मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 5 November, 2009 - 19:37

आशुतोष गोवारीकरच्या 'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने १२ भूमिका केल्या व या भूमिकांची नोंद गिनीज बुक मध्ये होणार अशी चर्चा झाली.
त्यानंतर बातमी आली की एखाद्या कलाकाराने एकाच चित्रपटात १२ भूमिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजेश शृंगारपुरेने 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात १२ भूमिका केल्या होत्या.
हे वाचून वाटले की, आतापर्यंत मराठी चित्रपटात सादर झालेल्या दुहेरी / विविध भूमिका संकलित कराव्यात.
आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
प्रदर्शनाचे साल, चित्रपटाचे नाव, कलाकाराचे नाव, व्यक्तिरेखांची संख्या, व्यक्तिरेखांची नावे

मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिकांची यादी -
१९३३ औट घटकेचा राजा शाहू मोडक २ राजकुमार / भिकारी

१९४१ संत सखू हंसा वाडकर २ संत सखू / विठ्ठल

१९५२ पेडगावचे शहाणे राजा परांजपे २
१९५७ गृहदेवता रेखा कामत २
१९५८ राजा गोसावीची गोष्ट राजा गोसावी ३

१९६० रंगपंचमी जयश्री गडकर २
१९६४ पाठलाग भावना २

१९७३ आंधळा मारतो डोळा दादा कोंडके २
१९७३ थापाड्या निळू फुले २
१९७६ फरारी जयश्री टी. २
१९७९ पैजेचा विडा लक्ष्मीछाया २

१९८० चोरावर मोर उषा चव्हाण २
१९८२ भन्नाट भानू सुषमा शिरोमणी २ भानू / जयमाला
१९८७ चल रे लक्ष्या मुंबईला लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्या काणे / स्मगलर भोजराज
('स्मगलर भोजराज' या व्यक्तिरेखेसाठी रविंद्र बेर्डे यांनी आवाज दिला आहे.)
१९८८ चंगू मंगू अशोक सराफ २
१९८८ मज्जाच मज्जा वर्षा उसगावकर २ प्रतापसिंग / कामिनी
('प्रतापसिंग' या व्यक्तिरेखेसाठी सुनिल शेंडे यांनी आवाज दिला आहे.)

१९९० अनपेक्षित अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच सचिन २
१९९० धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्मीकांत / गंगाराम
१९९१ अपराधी प्रिया अरुण ३ शालन / लाली / सोनाली
१९९१ गोडी गुलाबी रेखा राव २
१९९१ मुंबई ते मॉरिशस वर्षा उसगावकर २ भारती / आरती
१९९१ शेम टू शेम प्रिया अरुण २ शेवंता ओतूरकर / पल्लवी दादरकर
१९९१ शेम टू शेम लक्ष्मीकांत बेर्डे ४ लक्ष्मण जावळे / भालू जावळे / शंतनु जावळे /
'कमिशनर' राम जावळे
१९९१ शेम टू शेम दिपक शिर्के २ सटवाजीराव / हवालदार क्र. १००

२००० जोडीदार मृणाल कुलकर्णी २
२००० मृगजळ भक्ती कुलकर्णी २
२००६ जत्रा भरत जाधव २ मोन्या / घुम्या कानोळे
२००६ जत्रा विजय चव्हाण २ शिवा कानोळे / जिवा कानोळे
२००६ शंभु माझा नवसाचा राजेश शृंगारपुरे १२
२००७ कलम ३०२ अशोक सराफ ७

२०१० आयडियाची कल्पना सचिन ३ जयराम गंगावने / सचिन पिळगावकर (स्वत:) / गंगाराम गंगावने
२०१० दुर्गा म्हणत्यात मला मिलिंद गवळी २ डॉ. विजय / श्याम
२०१० दुर्गा म्हणत्यात मला दीपाली सय्यद २ दुर्गा सातारकर / डॉ. दुर्गा
२०१३ नारबाची वाडी मनोज जोशी २ रंगराव खोत / मल्हारराव खोत
२०१३ पितृऋण सचिन खेडेकर २
२०१४ मुक्काम पोस्ट धानोरी प्रकाश धोत्रे २ बाळासाहेब इनामदार / आप्पासाहेब इनामदार
२०१४ लय भारी रितेश देशमुख २

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँकी. नं. १, बरोबर. 'धरलं तर चावतंय...' हाच तो चित्रपट.

