पुण्यातले पुणेकर

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:43
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईसक्रिमच्या नावाखाली 'डेझोर्ट्स" म्हणुन वनस्पती तुपाचे/चरबीचे लगदेच्या लगदे खातोच की आपण>> त्यावर स्पष्ट छापलेलं असतं फ्रोजन डेजर्ट आहे का आईस्क्रीम आहे ते. एकदा असा फरक अस्तित्वात असतो हे कळल्यावर वाचून मग काय खायचं तो आपला निर्णय अस्तो, नाही का? कंपनीवर कशाला खापर फोडायचं?
सुदु पुपु. Happy

त्यावर स्पष्ट छापलेलं असतं फ्रोजन डेजर्ट आहे का आईस्क्रीम आहे ते. }}
एक शंका सध्याच्या बाजारात वनस्पती तूप ना वापरणाऱ्या आईस क्रीम कंपन्या आहेत का? असल्यास कुठल्या?

आम्ही नुसती हवा खाल्ली तरी आमचे वजन वाढते. तुपाची खाल्ली तर काय होईल?. Happy

सिंहगडावर जायच मनात येत आणि राहात. सिंहगडाची हवा खायला तरी जायला हव. बघू काय परिणाम होतो ते.
यावर्षात १६ वेळेस सिंहगडावर जाईन अस चिरंजीवांना जानेवारीत वचन दिल आहे. अजून खात उघडायचय. आता ओळीने सोळा शनिवार करायला लागणार. :). नाहीतर काही खर नाही. (पण यात माझ्याबरोबर एक सहगुन्हेगार असल्याने दोन्ही कडून ऐकाव लागणार नाही. Happy )

>>>> कंपनीवर कशाला खापर फोडायचं? <<<< मी कुठे फोडलय खापर का बिपर...... Proud
मी फक्त आधीच क्लिअर केले की असले खातोच की..... तर मग फ्लेवर टाकून डालडा खाऊन काय बिघडणारे असे? Wink हो ना! उगाच कुणी ऑब्जेक्शन घ्यायला नको..... की डालडा का खातोस म्हणुन.. ! हल्ली काये, माबोवर काहीहीऽऽ घडू शकते Proud

कान्द्या, टीव्हीवर कानीकपाळी अमुलची जाहिरात असते की.... विदाऊट तुप म्हणुन.... अमुल ट्राय कर, नाहीतर काहि आऊटलेट्स असतात ते बघ, आमच्या इथे कावरेचे आऊटलेट आहे. इतरही एक दोन आहेत, नावे माहित नाहीत.

अमा, किती मस्त पोस्ट लिहिली आहात! Happy

बरं, एक गंमत, पुन्हा एकदा नव्याने 'शिकवायच्या' पेशात मज्जा येतेय मला! विजिटिंग फॅकल्टी म्हणून एका इंजि. कॉलेजात काम सुरू केलंय. सध्या एकाच सेमिस्टरसाठी आहे, पण होप फॉर गुड! Happy

असले खातोच की>> खाऊ नकोस तब्बेतीला बरं नसतं.
मी सहसा अमूल, मदर डेअरी असं आईस्क्रीम खाते. नाहीतर आमच्याइथले काही माहितीचे स्थानिक ब्रॅण्ड्स!

पण टिपिकल उ. भारतीय आलू टिक्की चाटची मजा डालड्यात केली तरच असते Proud

असतं फ्रोजन डेजर्ट आहे का आईस्क्रीम आहे ते. एकदा असा फरक अस्तित्वात असतो हे कळल्यावर वाचून मग काय खायचं तो आपला निर्णय अस्तो, नाही का? कंपनीवर कशाला खापर फोडायचं?

>> वरदा, हे पटले नाही. ते दुकान आइसक्रीमच्या दुकानासारखेच दिसते. ते मिळणारे पदार्थ वरकरणी आइसक्रीम सारखेच दिसतात आणि लागतातही. अशा वेळेस सर्वसामान्य लोक फाइन प्रिन्ट बघून निर्णय घेतील अशी अपेक्षा अनरिझनेबल आहे. आइसक्रीम पेक्षा त्यांचे पदार्थ वेगळे आहेत हे जितक्या स्पष्टपणे लोकांसमोर यायला हवे तितके येत नाही.

आइसक्रीम पेक्षा त्यांचे पदार्थ वेगळे आहेत हे जितक्या स्पष्टपणे लोकांसमोर यायला हवे तितके येत नाही.>> हे मान्यच.
माझं म्हणणं फक्त लिंब्याच्या विधानाला उद्देशून होतं की माहित पडल्यावर (आणि वर्तमानपत्रे आणि वॉट्सॅप वर यावर व्यवस्थित कवरेज मिळालं आहे या मुद्द्याला) आपण पण काळजी घेऊन खाय्चं नाही. या विषयाला अधिक प्रसिद्धी हवी पण आता वॉट्सॅप वापरत नाही असा सुशिक्षित माणूस शहरात, शहराबाहेर (म्हणजे ज्याची नियमित आईस्क्रीम खाण्याएवढी क्रयशक्ती आहे) कमीच.

सुप्रभात पुपुकर्स!! Happy कसे आहात?

मी हल्ली सहसा खत्रीचे खातो. पण बाकी पण बघून घ्यायला हवे. वरदा म्हणते ते बरोबर आहे.