हितगुज दिवाळी अंक २००९ - दृक्-श्राव्य विभागासंबंधी सूचना

Submitted by संपादक on 19 August, 2009 - 02:23

नमस्कार !

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात दृक्-श्राव्य कार्यक्रमसुद्धा अंतर्भूत आहेत.
या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. मायबोलीकरांनी आतापर्यंत तुमच्या कलेचे अंतिम रूपच पाहिले आहे किंवा त्याबद्दल फक्त ऐकले आहे. या निमित्ताने तुमच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण / कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया बघण्याचा आनंद सर्व मायबोलीकरांना लुटता येईल. ते करत असतानाच सादर करत असलेल्या गोष्टीबद्दलचे तुमचे विचारसुद्धा ऐकायला मिळाले तर सोन्याहून पिवळे !

या विभागात आपण विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करू शकता. शिवाय, गाणी, कविता यांसारखे श्राव्य कार्यक्रमही सादर करू शकता.

* दृक्-श्राव्य सादरीकरण १० मिनिटांपेक्षा जास्त नसावे. श्राव्य कार्यक्रमांना अशी कालमर्यादा नाही.

* चित्रफितीचा आकार 2GBपेक्षा जास्त नसावा.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं याआधी इतरत्र प्रकाशित झालेले नसावेत. तसंच, सादरीकरणात अथवा चित्रीकरणात मायबोलीकरांचा सहभाग असावा.

* चित्रीकरण, संकलन, ध्वनिमुद्रण इ. सादरकर्त्यानेच करायचे आहे. चित्रफिती व ध्वनिमुद्रणं संपादकांकडे पाठवताना प्रकाशनास योग्य असावीत. संपादक या चित्रफितींत दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ व मायबोलीचा लोगो घालणे, असे किरकोळ संस्कार करतील.

* चित्रफितींत अथवा ध्वनिमुद्रणांमध्ये वापरलेलं संगीत हे प्रताधिकारमुक्त असावं, अथवा ते वापरण्यास अधिकृत परवानगी घेतलेली असावी. चित्रफितींत तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.

* आपली फीत .avi, .mpeg, .wmv, .wma, .camrec, .mpg, .wav यांपैकी एका formatमध्ये असावी.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं आपण www.qshare.com या संकेतस्थळावर upload करू शकता.

* या फिती तिथे upload केल्यावर आपल्याला download व delete असे दोन दुवे दिसतील. हे दोन्ही दुवे संपादकांना sampadak@maayboli.com या पत्त्यावर कळवावेत (विचारपुशीतून कळवू नयेत). संपादक त्या संकेतस्थळावरून चित्रफीत download करून नंतर delete करतील.

* चित्रफीत www.qshare.comवर upload करताना आपण फितीचा आकार कमी करण्यासाठी winzip अथवा winrar या सॉफ्टवेअरांचा उपयोग करू शकता. तसंच कमी आकाराच्या formatचा वापरही करू शकता. चित्रीकरण केल्यानंतर Camtasia Studio, Adobe Premier यांसारख्या सॉफ्टवेअरांचा वापर करून आपण अगोदर संकलन करू शकता व नंतर फितींमध्ये आवाज घालू शकता. यामुळे चित्रफिती अधिक देखण्या होतील. ही सॉफ्टवेअरं आंतरजालावर उपलब्ध आहेत.

* ध्वनिमुद्रणांवर संस्कार करण्यासाठी आपण आंतरजालावर उपलब्ध असलेले Audacity हे सॉफ्टवेअर वापरू शकता.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं संपादक मंडळाकडे पाठवण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर, २००९ ही आहे.

* या चित्रफिती आपण www.youtube.comवर upload करणार आहोत, याची नोंद घ्यावी. याविषयीची अधिक माहिती http://www.google.com/support/youtube/bin/topic.py?hl=en&topic=16560 इथे मिळू शकेल.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं यांचा दिवाळी अंकात समावेश करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

गेल्या वर्षी दिवाळी अंकात सादर झालेले कार्यक्रम आपल्याला http://www.youtube.com/user/maayboli08 या दुव्यावर पाहता येतील.

आपल्याला काही अडचण आल्यास कृपया संपादक मंडळाशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users