अमिता, या चित्रपटात दिलीप प्रभावळकर व प्रिया अरुण हे वेषांतर करतात त्यामुळे या चित्रपटाचा उल्लेख यादीत करणे सध्या टाळले आहे.
वर लिहिल्याप्रमाणे काही प्रकारच्या भूमिकांचा विचार यादीसाठी केलेला नाही. यावर आपले मत जरूर कळवा.

'पैजेचा विडा' (१९७९) या चित्रपटात लक्ष्मीछाया यांनी दुहेरी भूमिका केली आहे.
यादीत सुधारणा केली आहे.

एका चित्रपटात प्रिया अरुणने ३ भूमिका केल्या आहेत.
कुलदीप पवारच्या बायकोला तिळ्या मुली होतात. पण बाळंतपणात त्याची बायको जाते त्यामुळे तो मुलींचा सांभाळ करत नाही. त्याचा नोकर एक मुलगी सांभाळतो. दुसर्‍या मुलीला एक कोळी कुटुंब सांभाळते तर तिसर्‍या मुलीचा सांभाळ एक श्रीमंत कुटुंब करते.
पहिली प्रिया अरुण मोठी झाल्यावर फुले विकते. तिच्यावर हवालदार असलेला लक्ष्मीकांत बेर्डे प्रेम करत असतो. दुसर्‍या प्रिया अरुणवर कोळी असलेला विजय चव्हाण प्रेम करत असतो. तिसरी प्रिया अरुण वकील असते. तिच्या वकील प्रियकराची भूमिका एका नवीन कलाकाराने केली आहे.
कोणाला आठवतोय का हा चित्रपट ?

अर्चना जोगळेकर, नितिश भारद्वाज आणि अशोक सराफ यांचा एक चित्रपट होता. त्यात अशोक सराफ यांचा डबल रोल होता. यात अर्चना नर्तिका असते आणि नितिश इंस्पेक्टर असतो. अर्चनाच्या हातुन अशोक सराफचा खून होतो अशी काहितरी कथा होती.

अनपेक्षित...

एक अशोक सराफ प्रसिद्ध व्यक्ती असतो आणि दुसरा त्याचा अनौरस मुलगा, जो बापाप्रमाणे कपडे घालून त्याच्या नावावर ऐषाराम करत असतो... अर्चनाच्या हातून त्याचा खून होतो...

प्रिया अरुण तिळे... मी चित्रपट पाहिला आहे... नाव आठवत नाही...

मोसंबी नारंगी असला कुठला पिक्चर होता का? त्यात कोण डबल रोल मध्ये होते?

होय, अँकी नं. १, 'अनपेक्षित' हाच तो चित्रपट.

अमिता व अँकी नं. १, माहितीबद्दल धन्यवाद. माहितीप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

जागोमोहनप्यारे, 'मोसंबी नारंगी' चित्रपटात सुषमा शिरोमणी यांची भूमिका आहे. या चित्रपटात कोणी दुहेरी भूमिका साकारली आहे का ?

'थापाड्या' (निळू फुले यांची दुहेरी भूमिका) चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला होता तर 'फरारी' (जयश्री टी. यांची दुहेरी भूमिका) चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता.

'मज्जाच मज्जा' या चित्रपटात वर्षा उसगावकरने दुहेरी भूमिका साकारली आहे. तिने 'प्रतापसिंग' व 'कामिनी' या २ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. 'प्रतापसिंग' या व्यक्तिरेखेसाठी सुनिल शेंडे यांनी आवाज दिला आहे.

