चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला आणि निधपच्या पोस्टस मस्त.
शर्मिला, तुम्ही मंथनबद्दल आणि उत्सव बद्दल जे लिहिलं आहेत तसंच आणखीन खूप वाचायला आवडेल तेव्हा नक्की लिहा.

खूपच छान धागा आहे.

मागच्या वर्षी बिपीन नाडकर्णी चा 'एवढंस आभाळ' चित्रपट पहिला.
खुपच छान होता.
दिग्दर्शकाने छान बारकावे टिपलेत.
'बन्टी' हा अगदी भाऊूक, हळवा, निरागस असतो..त्याला गार्डेनिंग, झाडे, फुले, रोपे ह्या गोष्टीन मधे खूप रस असतो.
पण पुढे सगळ्या गोष्टी बदलतात, आयुष्यात बरेच काही घडते...
आणि शेवटी असा दाखवलाय की त्याचा आता फक्ता फुटबॉल मधे रस असतो....
फुटबॉल स्टेडियम बाहेर गेलेला बॉल परत आणत असताना तो पायी सगळे वेल, नाजूक झाडे, फुले सरळ तुडवत निघून जातो.... आता त्याच्यातली ती निरागसता, भावुकत आणि ह्ळवे पणा कुठल्या कुठे गेली आहे
खूप छान बारकावा टिपलाय... दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते जाणकार प्रेक्षकांना समजून येते.

ओंकारा मधे बरंच डोकं वापरून मराठीपण कमी दिसेल याचा प्रयत्न केला गेलाय. निदान कलरटोन मधे तरी.<<
हे कलरटोनचं जरा स्पष्ट कर ना नीधप. म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र किंवा इतर प्रदेशांमधे असणारा फरक पडद्यावर या 'कलरटोन'मधून कळतो म्हणजे नक्की काय होतं?<<

सोपं प्रकरण आहे. उत्तरेतल्या मातीचा रंग पिवळट आहे जास्त. त्यामुळे एक पिवळा टोन सगळ्या वातावरणात दिसतो. मातीने लिंपलेल्या घरांवरही दिसतो. तसेच माणसांच्या रंगांमधे पिवळट गोरेपण किंवा उजळपण जास्त आहे. अगदी उन्हात रापलेल्या स्किनमधे सुद्धा रापल्याचा तांबुसपणा आणि मुळचा पिवळटपणा जाणवतो. हिरवाई खूप मुबलक असतेच असं नाही. असली तरी सातारा-वाई पट्ट्यातल्यासारखी ज्याला लश ग्रीन म्हणू तशी दिसत नाही. नद्यांमधेही ग्रे-यलो टोन असतो (प्रतिबिंब आणि मिसळलेली माती)
त्याउलट आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात काळी माती आणि हिरवाई दिसते. घरं काळ्या दगडाची असतात किंवा मातीची असली तर शेण आणि मातीचा मिळून जो काळपट रंग तयार होतो तो ग्रे स्केलवर बर्‍यापैकी डार्ककडे असतो. चेहर्‍यांच्या रंगातही लाल, जांभळे, काळे टोन्स आढळतात. उत्तर प्रदेशमधला गोरा पिवळट रंग तितक्या मुबलक प्रमाणात आढळत नाही. पण काळ्या, चॉकलेटी रंगाला तकाकी मस्त असते. इथली गढूळलेली नदी चहाच्या रंगासारखी तांबडटही दिसू शकते.

ओंकारामधे उत्तर प्रदेशातले हे रंग राखण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला गेला होता.
हे केवळ रंगाबद्दल. माणसांची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, कपडे वापरण्याच्या पद्धती, घरांची आणि गावांची रचना या सगळ्या पातळीवर अजून खूप फरक विशद करता येतील.

शेकड्यातल्या ९९% वेळा समिक्षकांना आवाडलेली कलाक्रुती विशेषत: चित्रपट हे लोकांना आवडत नाही

समिक्षा कशी करावी ह्याचा अभ्यास करुन मग समिक्षा लिहिणारे किती जण आहेत?

