निष्ठूर

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 December, 2010 - 05:28

(डॉक्टरांच्या http://www.maayboli.com/node/21999 या गझलेला झब्बू (?))

कागदी घोडे... तया ना खूर आहे
योजना हाती नवी मंजूर आहे

लाभ पॅकेजी.... किती जाहीर झाले
कालचा राजा.... 'बळी' आतूर आहे

कामगारांना कळेना.. काय चुकले ?
बंद गिरण्या अन धुमसता धूर आहे

आज ते 'आदर्श' सारे फोल झाले
ती पहा, दिल्ली.. जवाना दूर आहे

आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे

रे तुक्या, इतुके कसे तुजला गमेना ?
आंधळा दळतोय.... कुत्रा चूर आहे

- कंपाऊंडर कौतुक शिरोडकर

गुलमोहर: 

क्या बात है !!!....

फार चांगला झब्बू..... आशयात अक्खी गझल मस्तै... Happy

आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे

>> हा शेर खूप खूप सुंदर आहे. कौतूक .. अप्रतिम विडंबन.

तरी म्हणलं आजकाल गुलमोहर ओस का पडतोय....! कौत्या, ट्पलेलाच असतो ना, एखादी चांगली कविता, गझल पडली रे पडली की याला रान मोकळं Proud

ये बात हुई कौतुक. मला ही सगळ्यात जास्त आवडली रे.

<< कामगारांना कळेना.. काय चुकले ?
बंद गिरण्या अन धुमसता धूर आहे >>
भिडलाच एकदम. प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे असेल कदाचित.

आज ते 'आदर्श' सारे फोल झाले
ती पहा, दिल्ली.. जवाना दूर आहे

आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे

हे दोन्ही शेर छान आहेत...

actually ही independent गझल म्हणूनच् चांगली आहे...विडंबन as such नको म्हणायला...
विडंबन is not working here Happy

आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे >>> खल्लास केलस!!

आणि विडंबन नाहियेच मुळी! Happy

किर्‍या. Happy