सर्वबाद!
निव्वळ अचाट आणि अतर्क्य! ब्राव्हो आणि चंद्रा ऊत्कृष्ट खेळत होते विशेषतः ३४ षटकाच्या सुमारास तेव्हा का नाही घेतला पॉवरप्ले?
विंडीज ला ही बॅटींग पॉ प्ले बद्दल माहीत नाही काय? कहर आहे.... काय गूढ आहे कळत नाही... Sad
(ईम्रान ताहीर चांगलाच "गवसलाय" आफ्रीकेला.. भारत/लंका/पाक वि. कामी येईल गडी.)

लौकीकानुसार आफ्रीकेने हा सामना आरामात जिंकायला हवा- त्यांना बॅटींग पॉप्ले ची गरज पडेल असे वाटत नाही Happy

<<लौकीकानुसार आफ्रीकेने हा सामना आरामात जिंकायला हवा- त्यांना बॅटींग पॉप्ले ची गरज पडेल असे वाटत नाही >> वे.इंडीज हें एक प्रतिभावान पण अनप्रेडिक्टेबल प्रकरण आहे; द.आफ्रिकेला बॅटींग पॉप्लेचे गरज नाही भासली तरी त्यांच्या बॅटींग पॉवरची कसोटी लागणारच आहे ! आणि, प्रत्येक विश्वचषकानं पूर्वीच्या लौकीकावर जाणं किती फसवं असतं हेच वारंवार सिद्ध केलंय !! Wink

>>> ब्राव्हो आणि चंद्रा ऊत्कृष्ट खेळत होते विशेषतः ३४ षटकाच्या सुमारास तेव्हा का नाही घेतला पॉवरप्ले?

हाच प्रश्न मलाही पडला होता. एकतर चंद्रपाल अतिशय संथ खेळला (५१ चेंडूत ३१). त्यात त्याने फटकेबाजी करणार्‍या ब्राव्होला उगाचच धावबाद केले. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राव्हो जोरदार फटकेबाजी करत असताना, चंद्रपाल सेट झालेला असताना व ३५ व्या षटकापासून नवीन टणक चेंडू उपलब्ध असताना त्यांनी पॉवरप्ले न घेऊन वेगात धावा करण्याची एक चांगली संधी घालविली.

द.आफ्रिका २६-२ व मग डी विलीयर्सने डावाचा गियर बदलला; अप्रतिम शॉटस मारत स्कोअर ४९-२ वर नेला आहे.
<< ...त्यांनी पॉवरप्ले न घेऊन वेगात धावा करण्याची एक चांगली संधी घालविली.>> खरंच वे. इंडीज एक न सुटणारं कोडंच आहे !

Pages