अमके उत्कृष्ट नि तमके नाही हे शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे ना? माबोवरच ५०% जणांना ३ इडियट्स भरभरुन आवडला आणि उरलेल्यांना तो अ आणि अ च्याही पुढे गेलेला वाटला.

निरजा धन्यवाद..

मी तिकडेही लिहिलेय की 'नदिया के पार' पाहताना चटकन लक्षात येतं की हे इथले नाहीये.. तो पिवळा रंग नजरेत भरतो लगेच... अगदी अंगातले कपडेही जरा पिवळसर वाटतात... Happy

समिक्षकांना आवाडलेली कलाक्रुती >> आपण आपल्या आवडीशी मिळता जुळता समिक्षक निवडावा लागतो - म्हणजे त्याची आणि आपली आवड बरीच मिळती जुळती हवी.

मी कमलाकर नाडकर्णी (मटा वाले) यांची समिक्षा वाचून ठरवायचो की शीणुमा बघायचा का नाही ते आणि इसाक मुजावरच्या समिक्षेच्या बरोबर उलटे करायचो. ते म्हणले चित्रपट रद्दड आहे की मला हमखास आवडायचा.

मी कमलाकर नाडकर्णी (मटा वाले) यांची समिक्षा वाचून ठरवायचो की शीणुमा बघायचा का नाही ते आणि इसाक मुजावरच्या समिक्षेच्या बरोबर उलटे करायचो. ते म्हणले चित्रपट रद्दड आहे की मला हमखास आवडायचा.

Happy Happy माझ्या घरी सकाळ यायचा तेव्हा त्यात ज्याला शिव्या दिलेल्या असतील तो पिक्चर मला आवडणार याची खात्री असायची मला....

माधव, साधना , अनुमोदन.माधुरीचा सैलाब - म.टा.मधील परिक्षण वाचून पाहिला. पण एकदम बकवास्.थ्री ईडियट मधील राजू एकदम गरीब दाखवला आहे.मग त्याची फी कोण भरते? आमीरखान दोन्ही मित्रांच्या घरी जाऊन येतो पण त्याच्या घराबद्दल दोघेही मित्र कधीच चौकशी करत नाहीत्.एकदम चांगले मित्र आणि १० वर्षे एकमेकांची साधी चौकशी पण करत नाहीत.

'नमस्ते लंडन' मधे कटरीनाचं त्या गोर्‍याशी चर्च मधे लग्न होतांना दाखवलय. फक्त पहिलंच लग्न चर्चमधे करता येतं (माझ्या माहीतीनुसार). त्या चार्लीचं ते चौथं लग्न आहे असं दाखवलय.

शर्मिला मस्त धागा सुरु केलायस .
स्टाईकरची सौंदर्य-कला समिक्षा कोणी करेल का ?. दिग्दर्शकाने बारीक सारीक गोष्टी सुध्दा खुप काळजीपुर्वक टिपल्यात . सिनेमा कुठेही अवास्तव वाटत नाही .

मला लोकसत्तामध्ये लिहिणार्‍या श्रीकांत बोजेवार ( हेच 'तंबी दुराई' ह्या टोपणनावाने दोन-फुल, एक हाफ लिहितात ना ? ) ह्यांचं परीक्षण आवडायचं.

फक्त पहिलंच लग्न चर्चमधे करता येतं (माझ्या माहीतीनुसार). त्या चार्लीचं ते चौथं लग्न आहे असं दाखवलय.>> हे नक्की का?? कारण फ्रेंड्स मधे रॉस २ वेळा तरी चर्च मधे लग्न करताना दाखवलाय.

मस्त चर्चा चालु आहे.

थॅन्क्स नीधप. खूप छान सोप्या भाषेत समजावलस. मला वाटतं सिनेमॅटोग्राफरचं कौशल्य पणाला लागत असेल अशा तर्‍हेने जेव्हां प्रदेशांचे कलरटोन्स मॅनेज करायला लागतात तेव्हां.

