टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो लालू... ५ सेटपर्यंत गेली आणि थोडीफार उत्सुकता म्हणून चांगली.. चांगले टेनिस काही नाही झाले हे खरेच आहे! फेडररला तर लाजच वाटत असेल आजचा खेळ पाहून! मधूनच चांगला खेळला फक्त..

खर तर फेडीने दुसर्‍या सेटमधली संधी दवडली नसती तर तीन सेटमध्ये मॅच संपली असती.. पण डेलपोट्रोला मानले पाहिजे. तो फार संयमाने खेळला शेवटपर्यंत ... नक्कीच नदालविरुध्दच्या मॅचमध्ये त्याचा खेळ जास्त सरस झाला होता पण कालही तो चांगलाच खेळला असे मला वाटते.. तो एक परिपक्व खेळाडु म्हणुन तयार होतोय... पुढे कधी तो रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकाला आला तरी त्याचे आश्चर्य वाटु नये...

डेल पोट्रोचा नदाल होतोय की रिचर्ड क्रायज्चॅक हे बघणं मोठं मनोरंजक असेल नक्की.
सलग दोन मॅचेस मध्ये राफा आणि फेडीला हरवलंय म्हंटल्यावर ह्याला केवळ फ्ल्यूक म्हणण्यात अर्थ नाही.
पाच-सहा वर्षे फॉर्म टिकवून ठेवणारा दोन्-चार दशकात एखादाच फेडरर होतो पण तरी पोट्रोचं वय आणि खेळ बघता पाचेक स्लॅम्स तो नक्की जिंकेल.
त्याच्या फोरहँडचा अँगल अप्रतिम आहे पण.

फेडरर हरला ... आज आनंदी आनंद झाला ... Happy

गैरसमज नको ... फेडरर आमचा पण आवडता खेळाडु, पण आमच्या कडे एक नविन साहेब आला आहे. तो आहे फेडररचा गाववाला आणि पक्का भारतीय द्वेष्टा. तो फेडरर जिंकला की हा सोकावतो आणि सगळे जग आणि बाकी सगळे खेळ / खेळाडु कसे तुच्छ आहेत हे उघड बोलतो. आज त्याने आजारी म्हणुन घरी होता. फेडरर हरला आणि त्याची चांगली जिरली. उद्या त्याला मुद्दामुन खिजवणार. त्याने 'चेहरा-पुस्तक' वर लिहले आहे की आज देशाचा झेंडा अर्धा करायला पाहिजे.

फेडरर हारला म्हणु सॅन फ्रॅन्सिस्कोच्या पक्वान्न मधे ह्या शुक्रवारी दुपारी पार्टी आहे. सर्वांना आग्रहाचे जाहीर आमंत्रण !

>>डेल पोट्रोचा नदाल होतोय की रिचर्ड क्रायज्चॅक हे बघणं मोठं मनोरंजक असेल
Lol
साफिन पण होऊ शकतो..
एमजी, साहेबाला घेऊन जा.

मॅच चांगलीच झाली. माझ्या मते फेडरर किंवा नादाल वाइट खेळले म्हणण्यापेक्षा डेल पोत्रो ने त्या दोघांना चांगले खेळू दिले नाही हे खरे. पहिल्या सेट मधे पोत्रो वर पहिली ग्रँड स्लॅम फायनल तीही १५ ग्रँड स्लॅम जिंकलेल्या फेडरर विरूद्ध खेळण्याचे दडपण होते. सुरूवातीला पोत्रो प्रत्येक शॉट विनर मारायच्या प्रयत्नात खूप चूका करत होता. नंतर तो सावरला. फेडररच्या स्लाइस रिटर्न वर त्याला जसे उत्तर सापडले तसा तो फेडररला त्रास देउ लागला. मग दुसर्‍या सेट पासून फेडरर वर द्डपण यायला लागले व त्याची सर्विसही बिघडली. कधी नाही ते फेडरर चिडला व रेफ्री विरूद्ध अपशब्द वापरले. पाचव्या सेट मधे तर his game was disintegrated. (योग्य मराठी शब्द सुचत नाही). (कोलमडवला गेला?)

