टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली फाइट देतेय वॉझनी.... सेरेना तर काल कित्येक शॉट्स पर्यंत पोहोचत सुद्धा नव्हती.
बाकी, क्लाईस्टर्स तर चँप आहेच, पण ही वॉझनीयॅकी मला शारापोवा टाईप तात्पुरती फॉर्मात नाही वाटत. खरच चांगला खेळ आहे आणि मुख्य म्हणजे फार प्रोफेशनल वाटतात.
फेडरर ला आधी ही हरवलय लोकांनी पण तुरळकच प्रकार ज्याला आपण "आऊटलायर" म्हणु शकु. भन्नाट खेळ आहे त्याचा. टॅलेंट आणि जोरदार तयारी यांच्या मिश्रणातुन तयार झालेला त्याचा नजाकती खेळ, काय मजा येते बघायला. त्याचं टॅलेंट त्यानी आख्ख्या कोर्टभर मारलेल्या फटक्यात तर आहेच पण त्याही पेक्षा प्रतिस्पर्ध्यानी मारलेल्या फटक्याचा अंदाज घेवुन तो स्वतःला पुढच्या फटक्या करता बरोबर मोक्याच्या ठिकाणी येऊन ऊभा राहतो यात आहे.

किम जिंकली... जबरीच.. Happy
प्रेझेंटेशनला पण मजा आली एकदम.. !! छान झाली मॅच..
एकूण सेरेना प्रकरण वगळता ह्यावेळी महिला विभागात मजा आली.. खूप चुरशीचे सामने झाले.. !

आज फेडी आणि डेल पोट्रो यांच्यात मॅच... डेलपोट्रोचा कालचा खेळ पहाता तो फेडीला टफ देईल असं वाटतय.. पण जिंकणार फेडीच Happy

डेलपोट्रो काल मस्तच खेळला.. बेसलाईनवर इतका पॉवरफुल खेळ होता त्याचा की नदालकडे उत्तरच नव्हते...

आणि ते मूर्ख कमेंट्रिटर त्याची आणि सेरेनाची तुलना का करतायत??????>> मी mute करून पाहिले त्यानंतर Wink

डेल नक्कीच फेडररला टफ देणार.. जिंकू सुध्दा शकेल..

कालसुध्दा जोकोविचने पहिला सेट जिंकायची संधी घालवली. फेडररला पहिला सेट जिंकू दिला की तो मॅच जिंकतोच. कालच्या मॅचच्यावेळी असे सांगितले की पहिला सेट जिंकल्यावर फेडररचा रेकॉर्ड १८६-४ असा आहे. म्हणजे पहिला सेट जिंकून तो १८६ वेळा जिंकलेला आहे आणि फक्त ४ वेळा हरलेला आहे. हे बहुतेक ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांचे आकडे आहेत.

तो डेलपोट्रो बोलायला अगदीच सौम्य वाटला.. Happy

हा ना राव! उगाच आपल्यालाच बोअर होतं. असो, बाकी खरच जोरदार खेळतोय डेल पोट्रो. फेडररच्या चुकांचं भांदवल तर करतोयच आणि त्या बरोबर स्वतः सुद्धा जबरदस्त रिटर्न्स मारतोय.
फेडररची जादु अवतरली नाही तर .............. Sad . मधुनच त्याची जादु परत येते. नुसता सुर गवसत नाही तर तो मालकंस वगैरे गायला लागतो. असं झालय आधी सुद्धा. त्याचीच वाट बघायची आता.

फेडीच्या बॉक्समधले लोक तो जिंकायला लागला की आनंदीत होतात, तो हरायला लागला की तोंडे पाडून बसतात पण हार्डली कधी त्याला चीअर करताना दिसतात, असे का ?

हो बर्‍याचदा फेडरर अशा स्थितीतही जिंकलाय... पण आज तो फेडररच वाटत नाहीये.. चिडला बिडला चक्क! Sad

आता तो भाऊ इतक्या वेळा जिंकलाय, त्यांचे ते हुर्रे वाले क्षण जाऊन एक तप वगैरे उलटलं असेल. आता नविन जिंकणार्‍यांची वेळ आहे जबरी चियरींग वगैरे.
असो, चला आजुन एक गेम घेतला. सर्विस ब्रेक करायला अवघड जातय पण. चुका पण वाढल्यात.

संपलं.................. आज काही खरं नाहीये................ बाहेर मारला त्यानी....
हा गेम मारला तर मजा आहे .... ही वील बी बॅक

श्या ! Sad Sad

पण मॅच जबरी झाली... डेल पोट्रो चांगला खेळला.. ( की फेडरर वाईट खेळला कोण जाणे! Sad )

मॅच सही झाली... फेडरर ने शेवटच्या सेट मधे चूका केल्या खूप... आणि त्याच वेळी डेल पोट्रो खूप कंट्रोल ठेऊन खेळला... डेल पोट्रोचे फोरहँड विनर अ फा ट होते !!!!!!!!!!!
फेडरर प्रेसेंटेशन ला किती शांत आणि मस्त बोलला..तो आता शब्दश: सगळ्याच्या पलिकडे पोचलाय.. Happy
दोन्ही मॅचेस मधे चारही खेळाडूंनी किती चांगलं Gesture दाखवलं... कालपण किम आणि वोझ्नियाकी एकदम सही बोलल्या.. एकमेकींशी पण एकदम मस्त हसत वगैरे बोलत होत्या.. आणि आज पण तसच..
एकूण ही युएस ओपन संपेपर्यंत नखं कितीवेळा खाल्ली गेली गणतीच नाही.. Wink

मस्त झाली मॅच. डेल पोट्रो सहीच खेळला एकदम, चौथ्या सेट मधे तर जाम थकला होता, पण जबरदस्त कमबॅक केला त्याने!

मॅच मस्त झाली??
म्हणजे बघायला मजा आली असेल पाच सेटमध्ये झाली म्हणून पण वाईट टेनिस खेळत होते.
पहिला सेट डेल पोट्रो वाईट खेळला, दुसरा सेट दोघेही वाईट खेळले. तिसरा सेट बरा झाला. चौथ्यात पुन्हा दोघेही वाईट खेळले. किती ब्रेक ते! शेवटी फेडरर वाईट खेळला. फेडीची फर्स्ट सर्व ५०%?
संपूर्ण मॅचमध्ये चांगल्या खेळाची झलक बघायला मिळाली अधूनमधून..
आजच्यापेक्षा नादालबरोबर खूप जास्त चांगला खेळत होता डेल पोट्रो.
हे माझे मत. Happy

Pages