सिनेमांची वर्तमानपत्रीय परिक्षणं हा खरंच विचित्र प्रकार असतो. नुसती स्टोरी सांगतात बहुतेकवेळा. खरं तर त्यातही किती परिक्षण जेन्युईन आणि किती पी आर मॅनेज्ड हे कळणच कठीण जातं.
पूर्वी मला विजय पाडळकरांचे लेख आवडायचे. छान लिहायचे. आता जरा तोच तोच पणा यायला लागलाय त्यांच्या लेखांमधे. पण तरी त्यांचं तलावातलं चांदणं म्हणून एक पुस्तक आहे त्यात खूप सुंदर रसग्रहणात्मक लेख आहेत बर्‍याच सिनेमांचे. राणी दूर्वेचं शब्दाविण संवादू पुस्तकही छान आहे यासंदर्भात.
सत्यजित रेंचे सिनेमे समजून घ्यायला सर्वात सुंदर पुस्तक आहे ग्रंथालीचं 'अभिजात' म्हणून. मुळ चिदानंद दासगुप्तांनी लिहिलय. सुधीर नांदगावकरांनी अनुवाद केला आहे. बारीक सारीक दृष्यांमधे एखादा दिग्दर्शक किती मेहनत घेतो ते वाचताना थक्क व्हायला होतं.

रेखा देशपांडेंचं नाही वाचलं हे. ते माहितीपटावरचं आहे तेच कां हे?

जुने मराठी सिनेमे ह्या बाबतीत प्रमाणीक वाटतात . विशेषषतः भालजींचे सगळे मराठी चित्रपट. खरच जुन्या शिवाजींमहाराजांच्या काळात गेल्या सारखे वाटते हे ऐतिहासीक सिनेमे बघताना (अर्चना दीक्षित) >>> अगदी खरं आहे. मलाही नेहमी प्रादेशिक चित्रपट वातावरण किंवा लोकेशन्स, मेकअप, वेषभुषा याबाबतीत जास्त खरेपणा दाखवतात असं वाटतं. कदाचित बजेट वाढलं की उगीच चकचकीतपणाही वाढत जात असावा.
हिन्दी चित्रपटांमधे दाखवली जाणारी खेडी, त्यातली माणसं (विशेषतः बॅकलेस ब्लाऊज घातलेल्या आणि रंगिबेरंगी माळा घातलेल्या कमरेवर रंगित हंडे घेऊन फिरणार्‍या त्या गांव की छोरियां ) हा एकंदरीतच हास्यास्पद प्रकार असतो. बिल्लू मधली चकचकीत चेहर्‍याची लारा दत्ता आणि तिचे ते कपडे, गावातल्या खोट्या कमानी इतकं कृत्रिम होतं सगळं. त्या तुलनेत बेनेगलांचा वेलकम टू सज्जनपूर खरंच मस्त होता. परफेक्ट गाव उभं केलं होतं. आणि त्यातली माणसंही किती खरी गावातली वाटतात.
फिल्म्समधे आदीवासी वगैरे लोकांचे काना गळ्यातले दागिनेही किती फॅन्सी, खोटे असतात. कपड्यांना किंवा दागिन्यांना जुना, वापरलेला लूक द्यायला, ऑथेन्टिसिटी आणायला असं कितीसं जास्तं बजेट लागणार असेल. पण खरंच चलता है दृष्टीकोनच असतो.

स्टाईकरची सौंदर्य-कला समिक्षा कोणी करेल का ?. दिग्दर्शकाने बारीक सारीक गोष्टी सुध्दा खुप काळजीपुर्वक टिपल्यात>>>>

बघताना बोट शिवशिवतात कैरम खेळण्यासाठी....

