प्रिय पप्पा,
स. न. वि. वि. पत्र लिहण्यास कारण की, खुप दिवसापासुन काही गोष्टी मी सर्वांना सांगत आलोय, पण कोणीच ऐकत नाहीत. म्हणुन विचार केला, त्या बद्दल थोड स्पष्टीकरण देऊ. पप्पा मी आशा करतोय की आपण वडीलकीच्या नात्यापेक्षा थोडावेळ ’मित्र’ म्हणुन हे पत्र (पुर्ण) वाचाल !
दिवस कसे झर झर सरतात ना ? मी कधी एवढा विचारच केला नव्हता. पण त्या दिवशी जेव्हा पहील्या पगाराचे पेढे भरवताना तुमच्या डोळ्यात पाहीले तेव्हा जाणवले. पर्वा पर्यंत शाळा कॉलेज करणारा तुमचा मुलगा आज कमवता झाला याचा अभिमान चमकत होता डोळ्यात तुमच्या. आईचे डोळे तर पदर सोडत नव्हते. माझ्यासाठी मुली पहायला केव्हा कशी सुरवात झाली हे तसं आठवतही नाही, वर्ष झाले असेल बहुदा. पण किती सहजपणे काढुन घेतल्या होत्या तुम्ही माझ्या कडुन माझ्या अपेक्षा. ’आरे मंदी चालू आहे ना, स्थंळं लवकर मिळत नाहीत." तुमचे हे वाक्य आठवले की आजही माझे मलाच हसायला येतं. पण खरंच मंदीचा परिणाम ’स्थळं’ पाहण्यावर सुध्दा होऊ शकतो हे गेल्या ३-४ महीन्यात कळले.....
पप्पा, आता पुन्हा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरु करताहात, पण खरं सांगायचं तर मी त्या मन:स्तिथीतच नाहीय. इच्छा होत नाही पुन्हा ’ना’ ऐकण्याची. आणि त्या पेक्षा जास्त म्हणजे तुमचं झालेलं खच्चीकरण पाहण्याची. तुमचा मुलगा हुशार आहे, कमवता आहे, स्वभाव चांगला आहे हे तुम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही मला गेले २६ वर्षे वाढवलंत. पण तुमचा मुलगा एवढाही चांगला दिसत नाहीय की त्याला बाजारात उभं केल्यावर कोणी शिकलेली मुलगी द्यायला मगे लागतील. कारण मुलगी शिकली आहे म्हंटल्यावर जोडा (मुलगा) दिसायला नी परिस्थितीने चांगला असावा ही अपेक्षा असणं सहजीकच आहे. मी तर हा असा, आणि त्यात आपल्या समाजात कितीसे शिकतात मुली ? गेली वर्षभर आपण मुली पाहत आलोय त्या अनुभवाबद्दल माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. आता पुन्हा तेच सत्र सुरु करायचं म्हंटल्यावर मन तयार होत नाहीय. कोणी मुलगी देणारच असतील तर ती तुमची प्रतिष्ठा पाहुनच द्यायला येतील त्यात वाद नाही. वाटतं मी एक नुसता बाहुला बबुन राहीलोय, कधी कधी लाज वाटते मुलगी पहायला गेल्यावर की आपण शोभुनतरी दिसतो का या मुलीला ? ना इलाजास्तव ’हो’ म्हणायचे आणि ’ना’ ऐकुन घ्यायची. एखाद्या मुलीने ऐकले नसतील एवढे ’ना’ प्रतिष्ठा, शिक्षण, नाव असुन तुम्ही नि तुमच्या मुलाने ऐकले आहेत.
पाहिलेल्या पंधरा (मी मोजलेत सारे) मुलींपैकी फक्त दोघांकडुनच होकर आला. त्यात माझ्यासाठी ’त्या’ स्थळाचं पारडं नेहमीच जड आहे. आणि तो विषय काढल्यावर तुम्ही त्रागा करण्याशिवाय दुसरं काही विचार करत नाही. वयात अंतर कमी आहे हे एवढंच तुम्हला दिसतं. ’तुझं तु बघ’, ’आम्ही मेलो तुझ्यासाठी’, ’पळुन जा’, ’हे कर ते कर’ हिच वाक्ये ऐकायला मिळतात. मग आपली प्रतिष्ठा, संस्कार सारं धाब्यावर ठेऊन तुम्ही आज म्हंटल्यासारखं पळुन जाउन लग्न करता आलं असतं (करायचेच होते तर कॉलेज च्या दिवसातच केले असते तसे). पण आपल्याच प्रतिष्टेची राख रांगोळी कसं करायची हे अजुन तुम्ही आम्हाला शिकवलं नाही.