मॅचच्या आधी फेडरर म्हणाला होता की पोत्रो खूप लवकर शिकतोय, इतके की त्याच्यातील प्रगती दर महिन्यागणित जाणवतीय. ऑस्ट्रेलियन ओपन मधे फेडररने त्याचा ६-३, ६-०, ६-० असा धुव्वा उडवला होता, तर फ्रेंच ओपन मधे पाच सेट मधे हरवले होते. आता तर फेडररला हरवे पर्यंत त्याची मजल गेली.

हा विजय बेकर च्या विंबल्डन विजया इतका सेन्सेशनल नव्हता, व मॅकेन्रोच्या विंबल्डन वरच्या बोर्ग विरूद्धच्या विजयाच्या तोडीचाही नव्हता. पण तेवढाच महत्वाचा ठरेल. चेंज ऑफ गार्ड.

पोत्रो कुणाच्या मार्गावर जातो हे काळच ठरवेल पण त्याच्याकडे अगदी बोर्ग किंवा फेडरर नाही पण बेकर किंवा मॅकेन्रो व्हायची क्षमता आहे हे नक्की.

आता वर्षाच्या शेवटच्या मास्टर्स ला मजा येइल.

वेल डन हुआन मार्टिन डेल पोत्रो. अनेक वर्षाची युरोपची मक्तेदारी मोडली.

मस्त झाली मॅच. फेडी हरला ते बघून वाईट वाटले पण पोत्रो सही खेळला. त्याचा कंट्रोल आणि पेशन्स जबरदस्त होते.

लालुला अनुमोदन. मी तेच लिहायला आले होते. नादाल/फेडी मधील ह्याआधीच्या एपिक मॅचेस किंवा २००९ विंबल्डन फायनलच्या तोडीस तोड फायनल बघायला मिलेल ह्या आशेने आम्ही तिकिट्स घेतली होती. पण मॅच सोमवारी आल्यामुळे विकावी लागली ते बरेच झाले. एक तर फेडी हरला, दुसरे वाईट खेळुन हरला. पहिल्या सेटमधले फेडीचे काही शॉट्स आणि पुन्हा ४/५ व्या सेटमधले पोत्रोचे फोरहँड विनर्स सोडले तर गेम असा फारसा छान नव्हता. योग्य वेळी खेळ उंचावणे खरे तर फेडीचा हातखंडा जे काल पोत्रोने केले. तसेच, पोत्रो चांगला खेळला हे ठीक आहे पण नादालला त्याने हरवले ते नादाल १००% तंदुरुस्त नसताना हे विसरायला नको. अर्थात त्यात पोत्रोची चूक नाही. असो, पोत्रोचे अभिनंदन आणि पुखेशु Happy

किम क्लायस्टर्सला सलाम. दोन वर्षांनी परत येउन ग्रँड स्लॅम जिंकणे सोपे नव्हे. क्लायस्टर्स माझी आवडती खेळाडु. तिचा खेळ तर आवडतोच पण तिचा कोर्टवरचा वावर सुद्धा, फार संयमीत. आणि तिचे खेळावरचे लक्ष (concentration/focus ?) तर वाखाणण्याजोगे. आपल्या मिर्झाबाईंनी ह्या दोन गोष्टी जरी शिकल्या तर आहे त्यापेक्षा पुष्कळ पुढे जातील Sad रच्याकने, I proudly share b'date with Kim Happy

बो-विश, Happy

डेल पोट्रो चांगला खेळला.. ( की फेडरर वाईट खेळला कोण जाणे! अरेरे )
फेडररला तर लाजच वाटत असेल आजचा खेळ पाहून!
>>
सगळ्याचा अर्थ एकच. जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो. एक वाईट खेळला म्हणून दुसरा जिंकला असे कधी नसते. फेडररला टेन्शन आले किंवा तो थकला होता, म्हणून त्याची सर्व्हिस वाईट झाली, अनफोर्स्ड एरर्स झाल्या, असे म्हणणे म्हणजेच पोट्रोने या दोन्ही बाबतीत फेडररपेक्षा सरस कामगिरी केली आणि म्हणून तो जिंकला असं होय.

