Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भारतातिल विज टंचाई

Hitguj » Views and Comments » Current Affairs » भारतातिल विज टंचाई « Previous Next »

Chaffa
Saturday, November 18, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात असणारी विज टंचाई. आमच्यासारख्यांचे प्राण कंठाशी आणते. वापरात कपात हा काही विकल्प नाही.
जमतिल का आपल्याला काही पर्याय विज निर्मिती करण्याचे.?????


Chyayla
Saturday, November 18, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकले आहे १ / ४ वीज तर विविध ट्रान्समिशन लॉस, व चोरीमधेच वाया जाते ईथली वीज वाचली तर कदाचीत काही वर्ष नवीन विज निर्मिती करण्याची गरजच नाही.

Chaffa
Monday, November 20, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
हे प्रकार बरेच कमी झालेत पण उपयोग नाही. काही ठिकाणी विजनीर्मिती फ़ारच छोट्या प्रमाणावर होतेय पण त्यामुळे खर्चाचे गणित जुळत नाही.


Bhagya
Monday, November 20, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, सोलर एनर्जी बद्दल काय वाटते? भाराभार nuclear enery plants सेट अप करण्यापेक्षा हा एक नक्कीच चांगला उपाय आहे. कमीतकमी भारतासारख्या देशात जिथे सूर्यप्रकाश भरपूर आहे, तिथे हा एक पर्याय होऊ शकतो. सगळ्या नाही, तरी अन्न शिजवणे, पाणी गरम करणे आणी बर्‍याच गोष्टी सोलर एनर्जी वापरून करता येतील.
पैसे वाचतील आणि प्रदूषण टळेल ते वेगळेच.
ही एक लिंक पहा:

http://edugreen.teri.res.in/explore/renew/solar.htm

Himscool
Monday, November 20, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोलर एनर्जी बरोबरच विंड एनर्जी हाही एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. पण ह्यात महत्त्वाचा मुद्दा पैशांचा उभा रहातो... महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तसेच नगर शहराच्या जवळ विंड मिल्स वापरून वीज निर्मिती सुरु आहे

चाफा तू म्हणत आहेस की वापरात कपात हा पर्याय नाही पण योग्य वापर हा नक्कीच पर्याय आहे. माझ्या कॉलेज मध्ये केवळ पाण्याच्या मोटर्स योग्य प्रकारे वापरुन आम्ही बर्‍यापैकी वीज वाचवू शकलो होतो...


Chaffa
Tuesday, November 21, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, हिमांशु,
सोलर एनर्जी, विंडएनर्जी हे पर्याय योग्य आहेत त्याच्यावर काम ही चालु आहे पण प्रचंड खर्चीक प्रकरण असल्याने सर्वसामान्यांवर आर्थीक बोजा पडतो. आणी विंड एनर्जी साठी मुबलक हवेचा वेग सगळीकडेच आहे असे नाही पण यावरही नविन प्रयोग़ चालले आहेत.
महत्वाचा मुद्दा हा की सर्वसामान्यांना परवडेल असे छोटे छोटे प्रकल्प उभारणे. हा विचार ईथे मांडण्याचे कारणच आहे की बरेच जाणकार ईथे आहेत.
भाग्या तु दिलेली लिंक पाहीली फ़ारच छान संकल्पना आहेत तिथे सोलर एनर्जी वापरण्याच्या. मनापासुन धन्यावाद.!!!!!!!!!!


Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं भाग्यश्री, भारतात मोठ्या शहरा ठिकाणी बैठी घरे नसल्यामुळे सुर्यचूल कुठे उभारावी हाही एक प्रश्न आहेच गं. छोट्या छोट्या शहरांमधे बैठी घरी जरी असली तरी बहुतेक घरांना गच्ची नसते. मी सुर्यचूल ही कल्पना फ़क्त ऐकली वाचली आहे पण कुठे कधी चौकशी केलेली नाही. ती कुठे विकत मिळते हे आता शोधून बघते. google वर बघते शोधून.

माहितीवर्धक लिंक दिल्याबद्दल धन्यवाद गं भाग्यश्री.