यादीत सुधारणा केली आहे.

एका महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मिकांत बेर्डे यांनी दोन भुमिका केल्या होत्या... एक बाटलीतल्या भुताची आणि दुसरी नायकाची... मला वाटते प्राजक्ता कुलकर्णी नायिका होती. मी हा चित्रपट पुर्ण पाहिला नसल्याने कथानक आठवत नाही.

अमिता,
त्याच नाव "दे दणा दण" होत बहुतेक. त्यामध्ये महेश कोठारे, अश्विनी भावे यांच्या पण भुमिका होत्या.
यामध्ये लक्ष्मिकांत बेर्डे आणि महेश कोठारेचा अजुन एक मित्र होता त्याच नाव मला माहित नाही.
कथानक साधारण अस होत:
महेश, लक्ष्मिकांत आणि त्यांचा मित्र हे चोर असतात, काही दिवस जेलची हवा खाऊन आल्यावर ते सामान्य जीवन जगायच ठरवून एका गावात येतात. अश्विनी भावे हीची या गावात पोलिस इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झालेली असते. त्या गावावर कवट्या महांकळ या खलनायकची दहशत असते. हे तिघे अश्विनी भावेच्या मदतीने त्याचा शेवट करतात. हे साधारण कथानक आहे.
यात बाटलीतले भूत लक्ष्मिकांतची कायम मदत करत असते.
प्राजक्ता कुलकर्णी ही लक्ष्मिकांत बेर्डेची नायिका होती.

तुम्ही रिमिक्स केलेत...

दे दणादण : लक्ष्याच्या अंगात भरपूर ताकत येत असते अचानक, पण लाल रंग बघितला की ताकत गायब होत असते..

बाटलीतला भूतवाला पिक्चर वेगळा आहे.... नाव बहुतेक धडाकेबाज असावे....

कवट्या महाकाळ : बहुतेक थरथराट असणार...

जामोप्या नी पण रीमिक्स केलं...
थरथराट- टकलू हैवान
धडाकेबाज - कवट्या महाकाळ

दे दणादण ची स्टोरी घेऊन कोठारेनी विनय आनंद आणि नंदिनी सिंग वाला 'लो मै आ गया' काढला होता...
अर्थात नव्या हिंदी दे दना दन पेक्षा हा मराठी कितीतरी चांगला होता...

धन्यवाद अमिता, मुग्धा, जागोमोहनप्यारे आणि अँकी नं. १.
आपण कळवल्याप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

'धडाकेबाज' हा पहिला मराठी सिनेमास्कोप चित्रपट.

या चित्रपटातील बाटलीतील भुताचे नाव गंगाराम असते. हा गंगाराम लक्ष्मीकांतचा पूर्वज असतो. त्याच्या बाटलीत जादूची वाळू असते. तिचा वापर करून तो लक्ष्मीकांतसाठी विविध कामे करतो. बाटलीतील वाळू संपल्यावर गंगारामला मुक्ती मिळते.
यातील खलनायकाचे नाव 'कवट्या महाकाळ' असते. महेश कोठारे यांच्या चित्रपटातील खलनायकांची नावे वेगळीच असतात त्यापैकीच हे एक.
'कवट्या महाकाळ'च्या गुंडांपासून पळत असताना लक्ष्मीकांत एका भिंतीला टेकतो. ती भिंत दुभंगते व लक्ष्मीकांत घसरत खालच्या भुयारात जातो. हे दृश्य चांगले चित्रित केले होते.

'दे दणादण' मध्ये लक्ष्मीकांतला शक्ती येते व त्या शक्तीच्या साहाय्याने तो गुंडांना पकडतो. लाल रंग दिसला की लक्ष्मीकांतची शक्ती जाते.
'बजरंगाची कमाल' चित्रपटाचे कथानकही 'दे दणादण'सारखेच होते. त्यात मुख्य इनस्पेक्टरची भूमिका अजिंक्य देवने केली होती.

