जागतीक पर्यावरण दिना निमित्त -उर्जा संवर्धन - काळाची गरज...

Submitted by suryakiran on 30 May, 2010 - 03:06

"गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी"

सह्याद्री - दुरदर्शन वरील एक जुनी जाहीरात, आठवतेयं का तुम्हाला कि विसरालात आजच्या M tv , F tv च्या भयान मिडिया जगात. काय होतं ह्या जाहिरातीमधे, का ती तेव्हाचं दाखवली गेली अन आज तीचा काय संदर्भ हा प्रश्न तुमच्या मनाला नक्कीच पडला असेल ना ?

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

tukaram.jpg

परम पुज्य जगत गुरू तुकाराम महाराजांनी रचलेल्या ह्या ओळी, याचे भान आजच्या पिढीला, समजाला राहीले आहे काय ? अहो राहिले असते तर आज हे असे झाले नसते. उन्हाळ्यात उन्हाच्या कहराने लोक मरतायेतं, पावसाळ्यातल्या पुरात तर सारं नशिबच हात धुवून वाहून जातोय. ऐन हिवाळ्यातही हिमालयातला बर्फ वितळतोय.हे का अन कशासाठी होतयं याचा विचार केलाय का कधी? नाही ना मग आता करा नाहीतर अजून काही वर्षानी मेंदूला संभाळणारा प्राणी मेंदूएवढाच शिल्लक राहील अन अखेरीस लुप्त होईल ही सारी जिवसृष्टी.

भारतातला अणूकरार सगळ्यांचा आठवत असेल कसा विसरणार .. कारण सरकारच्या बुडाखालची भुई गायब होणार होती ना तेव्हा.. एवढीच ओळख शिल्लक असेल त्या अणूकराराच्या तांडवाची. अरे पण तो अणूकरार कशासाठी, कोणासाठी, काय आहे त्यात, काय होईल त्यापासून याचा विचार का कोण करत नाही. मानेवरचं डोकं गुडघ्यात शाबूत ठेवून आपल ढिम्मासारखं बसायचं अन जे सगळ्यांच होईल तेच माझं होईल तेव्हा जगून घ्या ऐशोआरामात ह्या वृत्तीला पोसण्याचे काम सध्या सुरू आहे. तेव्हा कृपा करून आता तरी जागे व्हा अन उर्जा संवर्धनासारखे दुसरे गुप्तधन नाही हे ओळखून घ्या.

तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित पण एका वर्षाला देशात ५ हजार करोड रुपयांच नुकसान विद्युत उर्जा व्यवस्थापन त्रूटी दुरुस्त करण्यात अन तीची होणारी चोरी यातून होते. मग तुम्हीच सांगा जी आहे ती संभाळण्यासाठीच एवढा खर्च म्हणजे आहेच ना नाकापेक्षा मोती जड. मागच्यावर्षी एका संशोधनातून सांगण्यात आलं की जेवढी उर्जा सुर्याकडून मिळते त्या उर्जेचा योग्य उपयोग करून जर वीज उत्पादन केली तर आज जेवढी उर्जा विज आपण खर्च करतो त्यापेक्षा २० हजार पट उर्जा आपण या जगात निर्माण करू शकतो. पण ह्यावर कोणी गांभिर्याने विचार केला तर काही होईल ना ! अन भारतात अश्या अपारंपारीक उर्जेचा फक्त दिड टक्काच उपयोग केला जातो , जर तोच उपयोग ५० % एवढा जरी केला तरी भारताचं उज्वल देशाचं स्वप्न साकार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. अन भारतात अश्या प्रकारची उर्जा संवर्धन करण्यामधे तमिळनाडूचा दोन तृतिअंश सहभाग आहे कारण फक्त त्याच राज्यामधे अश्या उर्जास्त्रोतांचा उपयोग अन त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तेव्हा इतर राज्यांना काय धाड भरलीये या बद्दल जाणून घेण्यासाठी ?