चाफ़्फ़ा म्हणतो तेही बरोबर आहे. वापरात कपात. पुर्वी TV वरती एक जाहीरात येत असे ती खूप प्रभावी होती. एक बाई बाहेरून घरात येते. तिला सर्व पंखे फ़िरताना दिसतात पण तिथे कुणीच नसतं. मग ती आतमधे शिरते तिथे तिला इस्त्री जळताना दिसते ज्याकडे कुणाच लक्ष नसतं. तिची लेक कुणाशीतरी फ़ोनवर बोलत असते. TV चालू असतो पण दिवानखान्यात कुणीही नसतं. हे असे प्रकार रोजच्या जीवनात आपल्याकडेही होतात. घराघरात अनावश्यक वीज जळत असते. माझ्या घरी, माझ्या आईला देवघरात विजेचा दिवा ठेवणे आवडत नाही. मग आम्ही तो दिवा काढून टाकला. जोवर निरांजन पुरेल तोवर ठिक. मग दिवा विझला तरी त्याचे कुणाला काही वाटत नाही.


Himscool
Tuesday, November 21, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, तू म्हणतोस की सोलर व विंड ऍनर्जी हे प्रचंड खरचिक काम आहे पन Nuclear Energy हेही तितकेच किंबहुना त्याहून खर्चिक काम आहे आणि Nuclear Energy Generation मध्ये नंतर Radio Active Subsatace मिळवणे सुद्धा अत्यंत खर्चिक आहे..

घरगुती वापरासंदर्भात बोलायचे झाले तर पुण्यत कमी खर्चात Solar Energy वापरुन पाणी तापवणे ह्यवर एकांनी patent घेतले आहे.. आणि त्यात conventional panel system पेक्षा कमी खर्चात काम होते...
तसेच पाणि वरच्या टाकीत चढवण्यासठी, व्यायाम आणि पाणी उपसणे ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करणारी एक सायकल सुद्धा विकसित केलेली आहे


Kahikhas
Thursday, November 23, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Himscool आपण पुण्यातील ज्या व्यक्तिचा संदर्भ दिला आहे, त्यांचा पत्ता देऊ शकाल का? धन्यवाद.

Prasadp77
Thursday, November 23, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This is a burning topic in India but how many politicians are really interested in taking up this matter.
If you look back and stick to only Maharashtra, ShivSena was strongly against Enron for 'various' reasons and as soon as they came into power, Enron got a green signal so what ShivSena was thinking or what ShivSena got in return? Anyways, that is another topic of debate but worth noting next time you decide to vote for Narayan Rane or ShivSena, its same crop afterall.

One of my close relative used to work in a power plant at Nashik (now he is retired) he once told us the politics that was in play in early 90s to close down many hydro-power projects which we didn't believe (I wasn't old enough to understand though but my father tells me) but it turned out to be truth. try to find out how many hydro-electric power stations are working to full throttle, hardly any. The reason, water shortage. Even though I agree with it partly. I beg to differ. I will take it later if warranted.

Now lets turn to Solar energy. Even my parents stay in multi-storeyed building like anybody else and do not enjoy facility of terrace but we get a lot of sunlight in most of the rooms. We have sliding windows attached on those sides so I thought I could replace sliding windows with solar panels and generate electricity enough for at least lighting the house. When approached to the vendors, most were not interested. The couple of vendors who showed a bit of interest quoted a whooping price that we came to the conclusion that its not worth, rather we could have 2 inverters installed.
On more discussions and research, I realised that the best solar panels i.e. crystalline silicon solar panels are exported to Europe and US whereas we keep and import amorphous silicon panels for our local use. These amorphous silicon panels are not as energy efficient as the crystalline one so the energy output is significantly low. The price of the panel depends on the crystallinity of the material used. On the top of that it looks like there is a lot of zol with the taxations in Maharashtra so the price shoots up pretty much and goes out of budget for a middle-class. These taxations seems to be quite affordable in Karnataka and AP.

So as on today, I have given up this option of using solar energy on large scale but you can think on small scale. Visit few websites below if you are interested.
http://www.tatabpsolar.com/
http://www.teri.res.in/core/griha/index.htm (looks promising with enough administrative stuff to bury and to never get noticed)
http://www.solarbuzz.com/CompanyListings/India3.htm#Maharashtra (Few solar panel installers)

@Himacool,
I would really like to know more about the individual and patent that you talked about. Please offer some more details.