थ्री इडियट्स च्या फायनर पॉइन्ट्स बद्दल जरा. फक्त काही observations. हे अगदी सुरवातीलाच खटकले:
१) माधवनच्या आय.डी. कार्ड वर जन्म तारीख १९७८ अशी दाखवली आहे. ते गृहित धरून, १९९६ च्या आस-पास त्याने इंजिनीयरिंग कॉलेज मधे प्रवेश घेतला असावा. त्या काळात मोबाईल फोन्स इतके वापरात होते का? बोमन एका विद्यार्थ्याच्या वडीलांना खिशातून मोबाईल काढून फोन लावतो. वडीलही (बाग काम करता-करता) खिशातून स्लीक मोबाईल काडून बोलायला लागतात. १९९६-१९९८ च्या काळात होते का असे सेलफोन्स?
२) करीना लेटेस्ट बाईक चालवते. कायनेटिक होन्डा दाखवली असती तर जास्त appropriate वाटलं असतं. (पण "जाउ दे" वृत्ती).
३) स्पघेटी टॉप्स इतके कॉमन होते का?
३) २००५ मधे तूनळीचा जन्म झाला. त्या अधी (वरच्या सगळ्या तारखा लक्षात घेता) तूनळी / वेबकॅमचा उपयोग करून डिलेव्हरी करणे,म्हणजे जरा अती झालं!
Happy

शर्मिला...अगदी अगदी.
पूर्वी मटामध्ये मुकेश माचकर परीक्षण खुप मस्त लिहायचे. नुकतेच विजय पाडळकरान्चे 'गन्गा आये कहा से..' वाचले. गुलजारान्च्या चित्रपटान्बद्दल आहे. छान आहे.
चर्चा वाचून मागे पाहिलेला 'कैरी' आठवला. नितान्तसुन्दर!

3 idiots मधे करिनाचं आडनाव " सहस्त्रबुद्धे " आहे. पण तिच्यात कुठेही कोकणस्थीपणा सोडा, मराठीपणाही जाणवत नाही. तिच्या लग्नातही ती नवरी न वाटता मस्तानी वाटते.

चांगला धागा.. पण थोडासा भरकटलाय. (अचाट सीन्साठी वेगळा धागा आहेच की!!) मला स्वतःला आवडलेला चित्रपट सीमा.

हा चित्रपट जेव्हा आमच्या फिल्म अ‍ॅप्रीसीएशनमधे दाखवला आणि नेहमीचाच प्रश्न विचारला की यामधे दिसणारी / जाणवणारी एखादी चूक सांगा... तेव्हा आमच्या क्लासमधल्या एका मुलीचे उत्तर होतं की "हिरोईनने आयब्रोज बिल्कुल भी नही किये थे.. तब फॅशन नही थी क्या??"

एक कामवाली मुलगी आयब्रोज करत नाही हा छोटासा मुद्दा तिच्या लक्षात आला होता... हेही नसे थोडके. म्हणजे आपण तेच बघतो जे आपल्याला बघायचे अस्ते. जी आपली आवड असते ती आपण जास्त डीटेलमधे बघतो. उरलेलं सर्व "चलता है" मधे आपण पण टाकतोच ना??? (आपण == प्रेक्षक)

छान बाफ आहे हा ? चित्रपटाची पुर्ण मजा घेतली तरी माझ्या नजरेला अश्या चुका पटकन कळतात.
उत्सव च्या बाबतीत जास्त विस्ताराने वाचले होते. त्याकाळी हळदीचाच वापर कपडे रंगवण्यासाठी केला जात असे, त्यामूळे पिवळ्या रंगाच्याच सगळ्या छटा आहेत त्यात. तसेच माग छोटे असल्याने कपड्याना रुंदी नसे. कपडे शिवायची पण पद्धत नवह्ती. सर्व कपडे बांधूनच परिधान केले जात असत. याबाबतीत जेनिफर कपूरने देखील मदत केली होती.
लगान मधे, शेवटच्या मॉब सीनमधे मात्र (मॅचचे प्रेक्षक) कपड्यांचे निळे, गुलाबी रंग आहेत.
जगाच्या पाठिवर मधे, सिमा ने देखील, अनवानी पायाने वावर केला आहे. उनाचा तडाखा चेहर्‍यावर दिसण्यासाठी !!!

