सकाळचे ८.५५ वाजता मी गंधर्व होटलला पोहचलो, बाहेर बाईक पार्क करुन हेल्मेट उतरवत आत एक नजर फिरविली तर डाव्या बाजुला एक बराच मोठ गृप बसलेला दिसला, मला बाहेरुनच अंदाज आला की हाच असावा तो माबो गृप. होटलचे पाय-या चढताना मनात विचार आला की आपल्याकडे मयुरेशचा नंबर तर आहेच, तर चला एक फोन करुया. आता मी पाय-या चढुन काऊंटर जवळ पोहचलो होतो, मोबाईल काढुन नंबर लावणार तेवढ्यात गृप मधुन आवाज आला, मधुकर...... मधुकर ना? सापडलं रेssss बाबा एकदाचं (हे मनात बरं ) म्हणून दात दाखवत पुढे सरसावलो.
लालुनी पुढे होऊन आपला व मयुरेशचा परिचय करुन दिला. माबोकरानी एकदंरित चार टेबलं Occupy केली होती. डावीकडुन पहिल्या टेबलावर काही माबोकर बसले होते ज्यांचा शेवट पर्यंत परिचय होऊच शकला नाही, दुस-या टेबलावर नीरजा, लालु, हिमान्शू, साजिरा, तिस-या टेबलावर मीनु,पुनम,देवा, Sandi, अरुण, चवथ्या टेबलावर मी, अतुल, मनीष, जीएस, आणी मिल्या व दोन लहान पिल्लं आमच्या टेबला जवळ खेळत होती. तसं मिल्या आणी वैभव जोशी नंतर आलेत पण असा हा एकुण सगळ्यांच्या स्थानापन्नाचं चित्र होय. तसं सुरुवातीची १० मिनीटं माझं सगळं ल़क्ष त्या दोन पिल्लांकडेच होतं, कारण हि पिल्लं तिथे खेळत होती पाण्यानी भरलेले चार ग्लासं त्या टेबलावर ठेवलेले होते. मला वाटायचं हि पोरं एकतरी ग्लास उपड घातल्या शिवाय थांबणार नाहीत. हे सगळं चालु असताना कुणीतरी मला माबोकरांचा परिचय करुन दयायला सुरुवात केली, आणी माझं सगळं लक्ष त्या पिल्लांच्या खेळण्यावर. या चक्कर मधे मला ते परिचय काही झेपलच नाही. नंतर विचार पडु लागला अरे हा कोण, आणी तो कोण, बरं परत एकदा विचारणं म्हणजे मुर्खपणा होईल, उद्या वेंधळेपणाच्या बिबित माझं नाव येईल.
एक तर मी नविन, वरुन माबोकरांचे आयडी एक आणी नाव एक, माझा पार गोंधळ होऊ लागला, पण इज्जतका फालुदा होऊ नये म्हणुन नुसतं हो.. हा.. कळलं, बरोबर.. म्हणत तो इंडक्शनचा पार्ट कसं बसं निभाऊन घेतलं. नंतर सगळे गप्पा मारु लागले व मी मात्र आता कान देऊन ऐकु लागलो की यातली कोणती व्यक्ती माबोवरिल कुठलं पात्र आहे याचा अंदाज बांधु लागलो. माझा हा प्रयत्न अंशशा यशस्वी ठरला. साजि-याला सगल्यात आधी ओळखलं, नंतर पुनम,नीरजा,मीनु, अशी एक एक लोकांची ओळख पटू लागली. माझं हे सगळं ओळख पटविण्याचं निरिक्षण चालु असताना टेबल नंबर दोन व तीन वर धमाल चालु होती. मीनु मात्र एका ठिकाणि बसु शकत नव्हती, कोण जाणे काय पण ती शेवट पर्यंत अगदी ईकडे तिकडे फिरतच होती. भारताच्या सिमेवर सैनिक जसे गस्त घालतात अगदी तशी तिची गस्त चालु होती. आजुन काही लोकाना ओळखणे बाकी होते, मग शांतपणे त्यांच्या गप्पा ऐकु लागलो व गप्पा वरुन एकेकाचं नाव उलगडत गेलं. हे सगळं चालु असताना मधे मधे या पिल्लांवर लक्ष ठेवणही चालुच होतं. मला सारखी भीती वाटत होती की हि पिल्लं ते भरलेले ग्लास उपडे घातल्या शिवाय रहणार नाही. ते जवळ आले की मी सावध होऊन ग्लास पडलाच तर आपण धरुया म्हणुन अगदी फिल्डिंगसाठी तयार व्हायचा, पण हि पोरं अगदी गालाच्या जवळ यायची व ग्लास न पाडताच मागे सरकायची.