फेडररचा एकहाती बॅकहॅन्ड थोडासा कमकुवत वाटला. पोट्रोने काल पुष्कळ वेळा फेडररला बॅकहॅन्ड्वर खेळवले. फेडररचा फोरहॅन्डही वयोमानाप्रमाणे तितका पॉवरफुल राहिला नाही. पोट्रोने त्याचे फोरहॅन्ड चांगले परतावले. मात्र पोट्रोचे सुपर पॉवरफुल फोरहॅन्ड परतावणे फेडररला इतके नीट जमले नाही.

फेडररचे आजकाल सगळे अंतिम सामने ५ सेट्मध्ये होतात. त्याचे आता वय होत आहे. नवीन ताज्या दमाचे खेळाडू येऊन त्याला हरवणारच. त्याची एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इतकी वर्षानुवर्षे टिकवून ठेवलेला फिटनेस. गेली सहा वर्षे त्याने कुठल्याही स्पर्धेतून फिटनेसच्या कारणास्तव माघार घेतलेली नाही. नदालने ह्यावरून धडा घेतला पाहिजे. नाहीतर तंदुरूस्त होईपर्यंत मागचे दणकट खेळाडू येऊन तुम्हाला हरवून जातात.

विक्रम, पोस्ट चांगली आहे. Happy

तटी: वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टींना मरे हा अपवाद समजावा .. Lol Light 1

हो माझा नवराही हेच म्हटला, फेडरर चांगला खेळला नाही म्हणण्यापेक्षा त्या पोट्रोने त्याला चांगले खेळू दिले नाही असे म्हण... कालचा दु:खी दिवस सरल्यावर आज ते (दु:खी मनाने) पटते... Happy
पोट्रोचे फोरहँड्स चांगले होते... पण तरीही फेडररचा खेळ पाहायला जसे छान वाटते तसा काही त्याचा खेळ वाटला नाही.. उंची आणि ताकदीमुळे फटके जोर्रात बसतायत पण फेडररची नजाकत नाही असं अजुनही वाटते! तसंही फेडरर म्हटलाय आय अ‍ॅम द नंबर वन.. तेव्हा तो परत नक्कीच येईल.. [परत यायला गेलाय कुठे म्हणा! Happy ]

सिंडे, किम क्लायस्टरबद्दल १००% अनुमोदन.. कसली भन्नाट आहे ती एव्हढेच शब्द सुचतायत मला !!
रच्याकने, तिची मुलगी कसली डिट्टो तिची कॉपी आहे !! माय गॉड!

अरे देवा! फेडररला दडपण आले होते?? हे कोणी सांगितले? झाले की सगळे रेकॉर्ड वगैरे. एरवी आम्हालाच टेन्शन यायचे. आम्हाला बघताना नाही आले टेन्शन तर त्याला खेळताना कशाला येईल? Proud काय सिंडी? Happy Light 1

सचिन, "त्यातल्या त्यात" जो जास्त चांगला खेळतो तो ना? Happy

>>फेडरर चांगला खेळला नाही म्हणण्यापेक्षा त्या पोट्रोने त्याला चांगले खेळू दिले नाही असे म्हण
तसे काही अज्जिबात म्हणू नकोस बीएस्के! Wink

हे पहा मॅच स्टॅटिस्टिक्स, म्हणजे दोघेही कसे जवळजवळ सारखेच (वाईट) खेळले ते दिसेल.

http://www.usopen.org/en_US/scores/stats/day21/1701ms.html

सर्व नादाल प्रेमियांच्या दु:खात सहभागी. मास्टर्स मधे सेमि फायनला नाही.

फेडरर आणि देल पोत्रो सेमिफायनलमधे. मरे आउट.

