Submitted by बाळ पाटील on 5 December, 2016 - 16:45
बाकी सारे शब्दांचे विषयांतर होते
अश्रू केवळ मौनाचे भाषांतर होते
जर का सोबत नसते तुझिया नजरेचे धन
उरले जीवन ठरलेले गंडांतर होते
काळ असाही आला म्हणजे झुलवत नेतो
दिवसाकाठी भासे एक युगांतर होते
बोलायाचे होते पण मग नव्हते सुद्धा
भाव तिचेही भोळे एक समांतर होते
आत्म्याचा तो एक खुबीने जपता यावा
नश्वर बाकी देहाचे धर्मांतर होते
_बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षकात मोनाचे ऐवजी मौनाचे
शीर्षकात मोनाचे ऐवजी मौनाचे आणि गझलेत भोंळे ऐवजी भोळे हवे का?
>>> अश्रू केवळ मौनाचे भाषांतर
>>> अश्रू केवळ मौनाचे भाषांतर होते
फारच छान !
>>>>अश्रू केवळ मौनाचे भाषांतर
>>>>अश्रू केवळ मौनाचे भाषांतर होते
फारच छान !<<<< सहमत!
नश्वर बाकी देहाचे धर्मांतर होते<<<< मस्त
सचिनजी,गिरिशजी धन्यवाद!
सचिनजी,गिरिशजी धन्यवाद! !
बेफिकीरजी धन्यवाद!
वाह
वाह