विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिव्हीएनवर इतके वाईट नव्हते. बफरिंग होते पण लगेच दिसत होते.
खरेतर टिव्हीएन हे डिशवरुन दाखवत होते. मधे मधे डिश चा मेनु दिसत होता.

srisanth2.JPG
अग, "एक्स्ट्रॉ कव्हर"मधे हर्षा भोगले सामन्याच्या विश्लेषणाचं सूत्रसंचालन करतात; "तुम्ही देखील त्यांच्यासारखं डोक्यावर 'एक्स्ट्रॉ कव्हर' घ्या", हे काय म्हणतेयस तू ?

मला पण विलोला प्रॉब्लेम आला. बफरिंग होत होते बांगलादेशच्या बॅटिंगच्या वेळी. अधूनमधून आपल्या बॅटिंगच्यावेळी पण. पहिला अर्धा तास जे काही झाले ते माहित नाही मी गाढ झोपेत होतो. मॅच लावल्याबरोबर तेंडुलकर आउट!! पण नंतर ठीक होते कवरेज.

माझी माहिती चुकीची आहे रे, मित्राने सुरूवातीला कुठल्या तरी फुकट साईटवरून लावले होते ते माझ्या लक्षात नाहि आले. मधे कधीतरी विलोचे इमेल आल्यावर स्विच केले.

cric7 आणि TVNsports दोन्ही वाईट रितीने बफर होत होती Sad विलो घेऊ कि नको विचार करतोय

मला तर फुकट साईट वर छान दिसली पुर्ण मॅच.....प्रॅक्टीस मॅच पण अशीच व्यवस्थीत पुर्ण दिसली होती....

विलो घ्यायला हरकत नाही. नंतर हाय क्वालिटी होती. तसेच त्यांनी १० रु वापस दिले. Happy पुढे असे होणार नाही ह्याची काळजी ते घेतील.

Dear Willow TV Customer:

You may be aware that our website was a victim of a distributed denial-of-service attack at the beginning of today's match between India vs Bangladesh. Our engineers were able to contain the situation within approximately 30 minutes, but due to the magnitude of the attack, all systems took a while to fully stabilize. Many users were able to access the live feeds in the first hour, although a few users only saw a full restoration of service midway through the first innings. We are still fully analyzing the impact of this attack and should have a more full analysis available within the next 24 hours. We have already implemented a number of steps to ensure this does not impact us in the same way again.

As our engineers worked to contain the situation, we made a decision to limit a few auxiliary services so as to be able to restore stability at the earliest. Services impacted included access to streams for Roku and mobile users. We are in the process of restoring these services over the next 24 hours.

Please accept our sincerest apologies for this unfortunate incident. We are taking all steps possible to protect against such occurrences again. Two steps we are taking immediately are:

* All World Cup package subscribers will receive an automatic credit of $10 in their Willow TV accounts, applicable towards a future purchase of your choice. Please accept this as a token gesture from us.
* During the week of Feb 21, you will receive an email with instructions on how to continue to access the live video feeds, should for any reason our website become unavailable in spite of the measures we are taking now. This will be a simple set of instructions (e.g. go to an alternate URL that we will provide) where the live match feeds will be available to you. We are confident that this set of "emergency" instructions will not be required, but out of an abundance of caution we will make these arrangements.

Regards,
Willow TV Management

मी त्या अर्ध्या पाऊनतास वाल्यांपैकी होतो. Happy सकाळी Twiter वर ह्याविषयावर सर्व फार जोरात होते.

भाऊ ग्रेट कार्टून. हर्षा डोक्यावर 'एक्स्ट्रा कव्हर' नसतानाच स्मार्ट दिसायचा. उगीच आपले 'कौआ बनके पंख मयूरके अपने दुममें बांधे' असा प्रकार....

काल तीन सीमर्स आणि एक फिरकी घेवून धोणी ने लयच रिस्क घेतली होती.. त्या तीन पैकी एक सीमर म्हणजे श्री असेल तर रीस्क फारच महागात पडू शकते. ३७१ चा डोंगर असल्याने तेव्हडी महागात पडली नाही अन्यथा बांगला बंधूंनी तोंडचे पाणी पळवले असते.

