विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 25 May, 2016 - 00:35

कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता
१) पत्रिका पहायचीच आहे
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेका फेकि चित्र्पत अथवला .. अशोक सरफ अनि लक्श्य चा...
कुथे कोन्ति थाप मर्लि आहे ते नोत करुन थेवने जरूरि आहे नहितर असे होते Happy

जो पर्यंत मल अलग्न करायचं नव्हतं तोपर्यंत समोरच्या पार्टीला जे करायचं आहे त्याच्या उलटं मला करायचं असायचं Proud
आता खरी खरी उत्तर :-

१) पत्रिका पहायचीच आहे >> जरुरी नाही.... पण आई बेसिक गोष्टी पहायच्या म्हणून पहाते

२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही -- असं आहे

३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे. -- असं मिळालं तर उत्तम नाही तर काही हरकत नाही

४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे -- आई बेसिक पहाते. मला काही फरक पडत नाही

>>ही आकडेवारी कुठुन काढलीत? <<<
लेमनटेमन जी ही आकडेवारी तारतम्याने तर काढलीच पण अनुरुप सारख्या विवाह मंडळांशी संपर्क साधूनही काढली. अनुरुप चे मासिक ही निघते त्यात असलेल्या स्थळांच्या माहितीवरुन देखील काढली. ही आकडेवारी देशाच्या पातळीवर एकूण लग्न करणार्‍यांच्या संदर्भाने नसून विवाह मंडळांकडे येणार्‍या लोकांच्या पैकी किती ? अशा संदर्भाने आहे. आकडेवारी ही ढोबळ कल्पना यावी यासाठी आहे. जुजबी पत्रिका पहायची आहे हा वर्ग ही यात मोडतो. खर तर ही ढोबळ आकडे वारी आपल्यालाही मान्य आहे हे मला माहित आहे

या धाग्यावरील ज्या लोकांना खरोखर यात रस आहे त्यांनी माझे यंदा कर्तव्य आहे ? हे पुस्तक जरुर वाचावे. तसेच फलज्योतिषा च्या अनुषंगाने काही अनुभव, मते, निरिक्षणे यांची भर घालायची असेल त्यांनी माझ्याशी जरुर संपर्क साधावा
प्रकाश घाटपांडे
डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॉलनी, कमिन्स कंपनीजवळ कोथरुड पुणे ४११०३८
prakash.ghatpande@gmail.com
अवांतर- ही जाहिरात नाही आवाहन आहे. तसेच माझे व्यक्तिमत्व पारदर्शी आहे त्यामुळे नाव पत्ता जाहीर करण्यात मला काही गैर वा असुरक्षित वाटत नाही. माझ्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॉगवर माझा पत्ता आहेच.

>>>> पण अनुरुप सारख्या विवाह मंडळांशी संपर्क साधूनही काढली. ं<<<< Lol
मग तर कल्याणच झाले म्हणायचे.
या अनुरुप बद्दलचा माझा अनुभव, माझे एक स्नेही (मराठवाडी देशस्थ) त्यांच्या मुलाकरता स्थळ् नोंदवायला गेल्यावर त्यांनी स्पष्ट पणे सांगितले की भले तुमचा मुलगा इंजिनियर वगैरे असेल, पण आमच्याकडची येणारि मुलिंची स्थळे "हायफाय" कल्चरमधिल असतात व त्यांच्या अपेक्षाही उच्च दर्जाच्या(?) असतात, ती तुम्हाला झेपणार नाहीत सबब नाव नोंदविण्याचा खर्च उगाच करू नका. Wink ही सत्य घटना आहे.
अशा मंडळांकडुनचि आकडेवारी ग्राह्य मानायची म्हणजे प्रकाशराव, मला तरी अवघडच आहे बर्का.....
अन त्यातुन देशात एकुण होणार्‍या लग्नांपैकी किति लग्ने मंडळे/वधुवर संमेलने/नेटवर ठरवुन/लव्ह करुन होतात, अन किति अ‍ॅरेन्ज्ड असतात हा स्वतंत्र विषय असावा, नाही का? केवळ पुण्यामुंबई सारख्या शहरांत काय घडते यावरुन आख्ख्या देशात काय घडते याचा "अंदाज" लावणे तितकेसे बरोबर नाही असे नाहि वाटत तुम्हाला?

प्रकाश घाटपांडे - ''ही आकडेवारी देशाच्या पातळीवर एकूण लग्न करणार्‍यांच्या संदर्भाने नसून विवाह मंडळांकडे येणार्‍या लोकांच्या पैकी किती ? अशा संदर्भाने आहे. '' >>> त्याला उद्देशून लिंबूटिंबू पुढच्या प्रतिसादांत - ''अन त्यातुन देशात एकुण होणार्‍या लग्नांपैकी किति लग्ने मंडळे/वधुवर संमेलने/नेटवर ठरवुन/लव्ह करुन होतात, अन किति अ‍ॅरेन्ज्ड असतात हा स्वतंत्र विषय असावा, नाही का? केवळ पुण्यामुंबई सारख्या शहरांत काय घडते यावरुन आख्ख्या देशात काय घडते याचा "अंदाज" लावणे तितकेसे बरोबर नाही असे नाहि वाटत तुम्हाला?''

