ती कवा भाईर जात्ये
अन कवा घर्हात येत्ये
तिचा काई ठावठिकाना न्हाय
आयटीत नोकरी धरल्यापासून
घर्हात तिचे पाय न्हाय.
सट्व्या काम्पुटरच्या माग्ये
ती हात धुवून लागली हाय
नवरा गेला खडड्यात अन
लेकरा-बाळाकढंही लक्ष न्हाय.
आजपासनं म्या पन
तिचा नवरा न्हाय अन
ती पन माजी बायकू न्हाय
दारूच्या नादात म्या आता
समदं जिन बहालं केलं हाय!
- बी
बी काय हे दारूच्या फार आहारी गेलायस हं हल्ल्ली! सोड बघू
ही ही ... नाही गं मैत्रेयी.. मी नाही पितं. गमतीने लिहिली कविता..
बी
एका दारुड्यानं आयटीमधल्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो नवरा कसा उध्वस्त झाला. त्याचं सगळं आयुष्य बरबाद झालं. अरेरे अरेरे अरेरे.
heart पिळवटून टाकणारी दुख:द कविता. दिवे घे रे.