तुम्ही त्रागा करुन घ्यायला मी काही कॉलेज मधल्या किंवा दुस-या जातीच्या मुली ’मागे लागलेलो नाही’. तुम्हीच दाखवलेल्या, पसंत केलेल्या मुलीचा ’विचार करतोय’. वयात अंतर कमी आहे या एकच गोष्टीमुळे ’नकार देणे’ मला पटले नाही. मान्य आहे कि पती-पत्नी मध्ये ठराविक वयाचे अंतर असावे. पण कधी कधी काही गोष्टी अपवाद म्हणुन घेउ शकतो आपण ! एकतर आपल्या जाती मध्ये मुलेच कमी शिकतात तेव्हा मुलींकडुन उच्च शिक्षणाची अपेक्षा करणे खुपच अवघड ठरते. आणी मला तर शिकलेली मुलगी हवीय. एवढ्या मुली पाहिल्यात पण खुपवेळा शिक्षणामुळेच अडलंय हे तुम्हालाही माहीत आहे. पप्पा असंही आजकाल लोकांना आपल्या मुलींसाठी कमी जबाबदा-या असणारेच सासर हवे असते. आणि मी तर थोरला आहे. घरात आणखीन दोघेजण शिकणारे. मग जबाबदारी न सांगुनही दिसते त्याचं काय ? मग मुलींकडचे ’मुलगा डोळ्य़ांत भरत नाही’, ’मुलगा लहान वाटतो’, ’तब्येतीने खुपच नाजुक आहे’ म्हणत माझेच दिसणे मला दाखवुन देतात. या सगळ्या उठाठेवीत ’त्या’ एका स्थळानेच आपल्याला पसंती दर्शवली आहे. फक्त वयाचा मुद्दा करुन नाकारु नका. तेव्हा तुम्ही सबुरीनं विचार करुन जुळवुन घ्यावं एवढंच! फक्त मी एवढंच म्हणुशकतो की जमलं तर माझी मन:स्तिथी समजुन घेउन ’त्या’ स्थळाचा पुन्हा विचार करावा. बाकी माझ्या पेक्षा उन्हाळे पाउसाळे तुम्ही जास्त पाहीलेत आणि मी तुमच्या शब्दाबाहेर नाही हे तुम्ही ओळखुनच आहात. विचार करणार नसाल तरी काही हरकत नाही. पण मग माझ्या लग्नाचा विचार सध्याला बाजुला ठेवा. जेव्हा माझी पुन्हा ’ना’ ऐकण्याची तयारी होईल, डोकं जेव्हा ठिकाणावर येईल तेव्हा विचार करुत.
खरंतर या गोष्टी समोरा समोर बोलता आल्या असत्या मला. पण मी बोलायला लागलो की तुम्ही ऐकण्याच्या किंवा विचार करण्याच्या मन:स्तिथीत नसता. तुम्हाला एवढंच दिसत असतं की आज पर्यंत शब्दात असलेला मुलगा आज माझ्या शब्दाबाहेर जाउन विचारतरी कसा करायला लागला ? पप्पा, जेव्हा रातकिडा किरकिरतो ना, तेव्हा त्रास होतो. पण तो त्रास त्याच्या किरकिरण्याचा होत नाही, तर तो नक्की कुठे बसुन किरकिरतो हेच कळत नाही याचा होतो. किती शोधले तरी सापडत नाही म्हणुन चिडचिड होते. घरात तुम्हा सर्वांचं तसच होत आहे. कधी कधी विचार करतो, खरंच मी जास्त शिकलोय हीच माझी चुक आहे, की मी नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहुन त्यांच्या माघे धावतो हे चुकतंय ? अजुन उत्तर नाही मिळलं. कदाचीत मी ’थोरला’ म्हणुन जन्मलो हेच चुकलं. जन्मलो ते जन्मलो पण स्वभावाला थोडा तरी उद्धट पणा सोबत आणता आला नाही हे चुकलं. की कदाचीत जबाबदारीची जाण आहे हे चुकलं ? असो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात अर्थ नाही. कारण मला तुम्ही चुकत आहात असंही म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, मी माझ्या जागी. तुम्ही अनुभवलेली परिस्तिथी वेगळी; आम्हाला डोळे उघडल्यावर पंखा, टी. व्ही. दिसलेले. असो, मला वाटतं विषयांतर खुप होतंय. मी इथेच थांबतो.
तुमचा मुलगा,
मधु.
विशाल..... अॅडमीनच्या
विशाल..... अॅडमीनच्या रिजेक्शन मुळे टाकायचा विचारच मी टाकुन दिलेला..
बाकी इडीटींग ला तुमचा हातपायभार आहेच की... 
मग अस्सच ब्लोग वर टाकल्यावर लले नी सांगितलं म्हणुन टाकला इथे..
मल्ल्या, मस्त रे... मी पण
मल्ल्या,
मस्त रे... मी पण तुझे नव वाचून लगेच वाचायला घेतला...
>>तुमचा हातपायभार

छान..
छान..
अॅडमीनच्या रिजेक्शन मुळे >>>
अॅडमीनच्या रिजेक्शन मुळे >>>
ते का बुवा?
ते का बुवा? वो एक
ते का बुवा?
वो एक लंSSSSSSSSSSSSSSSSबी कहाणी है लले...