>>> प्रकाश, तुम्हाला एकदा साष्टांग दंडवत घालायचा आहे. समोरच्याचे म्हणणे काहीही न वाचता स्वतःचीच टिमकी वाजवणार्‍यांपुढे प्रतिवाद करायचा म्हणजे अचाट चिकाटी लागते. ते करत राहिल्याबद्दल धन्यवाद!

>>अशा मंडळांकडुनचि आकडेवारी ग्राह्य मानायची म्हणजे प्रकाशराव, मला तरी अवघडच आहे बर्का.....<<
एकतर ते या क्शेत्रात दोन पिढ्या काम करतात व त्यांची तिसरी पिढी ही यात आहे त्यामुळे त्यांच्या निरिक्षणाला दखलपात्र धरायला काहीच हरकत नसावी
>>अन त्यातुन देशात एकुण होणार्‍या लग्नांपैकी किति लग्ने मंडळे/वधुवर संमेलने/नेटवर ठरवुन/लव्ह करुन होतात, अन किति अ‍ॅरेन्ज्ड असतात हा स्वतंत्र विषय असावा, नाही का?<< होय नक्कीच!
>> केवळ पुण्यामुंबई सारख्या शहरांत काय घडते यावरुन आख्ख्या देशात काय घडते याचा "अंदाज" लावणे तितकेसे बरोबर नाही असे नाहि वाटत तुम्हाला?<<
तितकेसे बरोबर नाही हे बरोबर आहे पण तो अंदाज लावण्या साठी प्राथमिक पातळीवर गैर नाही. अगदीच संख्याशास्त्रीय काटेकोर पणा बाळगता नाही आला तरी तारतम्य जसे शितावरुन भाताची परिक्षा!
आन काय हो लिंटी बहुसंख्य लोक एवढ ढोबळ म्हणता येते हे आपल्याला मान्य नाही का? विवाहाच्या वेळी बहुस़ंख्य लोक पत्रिका वा तत्सम गोष्टींना थारा देत नाही असे झाले तर आनंदच आहे.

>>> आन काय हो लिंटी बहुसंख्य लोक एवढ ढोबळ म्हणता येते हे आपल्याला मान्य नाही का? <<<<< मला मान्य होईलही हो.... पण अन्निसवाल्यांचा अशा "ढोबळ" आकडेवारीवर कध्धीकध्धीच विश्वास नस्तोहो... Proud म्हणुन आपले मी हलवुन हलवुन खुंटा बळकट करु पहातोय तुमच्या मुद्द्याचा..... Wink त्यातुन त्यांना अशी "ढोबळ" आकडेवारी सोईस्कररित्या चालणार असेल, तर बाब निराळी, त्यावर मी काय बोलणार बापडा?

>>>>> विवाहाच्या वेळी बहुस़ंख्य लोक पत्रिका वा तत्सम गोष्टींना थारा देत नाही असे झाले तर आनंदच आहे. <<<< माफ करा पण मी दिवास्वप्ने बघत नाही, अन त्यावर आनंदाची शक्यताही व्यक्त करीत नाही. Proud

बाकी "भास्कराचार्य" म्हणतात, तसे तुमच्या "चिकाटीला" नक्कीच सलाम , बर का! Happy

>>>> समोरच्याचे म्हणणे काहीही न वाचता स्वतःचीच टिमकी वाजवणार्‍यांपुढे प्रतिवाद करायचा म्हणजे अचाट चिकाटी लागते <<<<
आमच्या टिमकीचे सोडा हो..... तिकडे "अन्निसवाले " समोरच्यांचे काहीही ऐकुन न घेता एकतर्फी हेकट मतांचे ढोल ताशे घेऊन वाजवित असतात, त्यांच्या गदारोळापुढे आम्हा पामरांच्या टिमकीचे काय घेऊन बसलात? Proud असो.

>>> >>अशा मंडळांकडुनचि आकडेवारी ग्राह्य मानायची म्हणजे प्रकाशराव, मला तरी अवघडच आहे बर्का.....<< एकतर ते या क्शेत्रात दोन पिढ्या काम करतात व त्यांची तिसरी पिढी ही यात आहे त्यामुळे त्यांच्या निरिक्षणाला दखलपात्र धरायला काहीच हरकत नसावी <<<<<

आयला, हे बरे आहे. दोनतिन पिढ्यांचा हाच न्याय लावायचा, तर एक दोन नव्हे तर असंख्य पिढ्यांच्या निरिक्षणे/अनुमानातुन रचलेले कुंडलीज्योतिष/हस्तसामुद्रिक मानायला मात्र हयगय का होते? Proud तीच बाब आयुर्वेदाबद्दलही...