अजूनही संघ संतुलीत नाही. युवी ला संघात ठेवण्याच्या अट्टाहासापेक्षा संघ संतुलन महत्वाचे आहे हे धोणीला कळत नाही काय? युवी चा फलंदाजी मध्ये अजून धड सराव देखिल झालेला नाही. काल विरू नेमकाच ४७ षटकापर्यंत खेळला अन्यथा युवी ला फलंदाजीची संधी मिळाली असतीच. (विराट मुळे मधल्या फळीला चांगले स्थैर्य आले आहेच त्यात खाली पठाण व धोणी असताना युवी निव्वळ "एक्स्ट्रा आर्टीस्ट" ठरतो). तेही न झाल्याने नमकी पुढील सामन्यात धोणी ला यावर निर्णय घ्यावा लागेल. ई. ऑ. विरुध्ध कालचा गोलंदाजी मारा अगदीच पोकळ ठरेल. भज्जी आणि अजून एक फिरकी (चावला) गोलंदाज आवश्यक आहे. झहीर किंवा भज्जी कुणालाही वाईट दिवस लागला तर ऊर्वरीत गोलंदाजीची शकले ऊडायला वेळ लागणार नाही.

तेव्हा युवी वर कितीही प्रेम असले तरी पुढील सामन्यात त्याला बसवून चावला ला घेणे अपरिहार्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------
कालचे साहेबांचे धावचित होणे शोभले नाही आणि झेपलेही नाही Happy बहुदा साहेबांना धावचित करून मग २०० चा विक्रम मोडायचा डाव होता विरू चा.. असो सात खून माफ Happy
बाकी पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतावि. नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी देणे हा निर्णय निव्वळ अपरिपक्वतेचे लक्षण आहे का "घरचा माज" हे तो शकीबच जाणे. ड्यू फॅक्टर ने नंतर खेळपट्टी अन मैदान फास्ट झाले होते हे खरे आहे पण तो एक निव्वळ फॅक्टर आहे. मला वाटतं काल दोन्ही संघांची मदार फलंदाजीवर होती हे स्वच्छ आहे- अशा वेळी निदान पहिले फलंदाजी करून दडपण आणता आले असते. असो विरू ४७ षटके खेळतो तेव्हा अशा "जर तर" ला विशेष अर्थ ऊरत नाही..
झहीर चा फिटनेस मलाच कमी वाटला का? फुट्बॉल सारखा फुगल्यागत दिसत होता.. क्षेत्ररक्षणातही चपळाई नव्हती.. रैना ला बरेचसे सामने सब. क्षेत्ररक्षक म्हणून खेळायला मिळतील बहुदा Happy

शास्त्री बुवांनी हुकुमी एक्क्यांची रम्मी (रम पासून रम्मी पर्यंत बुवांचा प्रवास देखणा आहे!) चालू केली आहे आपणही बसुयात. माझे हुकुमी एक्के:
भारतः विरू
श्रीलंका: संगा
बांगलादेशः तमीम
कांगारू: वॅट्टो
आफ्रिका: कालिस
न्युझिलंडः वेटो
ईग्लंडः ट्रॉट
वेस्ट ईं: ब्रावो (ड्वेन)
पाकः आफ्रिदी

तुमचे ?

एक कालीस सोडला तर शास्त्रींच्या इतर हुकमी एक्क्यांबद्दल मी तरी सहमत नाही. योगजी, माझे हुकमी एक्के सामन्यांची पहिली फेरी झाल्यावरच खरं तर ठरवता येतील [ कांही संघातील नवीन खेळाडू मी पाहिलेलेही नाहीत]. पण आपल्या कांही हुकमी एक्क्यांबाबत माझं मत दिलं तर चालेल ना ?

भारतः विरू - या चषकासाठी सचिनचं "मोटीव्हेशन" उच्चतम स्तरावर आहे, तो फॉर्मातही आहे व त्याचा विरुद्ध संघावर दबावही असतो; कांही सामने विरूने एकहाती जिंकून दिले तरीही संपूर्ण चषकासाठी "हुकमी एक्का" सचिनच ठरण्याची शक्यता अधिक आहे;

श्रीलंका: संगा - मला वाटतं उपखंडातील खेळपट्ट्यांवर बाहेरच्या संघाना मेंडीसला खेळणं खूपच अवघड जाईल; संगा ग्रेट असला तरी श्रीलंकेसाठी जिंकण्यासाठीचा हुकमी एक्का मेंडीसच ठरावा;

कांगारू: वॅट्टो - सगळं हल्लीचं अपयश धुवून काढण्याच्या"मोटीव्हेशन"च्याच जोरावर पाँटींगच ऑसीजसाठी हुकमी एक्का होईल असं मला राहून राहून वाटतंय;

आफ्रिका: कालिस -१००%सहमत;

ईग्लंडः ट्रॉट - पीटरसनचा फॉर्म व आयपीएलमुळे मिळालेला इथला अनुभव याच्या जोरावर तोच "हुकमी एक्का"चा अधिक दावेदार असावा.

पाकः आफ्रिदी - १००%सहमत;लेगस्पीनर या चषकात चमकतील असं तर मी आधीच भाकीत केलंय.