आणी तिकडे साजि-याची फोटोग्राफी, इंटरव्युव्ह व गप्पा चालु होत्या, तेवढ्यात राजमलाईचं वाटप चालु झालं, मला वाटते प्रत्येकी एक एक एवढच तो साठा होता, मात्र दुसरे चॊकलेट भरपुर होते, सगळ्यानी तिथे तर जमेल तेवढे खाल्लेच पण झीप लाँकच्या ब्यागा भरुन भरुन घरी नेलेत. तसं झीप लाँकच्या ब्यागांवर ब-याच लोकांची नजर होती, प्रत्येकाचा प्रयत्न होता की किमान एक तरी ब्याग त्याना मिळावी व सगळ्यानी तसे प्रयत्न ही केलेत. हाय एवढ्या वेळात पुनमनी मात्र दोन वेळा सगळ्या ब्यागा लांबविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, शेवटी एकदाचं त्या ब्यागांचं वाटप करण्यात आलच. एवढ्यात लालुच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला, सगळ्याना केकचे तुकडे वाटण्यात आले, मिल्या आजुन यायचा होता, पुनमनी मात्र माझ्या नव-याला केक मिळालाच पाहिजेचा नारा लावुन धरला होता, कुणीही केक कडे हात सरसावला कि तिच्या जिवाचि अगदी घालमेल व्हायची, “ए माझ्या नव-याला पण केक ठेवा बरं का” असं किमान शंभरवेळा तरी म्हणाली असेल, आणी शेवटी तिच्या भावनांचा विजय झाला. एवढया वेळ ज्या पिल्लानी माझ्या मनात धास्ती भरवली होती त्यानी आपला मोर्चा अखेर टेबल नंबर एक कडे वळविला व मी एकदाचा सुटलो म्हणुण उसासा घेतला नी बघतो काय तर मनिषनी भरलेला ग्लास उपडा घातलाच एकदाचा, मनात म्हटलं तुझ्या पेक्षा ती पिल्लं परवडलित. एवढ्यावर न थांबता थोड्याच वेळात मिल्यानी सुद्धा एक ग्लास उपडा घातला व एकदाचं ते घडलच ज्याची मला भीती होती, सगळा टेबल पाण्यानी भरलेला, वेटर काही येईना, कसं बसं थोड इकडे तिकडे सरकुन आम्ही तिथेच बसलो होतो. नंतर वेटरनी एकदाचं टेबल साफ केलं, पण हे यांच्याकडुन घडेल याची अपेक्षा नव्हती.