तसे तुमच्या "चिकाटीला" नक्कीच सलाम , बर का! Happy >>> आम्ही दंडवत करत असलो, तरी हा लिंब्या "सलाम" करत असतो, हे पाहून आज फार आनंद होत आहे. Proud Rofl

>>> आम्ही दंडवत करत असलो, तरी हा लिंब्या "सलाम" करत असतो, हे पाहून आज फार आनंद होत आहे <<<<
Proud नेहेमीप्रमाणे अनिलचेंबुर यांचीच ही पोस्ट आहे की काय असे वाटले हो क्षणभर मला ! Lol
मग नाव वाचले, तर "भास्कराचार्य" तुम्हीच आहात होय..... ! Wink

आम्हीच आहोत हो. तुम्ही कितीही गाजावाजा केलात, तरी अधूनमधून असा मराठी संस्कृतीचा ठेका सोडता, मग आम्हाला तो घ्यावा लागतो. Lol

>>>> तुम्ही कितीही गाजावाजा केलात, तरी अधूनमधून असा मराठी संस्कृतीचा ठेका सोडता, मग आम्हाला तो घ्यावा लागतो. <<<< अगदी अगदी......
काय करणार? आजुबाजुच्या "सर्वधर्मसमभावी" संगतीचा परिणाम हो हा, दुसरे काय? मग होते अशी "स्लिप टंग" Uhoh

चांगला नवरा मिळेल हे पत्रिकेतच लिहिलेले असते. मग पुन्हा होणाऱ्या नवऱ्याची पत्रिका बघून कन्फ्युजन कशाला? आपल्याला मिळाला तोच चांगला (किंवा वाईट). आणि सप्तमस्थानात कितीही गुरु शुक्र येऊन बसलेले असले तरी थोडे दिवसांनी चांगला नवरा पण वाईटच होतो!

चांगला नवरा मिळेल हे पत्रिकेतच लिहिलेले अस
>>>>
पत्रिकेत वाचणारयाला गोड वाटावे म्हणून काहीही लिहितात. माझ्या पत्रिकेत दोन बायका लिहील्या आहेत. ते वाचून मला तर लहानपणी खूप आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. पण आता वाटते की हे वाचून माझी गर्लफ्रेन्ड किंवा कुठलीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईन का?

माझे स्वत:चे लग्न ठरवून परंतु रजिस्टर पद्धतीने पत्रिका न पहाता झाले. आमचे लग्न जर पत्रिका पाहून पारंपारिक पद्धतीने करायचे झाले असते तर ज्योतिषांनी" मृत्यु षडाष्टका" मुळे नाकारले असते. माझी वॄषभ रास व बायकोची धनु रास. त्यातही मूळ नक्शत्र. मी पत्रिका पाहायचे नाकारले असल्याने मला तिची कुंडली वा रासही माहित नव्हती.
वधूवरांच्या राशी एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या असतील तर तो षडाष्टक योग
सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. पण ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. मेष- कन्या, वृषभ-धनु,मिथुन- वृश्चिक, कर्क-कुंभ, सिंह-मकर,तूळ-मीन या मृत्यु षडाष्टक असलेल्या राशी होत. काही षडाष्टकांमध्ये दोन्ही राशीचे राशीस्वामी एकच असतात किंवा त्यांची मैत्री असते अशावेळी ती षडाष्टके मृत्यू षडाष्टके न होता प्रीती षडाष्टके होतात व ती ग्राहय धरली जातात. उदा. मेष पासून आठवी रास वृश्चिक त्यामुळे षडाष्टक झाले पण दोहोचा राशीस्वामी मंगळ हा एकच असल्याने मृत्यू षडाष्टक ही विसंगती होईल म्हणून हे झाले प्रीती षडाष्टक. मेष-वृश्चिक, वृषभ-तूळ, मिथुन-मकर, कर्क-धनु, सिंह-मीन, कन्या-कुंभ ही प्रिती षडाष्टके.
विवाह संस्थाच मुळात फार काळ तग धरणार नाही असे आमचे भाकीत असल्याने प्रत्येक लग्नात वधू वरांचा मृत्युषडाष्टक योग आहे
ज्या वर्षी माझे लग्न झाले त्याच वर्षी मला अपघात झाला, त्याच वर्षी हार्ट अटॅक आला जो सुरवातीला डॉक्टरांनाही समजला नाही. आता जर मी त्यात गचकलो असतो तर मृत्युषडाष्टक ही समजूत घट्ट झाली असती. बघा आम्ही सांगत नव्हतो तुमचा विश्वासच नाही. आता जर माझा घटस्फोट झाला तरी वैवाहिक धारणेचा मृत्यु या अर्थाने ही समजूत घट्ट होईलच.