610x.jpg

आतंराष्ट्रीय जगताची कच्च्या तेलावरची पकड, इधंनासाठी वापण्यात येणारे नैसर्गिक वायुंचे साठे अन त्यांची उपलब्धता, जागतीक बाजारातली कोळश्याची वाढलेली किंमत या सगळ्यावर गांभिर्याने विचार केला तर नक्कीच आपल्याल्या उर्जा संवर्धनाची गरज आहे हे कळून चुकेल. मान्य आहे कि कोळसा, इधंन वापरून निर्माण केलेली वीज, उर्जा ही सौरउर्जा, पवन उर्जेच्या तुलनेने स्वस्त आहे पण थोड्या नुकसानासाठी आपण दुरचा फायदा का विसरतो हे अजूनही मला समजत नाही कारण सौरउर्जा, पवन उर्जेतून मिळणारी उर्जा, वीज ही नक्कीच मोठ्याप्रमाणात अन जास्त काळ टिकवून ठेवता येणारी आहे हे लक्षात यायला हवं.अन त्यासाठी आपल्याकडच्या लोकांच अज्ञान दुर व्हायला हवं. आज अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सौरउर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेवून त्याला त्यासाठी योग्य मोबदला ही दिला जातो अन त्या जमिनीमधे तो मक्यासारखं पिक घेवून वार्षिक उत्पन सुमारे ३०००० डॉलर इतके घेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की तिथे ह्यासगळ्याचं एक योग्य ज्ञान तिथल्या शेतकर्‍यांना आहे, त्याचे महत्व त्या लोकांना कळालेलं आहे.

energy-main.jpg

चीन हा पारंपारीक उर्जास्तोतापासून उर्जा बनवणाला अव्वल देश ठरला आहे , सौर उर्जा , पवन उर्जा अन विशेष म्हणजे भुगर्भिय उर्जेचा उपयोग करून मोठ्याप्रमाणात वीज बनवली जात आहे. सोबतचं स्पेन सुद्धा यात अग्रेसर आहे. पारंपारिक सौर प्लेट ही सिलिकॉन पासून बनलेली असते, ही जरी महाग असली तरी तिच्यातून निर्माण होणारी उर्जा खरचं खूप लाभदायक आहे. अन तिच्या महागाईमूळे सौर प्लेटला पर्याय शोधण्याचे काम सुरूचं आहे.हि सौरप्लेट सुर्यकिरणांना थेट उर्जेमधे बदलून आपल्याला वीज मिळते.अन काही राष्ट्रामंधे तर या सौरकिरणांचा उपयोग करून पाण्याला उकळवलं जातं अन त्या पाण्याची गती वाढवून मोठे मोठे टर्बाईन्स फिरवले जातात अन उर्जा निर्माण केली जात आहे.अश्याप्रकारे उर्जा संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाळवंटांचा, माळरानांचा सहज उपयोग केला जाऊ शकतो अन ही वीज दुर पर्यंत घेवून जाऊ शकतो.

bio fuel.jpg

नुकतीच वर्तमानपत्रात आपण वाचलं के "रेवा कंपनी आता मंहिद्रा सारख्या बड्या वाहन क्षेत्र अग्रेसर कंपनीत विलिनीकरण" काय आहे रेवा कंपनी. रेवा कंपनीने बॅटरीवर चालणारे इंजिन ही कल्पना विकसीत केली अन ती वाहनक्षेत्रात खूप फायद्याची ठरली म्हणूनच आता वाहनक्षेत्रात बहुतांश कंपन्या ह्या अश्याच बॅटरीवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात जनरल मोटर्स, ह्युंडाई या कंपन्यांबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. या बॅटरीचलित वाहनांमधे प्रदूषण कमी, इंधनखर्च कमी, अन वाहनांच आयुष्य या सगळ्याच गोष्टिंचा फायदा होत आहे तेव्हा हा एक उत्तम पर्याय उर्जा संवर्धनाचा. आणि सगळ्यात अनोखा अन विश्वास न बसणारा एक प्रयोग नुकतचं त्याबद्दल ऐकण्यात येत आहे तो म्हणजे उरलेलं अन्न, खाद्यपदार्थ जे आपण कचर्‍यात टाकून देतो त्यापासून हायड्रोजन निर्माण होतं अन हायड्रोजन हे पेट्रोलपेक्षा तीन पट जास्त उर्जादायी आहे म्हणजे आहे ना पुन्हा लखलाभ. पण हि प्रकिया विकसीत होण्यास आणखी काही वेळ जाईल. आणि हो या पासून मिथेन वायू सुद्धा उत्सर्जित होतो जो एक ग्रिनहाऊस वायू आहे ज्याची क्षमता कार्बनडायॉक्साईड पेक्षा २५ पटीने धोकादायक आहे. तेव्हा ह्या उपक्रमाचा निश्चितच उर्जानिर्मिती अन ग्रिनहाऊस प्रदूषण रोखण्यात दुहेरी फायदा होईल.

