टेनीस

सिंडी, असल्या बारीकसारीक स्पर्धांकडे लक्ष देऊ नको. फिदीफिदी

बारीकसारीक नाही गं...मास्टर्स आहे ना म्हणून वाईट वाट्टे...अरेरे

हे घ्या.... हरले साहेब पुन्हा... मास्टर्स कप मध्ये एकदा हरुन सुद्धा पुढे जाता येते...

http://news.bbc.co.uk/sport2/hi/tennis/7729083.stm

पण दोनदा हरुन नाही ना अरेरे

हमम्..... जाउ दे... आपण फक्त ग्रँडस्लॅम वर लक्ष ठेवू... स्मित

त्याचा फॉर्म बघता तो पुढच्या वर्षीचेच फक्त ग्रँडस्लॅम खेळेल असं दिसतंय...म्हणजे त्यानंतर retire होईल.. मी US open बघायला जाणार आहे... येणार का सांग...

सध्या तरी २००९ चे विंबल्डन बघावे असे वाटते आहे स्मित फेडीला हार्डकोर्टवर खेळताना दोनदा बघितले आहे.

ओह.. ओके.. स्मित

मी यावेळचे US open पाहिले... तिकिटं उशीरा काढली, त्यामुळे फायनलचं तिकिट परवडत नव्हतं... मग 4th round पाहिली... अँडी मरे vs वॉवरिंका आणि सेरेना विल्यम्स vs सेवरिन ब्रेमॉन्ड... मजा आली... स्मित

कित्ती दुष्ट आहेत ही लोकं http://specials.rediff.com/sports/2008/nov/17sld5.htm अरेरे

बॅड पॅच आहे...
जाईल...
प्रत्येकालाच येतो...
he is a fighter n he will fight back....
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !

जोकोविच चांगला आहे... मलापण वाटतं तोच आता टॉप रँकर होईल...
फेडररला सँप्रासचा रेकॉर्ड मोडायला किती ग्रॅन्डस्लॅम जिंकायचेत अजून?

.

चेन्नई - भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाचा आज (गुरूवारी) येथील डॉ. एम.जी. आर. युनिव्हर्सिटीकडून "डॉक्‍टरेट' देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे सानिया आता डॉ. सानिया बनली आहे. कुलगुरू ए. सी. शांमुघम व पोलिस महासंचालक सरबजीत सिंग यांच्या उपस्थितीत युनिव्हर्सिटीच्या दालनात खास समारंभात तिचा गौरव करण्यात आला.

यापुर्वी, ६ डिसेंबररोजी झालेल्या युनिव्हर्सिटीच्या १७ व्या पदवीदान समारंभात "चांद्रयाने-१' चे मयील्सामी अन्नादुराई तसेच सानियाला ही पदवी बहाल करण्यात येणार होती. मात्र, बाबरी मस्जिद पाडण्याला १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव ती या समारंभाला हजर राहू शकली नव्हती.

त्यामुळे युनिव्हर्सिटीने आज खास सानियासाठी समारंभाचे आयोजन केले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे टिअर ३ स्पर्धांच्या पहिल्यान दूअर्‍या फेरीत हरण्यासाठी वाटते अरेरे

उगाचंच...
कोणालाही देतात...
उद्या पायल रोहातगी ला ही देतील...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

हाहा... हो ना... टेनिस प्लेयर ला डॉक्टरेट कसली देतायेत... काय बिनडोकपणा आहे.... आता ती बाबरी मशिद पडून १८ वर्षे झाली, कसली डोंबलाची असुरक्षितता.....

डॉक्टरेट देणारे मूर्ख, अकारण सुरक्षिततेच्या कारणास्तव न येणारे महामूर्ख आणि पुन्हा तिच्यासाठी स्पेशल कार्यक्रम ठेवणारे शतमूर्ख.....