अनेक वर्षांपुर्वी तेंव्हाच्या सायन्स टुडे नामक मासिकात मॉर्फोजेनेटीक फिल्ड्स वरील एक लेख वाचला होता. तो प्रकार म्हणजे वस्तुस्थिती की थोतांड अशी काहीशी विचारणा त्यात केली होती. जेंव्हा केंव्हा कुणीही सायकल चालवायला शिकते तेंव्हा एकप्रकारचे क्षेत्र (field) तयार होते. त्यानंतर जो कुणी सायकल चालवायला शिकेल त्याला त्या आसमंतातील क्षेत्राची मदत होते (त्या 'सिद्धांता'नुसार). त्याचमुळे आजकालच्या मुलांना सायकल शिकणे जास्त सोपे पडते असा दावा होता.
लमार्कीय उत्क्रांतीच्या सिद्धांतात आणि मॉर्फोगेनेटीक फिल्ड्समध्ये थोडे साधर्म्य आहे, पण लमार्कीय उत्क्रांतीची बैठक किंचीत जास्त मजबुत आहे. उदाहरणादाखल हा दुवा पहा: http://www.technologyreview.com/biomedicine/22061/ . तुम्ही ज्या वातावरणात वाढता, त्यासंबंधीच्या स्मृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येतात. पण म्हणजे, तुम्ही किंवा तुमच्या आईवडीलांनी इतरांना सायकल चालवतांना पहायले असेल, किंवा ते स्वतः शिकले असतील तर तुम्हाला फायदा होऊ शकेल.
वरवर पहाता, हे मीम्स (memes) सारखे झाले - जीन्सचे (genes) वैचारीक समांतर - विचार/कल्पना/मते जी एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिपर्यंत उड्या मारतात. पण कल्पनांच्या बाबत तुम्ही त्या आपल्याशा करता. त्या कितीही अमूर्त असु शकतात. तुम्ही त्यांना आत्मसात करता आणि पसरवता.
इतक्यातच TED वर व्ही. रामचंद्रन यांचे लघुव्याख्यान ऐकले: Neurons that shaped civilization. इथे ते प्रतिबींब मज्जातंतुंबद्दल बोलतात. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया जेंव्हा केल्या जातात तेंव्हा मज्जतंतु उद्दिपीत होतात. प्रतिबींब मज्जतंतु मात्र जेंव्हा तुम्ही दुसर्यांना काही करतांना पहाता तेंव्हा पण उद्दिपीत होऊ शकतात (आठवा, प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाचा चेंडु हवेत असतांना भारतीय क्षेत्ररक्षकाचे हात जसे चेंडुकडे सरकतात तसेच - मनातल्या मनात - तुमचे पण हात सरकतात). अशा प्रकारे उद्दिपीत झालेल्या मज्जातंतुंमुळे देखील स्मृती बनतात (याचमुळे तुम्ही इतरांच्या आनंदात तसेच दु:खात सहभागी होऊ शकता). माझा असा कयास आहे की या प्रतिबिंब मज्जातंतुमुळे आधी जे सायकल चालवायला शिकले त्यांच्यापेक्षा आत्त्ताची मुले जास्त लवकर शिकु शकतात (त्यांच्या प्रतिबींब मज्जातंतुंनी जास्त सायकलस्वार पाहिले असल्यानी).
अर्थात त्यामुळे मला अनेक वर्षांपुर्वी आलेल्या एका अनुभवाचे रहस्य उकलायला मात्र पुरेशी मदत झाली असे वाटत नाही. माझ्या स्वप्नात मराठी डिटेक्टीव्ह नंदु नार्वेकर एका पार्टीला जातो आणि खुप खातो आणि त्याला तसे करतांना पाहुन ते सर्व माझ्या पोटात जात असल्यासारखे मला वाटते. दुसर्या दिवशी माझे पोट बिघडलेले होते.



मस्त लेख आशिष! आवड्या!
या लेखावरुन मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय , 'ऑरा' बद्दल तुमचं काय मत आहे?
ह्म्म.. छान आहेत यातल्या कल्पना... मलाही कधीकधी हे खरे आहे असे वाटते.
हा मस्तच सिद्धांत आहे की.. डोक्याला खुराक.. मॉर्फोजेनेटिक सिद्धांतात मला वाटलेला कच्चा दुवा म्हणजे त्या फिल्डच्या संदर्भात सगळेच गुळमुळीत आहे. त्यातुलनेत स्मृतींचे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमण हे अआहे.शास्त्रोक्त आहे.
आशिष, मीम्स (मी आजवर मेमेज असा उच्चार करायचो) बद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत लिहाल का? मला डॉकिन्सच्या पुस्तकांतून किंवा नेटवरुन सुद्धा फार काही झेपले नाहिये.