"आमच्याकडची येणारि मुलिंची स्थळे "हायफाय" कल्चरमधिल असतात

त्यांना खरे म्हणजे "पाश्चात्यांच अनुकरण करण्यात जास्त पटाइत" असे म्हणायचे असेल , तसे म्हणता येत नाही म्हणुन मग असे काहीतरी म्हणायचे

त्यांना खरे म्हणजे "पाश्चात्यांच अनुकरण करण्यात जास्त पटाइत" असे म्हणायचे असेल>>>>>
साधारण, तसे नाही. त्यांना तुलना मराठवाडा व पुण्यामुंबईकडील स्थळे असा फरक निदर्शनास आणायचा आहे.

वादावादीत किंवा निर्णय घेण्यात जो माघार घेतो तो चांगला नवरा" असं मागच्या आठवड्यातील होम मिनिस्टर कार्यक्रमातील महिलांनी सांगितलं. पत्रिका गेली चुलीत.

घाटपांडे, तुमच्या पत्रिकेत जो योग होता तसेच झाले. तुमची आयुष्याची दोरी बळकट होती म्हणुन तुम्ही सहीसलामत बाहेर पडलात. ती दोरी त्याच काळात नाजुक असती तर कदाचित काही वाईट झाले असते.

मागे एके ठिकाणी वाचले होते की पत्रिकेत वैधव्ययोग असेल तर लग्न जमवताना पत्रिकेत दीर्घायुष्य असलेल्या मुलाला पसंती द्यावी. असे केल्याने दोघेही म्हातारपणापर्यंत सहजीवन अनुभवु शकतात व ७० च्या पुढे गेल्यावर कोणीतरी एक आधी जाणार हे स्विकारलेले असते. तेव्हाही जोडीदार नसल्याचे दु़:ख असतेच पण तारुण्यात जोडीदार गेल्याचा त्रास जास्त होतो.

दोघांच्याही पत्रिकेत असा योग असल्यास काय??? नात्यात एक जोडपे आहे, दोघांचेही पहिले जोडीदार गेले व हा पुनर्विवाह आहे. बघु त्यांच्या बाबतीत दैव काय करते.

पत्रिकेवर विश्वास ठेवणे न ठेवणे व्यक्तीगत निर्णय आहे. मी एक सावधगिरी म्हणुन पत्रिका पाहिन. पण जेव्हा काही वाईट घडायचे असतेच तेव्हा पाहायची बुद्धी होत नाही हे पाहिलेय. Sad

साधना, माझे लग्न 1992 ला झाले. पाच महिन्याने मोटरसायकल अपघात व आठ महिन्यांनी हार्ट अटॅक. लग्नाच्या अगोदर बायकोने पत्रिकेत वैधव्य योग आहे अशा आशयाचे एका ज्योतिषाने सांगितल्याचे मला सांगितले होते. मी मूळात फलज्योतिष चिकित्सक व त्यातून अंनिस मधे सक्रिय असल्याने ती बाब मी धुडकावून लावली. आता लग्नाला 32 वर्षे झाली. मुलीच लग्न हे मात्र पारंपारिक / धार्मिक पद्धतीने झाले. अर्थात ते तिच्या मताप्रमाणे झाले. माझी मते मी लादली नाहीत. वधूपिता म्हणुन धार्मिक विधी मी केले देखील.
वैज्ञानिक दृष्टीकोनात अनिश्चितता पचवणे याला मोठे महत्व आहे. एखादी शक्यता माझ्या वाट्याला किती येवू शकते याचा विचार करणे स्वीकारले की अनिश्चितता स्वीकारावी लागते. आजही मी स्वत:चा अंत वा नात्याचा अंत या अनिश्चितता स्वीकारतो. प्रत्यक्ष तोंड देणे अवघड असते हे मान्य. सश्रद्धांना श्रद्धेचा आधार तरी मिळतो. आम्हाला तो ही नाही.

"त्यांना तुलना मराठवाडा व पुण्यामुंबईकडील स्थळे असा फरक निदर्शनास आणायचा आहे."

मुळात हा निर्णय दोन कुटुंबातला असतो . ह्यांचे काम नोन्द करणे एव्हढेच आहे. ते त्यानी करायला हवे. सन्केत स्थळावर, कोण नोंदणि करु शकतो ह्याच्या काही नियम, अटि, मार्गदर्शन आहे का?

हायफाय ची त्यांची व्याख्या काय आहे ? दुसरे , जर मराठवाड्यातिल व्यक्ति म्हणालि ओके, आम्ही पण "हायफाय" आहोत , तर मग काय करणार.
काही परिक्षा वगैरे घेणार कि काय ?