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
'जत्रा' चित्रपटात भरत जाधवबरोबर विजय चव्हाणनेही दुहेरी भूमिका केली आहे.
यादीत सुधारणा केली आहे.

चित्रपट - कलम ३०२. यात अशोक सराफ वेगवेगळ्या ७ भुमिकांमधे आहेत. त्या चित्रपटाची जहिरात 'अशोक सराफ सप्तरंगी भुमिकेत' अशीच यायची. खरं पाहिलं तर जहिरातीसाठी हे लिहिलं होतं. प्रत्यक्षात पाहिलं तर सगळं मिळुन १५-२० मिनिटांचंही काम नव्हतं अख्ख्या चित्रपटात. बोअर सिनेमा होता हा ( ऐश्वर्या & अविनाश नारकर).

धन्यवाद मनिमाऊ.
आपण कळवल्याप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

'आयडियाची कल्पना' या चित्रपटात सचिनने तिहेरी भूमिका साकारली आहे. त्याने 'जयराम गंगावने', 'सचिन पिळगावकर (स्वतः)' व 'गंगाराम गंगावने' या ३ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत.
यादीत सुधारणा केली आहे.

जागोमोहनप्यारे, 'मोसंबी नारंगी' चित्रपटात बहुतेक सुषमा शिरोमणी यांची दुहेरी भूमिका नाही. मी तो चित्रपट संपूर्ण पाहिलेला नाही. अधिक काही कळल्यास जरूर कळवावे.

सांग धावत्या जळा :

http://www.youtube.com/watch?v=j65xAv1eXGU&feature=related

सांग धावत्या जळा, तुझ्यापरी ओढ उरी
सांग कुणाची मला ?

लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा

हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला, तुझ्या मनाचा लळा

पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा, राव शंतनु खुळा

गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - गृहदेवता (१९५७)

आठवतोय हा सिनेमा मला. आवडला होता मला त्यावेळी. रेखा मस्त दिसते त्यात.

दिलीप प्रभावळकरांच्या हसवाफसवीचा उल्लेखच नाही या धाग्यावर? नक्की किती ते माहित नाही, पण मल्टीपल भुमिका होत्या त्यांच्या त्या नाटकात.

रंजना आणि कुलदीप पवार यांचा एक सिनेमा होता. ( जाता येता पाहिला त्यामुळे नाव माहित नाही) त्यात रंजनाने सीता-गीता टाइप, चंट आणि लाजरी अशा दोन बहिणींच्या भुमिका केल्या होत्या. या सिनेमामधे ' पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले" हे सुरेश वाडकरांचं मस्त गाणं होतं.

मनिमाऊ, त्यात रंजनाने एकच भूमिका केली होती. गुपचुप गुपचुप.
सिनेमात एक नाटक/लपवाछपवी घडते त्यासाठी रंजना रंगवीत असलेली तरुणी दोन दोन व्यक्ती असल्याचे नाटक वठवते.
गोलमालमध्ये अमोल पालेकर, दीना पाठक यांनी असेच खोटे खोटे डबल रोल केले होते.

गृहदेवताची स्टोरी अर्जुन रामपाल, काजोल, करीना यांच्या एका चित्रपटासाठी (फॅमिली?) ढापली ना?

तुम्हाला माहीत नाही ? Sad
१९८७ साली मोटार अपघातात त्यांचे पाय कायमचे निकामी झाले. त्यानंतरही त्यांनी एका नाटकात व्हीलचेअरवरच्या तरुणीची भूमिका केली. २००० साली त्यंचे निधन झाले.