एवढं सगळं घडतयं या जगात तरी आपण कुंभकर्णासारखे निपचीत पडून आहोत. तेव्हा आपल्याच हातानी आपणंच एक कानफाटात मारून स्वतःला जागं करण्याची गरज आहे. जर तुम्हाला खरचं या उर्जासंवर्धनाबद्दल कुतूहल वाटतयं तर याबद्दल योग्य मार्गदर्शन घ्या, जाणून घ्या अन तुम्ही सुद्धा हातभार लावा उर्जा वाचवण्यास अन अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून उर्जा बनवण्यास. कारण उर्जा ही खरोखर काळाची गरज आहे अन ती वेळेवर पुर्ण नाही झाली तर एवढंच म्हणावं लागेल काळ आला तेव्हा वेळही हाती शिल्लक राहीली नाही.

जगबुडीचं भाकित खरचं जर खोटं ठरवायचं असेल तर उर्जा संवर्धन, वैश्विक तापमान , अन प्रदूषण या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या.

go-green.jpg

"Energy conservation is the foundation of energy independence. - Tom Allen "

- सुर्यकिरण.

गुलमोहर: 

तुमची पर्यावरणसंबंधीत कळकळ समजतेय पण....
"तेव्हा आपल्याच हातानी आपणंच एक कानफाटात मारून स्वतःला जागं करण्याची गरज आहे."

तुम्ही आपल्याच हातानी दुसर्‍यांच्या कानफटात मारायच्या पवित्र्यात आहात असं वाटतय. Happy
Light 1

राक्षस असतो तर ते नक्कीच जमवलं असतं, देव ही नाहिये अन दानवही नाही. तेव्हा माणूस म्हणून एवढं तरी करता येईल. Wink :स्मित

धन्यवाद अभिप्रायाबद्दल.

कळकळीने लिहिलय.
अपारंपारीक उर्जास्त्रोतांचा शोध आता घ्यावाच लागेल. नाहीतरी तेल आता काहि वर्षात संपणार आहेच.

कानफटात द्यावीच लागेल लवकरच Happy आताच १६ तास भारनियमन आहे. इ.स. २०२० मध्ये २०-२० तास असेल! (२०-२० मॅचेस कंदील च्या उजेडात बघाव्या लागतील :))

www.arti-india.org ह्यांचे असे अनेक उपक्रम सुरु आहेत. त्यात सहभागी व्हा!

चंपक this is what we need, due to lack of appropriate knowledge we are still on starting point and dreaming for our destiny. सुंदर उपक्रम आहे हा खरचं ह्यात सहभागी व्हायला हवं. गावात नुकत्याच ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक होणार आहे तेव्हा एका तरी सरपंचाने ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या तरी त्याचे अनुकरण इतर करतील. अन गावपातळीवर काही प्रमाणात ह्याची सुरवात होणे शक्य आहे. प्रत्येक गावाला एखादं माळरान, कुरणं असतंच की नाही चरायला, एखादी टेकडी एखादी १२ माही वाहणारी नदी मग त्यावर असे काही प्रयोग करून पाहणं खरचं गरजेचं आहे निदान त्या गावापुरता तरी प्रश्न सुटेल. अन आदर्श गाव, आदर्श सरपंच अन आदर्श जनता असलेलं गावं म्हणून त्याचा आदर्श इतर गावेही घेतील. अन कदाचित सरकार सुद्धा ह्या उपक्रमाला मदत करेल अशी एक भाबडी आशा. Happy

चांगली व समयोचित माहिती दिली आहे! अर्थात ज्या अमेरिकेचे तुम्ही वर उदाहरण दिले आहे त्याच अमेरिकेत सामान्य नागरिक उर्जासंवर्धनाविषयी किंवा बचतीविषयी फारसा सजग नाही हेही अनुमान पुढे आले आहे.
पण त्याचा अर्थ हा नव्हे की आपणही त्याबद्दल निरुत्साह दाखवायचा. प्रत्येक माणूस या कामात आपापले योगदान देऊ शकतो.