इन्टरेस्टिंग! तू दिलेले दुवेही वाचेन सावकाश.
मीम्सबद्दल खरंच लिही ना सविस्तर. मलाही नेटवरून नीटसं कळलं नाही ते प्रकरण.
आशिष, Thought provoking म्हणायला पाहिजे, कारण मी ही काल रात्री ११ वाजता मीम्स, मॉर्फोजेनिक फिल्ड्स वगैरे सर्च करत बसलो होतो
वेगळाच विषय - आणखीन वाचायला आवडेल!
>>दुसर्या दिवशी माझे पोट बिघडलेले होते.
बाप रे! ~D
इन्टरेस्टिन्ग आहे..
आशिष,
खूपच सही आहे हा लेख. प्लीज अजून लिहा.
रेकीचा हाच बेस का?
लोकहो, धन्यवाद.
केवळ मी एक-दोन शब्द वापरले म्हणजे मला त्यातले खूप (किंवा सगळे) माहित आहे असा (गैर)समज कृपया करु नये
लालू, बहुदा पोट आधीच खराब असल्याने तसे स्वप्न पडले असावे.
आर्या, मोर्फोजेनेटीक फिल्ड्स प्रमाणेच ऑरा (आणि रेकी देखिल) बर्यापैकी बिनबुडाचे आहेत. लमार्कीय उत्त्क्रांतीत देखिल कुणी केवळ जवळ असल्याने, किंवा हाताच्या माध्यमाने काही माहिती दुसर्यांना देता येते असे म्हंटल्या जात नाही.
मीम्स या जास्त कुतुहलजनक आहेत कारण त्यांच्या उत्क्रांती करता तुम्हाला काही तरी करावे लागते जे मेंदुशी (अर्थात विचारांशी आणि मनाशी सुद्धा) संबंधीत आहे. एक उदाहरण घेऊ या. आपल्याकडे लग्नकार्यात पंगती असत (अजुनही अनेक ठिकाणी असतात). कधितरी जमिनीवरील पंगतींची जागा टेबल-खुर्च्यांवरील पंगतींनी घेतली. जेवण झाल्यावर ते ५-६ नळ असलेल्या ठिकाणी जाऊन हात धुवायचे. अशातच कुणाला तरी एक मीम चावली (की झाली, की बोकांडी बसली?). त्यानंतर अचानक अनेक ठिकाणी लग्नच्या पंगतीत टेबलवरच फिंगर बाउल्स दिसु लागले. ही मीम उपयोगी असल्याने पसरली. पण त्याकरता काही लोकांना तिचा प्रसार करावा लागला.
क्रिकेट मधिल रिवर्स स्वीप देखील तसाच. कुठेतरी एखादी गोष्ट क्लिक होते आणि पसरते.
पुण्यातील (आणि इतरत्र देखील - कधिकाळी अकोला या करता प्रसिद्ध होते) पॉश, वाईट, कॅट या सारख्या शब्दांचा प्रसार देखील असाच होता. They have a life of their own. विज्ञानात अनेकदा एखादा शोध एकाच वेळी दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी लागल्याची उदाहरणे आहेत. काही सूप्त मीम्सचा त्यात हात असुही शकेल.
मीम्सचा पद्धतशीरपणे अभ्यास कसा करायचा याबद्दल मात्र एकमत नाही.
याउलट प्रतिबींब मज्जातंतुं हा प्रकार मात्र पुर्णपणे शास्त्रीय आहे, त्यांचा अभ्यास वैज्ञानीक कसोट्यांद्वारे पुढे नेता येतो. त्यांच्या अभ्यासामुळे ऑटीझम सारख्या गोष्टींबद्दल सुद्धा जास्त माहिती मिळेल असे दिसते आहे. पुढील दुव्यावरील १५ मिनीटांची क्लिप जरुर पहा: http://www.pbs.org/wgbh/nova/sciencenow/3204/01.html
मला पण Being John Malkovich या दृष्टिकोनातुन पुन्हा पहावा लागणार आहे.
या सर्व गोष्टी उदा रेकी ऑरा ई सुडोसायन्स मधे येतात
अरेच्या, इतक्या दिवसात हा लेख कसा वाचला नाही?
मिरर न्यूरॉन्स एकदम खास प्रकार आहे, विषेशतः अगदी लहान बाळांमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट होताना त्यांचे काम कसे चालते ते पाहणे इंटरेस्टींग ठरेल.
सरपटणार्या प्राण्याबद्द्लची एकंदरीत सस्तन प्राण्यांना वाटणारी भिती/घृणा हे देखील मीम्स आहे का? मुळात कलेक्टीव्ह सबकाँशसचा जीन्सवर परिणाम होतो का? असल्यास त्याचे मेकॅनिझम काय असेल?
आशिष धन्स. टेड वरच ऐकायला हवं.
छान