लग्नाच्या अगोदर बायकोने पत्रिकेत वैधव्य योग आहे अशा आशयाचे एका ज्योतिषाने सांगितल्याचे मला सांगितले >>>>

माझ्या दोन्ही आज्या, आई, मावशी, २ वहिन्या, १ मावस बहिण या सगळ्यांनी त्यांचे नवरे गमावले. काहींनी वृद्धापकाळात तर काहींनी पन्नाशीच्या आत. या सगळ्यांच्या पत्रिकेत वैधव्ययोग होता असे समजावे का? यापैकी एकही लग्न पत्रिका पाहुन झाले नाही, यातल्या तिघींनी स्वपसंतीने प्रेम विवाह केले.

मला पत्रिकेबाबत अ‍ॅकॅडेमिक उत्सुकता आहे पण अभ्यासाची कुवत नाहिये.

परदेशात लोकं पत्रिका पाहत नाहीत म्हणून घटस्फोट जास्त होतात.>>>>>>>>बोकलत, असे गंभीरपणे मानणारे लोक पण आहेत. आपल्याकडे सुद्धा लग्न जुळण्यापेक्षा टिकेल कि नाही या भीतीने पत्रिका पहाणारे वाढलेत

आपल्याकडे सुद्धा बहुतांशी लग्न म्हणजे गुण जुळवण्यावर भर असतो. लग्न ठरवते वेळी वरपांगी पत्रिका न बघता सर्व बाजूंनी खोलात जाऊन बघितली जात नाही किंवा फार कमी वेळा बघितली जाते.

पत्रिकेव प्रत्यक्ष विश्वास ठेवून पत्रिका पाहणारे कमीच असावेत. एकनाड नाही ना आणि षडाष्टक योग नाही ना वगैरे जुजबी पाहत असतील फार तर.
पत्रिका ही "नाही म्हणायला एक कारण" म्हणूनच पाहिली जाते असं माझं मत आहे.

बाकी आमच्याकडे लग्नं पत्रिका न पाहताच झाली आहेत. तसे जोडीदारही मिळाले हे नशीब! ह्यात मागून गंमत म्हणून तपासल्यावर एक-नाड असणे, अज्जिबात गूण न जुळणे वगैरे गमती झालेल्या आहेत. पण जोड्या मुलाबाळांसकट नांदत आहेत.

पत्रिका ही "नाही म्हणायला एक कारण" म्हणूनच पाहिली जाते असं माझं मत आहे >>> कधी कधी पत्रिकेवर विश्वास नसणारे लोकही या कारणासाठी पत्रिका मागतात. वधु-वर पसंत नाही हे सांगून ऑफ़ेन्ड करण्याऐवजी पत्रिका जुळली नाही हे सांगणे लोकांना सोपे वाटते.

सश्रद्धांना श्रद्धेचा आधार तरी मिळतो. आम्हाला तो ही नाही.>>> या वाक्याला आक्षेप, तुम्हीही सश्रद्ध व्हा...आपण अश्रद्ध आहोत हे एकदा स्विकारल की बाकी उसासे टाकुन याला कसा अ‍ॅडव्हान्टेज आहे आम्हाला कसा नाही ह्याला काही अर्थ नाही..

मृत्यु षडाष्टक योग आमचा सुद्धा आहे. पण अजून कोणी मरायला तयार नाही. घरच्यांनी दोन चार ठिकाणी पत्रिका दाखवली होती. त्यातले काहींनी लग्न करूच नका असा सल्ला दिला. तर एकाने मस्त झाडाशी लग्न करायचा उपाय सुचवून पैसे कमावून घेतले. कुठल्या तरी खड्याची अंगठी सुद्धा खपवली. कारण मला मरणाचा धोका जास्त होता. पण ती मी कधीच घातली नाही. घरच्यांचे सुद्धा ठिक आहे. हाच योग असलेले काका लग्नानंतर मुले अगदी लहान असतानाच अपघातात गेले होते. त्यानंतर काही वर्षानी काकी सुद्धा अपघातातच गेल्या होत्या. त्यामुळे असे समज घट्ट होतात हे बरोबर आहे. आणि आमच्यात कोणी मेले नाही तर त्या झाडाच्या लग्नाने वाचवले असा समज घट्ट होईल Happy

प्राजक्ता,ऎडव्हांटेज म्हणून नव्हे पण एक विश्लेषण म्हणून पाहिले की चिकित्सकांना श्रद्धेचा आधार मिळत नाही. यावर मी माझ्या एका सायकियाट्रेस्टच्या अनुभवावर एका प्रतिक्रियेत लिहिले आहे. श्रद्धा ठेव असे म्हटल्याने ती बसत नसते. ती आतून यावी लागते.