अरुंधती ताई कदाचित हे अनुमान देशापुरतं असेल. पण जागतिक अनुमानानुसार तरी अमेरिका सारखी महासत्ता यावर आवर्जून लक्ष देते आहे. निदान इतर देशांनी सुद्धा ह्यावर भर दिली तर कोपनहेगन सारखी परीषद बोलवण्यापेक्षा.. एक जंगी पार्टी होऊन जाईल. यशस्वीरीत्या या उर्जास्त्रोतांचा उपयोग केला तर.

म्हणूनच म्हटले आहेत इतर देश अंतर्गत पातळीवर काय करत आहेत किंवा नाहीत ह्यापेक्षा आपण आपल्या देशाकडे लक्ष दिले पाहिजे व उपलब्ध नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा पुरेपूर यशस्वी वापर करण्यावर भर दिला पाहिजे. वर चंपक यांनी दिलेल्या आरती साईटसारखे जे उपक्रम आहेत त्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक सहभाग घेणे, आपल्या व इतरांच्या जाणीवा समृध्द करणे हे तरी आपण नक्कीच करू शकतो!

अभ्यासपुरक माहिती दिल्याबद्दल सुर्यकिरण धन्यवाद. ठाण्यामधील पर्यावरण संस्थाही या विषयावर मोलाचे कार्य करत आहे.

आजचं मला ह्या लेखाबद्दल दुसर्‍या क्रमांकाच पारीतोषिक मिळालं, त्याबद्दल मला इतका आनंद झाला नाही. पण माझ्या लेखाचा उल्लेख जेव्हा प्लॅंट हेडच्या भाषणात झाला तेव्हा जाम आनंद झाला.

कालच लोकमत वर्तमानपत्रामधे , bio diversity बद्दल वाचलं हा एक उर्जा संवर्धनासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी.

जैवविविधता म्हणजे जिवन...

- संयुक्त राष्ट्र महासभेचे १९७२ मधे मानव पर्यावरणावरील स्टॉकहोम समेलनाच्या शुभारंभाचे प्रतीक म्हणून उदघोषणा केलेला जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जूनला पाळण्यात येतो आणि प्रासंगिक पर्यावर्णाविषयक मुद्द्यांकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यात येते.

- संयुक्त राष्ट्राने जैवविविधतेला असणारे महत्वाचे धोके अन जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज याविषयी जागरुकता वाढविण्याकरता वर्ष २०१० ची आंतराष्ट्रिय जैवविविधता वर्ष म्हणून घोषणा केली आहे.

- भारत जैवविविधतेने नटलेल्या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त अश्या विपूल विविधतापुर्ण देशापैकी एक आहे. केवळ २.४ % पृथ्वीच्या भुक्षेत्रासह भारतात जगातील नोंदीत प्रजातीच्या ७-८% प्रजाती आहेत.

* तुम्ही सुद्धा जैवविविधतेच्या संवर्धन व टिकाऊ उपयोगाकरीता पुढील उपायांद्वारे योगदान देवू शकता *

१. नैसर्गिक प्रकाशाचा जास्तितजास्त उपयोग करा, उपकरणे वापरात नसताना बंद करा.
२. सार्वजनिक वाहनाचा उपयोग करा व कार संचित करा.
३. महत्वाची संसाधने जसे पाणी व उर्जेचा काटकसरीने वापर करा आणि आपली पर्यावरणातील ढवळाढवळ कमी करा.
४. पावसाच्या पाण्याचे हार्वेस्टिंग आणी संवर्धन करा आणि रोपटयांना पाणी देण्यासाठी किचन व बाथरूमच्या पाण्याची पुनःप्रक्रिया (recycling ) करा.
५. किमान कचरा निर्मिती अन कमी कार्बन उत्पादनासह संसाधने कमी करणे.अन पुनर्वापर करण्याचे धोरण स्वीकारा.
६. जाहीतात क्षेत्रात मोठ मोठाल्या बॅनर्स, पोस्टर्स वर होणारा विजेचा खर्च टाळा त्यासाठी आवर्जून सौरउर्जेचा वापर करा.
७. इंधनाला पर्याय म्हणून सौरउर्जेचा हा एकमेव उत्तम पर्याय ठरू शकेल.