ईकडे देवाच्या कांदेपोहे व चहाच्या गप्पा सुरु झाल्या, आजकाल वाढलेल्या महागाईमुळे त्याला पोरीकडचे पोह्या ऐवजी बिस्किट-चहावरच कटवत आहेत अशी नविन माहीती बाहेर आली, तरी मात्र चिकाटीने तो हे काम चालु ठेवणार आहे हे त्याने तेवढयाच आत्मविश्वासाने ठासुन सांगितले. तिकडे लालुनी आपली जागा सोडुन टेबल नं ४ कडे आल्या, मिल्याशी गप्पा सुरु होत्या, तेवढ्यात साजि-यानी लालुचा इंटरव्ह्यु घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. मधेच वैभव जोशींचं आगमन झालं, कुणीतरी मला विचारलं की याना ओळखतोस का? हे वैभव. ओळखीपाळखीचा कार्यक्रम परत लांबायला नको म्हणुन मी म्ह्टलं “हो” पण लगेच कुणीतर म्हटल “अरे पण तो आज काल माबोवर येत नाही” आणी माझं पितळ उघळं पडलं. पुढे खाण्याचे आँर्डर देण्यात आले, पहिल्या राऊंडमधेच काहीजण सुस्तावलेत, पण काही जाणानी मात्र खाण्याच्या दुस-या राऊंडमधे सुधा तेवढ्याच उत्साहाने भाग घेतला, चहा काँफी झाली व १०.३० च्या दरम्यान आम्ही सगळे होटलच्या बाहेर पडलो.
बाहेर आल्यावर होटलच्या पुढे रस्त्याच्या कडेनी सगळे घोळका करुन एकत्र जमलेत व गप्पा सुरु झाल्यात. आता मात्र खरी माजा येत होती, आत्ता पर्यंत त्या होटेलात चार नंबरच्या टेबलावरुन वाकुन वाकुन दोन नंबरच्या टेबलाशी बोलण फारस जमत नव्हतं. ईथे मात्र सहज उपस्थीती दाखविता येत होती, व गप्पातही सहभाग घेता येत होतं. तसही घोळका करुन उभं राहुन गप्पा मारताना कुणीही सहज मिसळुन जातं व आता मी खरं त्या माबोच्या गटात सामील होऊ लागलो होतो. तेवढ्यात मीनू व साजि-यानी मात्र माझ्यासाठी आणलेला प्रश्न न विचारता तसाच परत नेला, परत नेत आहोत याची वारंवार जाणीव करुन दिली. या घोळक्यात Wine Party करण्याचं ठरविण्यात आलं, तसं नीरजानी गोव्याला येण्याचा प्रस्ताव ठेवला पण कोणी फारसे उत्साही दिसले नाहित. मीनूची मात्र आता ईथेही गस्त चालुच होती, ती सारखी त्या घोळक्याच्या गोल गोल घिरट्या घालत होती. एकंदरित हा गट्ग फार मजेशीर होता. नंतर एकेकानी निरोप घेऊन घराची वाट धरली.
झाला झाला.. मधुकर अट्टल
झाला झाला.. मधुकर अट्टल मायबोलीकर झाला....
राजमलाई कोणी कोणासाठी आणली
राजमलाई कोणी कोणासाठी आणली होती?????????
बाकी, वृ छान.
इंडक्शनचा पार्ट
मीनूचं वर्णन पर्फेक्ट! सीमेवर
मीनूचं वर्णन पर्फेक्ट! सीमेवर गस्त!
पाण्याचा ग्लास मिल्याने नाही, जीएसने उपडा केला बरंका. हे यायचे होते गटगला तोपर्यंत.
वैनी.. त्याच्या मते पाण्याचा
वैनी.. त्याच्या मते पाण्याचा ग्लास मनिषनी उपडा केला.. मिल्यानी नाही...
ग्लास उपडा करण्याची सुरूवात
ग्लास उपडा करण्याची सुरूवात मनिषपासूनच होते
दुसर्या ग्लासाबद्दल वाच..
मधुकर, हिम्याने वाटलेल्या बर्फीचं राहिलं..
मधुकर, हिम्याने वाटलेल्या
मधुकर, हिम्याने वाटलेल्या बर्फीचं राहिलं..>> हो की राहुनच गेलं ते.......
तसं तो बर्फी वाटताना मला खुप लाज वाटत होती, कारण बर्फी माझ्यावर पण Due होती. तरी कुणीतरी म्हटलाच, अरे मधुकरची बर्फी कुठे आहे म्हणून.