तर एकाने मस्त झाडाशी लग्न करायचा उपाय सुचवून पैसे कमावून घेतले.>>>>>>>>>>>२००७ मधे जेव्हा अभिषेक बच्चन चे लग्न झाले त्यावेळी ऐश्वर्या रायला मंगळ दोष असल्यानं ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न फार काळ टिकणार नाही असं बोललं गेलं होतं. त्यामुळे ज्योतिषाच्या सांगण्यानुसार ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न करण्याआधी एका झाडाशी (बहुतेक पिंपळ) लग्न केलं जेणकरुन मंगळ दोषाचा प्रभाव संपेल अशी ती कल्पना.त्यावेळी मिडियाला तो खमंग विषय मिळाला होता. बिग बींच्या घरात अंधश्रद्ध वगैरे. अंनिसच्या लोकांनी त्याचा निषेधही केला होता हे मला स्पष्टपणे आठवतय. आता २०२४ मधे ऐश्वर्या व अभिषेक यांच्या वैवाहिक जीवनात कुरुबुरी चालू आहेत त्यामुळे त्यांचा घटस्फोटाच्या बातम्याही चघळल्या जातात.
माझ्या एका चुलत आजोबांनी ही तिसरे लग्न तुळशीशी केले होते. हे सगळे तोडगे आहेत

ह्या षडाष्टक जोड्यांत काहीतरी इन्कन्सिस्टन्सी दिसते आहे. म्हणजे मेष - कन्या हे जर आहे (मेष पासून सहावी रास, मेष पहिली पकडून), वृषभ-तूळ पण त्याच लॉजिकने बरोबर आहे, तर मग कर्क-कुंभ हे का? कर्क - धनु का नाही?

हा षडाष्टक प्रकार राशींचं 'चक्र' पाळत नाही का? म्हणजे सुरुवातीच्या राशीपासून सहावी रास निवड्त चला. मेष - कन्या, कन्या - मीन, मीन - सिंह, सिंह - मकर, मकर - मिथून, मिथून - वृश्चिक, वृश्चिक - मेष : अश्या जोड्या होऊन साधारण निम्म्या राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात. असंच आठ राशींच्या गॅपचंही होईल.

माझ्या मावशीच्या पहिल्या मुलीचे लग्न त्यांनी नुसती पत्रिका जुळवुन केले. लग्नानंतर मुलगा लगेच त्वचेच्या विकाराने आजारी पडला. हे आजारपण जवळपास १०-१२ वर्षे टिकले. त्यानंतर तो बरा झाला. पण त्याचे करता करता मुलीचे स्वतःकडे, खाण्यापिण्याकडे खुप दुर्लक्ष झाले. तो बरा होतोय इतक्यात ही आजारी पडली, इतकी की कंबरेपासुन लुळीच पडल्यासारखी झाली. खुप प्रयत्न करुन ती त्यातुन बाहेर आली. बाहेर यायला तिला ४-५ वर्षे लागली. आता दोघेही बरे आहेत, एकत्र कुटूंबात आहेत, पण तरुणपणात संसारसुख लाभले नाही, मुलबाळ झाले नाही. तिला अजुनही विकनेस आहे, जास्त वेळ उभे राहणे वगैरे जमत नाही. तिच्या मोठ्या दिराच्या हॉस्पिटलात ती रिसेप्शनवर काम करुन वेळ घालवते. स्वतःचेच हॉस्पिटल असल्यामुळे तिला हवे तेव्हा ती आराम करु शकते, रजा घेऊ शकते.

ज्यानी पत्रिका जुळवुन दिलेली त्यांच्याकडे मावशीने परत दोघांच्या पत्रिका दाखवल्यावर तिला सांगण्यात आले की नुसते गुण तर कुणाचेही जुळतात. ते नक्षत्रांवर असते. नशिबी संसार सुख आहे का हे पत्रिकेत पाहिले पाहिजे, ते नसले तर गुण जुळून काही उपयोग नाही. आणि मावशीने आणलेल्या पत्रिकांमध्ये संसारसुख नव्हते. त्यामुळे गुण जुळले तरी संसार चांगला झाला नाही असे तिला सांगण्यात आले.

ह्या अनुभवामुळे मावशीने नंतरच्या दोन्ही मुलांची लग्ने करताना पत्रिकेत नीट संसार सुख लिहिलेय का हे पाहुनच लग्न करायचे असे ठरवले. तश्या पत्रिका मिळेपर्यंत दोन्ही मुलांनी तिशी पार केली. पण दोघांचीही लग्ने झाली एकदाची आणि अपेक्षेप्रमाणे स्थळे मिळाली. धाकट्या मुलीला दोन मुले आहेत. मावशीच्या मते ती नवर्‍याबरोबर सुखात आहम, घरचेही चांगले आहेत. मुलाचे लग्न त्याच्या पस्तिशीत झाले पण मावशीच्या मते सुन हवी तशी मिळाली. आता कधी मधी सुनेच्या कुरबुरी ऐकवते मला पण तितके तर असतेच.