कारण फ्रेंड्स मधे रॉस २ वेळा तरी चर्च मधे लग्न करताना दाखवलाय.>>>>> दुसरं लग्न एमिलीशी होतं नं. ते कुठल्यातरी जुन्या वाड्यात होतं. ते चर्च नाहीये. (त्याचापण एक एपिसोड आहे. एमिली त्या वाड्याची पडझड झाल्यामुळे लग्न पोस्टपोन करु या म्हणते. मोनिका रॉसला समजावुन सांगते की आम्हा मुलींची लहानपणापासुन काही स्वप्न असतात त्या महत्वाच्या दिवसाबद्दल वगैरे. )

'एक रुका हुआ फैसला' मधे मनुष्यस्वभाव मस्त बारकाव्यांसकट दाखवलेत. प्रत्येक कॅरेक्टरचा मुळ स्वभाव आणि वेगवेगळ्या प्रसंगामधुन जातांनाच्या त्यांच्या प्रतिक्रिया आणि शेवटी फैसला. एका खोलीत टेबल आणि खुर्च्या एवढचं नेपथ्य आहे. थोडक्यात कथा अशी आहे. एक मृत्यु झालाय. मृत माणसाच्या मुलावरच त्या खुनाचा आरोप आहे आणि या खोलीतल्या ज्युरीना फैसला करायचाय. जवळ जवळ सगळा सिनेमा त्या खोलीतच घडतो.

>>>>फक्त पहिलंच लग्न चर्चमधे करता येतं (माझ्या माहीतीनुसार). त्या चार्लीचं ते चौथं लग्न आहे असं दाखवलय.

कॅथॉलिक चर्चचा हा नियम आहे. (त्यातूनही मार्ग आहेत). मात्र प्रोटेस्टंट, उदाहरणार्थ चर्च ऑफ इंग्लंड (ज्याच्या आधीन असलेल्या चर्चमध्ये कतरीनाचे लग्न होणार असते) पुढचे लग्न सुद्धा चर्चमध्ये मध्ये करता येते . बाप्टिस्ट, ऑर्थोडॉक्स चर्चमध्येही सहज करता येते.

------

विषय छान आहे.. वाचतो आहे..

ज्याला ज्या क्षेत्रातील माहिती असते तो ते एकदम बारकाईने बघतो आणि चुकाही लक्षात येतात त्याला. मला आठवतय, आम्ही कॉलेजमध्ये असतांना टर्मिनेटर बघायला गेलो होतो, आणि टर्मिनेटरचा अंतर्गत प्रोग्रॅम दाखवणार्‍या काही ओळी स्क्रीनवर दिसत होत्या. एक मित्र अचानक जोरात म्हणाला' अरे हा तर ८०८५ च इंस्ट्रक्शन सेट आहे, एवढा भारी रोबो ८०८५ वर कसा चालेल" Happy

ओंकाराला गेलो होतो तेंव्हा 'कूल' चित्रपट सुरू झाल्या झाल्या झोपला, पण मध्येच उठला, आणि म्हणाला अरे इथे हा कमळगड कुठून आला इकडे ? त्याला काही वाईला शूटिंग झाल्याचे माहित नव्हते पण मागे गड लगेच ओळखू आला...

जे दिग्दर्शक / पटकथालेखक त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी सल्लामसलत न करता काम करतात, त्या चित्रपट, मालिकातले प्रसंग तर अगदी हास्यास्पद होतात...

ओंकाराला गेलो होतो तेंव्हा 'कूल' चित्रपट सुरू झाल्या झाल्या झोपला,

वा.. भर मे मध्ये गेलेलात काय? 'कूल' एसीची हवा लागताच झोपला????

सर्व जण मस्तं लिहित आहेत. खास करुन नीरजेचे, साधनेचे आणि शर्मिलेचे पोष्ट फारचं वेगळ्या कोनातून लिहिलेले वाटले. धन्यवाद!!!! रेखा देशपांडे यांच पुस्तकं आता मिळवावं लागेल.

हेच 'तंबी दुराई' ह्या टोपणनावाने दोन-फुल, एक हाफ लिहितात ना ? ) ह्यांचं परीक्षण आवडायचं.>>>
मला वाटतं 'तंबी दुराई' नावानं लिहिणारे प्रवीण टोकेकर आहेत.

Pages