नादाल हरला, फेडरर हरला, डेल पोत्रो ही हरला. सर्व जनता शोक सागरात आहे असे दिसते. असे करू नये. शेवटी काय. चांगला खेळाडू नेहमी जिंकतोच असे नाही.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी वेगळा धागा उघडला आहे. त्यावर चर्चा करुया..

http://www.maayboli.com/node/13388

अ‍ॅडमीन, वेगळा धागा उघडण्यास काही हरकत असेल तर तो कृपया डिलीट करा.. वेगळा धागा एव्हड्यासाठीच की ह्या बाफ वर खूप पोस्ट्स होणार नाही. आणि विषयवार चर्चा एकत्र राहिल..

वेगळे धागे करायला काहीच हरकत नाही. सध्या ह्याच विभागात(ग्रूपमध्ये) असुदे. पुरेसे धागे झाले की टेनीससाठी स्वतंत्र विभाग करता येईल.

"खेळाच्या मैदानात - टेनिस" हा वेगळा ग्रुप काढल्याबद्दल अ‍ॅडमीनना धन्यवाद !
वेगळे 'संस्थान' मिळाल्याबद्दल सर्व टेनीसप्रेमींचे अभिनंदन आणि ग्रुप मधे स्वागत. Happy

सगळ्यांनी पटापट कंपूत सामिल व्हा !!

भारताने पुन्हा एकदा डेव्हिस कपच्या वर्ल्ड ग्रुप मधे स्थान मिळवले. सोमदेव देवबर्मन आणि रोहन बोपन्ना दोघांनी आपल्यापेक्ष खू़प वरचे मानांकन असलेल्या ब्राझिलियन खेळाडूंना परतीच्या सामन्यांत हरवले. सुरुवातीच्या दोन्ही लढतीही अत्यंत अटीतटीच्या होऊन पाच सेट पर्यंत लांबल्या होत्या.
देशासाठी खेळताना भारतीय टेनिसपटुंचा खेळ चांगलाच उंचावतो, त्यात चेन्नईच्या दमट हवामानानेही ब्राझिलीयन खेळाडूंचा घाम काढला.

सानिया मिर्झानेही आज आपले ९वे WTA डबल्स टायटल जिंकले.

भारतीय संघाचे जागतिक गटात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन. Happy
बोपण्णा आणि सोमदेव एकेरी सामन्यांसाठी तयार होत आहे ही चांगली गोष्ट आहे फक्त दुहेरीसाठी आता पण एखादी जोडी हळूहळू तयार करायला हवी

चीनमध्ये चालू असलेल्या एशियाड स्पर्धेत भारताच्या सोमदेव बर्मनने काल सनम सिंग बरोबर दुहेरीत तर आज एकेरीत सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल सोमदेव, सनम सिंग आणि सर्व भारतीय टेनीस फॅन्सचे हार्दिक अभिनंदन. Happy

टेनीस एकेरीत सुवर्णपदक पटकवायची कामगिरी भारतीयाने पहिल्यांदाच केली.. ! पेस भुपती नंतर पुढची पिढी तयर होण्यासाठी ह्याचा नक्कीच उपयोग होईल.

ओ मंडळी, बोला की राव काही तरी.
फेडरर ने सगळ्यांचा कचरा करत वर्ष अखेरीचे मास्टर्स जिंकली. सेमी फायनलला जोको विरूद्ध. तर एकही अनफोर्स्ड एरर नाही,
त्यातल्या त्यात नादालने एक सेट घेतला फायनल मधे.
२०११ मधे जुना फेडरर दिसण्याची लक्षणे. (हे सेफ , मोघम विधान).

डेव्हिस चषक स्पर्धेतली भारत वि. सध्याचे विजेते सर्बिया यांच्यातली टाय सध्या चालू आहे. काल रोहन बोपन्नाने व्हिक्टर ट्रॉइस्कीला पाच सेट पर्यंत झुंजवले. त्याच्या सर्व्हज अफलातून होत्या(एसेस, अनरिटर्नेबल आणि तितकेच डबल फॉल्ट्स) दोघांच्या रँकिंगमधले अंतर पाहता बोपन्नाने जबरदस्त झुंज दिली. त्याला एकेरीत खेळताना प्रथमच पाहायला मिळाले.
दुसर्‍या सामन्यात सोमदेवने टिपसर्व्हिचला तीन सेट्स मध्ये हरवले!
दुहेरीत हेश ली नसल्याने मात्र भारताची बाजू लंगडी पडली आहे. सर्बियाकडे नेनाद झिमोन्जिच आहे.
दुहेरीतही सोमदेव रोहनने सर्बियन्सना चांगली झुंज दिली.
लाइन्स जजेसही सर्बियाच्या बाजूने खेळत होते.

