सगळे ग्रूप म्यूट करून पाहिले
नोटिफीकेशन बार क्लियर केले
मेसेजेसना उत्तरं दिली
सगळं अनिवार्य म्हणून स्वीकारलं
पण
ही रुखरुख का जात नाही ?
पसारा करून पाहिला
पसारा आवरून पाहिला
स्वतःच्याच अवतीभोवती रेंगाळून पाहिलं
विचार करता करता सगळे दात कोरून झाले..
पण
ही रुखरुख का जात नाही ?
धुवायला दिलेल्या कपड्याच्या खिशात
जशी विसरावी महत्त्वाची चिठ्ठी
तसं काहीतरी विसरलंय
काळ खूप खेळून जातो म्हणतात-
उद्या त्या चिठ्ठीतली अक्षरं बदलतील
मलाच ओळखू येणार नाहीत
आवेग ओसरला की गोष्टींचे अर्थ बदलतात
असं काहीतरी होऊन
बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.
आणि हे जाणवून अजून अस्वस्थ वाटायला लागेल
मग त्या अस्वस्थतेवरची एखादी नवी कविता
पुन्हा एखाद्या कपड्याच्या खिशात ठेवली गेली तर ?
काळ खूप खेळून जातो म्हणतात..
ही रुखरुख का जात नाही ?
--सुशांत..
वा वा मस्त आणि नेमकी वळणे
वा वा मस्त आणि नेमकी वळणे (कलाटण्या) घेत घेत सुंदर प्रवास घडवते आहे कविता
शेवट प्रचंड अस्वस्थ करणारा !!
अभिनंदन ! सुंदर कवितेसाठी ...आणि धन्यवादही
धन्यवाद वैवकु.
धन्यवाद वैवकु.
कविता आवडली.
कविता आवडली.
मराठीने अजून पाहिलेच काय आहे
मराठीने अजून पाहिलेच काय आहे असे वाटवणारी रचना! किती थेट आणि किती इंपॅक्टिंग!
पण छंदातच लिहा असा आपला एक सल्ला! उगाचच समजा हवे तर!
सुंदर! फार आवडली. ... मगर जो
सुंदर! फार आवडली.
... मगर जो खो गई वो चीज क्या थी?
धन्यवाद समीरजी, बेफिजी,
धन्यवाद समीरजी, बेफिजी, स्वातीजी.
बेफिजी, खरंतर छंदातच लिहिण्याची ओढ आणि आवड आहे. पण ही एक कविता अशाच फॉर्मॅट मधे थेट सुचली आणि तशीच प्रकाशन्याचा मोह झाला.
... मगर जो खो गई वो चीज क्या थी? << वहीच तो ढुंड रहा हूं..
सुंदर कविता... बेफिंशी इथे
सुंदर कविता...
बेफिंशी इथे असहमत.... मुक्तही लिहा... छंदातही लिहा... सर्व प्रकारात लिहा...
यात्री नक्कीच. मी तुमच्याशी
यात्री
नक्कीच. मी तुमच्याशी सहमत आहे.
Thank you all.
Thank you all.
मस्त. आवेग ओसरला की गोष्टींचे
मस्त.
आवेग ओसरला की गोष्टींचे अर्थ बदलतात >>
मस्त कविता आहे!
मस्त कविता आहे!
सुरेख लिहिलय सुशांत. जस्त
सुरेख लिहिलय सुशांत. जस्त सुचेल तस, पण असं आतुन येणार, फारस रुपकात्मक नसलेल लिहा. छंदातच असल पाहिजे वगैरे अस काही नाही.
>>काळ खूप खेळून जातो
>>काळ खूप खेळून जातो म्हणतात..
ह्म्म्म्म...
>>काळ खूप खेळून जातो
>>काळ खूप खेळून जातो म्हणतात..
ह्म्म्म्म...
वाह!
वाह!
बिनमहत्त्वाची वाटू नये ती
बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.>> हे सगळ्यात आवडलं!
आवडली
आवडली
वा वा, किती थेट आणि नेमक
वा वा, किती थेट आणि नेमक लिहिल आहे.
छंदाच्या मागे लागुन कविता भरकटतात. उगाच यमकांंचा मोह होत राहतो चारोळ्यांचे घाणे निघतात. तू गझल उत्तमच लिहितोस त्यामुळे प्रश्नच नाही. अनेक शुभेच्छा
>>>छंदाच्या मागे लागुन कविता
>>>छंदाच्या मागे लागुन कविता भरकटतात<<< हो क्का?
ही कविता वाचलेलीही दिसत
ही कविता वाचलेलीही दिसत नाहीये. छंदामुळे कविता भरकटत नाहीत ह्याचे उत्तम उदाहरण आहे ही कविता!
http://www.maayboli.com/node/53188
सुशांत,
ह्यातील काहीही तुम्हाला उद्देशून नाही.
सहीये..मस्तच....
सहीये..मस्तच....
आवडली कविता!
आवडली कविता!
आवडली
आवडली
सही!
सही!
इथले लाडिक हट्ट आणि उद्दाम
इथले लाडिक हट्ट आणि उद्दाम सरसकटीकरण वाचून थक्क झाले.
सुशांत, तुम्ही प्रगल्भ लिहिता. तुमची अभिव्यक्ती अशा प्रतिसादांमुळे गढूळ करून घेणार नाही अशी आशा करते.
छान कविता... आवडली.
छान कविता... आवडली.
अरे वा? दुसरा एक कोणीतरी
अरे वा? दुसरा एक कोणीतरी चांगले लिहितो हे सगळ्या जगाने आधीच ठरवलेले असताना पुन्हा एकदा ठरवायचा आणि त्याचे इतर लेखन वाचायचा वेळ मिळाला हे उत्तम झाले.
खूप दिवसांनी असलं जिवंत
खूप दिवसांनी असलं जिवंत वाचायला मिळालं. धन्यवाद.
रुखरुख आवडली ... रुखरुख लागून
रुखरुख आवडली ...
रुखरुख लागून राहिली ....
खूप खूप आभार मायबोलीकर्स..
खूप खूप आभार मायबोलीकर्स..
यानिमित्ताने मायबोलीवर पोस्टायला एक वेगळाच हुरूप आलाय.
Pages