नकटीच्या लग्नाला यायचं हं... - झी मराठीवरील नवी मलिका

Submitted by योकु on 1 January, 2017 - 21:26

नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते योकु प्रोमो बघतात आणि ताबडतोब ( दुसरा कोणी काढायच्या आधीच ) धागे काढतात .. +१
त्या त्या धाग्यावर तुमचे स्वत:चे प्रतिसाद मात्र बघितल्याचे आठवत नाही...+१

नाय मी झीत काम नाही करत पण प्रोमो पाहिल्याबरोब्बर धागा काढून घेतो.
यानन्तर शिरेल नाही पाहीली तरी चालतेच, इथे धाग्यावर आलं की सगळी प्रोग्रेस कळतेच, वर पिसं असल्यानी वाचायला मजा!

तसही माबोवर पडिक तर असतोच... Wink

योकु खरंच तुम्ही झी वर काम करता कि काय ?>>पोटापाण्याच्या ठिकाणाची कुणि पिस काढेल का? काहितरच तुमच, योकु, मन लावुन सिरियली बघतो किवा पिस काढण्यात मजा वाटत असावी. >>> सध्याच्या दिवसात प्रसिद्धी चांगली-वाईट कशीही असली तरी चालते. झी वाले मुद्दाम त्यांच्या मालिका मराठी संस्थळावर चर्चेत ठेवत नसतील कश्यावरून?

माझ्या शंकेचे कारण हे आहे >>>> आणि त्या त्या धाग्यावर तुमचे स्वत:चे प्रतिसाद मात्र बघितल्याचे आठवत नाही...

मला तर ही आधीपासूनच मिस्टर योगी सारख्या फॉर्मॅट ची मालिका वाटत होती. तशीच असेल तर पाहायला मज्जा येणार.

तद्दन आचरट मालिका वाटतेय प्रोमोज वरून तरी...
प्राजक्ता ने एका प्रोमो मध्ये घेतलेला उखाणा तर अगदीच भिकार आहे.

त्यावर ते 'वाजव की' डोक्यात जातंय. :रागः

हो ना...प्रत्येक प्रोमोत काय.. "वाजवू की!"....अन तेही प्राजक्ताच्या वरवरच्या उथळ आवाजात...! आणि किती जनता भरलीए....... गाळ तोही!

प्राजक्ताच्या उखाण्यात निदान र ला र तरी जुळवा कि यार
पुष्कर प्रसाद विश्वास येतील सारे भर भर
आणि नकटीला नवरा शोधतंय सार घर
असं काहीतरी . साध र ला र , ट ला ट सुद्धा जुळवता येत नाही लेखकूला Sad

प्राजक्ता दिसते पण वाईट. मेकअप तेलकट झालाय तिचा .
त्या लाल ड्रेस मध्ये किव्वा एकंदरीत खूप तेलकट दिसते

ती थोराड पण वाटतेय जास्त. मि. योगी लिमिटेड एपिसोडसची होती आणि मोहन गोखले रॉक्स, ही लिमिटेड एपि. असेल तर ठीक, नाहीतर पकाऊ होणार.

वाजव की' डोक्यात जातंय. >>> मम. हास्यपण कृत्रिम वाटतं मला तिचं. फक्त आवाज गोड आहे तिचा पण जाऊदे मला नाही आवडत ती.

Kadachit pushkar shotri , prasad oak ani kunitari vishwas yeyil tila baghayala ani ti tyana reject karel mag nakta yeyil , ukhanyavarun tas vatale mala

मि. योगी लिमिटेड एपिसोडसची होती आणि मोहन गोखले रॉक्स, ही लिमिटेड एपि. असेल तर ठीक, नाहीतर पकाऊ होणार. >>+१
मि. योगी १३ भागाची होती त्यामुळे ती मालिका खुप आवडली होती. या नविन मालिकेत मोठे कुटुंब , परंपरा (त्यात उखाणा , लग्नरिती वगैरे आले), वाडा पाडुन नवीन ईमारत बांधण्यात ह्या सगळ्या गोष्टीमुळे कमित कमी १३० भाग तरी होतिल आणि त्यात सगळी मजा निघुन जाईल.

मिस्टर योगी (योगेश इश्वरभाई पटेल) नावाचा मुलगा अमेरिकेतुन भारतात मुली बघायला येतो. प्रत्येक भागात तो एका नवीन मुलीला बघतो पण त्याला काही योग्य मुलगी मिळत नाही. कधी मुलीचे सुत आधीच जमलेले असते, कधी मुलगी खुप उंच असते, कधी विचार जुळत नाहित वगैरे वगैरे. शेवट काय झाला ते आठवत नाही.