धन्यवाद भरतजी. हे माहीतच नव्ह्ते. सोमदेव ने टिपसर्व्हिचला हरवले म्हणजे सहीच. :).
>>लाइन्स जजेसही सर्बियाच्या बाजूने खेळत होते.
Sad अरेरे...

ही लढत भारत ४ - १ नी हारला... परतीच्या एकेरीच्या सामन्यात अगदीच सहज पराभव झाला... अर्थात सुरुवातीच्या लढतीत फारच चांगली लढत दिली... गेल्या वर्षीच्या विजेत्या टीम बरोबर पहिलाच राऊंड खेळायला लागला त्यामुळे जी लढत दिली ती चांगलीच म्हणायला लागेल... पण आता परत वर्ल्ड लेव्हलसाठी क्वालिफाय होण्याचे कष्ट घ्यावे लागणार..

आज सकाळी राफेल नदाल विरुद्ध सोमदेव देवबर्मन अशी मॅच बघितली Indian Wells Open मध्ये.. ४थ्या फेरीची मॅच होती... देवबर्मन दुसर्‍या फेरीत मार्कस बघदातिस तर तिसर्‍या फेरीत झेवियर मलिसेला हारवून पुढे आला होता.. तसेच त्यानी डेव्हिस कप मध्ये यांको टिपसर्वीचला नुकतेच हरवले होते.. ह्या पार्श्वभूमीवर त्याच्या कडून जोरदार लढतीची अपेक्षा होती आणि त्याने काहीप्रमाणात ती पूर्ण केली असेच म्हणावे लागेल... नदालनी मॅच ७-५, ६-४ अशी जिंकली पण त्यासाठी त्याला तब्बल २ तास लागले जे नदालचा खेळ बघता जास्तच होते.. पहिल्या सेट मध्ये सोमदेवने एक सर्व्हिस ब्रेकही मिळवला... मॅचचे स्टॅटिस्टीक्स बघता नेहमी प्रमाणे नदालने खूप विनर्स घेऊन मॅच जिंकली पण तितक्याच चुकाही केल्या.. त्याच्या तुलनेत सोमदेवचे विनर्स कमी होते पण चुका जास्त होत्या..

याच इंडियन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोव्हिचने फेडररला हरवले आणि फायनलमध्ये राफाला. आता जोको जागतिक क्रमवारीत फेडररला मागे टाकून दुसर्‍या स्थानी.
सोमदेव ७३ व्या.

वर्ल्ड कप क्रिकेट फायनलच्या आधी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता (अमेरिकन इस्टर्न स्टँडर्ड टाइम)

... फ्लोरिडातल्या की बिस्केन इथे चालु असलेल्या सोनी एरिकसन टुर्नामेंटमधल्या... राफा विरुद्द फेडरर.. यांच्यात होणार असलेल्या सेमिफायनलच्या मॅचची मेजवानी ...टेनिस प्रेमींमा इ एस पी एन २ वर एंजॉय करता येइल.. त्या मेजवानीचा इच्छुकांनी जरुर लाभ घ्यावा...

ज्यांना ज्यांना टेनीस व क्रिकेट हे दोन्ही खेळ आवडतात त्यांच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे पर्वणीचाच असेल.. आधी राफा-फेडरर मॅच व नंतर भारत्-श्रिलंका वर्ल्ड कप फायनल... दुधात साखर!:)

अगदी अगदी मुकुंद... आणि रविवारी कदाचित जोको विरुद्ध ह्या दोघांमधील कोणीतरी...

Pages