आता पुढच्या जीटीजीला आठवणीने हा Due पुर्ण करणार.
ते मी म्हटलं... तेव्हा
ते मी म्हटलं... तेव्हा पुढच्या जिटीजीला मी आले नाही तरी मला कुरीअर कर बर्फी!!
ते मी म्हटलं... तेव्हा
ते मी म्हटलं... तेव्हा पुढच्या जिटीजीला मी आले नाही तरी मला कुरीअर कर बर्फी!!>> नक्की, नक्की......
मला का नाही बोलावल
मला का नाही बोलावल साजिरादादाना भेटायची इच्छा आहे माज्या नवरोबाची
आला शेवटी वाजत गाजत.. वृ हो!
आला शेवटी वाजत गाजत.. वृ हो! मस्त लिहीलंय... मी नव्हते.. ऑ आ.....
ओ मधुकरराव,लालुपाठोपाठ मी
ओ मधुकरराव,लालुपाठोपाठ मी तुम्हाला आपली ओळख करून दिली.. विसरलात का? मी तेव्हा लालुच्या शेजारीच बसलो होतो..त्यानंतर त्या मीन्वाज्जीने कपटाने माझी खुर्ची मिळवली आणि मला एका कोपर्यात ढकलुन दिलं ते शेवटपर्यंत
रच्याकने,लाल्वाक्कांच्या कृपेने मला, मधुकरला,साजिरा आणि नीरजाला त्या सुप्रसिध्द राजमलाईची चव घ्यायला मिळाली.. साज्याने त्याची हातकी सफाई दाखविल्याने अरुणने त्याच्यासाठी आणि पूनमसाठी राखुन ठेवलेली राजमलाई साज्या आणि नीरजाच्या पोटात अर्धी अर्धी जाऊन पोचली

पूनमचा मार खावा लागु नये म्हणुन साज्याने `ती राजमलाई नव्हतीच दुसरच चॉक्लेट होतं राजमलाई अशी नस्तेच' अश्या उलट्या बोंबाही मारल्या.. पण राजमलाई जरी पोटात गेली असली तरी त्याचं रॅपर टेबलवरच असल्याने साज्याने मारलेल्या बोंबांचा काहीही उपयोग झाला नाही
ओ मधुकरराव,लालुपाठोपाठ मी
ओ मधुकरराव,लालुपाठोपाठ मी तुम्हाला आपली ओळख करून दिली.. विसरलात का?>> अगदी बरोबर, मी वर नाही म्हटलय का कुठे? Entry झाल्या झाल्या लालुची व तुमचीच ओळख झाली.
बाकी चु.भु.दया.घ्या.
छान लिहिलाय वृत्तांत मजा
छान लिहिलाय वृत्तांत
मजा केलीत एकंदर !
ग्लास उपडा करण्याची सुरूवात
ग्लास उपडा करण्याची सुरूवात मनिषपासूनच होते >> हे खोटं आहे.. मागच्या वेळी काशीनं सुरुवात केली होती. शिवाय मी ग्लास आडवा करतो उपडा नाही
मधुकर... मस्त लिहिलाय वृत्तांत. पुढच्या GTGला बर्फी आणि राजमलाइ दोन्ही पाहिजे..
मी वर नाही म्हटलय का
मी वर नाही म्हटलय का कुठे?.....>>> म्हटलय पण माझं नाव चुकीचं घेतलय
मयुरेश चुक दुरुस्त केली बरं
मयुरेश चुक दुरुस्त केली बरं का!
और ये रही मधुकरकी पदार्पण में
और ये रही मधुकरकी पदार्पण में सेंच्युरी. जो नवीन जीटीजीकर पूनम आणि मीनू या समैंचं परफेक्ट वर्णन करेल, तो अट्टल. (असं जीटीजीच्या घटनेत लिहून टाक रे मया.
)
सीमेवरची गस्त..