मि. योगीमधे दर आठवड्याला एकेका राशीची मुलगी यायची. सर्वात मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली अहमदाबादचा बिलीयर्डसपटू गीत सेठी, त्याची बायको. तिने एका एपिसोडमध्ये काम केलं होतं.

ती प्राजक्ता फारंच थोराड वाटते आणि डोक्यात गेली माझ्या. कोणीतरी फ्रेश चेहेरा घ्यायचाना. नीरज अभिजीत आमकर आहे, त्याची चौथी सिरीयल ही. झीवर पहीलीच. तो किती लहान वाटतो तिच्यापुढे. त्याला गृहीत धरुन लग्न ठरवतायेत. कीती उतावीळपणा तो, त्याला कोणी विचारलंच नाहीये.

मला वाटतं शेवटी त्याच्याशीच लग्न होईल की काय? त्याची गफे ब्रेक अप करेल किंवा हळूहळू एकेक जण येतील, तर त्याला आवडायला लागेल की काय ती.

चुकभुल द्यावी घ्यावी नाही बघितली.

प्राजक्ताची आता बघेन असं नाही, एकतर खूप पात्रांची गर्दीपण आहे त्या मालिकेत. कदाचित शेवटी नकटा म्हणून ललित प्रभाकरला आणतील लग्नासाठी.

कदाचित शेवटी नकटा म्हणून ललित प्रभाकरला आणतील लग्नासाठी.>>>> असे असेल तर मस्तच, शोभतात ते दोघे एकमेकांना

जर खरच तो आला तर त्यापुढे मी पाहीन ही शिरेल

नीरज (अभिजीत आमकर) - चेहरा खूपच ओळखीचा आहे त्याचा. कुठे पाहिलाय ते आठवत नाही.

लग्नाची आणि प्रेमाची अशा दोन-दोन बायका - हे जरा अतीच कै०च्या-कै वाटलं Uhoh

आणि ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं’ या म्हणीवर आधारित शीर्षक घेऊन (घेतल्यामुळे) सगळे तिला सारखे नकटू, नकटू म्हणतायत. ते पण ओ.ता. वाटलं.

प्राजक्ताच्या उखाण्यात निदान र ला र तरी जुळवा कि यार
पुष्कर प्रसाद विश्वास येतील सारे भर भर
आणि नकटीला नवरा शोधतंय सार घर
असं काहीतरी . साध र ला र , ट ला ट सुद्धा जुळवता येत नाही लेखकूला :(>>>>

प्राजक्ता मस्त दिसली कालच्या भागात... नवथर अवखळ वधूची भूमिका उत्तम निभावली तिने. पंचाहत्तरीवाली आजी मात्र डोक्यात गेली.
तो भटजी म्हणजे भूषण धुपकर... तोच त्या लताकाकूला बोलवायला उठतो तो सीन चांगला वाटला.
बाकी मालिका सो सो. पण प्रत्येकवेळी नवा बकरा येणार असेल तर बघायला बरी वाटेल. पंचेस मात्र नवे आणा बुवा.

अंकुश, भरत, जीतू, मक्या, येतील प्रसाद पुष्कर
स्वप्नील, सुबोधही येतील, नवरोबा शोधतंय आमचं घर

र ला र जुळवलाय की नीट!

हि सिरियल भंगार असणार हे दिसतच आहे.
कुठल्या काळातील आहे हा प्रश्ण पडतो. प्राज्क्ता माळी बुटकी आणि थोराड वाटते. ( तशी मूळातच ती बुटकी आहे प्रत्येक्षात).
लग्नासाठी इतक कोणीही उतावीळ नसतं पण सिरियल गावातली आहे तेव्हा काहीही दाखवतात.

त्या दुसर्‍या सिरियलने ( चूक भूल ....) सुद्धा इतका भ्रम निरास केला.....

नीरज (अभिजीत आमकर) - चेहरा खूपच ओळखीचा आहे त्याचा. कुठे पाहिलाय ते आठवत नाही.>> कलर्स मराठीवरच्या? सिरियल मध्ये होता ना हा. सिड नाव होतं त्याचं. सिरियलच नाव आठवेना मला आता. मी बरेचदा बघायचे ती सिरियल. छान काम करायचा.

बघूया. काॅमेडी असेल असं वाटतंय. पहिल्या भागावरुन तरी. काॅमेडी असली तरच बघणार आहे मी.

Pages