तर मग कर्क-कुंभ हे का? कर्क - धनु का नाही?>>>>>> कर्क -कुंभ हे मृत्यु षडाष्टक व कर्क -धनु हे प्रिती षडाष्टक अशी विभागणी केली आहे. कर्केचा राश्याधिपती चंद्र हा कुंभेचा राश्याधिपती शनि चा शत्रू आहे. व धनुच्या राश्याधिपती गुरुचा चंद्र हा मित्र ग्रह आहे. गंमत म्हणजे गुरुचा चंद्र "मित्र" असला तरी चंद्राचा गुरु हा" सम" आहे. अशी अनेक भन्नाट लॉजिक फलज्योतिषात आहेत. ३६ गुण जुळणे सुद्धा वाईट कारण टू गुड इज टू बॆड

>>>>> श्रद्धा ठेव असे म्हटल्याने ती बसत नसते. ती आतून यावी लागते.
प्रघा कंडिशनिंग आणी भित्रेपणातून श्रद्धा जन्म घेते. स्वतः विचार न करणे यातून खतपाणी मिळुन ती फोफावते असा अनुभव आहे. बाकी सध्या देवाचे करायला वेळ नाही - पण ढिम्म फरक पडत नाहीये. मलाच माझा संशय येऊ लागलाय की आपण संधीसाधू सश्रद्ध आहोत की काय. देवाचे विनासायास झाले तर झाले. गाजराची पुंगी वाजली नाही तर मोडून खाल्ली.

>>>> कर्क -धनु हे प्रिती षडाष्ट
शरद उपाध्ये यांचे आहे. बायको कर्क ते स्वतः धनु.
---------
माझे धनु लोकांबरोबर फार पटते. विशेषतः धनु लग्न, सूर्य किंवा चंद्र. मस्त ऑप्टिमिस्टिक, सकारात्मक लोकं असतात.

कर्क -कुंभ हे मृत्यु षडाष्टक व कर्क -धनु हे प्रिती षडाष्टक अशी विभागणी केली आहे >> हो, पण त्याला काय लॉजिक आहे? ६वी रास असेल तर मृत्यू आणि ८वी असेल तर प्रीती हे इतर जोड्यांत आहे ना, मग या जोडीत उलट का बरं?

मग या जोडीत उलट का बरं?>>>> ६ व्या वा ८ व्या स्थानातील असलेल्या राशीस्वामी ग्रहांचे मित्र शत्रुत्व वा समत्व याच्या तो संबंध जोडला आहे. वर च्या प्रतिसादात ते लिहिले आहे. काही ठिकाणी ज्योतिषाच्य तर्कशास्त्रानुसार पण लॉजिक बदलते

सश्रद्धांना श्रद्धेचा आधार तरी मिळतो. आम्हाला तो ही नाही>>
असेच काहीसे मत सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये लिहिले आहे. हे वाचून असा प्रश्न पडतो की अशी व्यक्ती द्विधा मनस्थितीत तर नाहीये, आस्तिक व्हावे का असे विचार तिच्या मनात अधुन मधुन/नियमित येत असावेत. असे काही आहे का तुमच्या बाबतीत?

दुसरे असे की सश्रध्द लोक कठीण प्रसंगी कमी विचलीत होतात, अधिक खंबीरपणे तोंड देऊ शकतात असे पहाण्यात नाही. हे अर्थात व्यक्ती सापेक्ष आहे, पण घरी व नातलगांत, मृत्यू व इतर त्याही पेक्षा कठीण प्रसंग आले त्यावरून हे निरीक्षण. आता यातही जे सश्रद्ध लोक जास्त विचलीत झाले ते अश्रद्ध असते तर अजूनच विचलीत झाले असते असा युक्तिवाद करता येईल, त्याला उत्तर नाही. कुणाची श्रद्धा अचानक काढुन घेतली तर त्या व्यक्तीच्या मनस्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल.

पण लहानाचे मोठे होत असताना विचारपूर्वक अश्रद्ध झालेल्या व्यक्तीच्या मनात कठीण प्रसंगी किंवा त्याची कल्पना केली असताना "सश्रद्ध लोकांचे एक बरं असतं...." असा विचार का यावा?

श्रद्धा ठेव असे म्हटल्याने ती बसत नसते. ती आतून यावी लागते.>>> ऑफ कोर्स! मी ते उपहासाने म्हटले होते.