आधिक माहीतीसाठी इथे अवश्य क्लिक करून पहा..
http://bsienvis.nic.in
http://zsienvis.nic.in
http://www.nbaindia.org

वरील सर्व माहीती दै. लोकमत , पुणे आवृत्ती ( दि. ५ जून ) मधे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

खुप चांगली माहिती आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही मांडत आहात... सर्वात अधिक प्राधान्य वापरात असलेल्या ऊर्जेची बचत करणे, ऊर्जेचा वापर कमी करणे म्हणजे एक नवा मोठा स्त्रोत सापडण्या एव्हढेच महत्वाचे आहे.

आज अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सौरउर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेवून त्याला त्यासाठी योग्य मोबदला ही दिला जातो अन त्या जमिनीमधे तो मक्यासारखं पिक घेवून वार्षिक उत्पन सुमारे ३०००० डॉलर इतके घेवू शकतो.
--- हो पण पृथ्वीवर जमीनीचे क्षेत्र मर्यादित आहे, दिवसंदिवस शेतीला लागणारी जमीन कमी होते आहे, आता ७ अब्ज लोकांना लागाणारे अन्न निर्माण करायला आपल्याला जमीन कमी पडत आहे. दिवसंदिवस अन्नाचा प्रश्न अजुन गंभीरच होत जाणार आहे. अशा परिस्थितीत जर शेतीचा वापर अन्न निर्माण न करता मक्या साठी वापरला तर ते परवडणारे नाही आहे.

दोन वर्षांपुर्वी अन्नाचा तुटवडा पडला होता, खुप आरोप-प्रत्यारोप झाले. २००७ पर्यंत bio-fuel चा आवाज होता... पण २००८ च्या अन्नाच्या गंभीर समस्येनंतर bio-fuel संशेधनासाठी नवा पैसे मिळणे तुलनेने कठिण झाले आहे.

http://www.maayboli.com/hitguj/messages/46/119498.html?1189872976

वरिल धाग्यात काही पोस्टी चांगल्या आहेत.

Uday123

Saturday, September 15, 2007 - 12:16 pm:

वारा, सूर्य यामुळे निर्माण होणारी ऊर्जा मागणीच्या तुलनेत नगण्य आहे.

निर्माण होणारी ऊर्जा खुप कमी आहे- मान्य, कारण आपण वाया घालवतो (रुपांतर करता येत नाही). पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, स्त्रोत हा सुर्यच आहे. कोळसा, तेल, नैसर्गीक वायु ई. पासुन आपण आज जी ऊर्जा वापरतो ती काही लाख वर्षांपुर्वी सुर्या पासुनच मिळवली आहे.

मी अणु ऊर्जेच्या विरोधी नाही, पण ऊर्जा स्त्रोत हा कमालीचा निर्धोक असायलाच हवा. चेर्नोबील (१९८६) सर्वांनाच ठाऊक आहे, आणी नुकताच स्वीडन मधे (जाने-०७) अपघात होता होता सुदैवानी टळला. जसे अणु प्रकल्प वाढतील तसे ”risk probaility” वाढत जाईल. येथे अपघत झाला तर हजारो-लाखो लोक जातील. वापरून झालेले ईंधन सुरक्षीत साठवणे ही एक कायमची डोकेदुखी आहे. थोरीउम चे प्रकल्प, आणी तन्त्रातील प्रगती ने आपण यावर मात करु शकु. त्यावर वेग़ळी चर्चा होइल...