Someone also mentioned about Solar cooker or something like that. My suggestion is don't go for it unless you have terrace. One of my relative who used to stay in Nagpur, they used it. It takes about an hour to cook rice in the mid-Nagpur summer afternoon. Rest of the India should comapre accordingly, with respect to the time and space it takes. It is considerably heavy so you may want to have a terrace where you could leave it all the time.

Thanks to the BB opener, it is indeed a very good BB and I hope everyone shares his/her thoughts and experiences with alternative sources of household energy.


Himscool
Thursday, November 23, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kahikhas आणि Prasadp77 मी लवकरच त्यांचे details तुम्हाला कळवतो...

आत्ता हैद्राबाद मध्ये मी ज्या complex मध्ये रहातो आहे तिथे सगळ्या बंगल्यांवर TATABP चे Solar Water Heaters बसवलेले आहेत... त्यामुळे बहुतेक कोणत्याही घरात गिझर नावाची वस्तू अस्तित्त्वात नसावी... अर्थात ही बंगले असल्यामुळे ते शक्य आहे... आणि बहुतेक ते Builder नीच पुरवलेले असावेत...
तसेच पुण्यात माझ्या काकाकडे Solar Cooker वापरला जात असे... त्यात वरण भात व्हायला १ तास लागत असे...


Chaffa
Sunday, November 26, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे पोस्ट वाचुन बरं वाटलं.
मध्यंतरी मायक्रो एनर्जी ह्या विषयावर कुठेतरी वाचल्याच आठवतं कुणी काही कल्पना देउ शकेल का.????


Uday123
Wednesday, September 12, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील बातमी हा एक आशेचा किरण वाटावा, सुरवातीची गुंतवणुक २५ लाख थोडी जास्त आहे, पण नंतर कमी खर्चीक आहे.

http://esakal.com/esakal/09122007/jalgaon41ACA249CC.htm

तसेच मला एक माहिती पुर्ण लिंक मिळाली.

http://en.wikipedia.org/wiki/Wind_power

आपली ऊर्जेची भुक प्रचंड आहे, आणी पर्याय शोधणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रात, peak time deficit is more than 4000 MW, मागणी-पुरवठा मधे २०-२५% तफ़ावत आहे. अणु, कोळसा ई. पासुन तयार झालेली विज वातावरण कमालीचे प्रदुशीत करते, त्यामानाने हवे पासुन तयार झालेली विज स्वछ्छ असेल.


Uday123
Wednesday, September 12, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोट्या मित्रांसाठी तसेच आपल्यात जर कोणी उद्योगी किर्लोस्कर असतील तर त्यांना देखील ऊपयोगी पडु शकेल. येथे बरीच पायाभुत महिती आहे.

http://www.windpower.org/en/kids/index.htm?d=1

Shendenaxatra
Thursday, September 13, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अणु, कोळसा ई. पासुन तयार झालेली विज वातावरण कमालीचे प्रदुशीत करते, त्यामानाने हवे पासुन तयार झालेली विज स्वछ्छ असेल. "


अणू ऊर्जा निर्मिती आणि कोळशापासून ऊर्जा निर्मिती एकाच मापाने तोलणे साफ साफ साफ चूक आहे. कोळसा जाळल्यामुळे अमाप घाण वातावरणात सोडली जाते. ह्यातली खूपशी घाण चक्क रेडियोआक्टिव्ह असते.
अणू उर्जा बनताना घाणेरडे, विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही ऊर्जा अत्यंत निर्धोक झाली आहे. त्यातील बायप्रोडक्ट अत्यंत थोड्या प्रमाणात किरणोत्सारी रहातील हे करणारे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. तेव्हा प्रदूषण कमी करायचे असेल तर आण्विक ऊर्जेला पर्याय नाही. वारा, सूर्य यामुळे निर्माण होणारी ऊर्जा मागणीच्या तुलनेत नगण्य आहे. मोठमोठ्या मोटारी, गाड्या चालवायला ही ऊर्जा पुरणार नाही. पण आण्विक ऊर्जा इतकी बदनाम झाली आहे की तिचे नाव घेणेही अपवित्र मानले जाते. पण तोच एक व्यावहारिक पर्याय आहे.