पण लहानाचे मोठे होत असताना विचारपूर्वक अश्रद्ध झालेल्या व्यक्तीच्या मनात कठीण प्रसंगी किंवा त्याची कल्पना केली असताना "सश्रद्ध लोकांचे एक बरं असतं...." असा विचार का यावा?>>> हा विचार बहुतेक अश्रद्ध लोकाच्या मनात येत असतो.

चर्चा आवडली.
घरातले वातावरण कर्मनिष्ठ असले की सश्रद्ध जरी असलो तरी श्रद्धेचा आधार वाटत नाही, असते पण आधारबिधार वाटत नाही. कारण ते भ्रामक वाटू शकतं. आपलं आपल्या आईवडीलांवर प्रेम असतं पण आईवडील वृद्ध झाल्यावर त्यांचा आधार वाटत नाही/ किंवा थोडा वाटला तरी तशी अपेक्षा ठेवणं पटत नाही.

एका मर्यादेपर्यंतच आधार शोधणं रिअलिस्टिक आहे, पुढे तुम्ही भ्रमिष्ट/ परावलंबी होत जाता मग ते श्रद्धा असो, व्यक्ती असो वा सोशल मीडिया. अशाने श्रद्धेचा सुद्धा मूळ उद्देश हरवतो. रोज उठून पुन्हा शोधावी लागत असेल आणि ती 'अप्लाय' करता येत नसेल तर काय उपयोग. फोन आणि चार्जर थोडीच आहे. एखादं स्तोत्र वाचून थोडा वेळ प्रसन्न वाटू शकतं पण त्याने विवेक येत नाही. आता श्रद्धेचा उपयोग फक्त दैनंदिन प्रसन्नतेसाठी करायचा आहे का विवेकासाठी- स्थितप्रज्ञतेसाठी हे फक्त ज्याचं त्यालाच माहीत. त्यात श्रद्धा किती आणि भीती किती आहे हा देखील संशोधनाचा विषय ठरेल. एखाद्याला इतरांच्या श्रद्धेचा 'हवा तसा' वापर करून घेता येतो पण ते बरेचदा चुकीचंच असतं ते कदाचित यामुळेच. कारण चार्जर रोज 'विकता' येतं, फोन नाही. Happy

"सश्रद्ध लोकांचे एक बरं असतं...." असा विचार का यावा?>>>>>>>>> खर तर यावर वेळोवेळी आनुषंगिक प्रतिसाद दिले आहेत. पण जगण्यासाठी केवळ वैज्ञानिक दृष्टीकोन हा आयुष्यभर पुरेसा आहे असे मला वाटत नाही.काही लोक असे असू शकतात की ज्यांना देव, श्रद्धा या संकल्पनेच्या आधाराची आयुष्यभर गरज पडली नाही. काही लोक देव वा श्रद्धा या संकल्पनेचा गरजेपुरताच ( संकट काळी) आधार घेतात पण त्यात अडकून पडत नाही. ( स्वार्थी लेकाचे! ) काही लोक सर्वकाही सुरळीत चालले आहे पण हे असेच चालू राहील याची खात्री नाही तेव्हा सुखाच्या प्रसंगी सुद्धा देवाची आठवण ठेवतात व कृतज्ञता व्यकत करतात.
यावरुन एक आठवण आली.मध्यंतरी बी प्रेमानंद जे अब्राहम कोवूर यांच्या चळवळीचा वारसा चालवणारे एक निरिश्वरवादी ( विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी) चिकित्सक कार्यकर्ते. त्यांच्या आजारपणात शेवटच्या दिवसात एक अशी अफवा / बातमी पसरली कि त्यांनी ईश्वराची संकल्पना मान्य केली/ इश्वर मानला. त्यामुळे काही स्केप्टिक लोकांनी त्यांचे एक स्टेटमेंट घेतले की मी ईश्वर मानीत नाही व त्यांची सही घेतली व ते पत्रक प्रसिद्ध केले.( आता मला त्याचा दुवा देता येणार नाही पण मला मेल आले होते) त्यानंतर ते गेले. खर तर अशा विकलांग अवस्थेत स्टेटमेंत घेणॆ याला तसा अर्थ नाही.
नास्तिकतेच्या टप्प्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्‍यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते. ईश्वर मानणारा तो अंधश्रद्ध अशी ती थेट मांडणी आहे. ईश्वर ही अवैज्ञानिक संकल्पना जो मानतो तो विज्ञाननिष्ठ तर नाहीच नाही पण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाराही नव्हे.
मानवीय नास्तिक मंच याचाच शब्दोच्छल होउन सामाजिक तडजोड म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती तयार झाली. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या.
ईश्वर या संकल्पनेच्या विविधते मुळेच ईश्वर टिकून आहे.
एसेम जोशी,ग.प्र.प्रधान , राम बापट असे अनेक विचारवंत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सश्रद्ध झाले होते असे त्यांच्या लेखनात दिसते.

Pages