आपल्या पृथ्विवर कोळसा, तेल, वायु, युरेनियम या सर्वांचा साठा मर्यादीत आहे. आपल्याला ऊर्जा-स्त्रोत असे हवेत की जे कायम स्वरुपी (replenish frequently) रहातील आणी तो आहे सुर्य. आता मुख्य अडचण ही ऊर्जा ”convert” कशी करयची ही आहे. काही प्रयोग यशस्वी होत/ झाले आहेत. सुरवात खुप महागडी आहे, पण जस-जसे वरील साठे
संपत जातील तस-तसे त्या पासुन मिळणार्‍या ऊर्जेचे भाव वाढत जातील. अन्तर्-राष्ट्रीय
बाजारात युरेनियम चे भाव मागील ५ वर्शात ६+ पटींनी वाढ्ले आहेत. मागणी जास्त, पुरवठा कमी, किम्मत वढणारच. आता हा ट्रेन्ड रहिल्यावर ही फ़ुकटातली (वाया जाणारी)ऊर्जा आपल्याला स्वस्त वाटु लागेल.

SEGS येथे concentric solar energy वपरून, ६.४ sq km मधुन ३६४ MW vij तयार केली जाते. http://en.wikipedia.org/wiki/SEGS

आपल्या देशाला ऊर्जा हवी आहे, आणी सर्व ऊपलब्द पर्यायांचा विचार करायला हवा. भारतात निसर्गाची कृपा अमाप आहे (दिवसा सुर्य तळपतच रहाणार), का म्हणुन प्रयत्न नको करायला?

इतर कुठल्याही विषयापेक्षा हा विषय आपल्या existence करता इतका महत्त्वाचा असूनही ह्यावर फारसे प्रतिसाद नाहीत Sad
हेच आपल्या उदासीन वृत्तीचं द्योतक आणि आपल्या आजच्या परिस्थितीचं कारण आहे का?
We want things to just 'happen' - आपण त्याकरता काही करण्याचा प्रयत्न नाही करत Sad

नानबा, ह्याबद्दल ग्रामसभेमधे एकदा प्रेझेंटेशन करण्यात आलं, सर्वसामान्य शेतकर्‍यांना हा उपक्रम आवडला पण ग्रामपंचायतीमधल्या लोकांनी पैश्याची उधळपट्टि होईल अन हाती काहीच लागणार नाही अशी चूकीची समज त्या लोकांमधे पेरायला सुरवात केलीये. पण मी हार माननार नाही. लवकरच माझ्याच शेतामधे हा प्रकल्प सुरू होणार आहे. एक सौर पवनचक्की बसवणार आहे आमच्या शेतात कि जेणेकरून त्यामुळे विहिर उपसा करण्यासाठी लागणारी वीज वाचेल.

ह्या उपक्रमांबरोबरच.. शेतीसाठी ज्या काही सरकारी योजना आहेत त्याचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना लाभ घेता यावा या दृष्टीने, योग्य त्या योजनेबद्दल माहीती, त्या योजनेसाठी आवश्यक असण्यार्‍या सगळ्या फॉर्म्यालिटीज कशा पुर्ण करायच्या. या सगळ्याची माहीती घरोघरी कशी पोहचवता येईल यावर एक प्रेझेंटेशन अन माझ्या काही मित्रांची टिम तयार करतो आहे. बघूयात कितपत जमेल ? Uhoh

कवे खरं तर ह्या लेखाबद्दल जेव्हा मी माहीती गोळा केली ना तेव्हा थोडा आश्चर्याचा धक्काच बसला. इतकं सोप्प सहज उपलब्ध असलेलं आपण उपयोगात आणत नाही याचं दु:ख वाटलं. असोत.. आता सुरवात केली आहे तेव्हा जोपर्यंत वाटा दिसतायेत तोपर्यंत सुखाचा प्रवास, अन त्यापुढे खडतर प्रवासाला सुद्धा समर्थ रहावं लागणार.

नानबाच्या प्रश्नांना उत्तरे : लवकरच या विषयावरचं एक प्रेझेंटेशन मेल करण्यात येईल. तुमचे मेल आयडी असतील तर संपर्कातून कळवा.

