युरोप

Submit to kanokani.com

जाइजुई, तुम्ही युत्रेख्तला आहात का.. मस्तच.. मी मागच्या वर्षी वर्षभर युत्रेख्तजवळच्या एका छोट्या खेड्यात होतो.. थंडी संपली की नाही अजुन? हुग फेलंला (हॉलंडचे राष्ट्रीय उद्यान) जाउन या उन्हाळ्यात. छान आहे ते..

स्वित्झर्लंडचे दरवाजे उघडले मार्च २९ पासून, आता युरोपात इकडे तिकडे फिरायला बरं पडेल.
इकडे वसंतात फिरायला युरोपात तसं बरंच आहे, पण कुणाला थोडंसं मार्गदर्शन करता येईल का? अगदी आवर्जून पहाण्यासारख्या जागा वगैरे..

कोणत्या जागा याविषयी की कसं जायचं या विषयी ?
नुसत्या जागा म्हटलं तर खाली दिलेल्या साईट्स वर जा.. तेथे तुला "पटेल पॉईंट्स" ची स्टँडर्ड लिस्ट मिळेल

http://startours.co.uk/tourlist.aspx?intrg=EERG
http://tajtours.co.uk/index.php?option=com_content&view=article&id=45&ca...

याशिवाय तेथे न लिहीलेली बरीच ठिकाणे आहेत, ते हळू हळू देऊच स्मित

नमस्कार मंडळी,
मी अ‍ॅमस्टरडॅमला आहे..कुनी आहे का आसपास?

adz,

अ‍ॅमस्टरडॅममधे सुस्वागत.... मी सध्या अ‍ॅमस्टरडॅमलाच आहे... तुम्ही नक्की कुठे राहता?

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

नमस्कार, आम्ही ७ दिवसाकरीता Italy ला जानार अहोते...any one has any tips??? We plan to hit Rome, Florence, milan and Venice

हाय. कानोकानी पण बघा.

नमस्कार मंडळी,

मी आजच 'मायबोली ' ची मेंबर झाली आहे.
सौ. प्राची भावे

drukghoshana.jpg

नमस्कार !!

आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.

यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.

त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.

या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.

यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

http://www.bbc.co.uk/news/world-europe-11493157

लाट् विआ मधे शिकलेल्या पुरषांची कमतरता भासत आहे

नमस्कार युरोपातल्या मा.बो. करांनो, मी Stockholm, Sweden येथे वास्तव्यास आहे, कुणि जवळपास असेल तर क्रुपया संपर्क करा. ओळखी वाढवु.

कुणी हंगेरी किंवा जवळपास आहे का? मी सध्या बुडापेस्टपासून ६०किमी अंतरावर आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत बहुतेक तरी इथेच असेन.

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

नमस्कार - मी पुढ्च्या अठवड्यात कामा नीमीत्त एक आठवडा पोलंड (katowice) ला येणार आहे - कोणी माय्बोलीकर आहेत का तिथे????? अस्ल्यास क्रुपया सांगा

नमस्कार मायबोलीकरांनो!