इथे तर पानगळ बहरात आहे

Submitted by जयन्ता५२ on 18 July, 2009 - 14:00

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विनासंचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

----------------------------------------------------------
जयन्ता५२

गुलमोहर: 

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
>> खास एकदम

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे >>>> मस्त.. !!

जयंत, तुमच्या गझलांमधली वृत्त आणि शब्दांची कारागरी मला नेहमी आवडते..
मात्र..
म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

इथे थोडं अडखळायला झालं. अर्थात ह्यात माझ्या कवितेबद्दलच्या अज्ञानाचा जास्त दोष आहे.. Happy

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे... बहोत खूब!
मक्ताहि उत्तम, अर्थवाही आहे!
-मानस६

व्वा ! मस्त गझल! जहराचा शेर खुप आवडला!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

छानच...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

व्वाह ! मस्त गझल....जहराचा शेर तर खासच.

आवडली Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

वाह !

परागकण

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

छान.

संपूर्ण ग़ज़ल आवडली.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

जयंतराव, फारच नशीली गझल.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!

वाह! मस्तच! जहर बेस्ट!

---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

मस्त गजल!
आमची दाद इथे ऐका!

जीवघेणे मक्ते आणि संपूर्ण गजलच !

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे
>>>>>> सुरेख !!!

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे<<<<<<<< हे सर्वात जास्त आवडले. कमी शब्दात अजून एक सून्दर गझल.

अभिनंदन Happy

खुपच छान!
अभिनंदन !!! जुलै महिन्यातली सर्वोत्तम कविता म्हणुन निवड झाल्याबद्दल!!

विरोधाभास छानच रंगवला आहे. वास्तववादी.

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे
=सुंदर.

अभिनंदन.

Pages