घरगुती पवन/सौरचक्कीचे किती पैसे पडतात? << आपल्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार पवनचक्कीचा खर्च सुमारे २ लाखापासून १२ लाखांपर्यंत येतो.

त्यातून किती वॅट वीज निर्मिती होते? 7.2 किलो एवढी वीज उत्पन्न होते. ( क्षमतेनुसार )
ही चक्की किती वर्ष चालते? त्याबद्दल त्या संबधीत कंपनीवर अवलंबून.
मेंटेनन्स काय लागतो? पवनचक्यांच्या देखभालीचा खर्च खूपच कमी असतो.

बसवण्यासाठी काही prerequisites आहेत का? (जसं की नगरपालिकेची परवानगी/काही एकर मोकळी जमिन (वारा येण्याच्या दृष्टीनं?) नगरपालिकेची,ग्रामपंचायतीची परवानगी लागते. अन त्यासाठी रितसर अर्ज करून काही सरकारी मदत मिळवण्याचे सुद्धा प्रयत्न करू शकता. अन परवानगी असल्यास मालमत्ता करामधे सवलतीसाठी विनंती अर्जही करू शकतो.

ज्या कंपनीची घ्यायची आहे त्या कंपनीशी संपर्क साधल्यास कंपनी जागेचा सर्व्हे करते आणि ठरवते कि तिथे शक्य आहे की नाही.

कंपनी :- Supernova Technologies Pvt. Ltd. ( http://www.supernovawindsolar.com/ ) सध्या हि कंपनी नावाजलेली आहे ह्या संदर्भात.

सर्वात छान गोष्ट म्हणजे, सध्या फार्म हाऊस प्रकल्प, हॉलिडे होम्स प्रकल्प किंवा बांधकाम क्षेत्रातले हिलसाईड प्रकल्पांनी अश्या पवनचक्क्या उभारून वीज निर्माण करण्याचा असा प्रयत्न चालू आहे. किमान ह्या उर्जेपासून २४ तास लिफ्ट, पाण्यासाठी चालवण्यात येणारी मोटार, क्लबहाऊस, गार्डन, अंतर्गत पथदिवे यासाठी लागणारी वीज निर्माण करता येईल. Happy

आपण पाणी गरम करण्यासाठी जी सोलर सिस्टिम वापरतो, तिच्या अतिरिक्त ऊर्जेचा पाणी गरम करण्याव्यतिरिक्त काही उपयोग करता येईल का? घरातील काही दिवे त्यावर लागले तर वगैरे?
आमच्याकडे २ पॅनेलची यंत्रणा आहे, उन्हाळ्यात तिची बरीच ऊर्जा वाया जात असेल असे वाटते. एकदा पाणी गरम झाले, की बाकीची ऊर्जा इतरत्र वापरता येऊ शकेल.

कोणाला याबाबत माहिती आहे का?

फारच चांगला लेख आणि माहिती.
सोलारएनर्जीचा वापर खरच उपयोगी ठरेल.

एक गोष्ट इथे लिहावीशी वाटते.
सोलारएनर्जी साठी सध्या जे Panel वापरले जाते ते सिलिकॉन पासून बनते.त्यामुळे हे महाग असते आणि सोलारएनर्जीचा सुरुवातीचा खर्च वाढतो.
आपल्याला असे सोलार Panelकमी किमतीत बनवता येईल अशी टेक्नोलोजी असेल तर एखूप चांगल होईल.
इथे वाचकांपैकी कुणी या विषयावर काम करत असेल तर अस काही करता येईल का याचा विचार कराल का?

सावली, सध्या बर्‍याच देशांमधे तो खर्च कमी करण्यामागे पर्यायी पॅनल्स बनवण्यावर संशोधन चालू आहे. त्यामधे चीन, जपान ह्या कंपन्या पुढे आहे. आणखी १ दोन वर्षांमधे गरज लक्षात घेवून हा अमुलाग्र बदल घडून येईल अशी आशा. तरीही अश्या एनर्जीवर काम करण्यासाठी भारत सरकारने स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत त्याबद्दलच्या लिंक्स लवकरच इथे पोस्ट करेल. अथवा ह्या आधीच्या पोस्टमधे बघितल्यास त्या लिंक्स मिळतील.