अश्रूंचे मुखवटे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आता सगळीच मनं, डोळे
इतके आटलेत
म्हणून तर, अश्रूंचे मुखवटे
आम्ही बनवलेत

घेता का घेता?
पाहिजे तो मिळेल
प्रसंगानुरूप, हवे तेवढेच,
अश्रू तो ढाळेल

हो, हल्ली त्यालाही
पैसे पडतात
फायदा नसेल तर तिथे
अश्रूही अडतात

सगळ्या प्रकारचे अश्रू
आमचेकडे मिळतील
त्याच्यासाठी त्यांचे
रिमोटही मिळतील

वैयक्तिक दु:खासाठी
घळाघळा,
आसपासच्यांसाठी
थोडे कमी ढाळा

सामाजिक प्रश्ण?
डोळे फक्त पाणावतील
लुच्चे असाल तर
मगरीचेही मिळतील

अजूनही आहे
बरीच व्हरायटी
फक्त तुम्ही
मागायची खोटी

बालकांच्या डोळ्यांतून म्हणे
पडतात निर्मळ मोती
अशीही एक डिमांड
पूर्वी आली होती

माफ करा, आमचेकडे
तेवढीच कमी आहे
हां पण खात्री बाळगा
बाकी साऱ्याची मात्र हमी आहे
बाकी साऱ्याची मात्र हमी आहे

सुधीर

विषय: 
प्रकार: 

छान काहितरी वेगळं , मस्तच

अज्ञात
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुधीर