हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.
हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.
आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.
कोकणातुन येताना एका मित्राने माझ्यासाठी अननस आणला आणि योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो. अजुन एक योगायोग असा की, त्याच दिवशी मी घरी नसताना, घरात असलेल्या २ व्यक्तींपैकी एकाने माझा माठ फोडला.
तोडलेला अननसाचा देठ मी फुटलेल्या माठात कचरा + माती भरुन रोउन दिला. गोल माठात हिरवा देठ 'शो' साठी चांगला दिसेल, इतकीच अपेक्षा. पुढच्या प्रवासात मात्र रोजची सकाळ माझ्यासाठी एक सुंदर रंगीबेरंगी आश्चर्य घेउन येत होती. अत्यंत देखणी अशी ही प्रक्रिया शब्दात सांगणे खरच अवघड आहे.
[फोटो मी माझ्या सेल फोन कॅमेर्याने काढले आहेत, त्यामुळे जे दिसले, ते तसेच्या तसे तुमच्या पर्यंत पोहोचेलच असे नाही, पण एक प्रयत्न :)]
छोटासा शेंडा रुजला, आणि मोठ्या-मोठ्या नविन पानांनी छान बहरला.
पण तरीसुध्दा याला एखादे फळ / फुल येईल असे माझ्या ध्यानी-मनी पण आले नाही. अचानक एके दिवशी सकाळच्या टेहळणीच्या वेळी दिसले की एक लाल लुसलुशीत असे फुलासारखे काही झाडाच्या मध्यभागात दिसते आहे. अननसाला फुल येते ?, या आधी कधीच ऐकले नव्हते, अनेकांना विचारले, फळवाल्याला सुध्दा, पण कोणीच निट उत्तर देउ शकले नाही.
दोन दिवसांनी फुल थोडे वर सरकले, आणि खाली एक दांडा दिसु लागला.
फुल थोडसं मोठ झाल्यावर, पाकळ्या एकदम दाट आणि जाड झाल्या. तेंव्हा या फुलाचेच फळ होणार, म्हणजे हे फुल नसुन फळाची पहीली अवस्था आहे हे लक्षात आले.
आठच दिवसात छान गोलाकार आला. आणि तो लालचुटुक गोळा अत्यंत देखणा दिसु लागला.
या लाल गोळ्या भोवतीची लांब-लांब पाने पण मस्त लालबुंद, आणि टोकाकडे हिरवी अशी होती.
अजुन ८ दिवसांनी, मधला भाग थोडा हिरवट दिसायला लागला. मधे हिरवा, त्या भोवती लाल, पुन्हा त्या भोवती हिरवा. इतके देखणे दिसत होते ते फुल / फळ.
आणि अचानक या रंगांमधे भर पडली अजुन एका रंगाची. जांभळ्या रंगाचा एक टिपका लाल पाकळ्यांमधे दिसायला लागला.
दुसर्या दिवशी अजुन काही टिपके दिसले.
आणि आदल्या दिवसाच्या टिपक्याचे आज फुल उमलले होते.
अननसाला जे खवले असतात, निट बघितले तर लक्षात येते की त्या खवल्यांना छोटेसे काटेरी टोक असते. ते टोक म्हणजेच हे जांभळे फुल. प्रत्येक खवल्यात असे एक जांभळे फुल येत होते.
जांभळी फुले सुकुन, खवले स्पष्ट दिसायला लागले.
आणि अननसाने आता मस्त आकार घेतला.
हळुहळु तो मोठा होऊ लागला.
अननसा बरोबरच तुराही मोठा झाला, पण जुनी पाने आणि नविन तुरा, दोघांच्या रंगात खुपच फरक होता.
आणि हा मोठा झालेला अननस.
अनेकांनी म्हंटले आहे की एखादी वेल वाढताना बघणे हे आपल्या लहान मुलाला वाढताना बघण्याइतकेच आनंददायी असते. पण मी म्हणेन की असे एखाद्या अननसाला वाढताना बघणेही तसेच काहीसे मन भरुन आनंद देणारे असते.



खूप मस्त. सहीच. मजा आली सगळे फोटो बघायला. ईशान म्हणतोय "यम्मी पायनॅपल"
कार्ट्यांनी माठ फोडला काय ? त्यांच्या आईकडून दुसरा घे.
छानच !!
फारच भारी!
ही प्रगती अशी टप्प्याटप्प्याने बघणे काय मस्त वाटले असेल!!
आरती, अननसाचा तुरा मातीत खोचल्यापासून किती दिवस लागले फळ यायला? मी पण हा प्रयोग करुन पाहिन म्हणते.
मस्त!
आरती, मस्तच. फोटोंची क्लॅरिटी फार ग्रेट नाहीये पण सगळी प्रोसेस मस्त टिपली आहेस जी माझ्याकरता नवीनच होती.
आरती, एकदम मस्त. छान मजा आली फोटो बघायला.
छान
फारच छान वर्णिला आहेस अननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास!!!
) तो इथे देते आहे.....

अधुन मधुन आम्हालाही घरी बोलावुन तू अननसाची प्रगती बघण्याची जी संधी दिली होतीस त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. असेच एकदा अननस बघायला आले असताना तुझ्या नकळत अननसाचा एक फोटो काढला होता (त्याबद्दल माफी असावी
आरती..मस्त गं ..खूप मजा आली हळू हळू मोठा होणारा अननस पाहताना
छानच !!
असे झाड वाढताना त्यांचे निरिक्षण करणे फार मजेशीर असते.
त्यातला रोजच्या बदलातला वेगळेपणा दाखवल्या बद्दल धन्यवाद.
मस्त.
आहा! मस्त!
सुंदर! घरातल्या लहान बाळाच्या प्रगतीचे टप्पेवार फोटोज काढावेत त्या निगुतीने टिपले आहेस अननसाचे सौंदर्य!
अप्रतिम !!!
फोटो चा sequence एकदम मस्त घेतला आहे.
पण एक सांगावेसे वाटते.
माझ्या माहिती प्रमाणे फुलाशिवाय फळ येत नाही.
मी केरळ मध्ये अननस चा फार्म बघितला आहे!
खुप सही होता!!
आरती सहीच. मी पण आता अननसाचा शेंडा आणून लावेन. इतक सुंदर असतो शेंड्यावर येणारे अननस हे मला माहीतच नव्हत.
कित्ती क्युट..
सही आहेत फोटो
खरंच आरती, सगळी प्रोसेस मस्तच टिपली आहेस
सायोला अनूमोदन.
सुन्दर! सेल फोन वर देखील छान आले आहेत!
सिंड्रेला, नंद्या, बस्के, भग्यश्री, रमा, सायो, फचिन, अशुतोष,चंद्रकांता,वर्षु,सचिन, रैना, पोर्णीमा,अरुंधती,
jiraiya,जागू,नानबा,कविता,मंजिरी,manmayu आणि सतिश
सगळ्यांचे मनापासुन आभार.
सिंड्रेला,
कारटी थोडी मोठी असल्याने, दुसरा माठ एक तर माझ्या आई कडून किंवा स्वातीच्या सासुबाईंकडुन घ्यावा लागेल.
भाग्यश्री,
नक्की किती वेळ लागतो नाही सांगता येणार. मी मागच्या एप्रिल-मे मधे लावला होता. आणि या मर्च मधे फळ धरले. पण उन्हाळा हाच त्याचा सिझन असल्यने मार्च मधे आले की तोपर्यंत झाड पुरेसे मोठे झाल्याने आले हे नाही लक्षात आले.
सुंदरच
अरे वा, मस्तच प्रवास टिपला आहेस. शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना
वर्षभर एक एक करून फोटो काढत होतीस, एकत्र ठेवत होतीस याला खरच चिकाटी आणि या सगळ्या फुल-फळ येण्याच्या प्रक्रियेवरच खर प्रेमच लागतं. मलाही बागकामाची फार आवड आहे, विशेषतः दुसर्यांनी केलेल्या...
आता तुझ्याक्डे येणार्या पक्ष्यांवर असे काही जमवता आणि लिहिता येईल..
शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना >>>>
सुंदर प्रवास. छान वाटलं पाहून.
अननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास!!!>> मनपूर्वक धन्यवाद आरती मला अगदी डिस्कव्हरी चॅनेल बघितल्यासारखं वाटतंय....
शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना
>>
आरती, खरच खूप सह्ही वाटलं फोटो पाहून.
जीएस आणि कंपनी,
का अशी चेष्टा करता रे माझ्या झाडांची
चिन्नु, ड्रिम्गर्ल, दीप्स
धन्यवाद.
सही आरती... सगळेच फोटो पाहताना इतकं मस्त वाटलं....
घरच्या अननसाची चवही वेगळीच असते.. मधूर आणि स्वादीष्ट!!