Submitted by जयन्ता५२ on 18 July, 2009 - 14:00
ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे
म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे
निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे
विनासंचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?
----------------------------------------------------------
जयन्ता५२
गुलमोहर:
शेअर करा
झक्कास
झक्कास ...................
अजूनी धुंद
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
>> खास एकदम
वा! खूप सही
वा! खूप सही गझल!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/
सुंदर
सुंदर
अजूनी धुंद
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे >>>> मस्त.. !!
जयंत, तुमच्या गझलांमधली वृत्त आणि शब्दांची कारागरी मला नेहमी आवडते..
मात्र..
म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?
इथे थोडं अडखळायला झालं. अर्थात ह्यात माझ्या कवितेबद्दलच्या अज्ञानाचा जास्त दोष आहे..
अजूनी धुंद
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे... बहोत खूब!
मक्ताहि उत्तम, अर्थवाही आहे!
-मानस६
व्वा ! मस्त
व्वा ! मस्त गझल! जहराचा शेर खुप आवडला!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
छानच... ***** गण
छानच...
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
व्वाह !
व्वाह ! मस्त गझल....जहराचा शेर तर खासच.
आवडली
आवडली
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
वा ! मस्तच
वा ! मस्तच आहे.
धनु.
वाह
वाह !
परागकण
छान आहे
छान आहे गझल
म्हणे ते
म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
छान.
संपूर्ण
संपूर्ण ग़ज़ल आवडली.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
खासच !
खासच !
जयंतराव,
जयंतराव, फारच नशीली गझल.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!
वाह! मस्तच!
वाह! मस्तच! जहर बेस्ट!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
क्या बात
क्या बात है!!
वा! मस्त
वा! मस्त आहे.
मस्त
मस्त गजल!
आमची दाद इथे ऐका!
जीवघेणे
जीवघेणे मक्ते आणि संपूर्ण गजलच !
उगा ना
उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे
>>>>>> सुरेख !!!
...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...
अभिनंदन !!! जुलै महिन्यातली
अभिनंदन !!! जुलै महिन्यातली सर्वोत्तम कविता म्हणुन निवड झाल्याबद्दल!!
धनु.
ऋतू न्याराच ह्या नगरात
ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे<<<<<<<< हे सर्वात जास्त आवडले. कमी शब्दात अजून एक सून्दर गझल.
अभिनंदन
खुपच छान! अभिनंदन !!! जुलै
खुपच छान!
अभिनंदन !!! जुलै महिन्यातली सर्वोत्तम कविता म्हणुन निवड झाल्याबद्दल!!
अप्रतिम!! सर्वच शेर
अप्रतिम!! सर्वच शेर खास!!
अभिनन्दन.. !!!
अप्रतिम गझल!! सर्वोत्तम
अप्रतिम गझल!!
सर्वोत्तम कवितेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!:स्मित:
विरोधाभास छानच रंगवला आहे.
विरोधाभास छानच रंगवला आहे. वास्तववादी.
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे
निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे
=सुंदर.
अभिनंदन.
फारच सुंदर गझल आहे.अभिनंदन
फारच सुंदर गझल आहे.अभिनंदन
Pages