आता तरी विचार मीनू प्रश्न. 
चला. वृत्तांत आला. आता मी क्षणचित्रे टाकण्यास मोकळा. त्या क्षणचित्रांत कार्याध्यक्षांच्या विशाल सागराचं पण दर्शन आहे. ते सेंसॉर नाही झालं, तर तुम्ही वाचा- कमिंग सून. क्षणचितरे.
अरे ग्लास कधी उपडे झाले?
अरे ग्लास कधी उपडे झाले? मागल्या वेळी मी मीनूवर लक्ष ठेऊन होतो. यावेळीही तिच्या समोरच बसलो होतो, गस्त घालत. तर दुसर्याच कुणीतरी उपडाउपडी केलेली दिस्तेय. मला कशी कळली नाही?
आणी तिथे पुणे-२९ व पुणे-३८ ची
आणी तिथे पुणे-२९ व पुणे-३८ ची मेजॊरीटी होती असं कुणाचं तरि म्हणन होतं.
बरं हे २९ व ३८ वाले कोण आहेत जरा हात वर करा बरं.
क्षणचित्रे टाक रे. वृ सह्ही
क्षणचित्रे टाक रे. वृ सह्ही आहे
झिपलॉकच्या ब्यागा होत्या??
हुम्म्म्म, म्हणजे नेहमीच्या
हुम्म्म्म, म्हणजे नेहमीच्या यशस्वी पैकी मी, आरती, वाकड्या, लिम्ब्या, ३बू, बोम्ब्या भट , चिनूक्स्,काशी, हे नव्ह्ते तर. पुढच्या वेळेस नक्की...
आयड्यांचा घोळ तर मला अजूनही कळत नाही. मधोबा तर बोलून चालून नवाच....
चला चांगले झाले जीटीजी . (जी एस ग्लास सांडू शकतो. तो काहीही करू शकतो.)
तु कसा काय 'नेहेमीचा यशस्वी'?
तु कसा काय 'नेहेमीचा यशस्वी'? आणि जीटीजी 'चांगले' म्हणजे नक्की कसे झाले? मधोबाच्या अंगात आला होतास का नऊ ते दहा वेळेत?
मी पण यशस्वी कलाकारांपैकी आहे
मी पण यशस्वी कलाकारांपैकी आहे (असे माझे मीच समजतो). माझा अनुल्लेख करू नये.
मधुकर मीन्वाज्जी सैनिकासारख्या गस्त घालत होत्या, की संतप्त सिंहिणीसारख्या येरझार्या घालत होत्या?
मी नेमका गावाला तरफडलो होतो रविवारी. (गाढव मेलं ओझ्यानं)
(No subject)
कोणत्या फोटोत? आयडी साजरी
कोणत्या फोटोत?
आयडी साजरी करा म्हणजे काय? वरच्या पोस्टचा अर्थ सांगा रे कुणीतरी. 
.
:स्मित:.
अहो गंगाधर, पोस्ट कशाला
अहो गंगाधर, पोस्ट कशाला उडवताय? आता मुलीचं नाव तुमच्याकडे साजिरा असतं, त्यात तुमचा काय दोष? काही अपमान वगैरे होत नाही. माझा तर नाहीच नाही. तुमची पोस्ट ठेवा तुम्ही तशीच.
गंगाधर, कितीवेळ एडिट करताय.
गंगाधर, कितीवेळ एडिट करताय.
फारच मनावर घेऊन पोष्टी टाकू नये. कारण कुणीच कुणाचेही बोलणे इतके मनावर घेत नाही. मी तर मायबोलीवर येताना राग, मान, लाज सारे घरी ठेऊन येतो. तुम्हीही तसेच कर नि मज्जा करा. 
(No subject)
हो मी ओळखतो. मागच्याच
हो मी ओळखतो. मागच्याच महिन्यात एका पुस्तक प्रकाशनात त्यांचे भाषण ऐकले...
Pages