हा आपला माझा आंतला आवाज झाला; तज्ञांचे अंदाज साफ चुकतात तिथं या आवाजाची काय बिशाद ! Wink

काल स्रिसंथचे चेंडू खूपच जास्त स्विंग होत होते. तसेच तो अतिशय वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे चेंडूवर अजिबात नियंत्रण नव्हते. कदाचित अनपेक्षित विश्वचषकाची लॉटरी लागल्याने तो चेकाळला असावा. त्याच्याऐवजी मुनाफने सुरूवात करायला पाहिजे होती. अजून १-२ सामने त्याला खेळवायला हरकत नाही. नाहीतर मग शेवटी नेहरू आहेच त्याची जागा घ्यायला.

मला वाटतं धोणी श्री ला बाहेर बसवून चावला ला घेईल.. थोडक्यात दोन सीमर आणि दोन फिरकी आणि शिवाय युवी ला ही संघात ठेवेल Happy

<<थोडक्यात दोन सीमर आणि दोन फिरकी आणि शिवाय युवी ला ही संघात ठेवेल>>योगजी, एकाच उपखंडात सामने असले तरीही सामन्यांच्या प्रत्येक ठीकाणच्या खेळपट्ट्या, हवामान [आज श्रीलंकेत पावसाचा अंदाज होता] इ. खूप वेगवेगळं आहे. शिवाय प्रत्येक विरुद्ध संघाचीही बलस्थानं व मर्मस्थानंही वेगवेगळी आहेत. त्यामुळे, धोनीला दोन सीमर व दोन फिरकी हा ढोबळ फॉर्म्युला न वापरता प्रत्येक सामन्यासाठी संघनिवडीसाठी डोकं खाजवावंच लागणार आहे. [ "साहेबां"चाही लेगस्पीनर म्हणून अधून मधून वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही !].
[ माझ्या कांही अडचणींमुळे मी धोनीचा सल्लागार म्हणून जाणं आत्ताच मला शक्य नाहीय; तसं इथल्या कुणी त्याला सुचवूं नये, म्हणून हे स्पष्टीकरण !]. Wink

आपल्या विरूद्धच्या कामगिरी वरून बांगला देश चौथी टीम म्हणून आपल्या ग्रुप मधून वर जाणार अस दिसतय.
आपली बॉलिंग आणि फिल्डिंग अपेक्षेप्रमाणेच होती. त्यामुळे सतत ३५०+ काढायला लागणार आपल्याला पहिले यायच असेल तर. नॉक आउट ला तर नक्कीच ३५०+ ची जरूर.

>>> आपल्या विरूद्धच्या कामगिरी वरून बांगला देश चौथी टीम म्हणून आपल्या ग्रुप मधून वर जाणार अस दिसतय.

मला तसं वाटत नाही. बांगलादेशाचा संघ सामान्य आहे. त्यांची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सुमार आहे. फक्त २-३ फलंदाज बरे आहेत. आपल्या गटातून आपल्याव्यतिरिक्त द. आफ्रिका, इंग्लंड व वेस्ट इंडिज हे देशच वर जातील. बांगलादेशाला वर जाण्यासाठी वरील चौघांपैकी किमान एकाला तरी हरवावे लागेल. ते शक्य वाटत नाही. तसेच हॉलंड व आयर्लॅन्डला सुध्दा हरवावे लागेल. आयर्लॅन्डला हरविणे त्यांना अवघड आहे.

आपल्याविरूध्द त्यांनी २८३ धावा केल्या कारण आपण तेवढ्या धावा त्यांना करून दिल्या. ३७० धावा खात्यात असल्याने आपण सहज जिंकू अशी आपली खात्री होती. त्यामुळे आपल्या संघाने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण गांभीर्याने घेतलेच नाही. जर आपण २७५ च धावा केल्या असत्या तर आपल्या गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी करून बांगलादेशाला २२५ च्या आतच रोखले असते.

<<त्यामुळे आपल्या संघाने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण गांभीर्याने घेतलेच नाही..... २२५च्या आतच रोखले असते.>> विश्व चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत अशी वृत्ती बाळगणं खूपच खतरनाक ठरूं शकतं; म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो !

सेहवाग म्हणे- 'मी ५० ओव्हर खेळण्याचा प्रयत्न करणार आहे'. म्हंजे बोलर्स मेलेच आता.

बांगलादेशला त्यांच्याच देशात खेळताना अजिबात कमी लेखू नका.. परवा वीरु पेटला म्हणून एवढ्या धावा झाल्या... बांगलाचा कॅप्टन आजच्या घडीला वनडे च्या क्रमवारीत पहिल्या दहात असलेला बॉलर आहे आणि त्यांचा ओपनर सुद्धा पहिल्या १५त आहे.. सुदैवानी परवा त्याला जखडून ठेवले होते म्हणून वाचलो.. आणि प्रत्येक मॅच घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना मिळणारा फायदा कसे विसरून चालेल... वेस्ट इंडीज आणि बांगला मध्येच चुरस होणार ४थ्या संघासाठी..