उप्स ! हे मला माहितच नव्हतं. त्यांना अपघात झालेला त्यानंतर एकदा टीवीवर पाहिलं होतं. त्या व्हीलचेअरवर होत्या.
पण जावुन १२ वर्षं झाली तरी मला माहित नाही. असे किती तरी कलाकार काळाच्या पडद्याआड जातात किंवा प्रसिद्धीच्या झोतातुन दुर एकाकी रहात असतात. आपण कसे विसरुन जातो त्यांना ! Sad
'कशाला उद्याची बात' वाल्या शांताबाई हुबळीकर गेल्यावरच आम्हाला कळलं कि त्या पर्वती जवळच्या महिलाश्रमात रहायच्या. त्याच्या बरोबर समोरच्या अपार्टमेंटमधे माझी मैत्रिण राहायची आणि तिच्याबरोबर पदार्थ विकत आणायला आम्ही किती वेळेला त्या महिलाश्रमात गेलो. आम्हाला त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण माहित नसल्यांमुळे कधीच भेटलो नाही. Sad

धन्यवाद मनिमाऊ.
आपण 'कलम ३०२' चित्रपटाबद्दल कळवल्याप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

शांताबाई हुबळीकर यांच्याबद्दल तुम्ही अनुभवली तशीच हुरहुर त्यांच्या निधनाची बातमी वृत्तपत्रात वाचून मलाही वाटली होती.

अशाच विस्मृतीत गेलेल्या २ जुन्या चित्रपटातील दुहेरी भूमिकांविषयी:

१९३३ साली प्रदर्शित झालेल्या 'औट घटकेचा राजा' या चित्रपटात शाहू मोडक यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. राजकुमार व भिकारी या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या. हा चित्रपट मार्क ट्वेन यांच्या 'The Prince And The Pauper' या कादंबरीवर आधारित होता.

ही ज्ञात मराठी बोलपटातील पहिली दुहेरी भूमिका आहे.
हाच चित्रपट 'आवारा शहझादा' या नावाने हिंदीतही बनवला गेला होता. त्यामुळे ती दुहेरी भूमिका ही ज्ञात हिंदी बोलपटातील पहिली दुहेरी भूमिका आहे.

१९४१ साली प्रदर्शित झालेल्या 'संत सखू' या चित्रपटात हंसा वाडकर यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. संत सखू व विठ्ठल (जेव्हा तो सखूचे रूप घेतो) या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या.

हंसा वाडकर यांचे 'सांगत्ये ऐका' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 'भूमिका' हा हिंदी चित्रपट याच पुस्तकावर आधारित होता. यात स्मिता पाटील यांनी अभिनय केला होता.

रंजना आणि कुलदीप पवार यांचा एक सिनेमा होता. ( जाता येता पाहिला त्यामुळे नाव माहित नाही) त्यात रंजनाने सीता-गीता टाइप, चंट आणि लाजरी अशा दोन बहिणींच्या भुमिका केल्या होत्या. या सिनेमामधे ' पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले" हे सुरेश वाडकरांचं मस्त गाणं होतं. >>>> गुपचुप गुपचुप.

रंगपंचमी चित्रपटात, जयश्री गडकरची दुहेरी भुमिका आहे. एक हंसा वाडकरची मुलगी आणि एक रत्नमालाची मुलगी.
( आधी उल्लेख झालाय का ? )

धन्यवाद दिनेश, रंगपंचमी चित्रपटाचा उल्लेख आधी झाला नव्हता.
आपण कळवल्याप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती तसेच दुहेरी भूमिका असलेल्या इतर चित्रपटांबद्दल जरुर कळवा.

धन्यवाद दिनेश, रंगपंचमी चित्रपटाचा उल्लेख आधी झाला नव्हता.
आपण कळवल्याप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती तसेच दुहेरी भूमिका असलेल्या इतर चित्रपटांबद्दल जरुर कळवा.

लक्ष्मी म्हणत्यात मला (चित्रपटाचे साल आठवत नाही, बहुतेक २००८) - यात मिलिंद गवळीने दुहेरी भूमिका केली आहे. नायिका दीपाली सय्यद आहे. तिचा पहिला मृत पती आणि नंतर तिच्याशी लग्न करणारा तिच्या पतीसारखाच दिसणारा डॉक्टर अशी ती भूमिका आहे.

Pages