मायबोलीवरील लेखन तुम्ही कसे शोधता??

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"देव एक आहे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहे" असं जे म्हटलं जातं त्याचप्रमाणे मायबोलीवरील लेखन एक (तेच) आहे आणि त्यापर्यंत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. Happy

तर हे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी तुम्ही कुठला पर्याय वापरता? इतर मार्गांची तुम्हाला माहिती आहे का? मायबोलीवर येताना कींवा आल्यावर तुम्ही प्रथम कुठला दुवा बघता. जुने लेखन कसे शोधता? मायबोलीवर दरवेळी आल्यावर नवीन लेखन्/प्रतिसादासाठी सर्वप्रथम तपासले जाणारे तुमचे काही ठरावीक दुवे आहेत का?

मायबोलीवर बरंच काही आहे पण तीथपर्यंत पोचायचं कसं हे नेमकं माहीत नसल्याने बरेच धागे तुमच्या नजरेतून सुटले असतील. या चर्चेचा हेतु हा आहे की सर्वांना हे विविध मार्ग जर कळले तर साहित्य शोधणं सोपं जाईल.

विषय: 
प्रकार: 

१. पाउलखुणा
२. नविन लेखन (साधारण पहिली ३ पाने)
३. माझ्यासाठी नविन
४. ग्रूपमधे नविन
५. लोकांच्या वि.पु.मधे डोकावत फिरणे Happy

नवीन लेखन
निवडक १०, माझे ग्रुप्स , पाऊलखुणा
हे सर्व वाचताना काही लिन्क्स मिळाल्या तर तिकडे...

मला वि. दा. करंदीकर यांची प्रहार मध्ये प्रकाशित झालेली कविता हवी आहे. कशी शोधावी?

Pages