वो एक लंSSSSSSSSSSSSSSSSबी
वो एक लंSSSSSSSSSSSSSSSSबी कहाणी है लले...
>>
ती दुसर्या पत्रातुन सांग...
ती दुसर्या पत्रातुन सांग >>
ती दुसर्या पत्रातुन सांग >> योडे
, पण ते पोस्ट करतानाही अॅडमिन आडवे आले तर..
, अजून एक कहाणी
छानच विचार मांडले
छानच विचार मांडले आहेस...त्यानिमित्ताने मुलं कसा विचार करतात ते ही कळलं.
>>ते का बुवा? >ती दुसर्या
>>ते का बुवा?
>ती दुसर्या पत्रातुन सांग...
आता सांगूनच टाक रे मल्ली... लंबी जुदाई सही नाही जाती
खूप छान.. मधू चं मनोगत वाचून
खूप छान.. मधू चं मनोगत वाचून मुलांनाही या परिस्थिती तून जावे लागते ही गोष्ट कळली....(आणी ...बरं वाटलं
) जोक्स अपार्ट.. खरच चांगल लिहिलयस!!
क्लिष्ट विषय्..समर्पक हाताळणी
क्लिष्ट विषय्..समर्पक हाताळणी !
कुणी मुलगा यापेक्षा अजुन चांगल कम्युनिकेट करु शकेल अस वाटत नाही..पण मला वाटल होत जमाना बदल गया है...आता लग्न मुख्य्त्वे समजुतीच्या आधारावर ठरतात/होतात.. असो. खुप छान लिहीलय !!! ब्राव्हो !!!
लेख सुंदरच. खुप आवडला.
लेख सुंदरच. खुप आवडला.
फार छान लिहिलं आहे. गिरिश,
फार छान लिहिलं आहे. गिरिश, जमाना नाही हो बदलला - ना मुलासाठी, ना मुलीसाठी
मस्त लेख आहे. एकदम आवडला.
मस्त लेख आहे. एकदम आवडला.
अतीशय सुंदर लेख.ह्या
अतीशय सुंदर लेख.ह्या परिस्थितीला मुलींना जास्त सहन करावं लागतं हे खरंय..पण मुलांच्या बाबतीतही असं होतं हे पटलं..आणि तो काळ एकदम वाईट जेव्हा आपण स्थळं पहायला सुरूवात करतो आणि कुठे सर्वानुरूप साजेसं स्थळ मिळेपर्यंत शोधकार्य चालुच असते. कुठे काही जमतंय असं वाटतं आणि काही बिनसलं की पुन्हा सगळ्याचा श्रीगणेशा..त्यात सर्व "हितचिंतकांच्या" प्रश्नावल्या असतातच मानगुटीवर बसलेल्या. असो. खुप छान मांडलंय सगळं. अभीनंदन!
पुनःश्य सर्वांना
पुनःश्य सर्वांना धन्यवाद.
स्वप्ना_राज, अनुमोदन तुम्हाला. या बाबतीत तरी जमाना अजुन तरी बदललाय असं वाटत नाही. आणि आजही अश्या घटना मुलांच्या बाबतीत घाडलेत किंवा घडु शकते असं विचारही सहसा कोणी करत नाहीत. या बाबतीत सहानभुतीचे पारडे बायकांकडे झुकते.
या पुर्वीही अश्या घटना घडल्या अस्तील, पण ते समोर आल्या/आणल्या नस्तील कदाचीत. 
सुंदर लिहीले आहे. आवडले.
सुंदर लिहीले आहे. आवडले.
जेव्हा रातकिडा किरकिरतो ना,
जेव्हा रातकिडा किरकिरतो ना, तेव्हा त्रास होतो. पण तो त्रास त्याच्या किरकिरण्याचा होत नाही, तर तो नक्की कुठे बसुन किरकिरतो हेच कळत नाही याचा होतो >> अगदी अगदी .....
आता मला भिती वाटतीये ...
मला सुध्धा यातुन जावे लागणार की काय ... एकुलता एक आहे ... आई बाबा जाम डोके खाणार ..

आणि मी करीअरच्या नादात चक्क विचारही नाही केला अजुन तर ..
नीळुभाउ... हा अनुभवही गाठी
नीळुभाउ...


हा अनुभवही गाठी ठेवा(च) एकादा(च) !!!
ऑल द बेस्ट तुम्हाला..
'अनुरुप' नि 'छान' याचं
'अनुरुप' नि 'छान' याचं डेफिनेशन अजुनही फुल-न-फायनल झालेलं नाही या बाबतीत तरी.... तरी सर्रास्स या शब्दाचा वापर वधु-वर शोधतान केला जातो>>>>>>>>>>>
मस्त............ एकदम पटेश.............
छानच लिहिलंयत.............. आवडलं......
सुंदर लिहिलय.
सुंदर लिहिलय.
वैभु, साकी, धन्यवाद... (आज
वैभु, साकी, धन्यवाद...
)
(आज पाउलखुणा चालु झाल्यामुळे तुमचे प्रतिसाद आज वाचले...
Pages