<<सेहवाग म्हणे- 'मी ५० ओव्हर खेळण्याचा प्रयत्न करणार आहे'. >> पण त्याकरता सचिनला रन आऊट करायची मात्र गरज नसते, हे माहित आहे ना त्याला ? नियमांनुसार, ते दोघेही एकाच वेळीं ५०ओव्हर खेळूं शकतात कीं ! Wink
<<बांगलादेशला त्यांच्याच देशात खेळताना अजिबात कमी लेखू नका>> बांगला देशाने "लिंबू टींबू "ची कात केंव्हाच टाकली आहे ! आपल्याला एकदां दंशही केलाय !! Wink

ऑसी २८-० दहा ओव्हरमध्ये ... झिम्बाब्वेच्या स्पिन बॉलर्सनी चांगलच रोखुन धरलय कांगारुना ...

उत्सेया ४ पैकी २ निर्धाव.उरलेल्या २ मद्ये ५ धावा. वा वा...

आयर्लंड, कॅनडा, केनिया, नेदरलंड या सारख्या संघाना विश्वचषकात या घडीला खेळवायची आवश्यकता आहे का? क्रिकेट अधिक अधिक संघांनी अनेक ऊपखंडातून खेळले जावे हे चांगलेच आहे पण विश्वचषका सारख्या मह्त्वाच्या स्पर्धातून मात्र या अशा संघांचा सहभाग हा निव्वळ यांचा वापर करून ईतर संघ रन रेट निव्वळ मजबूत करून घेणार, एव्हड्यावरच रहातो. एखादा वैश्विक चमत्कार झाल्याशिवाय (बांगला ने २००७ मध्ये आपल्या बाबतीत केले पण तो चमत्कार नव्हता, आपला आगाऊपणा नडला होता) हे संघ दुसर्‍या संघांना हरवणे अशक्य आहे. मग निव्वळ त्याचा फायदा घेवून तक्तेवारीत असंतुलन होवू शकते. (पुर्वी बांगलादेश, झिंबाब्वे बद्दल असे बोलले जायचे पण आता त्यांचा स्तर चांगलाच ऊंचावला आहे.. झिंबाब्वे चा राजकीय अस्थिरतेमूळे बळी गेला.) नशीब तरी यावेळी युएई चा संघ नाहीये.
या उपरोल्लेखित संघांनी विश्वचषकात क्वालिफाय करण्या आधी किमान काही मोठ्या आंतर्राष्ट्रीय स्पर्धा (नुसत्या मालिका नकोत) खेळलेल्या असायला हव्यात ना?

ईथल्या अभ्यासू/जाणकारांचे काय मत आहे?

पुढल्या वेळपासून विश्वचषकात १०च संघ असतील असे काहीसे उडत उडत कानावर आले आहे. त्यातही ऑसी उ. न्या ८ च हवेत.
रणजीसारखी प्लेट लेव्हलची आणखी एक स्पर्धा होईल बाकीच्या संघांसाठी.

बांग्लादेशने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली असती आणि २७०-८० धावा केल्या असत्या तर भारताला जड गेले असते असे काही समालोचक (नाही, मांजरेकर नाही) म्हणत होते आणि बक्षीसे वाटताना शास्त्रीबुवांनी पण असेच सूचित केले होते.

भारतालाच काय, विश्वचषकात २५० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग कुणालाही भारी पडू शकतो..
नेहेमीपेक्षा प्रेशर जास्त असतेच. फक्त दिवस रात्र सामन्यात दवाचा फायदा दुसर्‍यांदा फलंदाजी करणार्‍या संघाला जास्त होतो ईतकच. बांगला वि. सामन्यात याचा प्रत्यय आला.

ऑसीजचा झिम्बाब्वे विरुद्ध फक्त २६२ धावांचा डोंगर... ली आणि टेट असल्यामुळे जड जाणार नाही इतकेच.. अन्यथा काही सांगता येत नाही... कोव्हेंट्रीच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम होता काही दिवसांसाठी..

आज ऑसीच्या सामन्याआधी स्टुदियोत चकाट्या पिटायला हर्ष भोगले बरोबर दादा होता. त्याचे ठाम म्हणणे की दवविरोधी स्प्रे मारायला लागल्यापासून दुसर्‍या इनिंगला काही फरक पडत नाही.
माइक हसी ऐवजी ऑसीजनी अष्टपैलू फिरकी गोलंदाज घेतल्याबद्दल त्याची टिप्पण्णी : ऑसीजना सीनियर्स पेक्षा तरुणांना प्राधान्य द्यायची सवयच आहे.

Pages