Submitted by सत्यजित... on 29 March, 2017 - 03:28
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले
बोललो नाही कधी पण दुःख तर झाले!
चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली
वार काही काळजाच्या खोलवर झाले!
लागला धक्का असा अन् सांडला पेला...
पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!
या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या
हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले!
तू दिलेली डायरी अन् पीस मी जपले
डायरी आकाश माझे..पीस पर झाले!
व्हायचे असतेच ते होवून जाते पण
नेमके कळले कुठे जे आजवर झाले?
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हायचे असतेच ते होवून जाते
व्हायचे असतेच ते होवून जाते पण
नेमके कळले कुठे जे आजवर झाले?>>>>>> खूप सुन्दर! ! !
लागला धक्का असा अन् सांडला
लागला धक्का असा अन् सांडला पेला...
पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!...,,मस्त
Very unique thought....good one
धन्यवाद!
धन्यवाद!
सुरेख...
सुरेख...
"लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!"
....ह्या ओळी डसल्या