Rajankul
Friday, September 14, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमुनिस्ट आहेत तवर भारतात विज येनार न्हायी त्यामुळ काही काळजी करु नका.

Zakki
Friday, September 14, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोळसा जाळल्याने जरी अमाप घाण तयार होत असेल तरी, त्याची राख सिमेंटसाठी वापरतात. नि त्यातून निघणारे वायू SCR, FGD अश्या प्रॉसेसने कमी करतात. ते करायला लागणारा खर्च परवडतो, कारण कोळसा अतिशय स्वस्त व त्यापासून जास्तीत जास्त उष्णता मिळते. सध्या अशी विद्युत् निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. इथल्या माझ्यासारख्या, नि भारतातल्या बर्‍याच इंजिनियरांना त्यामुळे भरपूर कामे व पैसा मिळतो आहे.

Uday123
Saturday, September 15, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमुनिस्ट आहेत तवर भारतात विज येनार न्हायी त्यामुळ काही काळजी करु नका.

-काय योगा योग आहे पहा, पाकीस्तान्-चिन यांनी देखील अणु कराराला विरोधच केला आहे, आणी आपल्याकडे करात्-येचुरी कंपुनी. कित्ती कित्ती सारखे ध्येय असु शकतात.

या करात यांच्या घराची विज भर ऊन्हाळ्यात तोडुन टाका (१४-१६ तास).


Uday123
Saturday, September 15, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारा, सूर्य यामुळे निर्माण होणारी ऊर्जा मागणीच्या तुलनेत नगण्य आहे.

निर्माण होणारी ऊर्जा खुप कमी आहे- मान्य, कारण आपण वाया घालवतो (रुपांतर करता येत नाही). पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, स्त्रोत हा सुर्यच आहे. कोळसा, तेल, नैसर्गीक वायु ई. पासुन आपण आज जी ऊर्जा वापरतो ती काही लाख वर्षांपुर्वी सुर्या पासुनच मिळवली आहे.

मी अणु ऊर्जेच्या विरोधी नाही, पण ऊर्जा स्त्रोत हा कमालीचा निर्धोक असायलाच हवा. चेर्नोबील (१९८६) सर्वांनाच ठाऊक आहे, आणी नुकताच स्वीडन मधे (जाने-०७) अपघात होता होता सुदैवानी टळला. जसे अणु प्रकल्प वाढतील तसे
”risk probaility” वाढत जाईल. येथे अपघत झाला तर हजारो-लाखो लोक जातील. वापरून झालेले ईंधन सुरक्षीत साठवणे ही एक कायमची डोकेदुखी आहे. थोरीउम चे प्रकल्प, आणी तन्त्रातील प्रगती ने आपण यावर मात करु शकु. त्यावर वेग़ळी चर्चा होइल...

आपल्या पृथ्विवर कोळसा, तेल, वायु, युरेनियम या सर्वांचा साठा मर्यादीत आहे. आपल्याला ऊर्जा-स्त्रोत असे हवेत की जे कायम स्वरुपी
(replenish frequently) रहातील आणी तो आहे सुर्य. आता मुख्य अडचण ही ऊर्जा ”convert” कशी करयची ही आहे. काही प्रयोग यशस्वी होत/ झाले आहेत. सुरवात खुप महागडी आहे, पण जस-जसे वरील साठे
संपत जातील तस-तसे त्या पासुन मिळणार्‍या ऊर्जेचे भाव वाढत जातील. अन्तर्-राष्ट्रीय
बाजारात युरेनियम चे भाव मागील ५ वर्शात ६+ पटींनी वाढ्ले आहेत. मागणी जास्त, पुरवठा कमी, किम्मत वढणारच. आता हा ट्रेन्ड रहिल्यावर ही फ़ुकटातली (वाया जाणारी)ऊर्जा आपल्याला स्वस्त वाटु लागेल.


SEGS येथे concentric solar energy वपरून, ६.४ sq km मधुन ३६४ MW vij तयार केली जाते.
http://en.wikipedia.org/wiki/SEGS

आपल्या देशाला ऊर्जा हवी आहे, आणी सर्व ऊपलब्द पर्यायांचा विचार करायला हवा. भारतात निसर्गाची कृपा अमाप आहे (दिवसा सुर्य तळपतच रहाणार), का म्हणुन प्रयत नको करायला?
}

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators