देवमाणूस

Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25

सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!

Group content visibility: 
Use group defaults

मी ग्रुप बदलायला सांगणारच होतो. Happy

कालचा भाग मस्त होता. डॉक्टरला नवीन शिकार मिळाली.
कधीकधी असं वाटतं, की डिंपलचाही नंबर लवकरच लागेल.
मूळ कथेत आणि या कथेत फरक म्हणजे, या कथेत प्रत्येक फसलेल्या स्त्रीमागे काहीतरी sad स्टोरी आहे.
मूळ घटनेत मात्र स्त्रिया स्वतःहून फसल्या होत्या.
आजी त्याला कंपाउंडर म्हणते तेही जस्टीफिकेबल! कारण मूळ घटनेत तो बोगस डॉक्टर आधी कंपाउंडरच होता.

माझ्या मते शेवटचा खून तिचा असेल.... (मेलोद्रामा वाढवण्यासाठी.)
तसंही सोर्स मटेरियलशी झीची कुठलीही सिरीयल जुळत नाही. Lol
मूळ डॉक्टर (संतोष पोळ) ला मदत करणारी त्याच्याच हॉस्पिटलमधली एक नर्स होती. तिनेच शेवटी सगळं उघडकीस आणलं असं वाचलेलं आठवतंय.
वाईकरांनी वाईच प्रकाश टाकावा Happy

मी वाटच बघत होते कुणी धागा काढतंय का ते. सिरियल बघायचा योग काही येत नाही. पण उत्सुकता आहे की तो का मारतो एवढ्या लोकांना? कुणी बघत असाल तर प्लीज सांगाच.

बापरे! अज्ञात, भयंकर आहे हे. मला इतकी माहिती नव्हती.
शेवटचा खुन डिंपलचाच करेल तो. सरूआज्जी एकदम भारी!

@चिन्मयी
मूळ घटनेतील आरोपी संतोष पोळ हा एक विकृत होता. स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवून त्यांना जीवे मारण्यात त्याला आनंद मिळत असावा. त्यासाठी त्याने आपल्या डॉक्टरी पेशाचा गैरफायदा घेतला. (जो मुळात डॉक्टर नव्हताच.)
पण यातील मुख्य फरक म्हणजे, पैसा मिळवणं हा कधीही प्रायमरी मोटिव्ह नव्हता.

सिरीयलमधील डॉक्टर मात्र पैशाचा लोभी दाखवला आहे, आणि हाच प्रायमरी मोटिव्ह देखील आहे. अनैतिक संबंध हा त्याला जोडणारा एक ट्रॅक. खून जस्टीफाय करण्यासाठी एक नॉर्मल कारण.
एकूणच सत्य हे कल्पनेपेक्ष्या भयानक असतं!

@ गार्गी - सरूआजी आणि तो डिंपलचा भाऊ मजा आणतात. मी रोज बघत नाही, पण आता बघावी वाटतेय.

खऱ्या कथेतील dr पोळ (कंपोंडर) हा वाई मधील एक हॉस्पिटल मध्ये काम करत होता ते हॉस्पिटल जास्त मोठे नाही म्हणजे कम्पोंडर आणि डॉक्टर मधील फरक लपून राहू शकत नाही .
चालक हे दोघे ही डॉक्टर असल्या मुळे बराच वेळ ते हॉस्पिटल मध्येच असतं आणि रोगी शक्यतो तेच तपासात..
पोळ ला फसलेल्या स्त्रिया ह्या गरीब आणि अशिक्षित अशाच होत्या .
आणि तो राहत असलेल्या गावात आणि समाजात त्यांनी त्याचे खरे रूप लपवून ठेवले..
Rti karykarta आहे असा भास निर्माण करून स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये दबदबा निर्माण केला.
त्या मुळे पोलिस नी बऱ्याच वेळा त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले होते.

कालच्या भागाच्या सुरूवातीलाच टोन्या आणि सरू आजीने मजा आणली. मंजुळा वाड्यात ट्युशन घेण्यासाठी येते तेव्हा डॉक्टर दूसरा मासा गळाला लावण्यात बिझी असतो. तेवढ्यात विजय (याची बायको डॉक्टर ची पहिली शिकार असते) दवाखान्यात दारू पिऊन येतो. पण आता डॉक्टरला त्याचा काही उपयोग नसल्याने डॉक्टर त्याला जवळजवळ हाकलून लावतो.
मंजुळाला विजय दिसताच ती काळजीने त्याची विचारपूस करते. पण डॉक्टर ला ते बघवत नाही आणि मंजुळा ने विजयसाठी आणलेल्या डब्यात कसलेसे औषध मिसळतो.
मंजुळा च्या नवर्याला कसला आजार असतो ते काही कळले नाही.

(इथे इतकं काहीतरी लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न! डीजे यांचे सगळे अपडेट्स वाचले आहेत . पहिलं लिखाण असल्याने चुका भरपूर आहेत. पुढच्या वेळी अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करेण.
चूभूद्याघ्या!)

इथे इतकं काहीतरी लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न! डीजे यांचे सगळे अपडेट्स वाचले आहेत . पहिलं लिखाण असल्याने चुका भरपूर आहेत. पुढच्या वेळी अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करेण.
चूभूद्याघ्य) >> Bw

माझं लिखाण असं काय एवढं भारी होतं का..? Proud
मीही तुमच्या सारखाच हळु हळु लिहिता झालो... सिरियलमधे गुंतत जाणं काय असतं हे मी राखेचा२ मधे पुरेपुर अनुभवलं अन त्यामुळेच माझे अपडेटस नंतर नंतर खुलुन येऊ लागले असतील असं वाटतंय..

बादवे, मी ही सिरियल नाही बघत.. अजुनही आमचा गाडा राखेचा मधेच गुंतलाय.. सद्ध्या या टाईमस्लॉट मधे आम्ही राखेचा१ पुन्हा पहात आहोत.. झी युवा युवा युवा वर...! Wink नाईकांच्या वाड्यात्सुन इतक्यात बाहेर येवाक नको असाच अजुनही वाटताहा Biggrin

माझं लिखाण असं काय एवढं भारी होतं का..? >> अरे म्हणजे काय! Happy
तुमचे अपडेट्स खूप भारी असतात. मालिका न बघता ती डोळ्यासमोर उभी राहते!
सिरियलमधे गुंतत जाणं काय असतं हे मी राखेचा२ मधे पुरेपुर अनुभवलं >> अगदी! आता मीसुद्धा तेच अनुभवतेय.
आधी राखेचा १ चं शीर्षक गीत ऐकूनच घाबरले होते मी त्यामुळे तेव्हा नाही पाहता आली आणि आता झी युवा subscribe केलेले नाहीये.
जेव्हा ही मालिका बघाल तेव्हा please अपडेट्स द्या. Happy

कालच्या अपडेटच्या प्रतीक्षेत Happy >>आज टाकणार आहे. Happy

Finally smile takan Jamal watat >> हो :))
कालचा भाग मिस केला मी Sad कोणी पाहीला असेल तर अपडेट द्यावे.

परवाचा भाग :-
मुलांसाठी खाऊ घ्यायला मंजुळा नाम्याच्या मॉलमध्ये जाते तिथे आधीपासून उभ्या असलेल्या बज्याला ती विजय बद्दल विचारते. तेव्हा बज्या तिला रेश्मा बद्दलही ( विजय ची बायको) सांगतो. तो रेश्मा बद्दल सांगत असताना मंजुळाला डॉक्टरांच बोलणं आठवतं. तिला प्रश्न पडतो की डॉक्टर रेश्मा आणि विजय बद्दल इतकं वाईट का बोलत होते?.
नाम्या तिला लग्नाबद्दल विचारू लागताच ती तिथुन काढता पाय घेते..
इकडे वाड्यात शुभंकर राव आधीच मुलांचा अभ्यास घेत असतात ते बघून खुष होऊन ती मुलांना खाऊ देऊ लागते.
तेवढ्यात डॉक्टर तिथे येतो आणि तिच्या हातातली
खाऊची पिशवी हिसकावून घेतो. आणि तिला ऐकवतो की कसं तिने आणलेल्या डब्यामुळे विजयला food poisoning झाल आणि आज ती मुलांना खायला देऊन त्यांच्या जिवाशी खेळत आहे. तसेच तो तिला हे ही ऐकवतो की काल त्याच्यामुळेच विजयचा जीव वाचला. आणि तिला सुद्धा त्याची गरज लागणार आहे.
सरूआजी ते ऐकून बाहेर येते आणि डॉक्टरला चांगलाच खडसावते.
डॉक्टरांच बोलणं ऐकून मंजुळाला वाईट वाटत. तेवढ्यात डॉक्टरांकडून डिसचार्ज घेऊन विजय तिथे येतो आणि तिला सांगतो की डॉक्टर खूप चांगले आहेत वैगेरे.
( हे प्रकरण बघायला मजा येणार आहे कारण डॉक्टर
मंजुळे साठी वेडा झालाय आणि मंजुळा त्याला भाव देत नाहीये. दुसऱ्या प्रकरणात बायका डॉक्टर साठी वेड्या व्हायच्या आणि डॉक्टर त्यंच्या पैशासाठी!)

भारी अपडेट!
आजपासून मी सिरीयल बघणं सोडलं तरी चालेल असं वाटतंय. अपडेट वाचायला मजा येतेय.

Pages